तोंडावर गोड आणि माघारी....३

कथामालिका
दुजाभाव ३

घरातील सगळेजण प्रेरणा आणि सईला सोडून गार्डनमध्ये निघून जातात.

पुढे.....

प्रेरणा सगळ्यांची वाट बघत असते. जवळपास साडेआठ वाजता बेल वाजली.

प्रेरणाला वाटले आले बहुतेक..

दारात अजितला बघून तिला आश्चर्य वाटले.

"अहो, तुम्ही ! तुम्ही तर अकरा वाजेपर्यंत येणार होता? "

"पाणी देतेस ?"

"हो"

"सई झोपली वाटतं?"

"हो"

अजितपाणी प्यायला आणि सरळ सई जवळ गेला. सईच्या नाजूक गालावरचे वळ बघून त्याला लक्षात आले की प्रेरणाने तिला किती जोरात मारले ते. त्याने कपाटातून मलम काढला आणि सईच्या गालावर लावला. तिला स्वतः च्या कुशीत घेऊन ती थोपटवू लागला. सोबतच रडून रडून प्रेरणाचेही डोळे लाल झालेले त्याने बघीतले.

"अहो, साॅरी. मी अशा पध्दतीने सईला मारायला नको होते. मला माफ करा."

"प्रेरणा हे काय करतेस? आपल्या चार पाच वर्षाच्या नाजुक सईला या पध्दतीने.....अशी पायावर डोक ठेवून माफी वगेरे मागण्याची गरज नाही तुला."

त्याने सईला गादीवर झोपवले.

"जेवायला वाढतेस का?"

"सगळ्यांसाठी नाही थांबत. येतच असतिल घरी‌."

"नको. आपण दोघ सोबत जेऊ."

"नाही. मी थांबते सगळ्यांसाठी. चांगले वाटणार नाही मी आधी जेऊन घेतले ते. आईसुद्धा ओरडतील."

"साॅरी."

"कशासाठी?"

"नाही, काही नाही."

"ठीक आहे. मी पण थांबतो थोडावेळ."

अजितचे बदलेले रूप बघून प्रेरणा घाबरली. अचानक अजित तिच्या जवळ आला. त्याला बघताच तिच्या डोळ्यात अश्रू आले.

"अग का रडतेस?"

"मी खरच चुकले. सईवर असा राग काढायला नको होता."

"हे बघ आता विचार करून काहीच उपयोग नाही. फक्त यापुढे मारू नको ग तिला. आपली छकुली आहे ना ती. मी आहे आत. सगळे आले की बसू जेवायला."

माझ्या वरचा राग गेला नाही बहुतेक असा विचार प्रेरणा करत होती. प्रेरणा काही बोलणार तेवढ्यात सगळेजण आले.

डायनिंग टेबलवर तिने जेवणाची आधीच तयारी केली होती.

"प्रेरणा एवढा मोठा स्वयंपाक ! " शलाका

"सगळेच जेवणार आहेत ना?"

"छे ! मला तर बाबा बिलकुल भुक नाही. बाहेर एवढं पोटभर खाल्ले आहे की मला काहीच नको आता. " प्रेरणाची नणंद अनिता बोलली.

"आई बाबा तुम्ही जेवणार ना !"

"नको... मला भुक नाही. आईला विचार आता तू."
नारायणराव

"आई बसा तुम्ही वाढते जेवायला. हे पण..."

"ए बावळट. एवढा मोठा स्वयंपाक कोणी करत का?"

"पण तुम्ही तर सगळे जेवणार होता ना?"

"अग मामी बाहेर गेल्यावर आम्ही भेळ खाल्ली , मिसळपाव, पाणीपुरी, पावभाजी असं भरपूर खाल्लं आहे. त्यामुळे मलाही भुक नाही. दहा बारा वर्षांचा अर्णव बोलून गेला.

"प्रेरणा स्वतः ची अक्कल काय गहाण ठेवली आहे का ? तू आपली पुढे पुढे करते आणि ती सई पण करते तशीच." शलाका

"बावळट कुठल्या." अनिता

मायलेकी सारख्याच नुसत्या. तिघी जणी तिला हसू लागल्या.

घरात अजित आल्याच कोणालाच माहीत नव्हतं. त्यामुळे अजित सगळ ऐकत आहे. याचा विचारही मनात आला नाही कोणाच्या.

तेवढ्यात सई उठली आणि बाहेर आली. खोलीत अंधार असल्याने तिने सुध्दा अजितला बघीतले नव्हते.

" आजी...."

अजित आता सईचे बोलणे ऐकू लागला.

चौघा मुलांच्या हातात फुगे होते. काही खेळणी होती.

आता सई परत हट्ट करणार? हे प्रेरणाच्या लक्षात आले.

"दादा मला पण फुगा दे ना ?"

"ए, चल हो तिकडे. तुझ्या साठी आम्ही काहीच आणले नाही. हे आमच आहे सगळ." अर्णव

"आजी तू मला सोबत पण नेले नाही आणि काहीच आणले पण नाही."

आपल्या चिमुरड्या सईच्या मनात असेही विचार येतात. तिला सगळ समजत. अजित तिचे बोलणे ऐकू लागला.

"ए बाई तू हो बाजूला. प्रेरणा तुला कितीदा सांग ना हिला आमच्या पासून दूर ठेवत जा म्हणून. काळी मांजर मेली. माझ्या पोराच रूप घ्यायच गोर गोमट तर ते नाही. आईच्याच रंगावर गेली." सुमनताई

परत सईने रडायला सुरुवात केली. मला फुगा पाहिजे. प्रेरणाने तिला स्वतः च्या कुशीत घेऊन स्वयंपाक घरात गेली आणि डब्यातून एक चाॅकलेट दिले. तेव्हा कुठे ती शांत झाली.

"चला खूप थकायला झाले. झोपा आता." सुमनताई

सगळेजण झोपायला ‌निघून गेले. आवाज शांत झाला आणि अजित बाहेर आला.

"अहो, बसा जेवायला."

"पोट भरल माझं प्रेरणा." डोळ्यात आलेले पाणी पुसत होता.

"अहो उपाशीपोटी झोपू नये. मी सुध्दा थांबली आहे ना."

"तुम्हा दोघींना अशा लोकांमध्ये‌ मी रोज सोडून जातो. पण आता तसे होणार नाही. मी निर्णय घेतला आहे."

"म्हणजे? काय करणार आहात?"

"समजेल सगळ लवकरच . वाढ जेवायला. मी जर जेवलो नाही. तर तुझ्या घशाखाली सुध्दा घास उतरणार नाही. "

आता अजित काय निर्णय घेणार. याची चिंता प्रेरणाला सतावत होती.

©® अश्विनी मिश्रीकोटकर


🎭 Series Post

View all