तोंडावर गोड आणि माघारी...२

कथा मालिका
दुजाभाव २

घरच्यांचा खोटेपणा उघडकीस येईल का?
पाहुया पुढे...

दोन तीन दिवसांनी अजितचा राग हळूहळू कमी होऊ लागला. पण तरीही पुर्णपणे राग गेला नव्हता.

उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्याने सगळेजण आले होते. प्रेरणाचा बराच वेळ स्वयंपाक घरात जाऊ लागला. साहाजिकच सईकडे दुर्लक्ष होऊ लागले. प्रेरणाला फार वाईट वाटायचे.‌ तरीही ती दुर्लक्ष करायची.

दोनच दिवसांनंतर आणखी एक घटना घडली.
संध्याकाळी सगळेजण फिरायला जाणार होते. आधी देवळात जायचे. मग चाट खाऊ असा प्रोग्राम ठरला. छोट्या सईला सुध्दा कळले की सगळेजण फिरायला जात आहे. तिने प्रेरणाकडे हट्ट करून छान तयार झाली.

"आई तू पण चल ना !"

सईने खूप हट्ट केला म्हणून ती सुध्दा तयार झाली.

तेवढ्यात, "प्रेरणा ए प्रेरणा."

"आलेच आई. तयार झाली मी."

"हे काय तू कुठे येतेस?"

"तुमच्या सोबत."

"अजित घरी आल्यावर त्याला जेवायला कोण देणार ? आणि आमच्या जेवणाच काय? तू आमच्या सोबत येण्याची गरज नाही. तू रात्रीच्या स्वयंपाकाच बघ.‌"

प्रेरणा नाराज झाली. कारण तरीही मनावर संयम ठेवून ती ठीक आहे म्हणाली.

"पण आई सईचे काय?

सई स्वतः ची सॅन्डल घालून तयार होती.

तेवढ्यात अजितचा फोन आला आणि प्रेरणा फोनवर बोलत असतांनाच...

"आजी, आत्या थांबा मी पण येत आहे."

"प्रेरणा कुठे चालले सगळे?" अजित

"गार्डनमध्ये!"

"मग घरी कोण आहे? एक काम कर किल्ली बाजूला ठेवून जा तुम्ही. मला यायला तसाही वेळच होणार आहे. "

"आता ही ब्याद कशाला पाहिजे आमच्या सोबत."

"आई काय बोलता तुम्ही?"

"ए मला शिकवू नको."

प्रेरणा आई कोणाला बोलत आहे. प्रेरणाच्या डोळ्यात अश्रू आले.

"नाही कोणाला नाही."

अजितचा फोन आला आहे. हे त्यांना माहीत नव्हते. प्रेरणा बोलणे ऐकू जाऊ नये म्हणून नेहमीप्रमाणे म्यूटचे बटण दाबायला गेली तर चुकून तो स्पीकर वर झाला आणि त्याला सगळा आवाज गेला.

"ए बाई सांभाळ तुझ्या कार्टीला. आम्ही फिरायला जात आहोत. तुझ्या मुलीला सांभाळायला नाही. 'काय ते रूप' ! 'काय तो तोरा' मायलेकीचा. आम्हाला जोर‌ नाही तुझ्या मुलीला सांभाळायचा. ही अशी काळी रुपवान मुलगी देण्यापेक्षा ती जन्मालाच नसती आली तर बर झाल असत."

"तू आणि सई घरीच थांबा. तू स्वयंपाक करूंन ठेव. आम्ही जाऊन येतो."

इकडे सगळेच निघाले. पण सईला नेले नाही. त्यामुळे सईने भोंगा पसरला. जोरजोरात रडायला लागली." आजी मला ने. आत्या ,दादा मला पण यायच."

पण तिच्याकडे सपशेल दुर्लक्ष करून सगळेजण निघून गेले.

फोन चालूच होता. प्रेरणा सुध्दा विसरली होती फोन कट करायचा. प्रेरणाने सईला बळजबरीने उचलून घरात आणले. तिला समजावून सांगू लागली. आपण पप्पा आले की फिरायला जाऊ. तेव्हा आपण कोणालाच नेऊ नाही. पण बालहट्ट तो. तिच्या समोर सगळेच फिरायला गेले त्या दोघींना सोडून.

सई मात्र खूपच त्रास देऊ लागली. खूप रडू लागली, हट्टीपणा करु लागली होती. त्यामुळे प्रेरणाचाही राग अनावर झाला आणि तिने सईला फटके दिले. त्यामुळे सई आणखी रडायला लागली.

अजितने सगळ फोनवर ऐकलं होत. तो घरी उशीरा जाणार होता. पण प्रेरणाची आणि तिची अवस्था बघून तो ताबडतोब ऑफीसमधून घरी निघाला.

काही वेळा नंतर सई रडून रडून दमली आणि झोपी गेली. प्रेरणा सुध्दा स्वयंपाकाला लागली. स्वयंपाक करून ती एकटीच खोलीत अंधारात बसली होती.

जवळपास दीड तास झाला होता. सगळ्यांची ती वाट बघत होती.

अजितला सगळ कळतय का?...

©® अश्विनी मिश्रीकोटकर







🎭 Series Post

View all