तोंड दाबून मुक्क्यांचा मार
( जलदलेखन स्पर्धा - नोव्हेंबर 2025 )
( सत्य कथा)
भाग-1
शांताताई स्वयंपाकघरात उभी होती.
धुराने भरलेल्या त्या छोट्या घरात ती रोजच्या प्रमाणे चूल पेटवत होती.
धुराने भरलेल्या त्या छोट्या घरात ती रोजच्या प्रमाणे चूल पेटवत होती.
अंगावरच्या जुन्या साडीचा पदर तिने नाकावर धरला, पण तरीही डोळ्यांतून पाणी आलं. ते फक्त धुरामुळे नव्हतं — आतल्या वेदनांचंही होतं.
शांताताई नावाप्रमाणेचं शांत, संयमी, मेहनती होती.
तिचा नवरा गणपत — गावातल्या मिलमधला कामगार.
रोज कामावरून थकून येतो, पण रोज घरी दारू पिऊनचं यायचं हा त्याचा नित्यक्रम.
संध्याकाळी घरी आला की ओरडणं, शिव्या, कधी हात उचलणं — हे शांतेच्या आयुष्याचं रोजचं चित्र.
पण तरीही ती कधी कुणाकडे काही बोलली नाही.
“आपलं घर आहे, आपली माणसं आहेत,” असं म्हणत ती सगळं मनात दाबून ठेवायची.
शांताला दोन मुलं होती,
मोठा मुलगा संतोष - दहावीला होता, आणि धाकटी सुषमा - पाचवीला होती.
मुलांपुढे काही वाईट दाखवू नये म्हणून शांता नेहमीच हसून सगळं झाकून टाकायची. रात्रीचा मार, सकाळचं हसू हे तिचं रोजचं झालं होतं.
गावातल्या बायकांना सगळं माहीत होतं.
त्या नदीवर शांता कपडे धुवायला गेली की गप्पा मारताना म्हणायच्या,“अगं शांताताई काहीच बोलत नाहीसं कां! एवढा मार खात असूनही गप्प कां बसतेसं!” शांता त्यांच्या बोलण्यावर गप्प राहायची.
त्या नदीवर शांता कपडे धुवायला गेली की गप्पा मारताना म्हणायच्या,“अगं शांताताई काहीच बोलत नाहीसं कां! एवढा मार खात असूनही गप्प कां बसतेसं!” शांता त्यांच्या बोलण्यावर गप्प राहायची.
कुणी हळहळायचं, तर कुणी टीका करायचं —
“आपल्याला काय? तिला आवडतं तसे राहू दे!” असं बोलून मग बायका गप्प बसायच्या.
पण कोणीच कधीच तिच्या दारात येऊन विचारलं नाही, “काय झालं?” नवरा- बायकोचं होतं भांडण असं बोलून सगळी निघून जातं असतं.
शांतेला समाजाची नजर समजली होती.
इथे जो रडतो, त्याला सहानुभूतीपेक्षा टोमणे जास्त मिळतात. म्हणूनच तिने ओठ बंद ठेवले, आणि मनातले घाव लपवले.
एका दिवशी गणपतने कामावरून पैसे आणले नाहीत.
“मिल बंद होती” असं सांगून तो रात्रभर दारू प्यायला गेला. त्यानंतर तीन दिवस सतत दारू पिऊनचं राहू लागला.
चार दिवसांनी घरचा किराणा संपला, मुलांच्या फीची वेळ आली.
शांतेने तिचा एकुलता एक दागिना सोन्याचं मंगळसूत्र सावकाराकडे गहाण ठेवलं, आणि तिने मुलांची फी भरली.
संतोषला जेव्हा हे समजलं, तेव्हा त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो शांताला म्हणाला “आई, बाबा असं का करतात गं? तू एवढी सहन का करतेस?”
शांता फक्त म्हणाली —
“बाळा, कधी कधी माणूस स्वतःच्या रागात बुडतो, आपण त्याला ओढून बाहेर काढायचं काम करायचं. मार खाल्ला तरी चालेल, पण घर मोडू नये.”
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा