तूच माझं जग...३
एके दिवशी कबीरने तिला बाहेर भेटायला बोलावले. ते दोघेही रोज भेटत असले तरी त्यांची ही भेट अनोखी होती. कबीरने तिला एका कॅफे मध्ये नेले. छानशी कोल्ड कॉफी ऑर्डर केली आणि मग हळुच तिला प्रपोज केले. अचानक कबीरने गुलाबाचे फुल समोर केले.
"शर्वरी, हे तुझ्यासाठी."
घडलेल्या या प्रसंगाने शर्वरीने चमकून पाहिले.
"शर्वरी, हे तुझ्यासाठी."
घडलेल्या या प्रसंगाने शर्वरीने चमकून पाहिले.
"कबीर"
"काय झालं शर्वरी?"
"मी तुला फुल दिलेले आवडले नाही का?"
"अरे, तसं नाही. पण अचानक हे फुल वगैरे.... "
"अगं, ही आपल्या प्रेमाची परीक्षा आहे."
"म्हणजे? तू माझ्यावर प्रेम करतोस?
"हे बघ शर्वरी, तू जेव्हा पासून या महाविद्यालयात आली ना! तेव्हापासूनच पहिल्या नजरेत मला तू आवडायला लागली.
"पण मला नाही आवडले. कारण कबीर आपण फक्त चांगले मित्र आहोत. मी कधी तुला त्या नजरेने बघीतलेच नाही. हे नवीन नातं मी स्विकारू शकत नाही."
"शर्वरी, एक सांगू तुला. प्रेमाची परिभाषा मला सांगता येत नाही आणि ते फिल्मी डायलॉग तर मुळीच मी मारणार नाही. पण मला तुझ्याविषयी काहीतरी फिलींग आहे ग. म्हणून सांगतोय ."
"साॅरी कबीर. पण मला माझ्या ध्येयापासून विचलित व्हायचे नाही. अरे, आई बाबांनी खूप मोठ्या आशेने मला इथे शिकायला पाठवले आहे आणि मी इथे हे असं प्रेम करत बसू ! ते शक्य नाही."
"शर्वरी, मी कुठे म्हणतोय की प्रेम करत बसायचे. अगं, आपले ध्येय खूप मोठे आहे. खूप शिकायचे आहे. छान नोकरी करायची आहे. खोट्या प्रेमाच्या आणाभाका, वचन नाही देत आहे मी."
"कबीर सोड माझा हात. तुला काय वाटलं मी तुझ्या रुपाला भाळले."
"अगं शर्वरी, असं काय करते? माझ्या समोर मुलींची रांग लागलेली असतांना सुध्दा मी तुझ्या प्रेमात पडलो."
"मग नको पडू ना माझ्या प्रेमात. मला माझं स्वतः च आयुष्य आहे आणि माझं एक स्वप्न आहे आणि तू माझा एक चांगला मित्र आहे."
"अगं. मी काय म्हणतो ते ऐकून तर घे एकदा."
"कबीर, प्लीज. माझ्या सारखी गरीब घरची मुलगी. जिच्या भविष्यात फक्त आणि फक्त अंधार आहे. उद्याच्या दिवसाचा अंदाज नाही. त्यामुळे तुझ्या सारख्या श्रीमंत मुलाची आणि माझी कुठलीच आणि कोणत्याच ॲगलने बरोबरी होऊ शकत नाही. "
"अग, एकदा माझे ऐकून तर घे.'
पण शर्वरी निघून गेली.
पण शर्वरी निघून गेली.
आतापर्यंत शांत असलेला कबीर मला नाही म्हणते. "अरे, हिच्यासारख्या पन्नास पोरी माझ्या मागेमागे करत असतात आणि मी स्वतः हून हिला प्रपोज करतोय तर नाही म्हणते. शर्वरी कसं सांगू तुला की माझे तुझ्यावर खरोखरच जीवापाड प्रेम आहे."
कबीर धावत शर्वरीच्या मागे मागे जाते. पण ती प्रतिसाद देत नाही.
आयुष्याची स्वप्ने पाहिली
तुझ्याच प्रेमासाठी
रुसवा सोडून वळून बघ जरा
प्रत्येक क्षण तुझ्याचसाठी....
तुझ्याच प्रेमासाठी
रुसवा सोडून वळून बघ जरा
प्रत्येक क्षण तुझ्याचसाठी....
इंद्रधनुच्या सप्त रंगाची
उधळण करतो तुझ्यावर
सुखात ठेवील कायमच मग
जीवापाड प्रेम करतो तुझ्यावर....
उधळण करतो तुझ्यावर
सुखात ठेवील कायमच मग
जीवापाड प्रेम करतो तुझ्यावर....
"कबीर सोड माझा हात. तुला काय वाटतं अशा कविता करून तू तुझं प्रेम व्यक्त करशील आणि मी लगेच हो म्हणेल."
"शर्वरी माझं एकदा ऐकून तर घे. मला तुझी, तुझ्या घरची सगळी परिस्थिती माहिती आहे. मला फक्त तुझा स्वभाव आवडतो. तुझ ते निरागस खळखळून हसणे, मनात किल्मिष न ठेवता बोलणे, कोणालाही मदत करण्याची तुझी वृत्ती, परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तू तुझ्या जबाबदाऱ्या सांभाळते. हे सर्व मला आवडते ग."
"कबीर थांब. ह्या कविता, हे मोठे मोठे शब्द वापरून तू मला प्रेम करण्यासाठी भाग पाडू शकत नाही. कारण मला माहिती आहे की
तुझं रिया नावाच्या मुलीवर प्रेम आहे. "
तुझं रिया नावाच्या मुलीवर प्रेम आहे. "
"हे तुला कोणी सांगितलं?"
"ते महत्वाचे नाही. अरे, तू माझ्या प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी तू मलाच उलट प्रश्न विचारत आहे."
"हो, हे खरं आहे. की माझ रियावर प्रेम होते. तो माझा भूतकाळ होता. आज मात्र मी तुझ्यावर प्रेम करतो."
"आज म्हणजे? उद्या कोणती नवीन मुलगी तुझ्या आयुष्यात आली तर तू मला सोडून देशील."
"नाही शर्वरी नाही. तुला जे कळलं ते अर्धवट आहे. मी सांगतो तुला खरं काय ते?"
"नको कबीर. आयुष्यात काही अशा गोष्टी असतात की त्या माहिती न झालेल्याच बऱ्या."
"शर्वरी फक्त एकदा ऐकून घे. मग तू तुझा निर्णय घेण्यासाठी मोकळी आहे. मी तुझ्याशी कधीच खोटे बोलणार नाही."
"आपण आत जाऊन बोलू या का ? प्लीज शर्वरी."
शर्वरी नाईलाजाने कबीरसोबत परत कॅफे मध्ये जाते.
©® अश्विनी मिश्रीकोटकर
प्रेमकथा
अष्टपैलू लेखन स्पर्धा २०२५
©® अश्विनी मिश्रीकोटकर
प्रेमकथा
अष्टपैलू लेखन स्पर्धा २०२५
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा