Login

तूच माझं जग...(भाग २)

कथामालिका

तूच माझं जग ‌..२

शर्वरी कबीरचे स्वप्न बघत होती. शर्वरी आणि कबीरचे प्रेम फुलते की नाही.
पाहुया पुढे...

शर्वरी पटकन आवरून ती महाविद्यालयात जाते. वाचनालयात जाऊन अभ्यासाची काही पुस्तके काढायची होती.

शर्वरी वाचनालयात पोहचते. तिथे कबीर अगोदरच आलेला असतो.

"साॅरी."

"नाही मी साॅरी."

दोघांचाही एकमेकांना धक्का लागला आणि हातातली पुस्तके पडली. दोघेही लायब्ररीत जाऊन पुस्तके शोधत होती आणि अचानक एकमेकांचा धक्का लागला. हातातली काही पुस्तके खाली पडली. दोघांचीही नजरानजर झाली आणि प्रेमाचा बाण एकमेकांच्या काळजात घर करून गेला. ती फक्त हसली.

"हाय, मी कबीर."

"हॅलो, मी  शर्वरी."

"फस्ट यिअर स्टुन्डट."

"हो."

"मी सेकंड यिअर."

"अच्छा. चल मी येते. बाय."

"मिस शर्वरी." पण तिच्या कानावर आवाज गेलाच नाही. नेमकं त्या दोघांचेही  पुस्तके अदलाबदली झाली होती. पण शर्वरी थांबलीच नाही. सरळ तिच्या वर्गात निघून गेली. कबीरने ते पुस्तक उघडले. तर एक
कागद बाहेर पडला.

स्वप्नांचे उंच मनोरे
बांधून ठेविले उराशी
वाटचाल नव्याने केली
थबकून गेली जराशी...

"वा! मस्त.  शर्वरी कविता सुध्दा करते वाटते." त्याने तो कागद स्वतः जवळ ठेवला आणि तिचे पुस्तक परत करण्यासाठी तिच्या वर्गाकडे निघाला. लेक्चर सुरू होण्यासाठी दहा मिनिटे वेळ होता. तो सरळ तिच्या वर्गात गेला.

कबीर एका श्रीमंत घरातला मुलगा. उंचपुरा, स्मार्ट होता. कबीर तसा मेहनती आणि उत्साही होता. अभ्यासात हुशार आणि  खेळातही उत्तम. स्वतंत्र विचारांच्या समुद्रात तो नेहमीच राहायचा. त्याचे कुरळे केस आणि सतत  डोळ्यांवर ठेवत असलेला काळा चष्मा त्याच्या  देखणेपणात भरच टाकत होता. तो काॅलेजमध्ये 'कूल' नावाने ओळखला जायचा.  त्याच्या रुबाबदारपणामुळे अनेक मुली त्याच्यावर जीव ओवाळून टाकत होत्या. आजपर्यंत अनेक मैत्रिणींच्या गोतावळ्यात तो  वेळ घालवायचा. पण शर्वरीची नकळत झालेली पहिली भेट त्याच्या  काळजात घर करून गेली. इतक्या चांगल्या घरातल्या मुलींपेक्षाही तो शर्वरी कडे आकर्षित झाला होता. शर्वरी सुध्दा कबीरला बघीतल्यापासून त्यांच्या प्रेमात पडल्याचे स्वप्न बघत होती.

शर्वरीने सुरूवातीला कबीर कडे दुर्लक्ष केले. पण कबीरने तिच्यात विशेष  रुची दाखवायला सुरुवात केली. कारण शर्वरी एक वेगळीच मुलगी होती. पहिल्या पावसाच्या सरीसारखी. क्षणभरासाठी मृदगंधाचा सुवास मनाला भुरळ पाडणारी.
तर कबीर एका श्रीमंत  घरातला मुलगा आणि  ती अगदीच सामान्य परिस्थितीमध्ये जगणारी. तिचे राहणीमान अगदी साधे होते. तसेच तिचे विचार सुध्दा. फारशी कोणातही जास्त मिक्स न होणारी ती कबीरच्या मैत्रीत मात्र गुंतून गेली. जणू इंदधनुच्या सप्त रंगाची उधळण होत आहे असे तिला वाटत होते. ती स्वतः च्याच विचारात गुंतली होती. तेवढ्यात कबीर वर्गात आला. शर्वरी आणि कबीरची नजरानजर झाली.

"मिस शर्वरी..."
परंतु कबीरला बघताच...

"हे कबीर," काही मुलींनी त्याच्या भोवती गराडा घातला.

पण तो "साॅरी, प्लीज एसक्युज मी." असे म्हणत शर्वरी जवळ  पोहोचला.
शर्वरी त्याच्याकडे बघतच राहिली.

"हॅलो, मिस शर्वरी." शर्वरीचे लक्षच नव्हते. कबीरने  तिच्या समोर चुटकी वाजवून  तिची तंद्री भंग केली.
"काय झालं? "

"मिस शर्वरी. माझे आणि तुझे पुस्तक अदलाबदल झाले आहे.

"ओ साॅरी. माझे लक्षच नव्हते. हे घ्या. तुमचे पुस्तक."

त्याच्या स्पर्शाने ती मोहरून गेली. क्षणभरासाठी तिला ते आवडले. पण लगेचच स्वतः ला सावरले. मुलींच्या गराड्यातून कसाबसा कबीर त्याचे पुस्तक घेऊन बाहेर  पडला. शर्वरीचे लक्ष मात्र कबीर कडेच होते. त्यांचे अबोल प्रेम सुरु झाले होते. कबीर आणि शर्वरी तारुण्याच्या अशा उंबरठ्यावर उभे होते की प्रेम, आकर्षण, स्पर्श, रुसवा असे‌ विविध पैलू त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून दिसत होते.

दोन तीन दिवसांनंतर ...
"हाय, शर्वरी! कसं चाललंय तुझं स्टडी?" त्यांची  दुसरी भेट परत  ग्रंथालयातच झाली.

"एकदम छान" शर्वरी  म्हणाली.

"तू खूप हुशार आहेस. मागच्या टेस्टमध्ये सर्वाधिक मार्क्स घेतलेस, हैट्स ऑफ!" कबीर तिचं कौतुक करत म्हणाला.

शर्वरीच्या गालांवर हलकंसं गुलाबी छटा उमटली. ती लाजत म्हणाली, "थँक यू!"

"पण तुला कसं कळलं?"

"ते सोड. आता यापुढे काहीही मदत लागली तर ये बंदा हाजिर है।"

त्यानंतर त्यांचे संवाद वाढत गेले. कबीर नेहमी काही ना काही कारणाने शर्वरीला भेटायचा. हळुहळु त्यांच्या भेटीगाठी वाढल्या होत्या. अनेकदा अभ्यासावरून त्यांच्या मध्ये  चर्चा होऊ लागली. अभ्यासासोबत ते अनेक कार्यक्रमात सहभागी होऊ‌ लागले. बघता बघता त्यांची घट्ट मैत्री झाली. कधी महाविद्यालयाच्या आवारात एखाद्या झाडाखाली बसून गप्पा मारत. तर कधी कॅन्टीनमध्ये जाऊन बसत. दोघांनाही एकमेकांशिवाय आता करमत नव्हते.  कबीरला  तिच्या सोबत जास्तीत जास्त वेळ घालवावा वाटत होता.

परंतु शर्वरीला आठ वाजेपर्यंत होस्टेलमध्ये परत यावेच लागत होते. फक्त रविवारी तेवढी सुट मिळत होती. त्यामुळे जेवढा जास्त वेळ मिळेल तेव्हा ते दोघेही एकत्र वेळ घालवत होते. त्या दोघांची मैत्री मात्र काही जणांच्या डोळ्यात खुपत होती. पण कबीर तिकडे दुर्लक्ष करत होता. पण कबीरच्या मनात शर्वरी विषयी साॅप्ट काॅर्नर होता.

त्याचा जीवलग मित्र कबीरला सारखा समजावत होता.
"कबीर, काय चाललंय तुझं? रिया सारखी तुझी गर्लफ्रेंड असतांना आणि त्यात तू एवढा श्रीमंत. तर त्या सो कॉल्ड मुलीमध्ये का गुंतत चालला आहे?"

"अरे, राज चिल्ड. शर्वरी खरोखरच एक चांगली मुलगी आहे. तिची  साधी  राहणी आणि तिचे विचार. खूप चांगले आहे."

"काय म्हणतोस यार. मग तू  रियावर करतो ते प्रेम खरे की शर्वरीवर करत असलेले."

"अरे, मी खरंच शर्वरीवर प्रेम करतो माझे शर्वरीवर खरे प्रेम आहे ."

"कबीर तू शर्वरीला लवकरात लवकर  प्रपोज कर. म्हणजे तिलाही तुझ्या प्रेमाची प्रचिती येईल. पण रियाचे काय? तिला काय सांगशील? ती सगळ एक्सेट करेल? "

"अरे, राज तुला माहिती आहे ना. रिया माझ्या आयुष्यातून केव्हाच दूर गेली आहे. जाऊ दे. मला तुझी आयडिया  फार आवडली. राज, चला मी तयारीला लागतो."

कबीर खूप आनंदात होता. त्याच्या प्रेमाचे फुलपाखरु आता उंच भरारी घेणार होते. त्याच्या मनातले भाव तो कवितेच्या रुपात शर्वरी समोर सांगणार होता.

पाहुया पुढच्या भागात....

© अश्विनी मिश्रीकोटकर
अष्टपैलू लेखन स्पर्धा २०२५
प्रेमकथा

🎭 Series Post

View all