Login

तूच माझं जग...(भाग ४)

कथा मालिका
तूच माझं जग...४

कबीर आणि शर्वरी परत आत कॅफे मध्ये जातात.

"शर्वरी आज मी माझे रियाचे अनुभव सांगतो‌ . "माझे रियावर खरच प्रेम होते. पण तिचे खरे रुप माझ्या तेव्हा लक्षात आले जेव्हा मला तिची खरच गरज होती.
शर्वरीवर मी मनापासून प्रेम केले. तिच्यासाठी काहीही करण्याची तयारी होती. तिच्या हसण्यात, तिच्या बोलण्यात एक वेगळीच जादू होती. तिच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण आठवला की मन सुखावून जायचं. पण खरं प्रेम तेव्हा ओळखू येतं, जेव्हा आपल्याला कोणाची खरी गरज असते."

"त्या दिवशी माझ्या आयुष्यात मोठा वादळ आलं होतं. आम्ही खूप मोठ्या अडचणीत सापडलो होतो—मानसिक, आर्थिक आणि भावनिकदृष्ट्या. मला तिचा आधार हवा होता. वाटलं होतं, ती माझ्या पाठीशी असेल, माझ्या वेदना समजून घेईल. पण जेव्हा मी तिच्याकडे मदतीचा हात पुढे केला, तेव्हा तिचा चेहरा निर्विकार होता. तिच्या डोळ्यांत ना काळजी होती, ना प्रेम.
मी तुझ्यासाठी एवढं काही करू शकत नाही. मला स्वतःचं आयुष्य सांभाळायचंय,
असं म्हणून ती वळून निघून गेली."

"त्या एका क्षणात माझ्या डोक्यात झणझणून गेलं, जी व्यक्ती माझ्या आनंदात सहभागी झाली, माझ्या सुखाच्या क्षणांना रंगत आणली, तीच आज मला अशा कठीण प्रसंगी एकटं सोडून चालली होती."

"मी तिला अडवायचा प्रयत्न केला नाही. कारण जेव्हा कोणी आपल्याला खरंच प्रेम करतं, तेव्हा ते आपल्याला सोडून जात नाही. आणि जे जातं, त्यांचं प्रेम केवळ स्वार्थी असतं. पण शर्वरी तू मला, माझ्या प्रेमाला अशी अर्ध्यावर सोडून निघून जाणार नाही ना?"

"कबीर आधी माझं शिक्षण आणि मग आयुष्याचा निर्णय." असे म्हणत शर्वरी जातच होती; की  मी तुझी शेवटपर्यंत वाट बघेल."

शर्वरी तेथून निघून गेली. पण कबीरचे वाक्य तिच्या मनात घर करून गेले. पण  कबीरचा मूड जरा बिघडलाच होता.  शर्वरी वर चिडून काहीच उपयोग नव्हता. बघता बघता दोन वर्ष निघून गेली. कबीरने डिग्री पुर्ण करण्यासाठी  नवीन महाविद्यालयात प्रवेश घेतला. इकडे वर्षभरानंतर शर्वरीचा सुध्दा डिप्लोमा पुर्ण झाला. पण पुढे काय ? पुढचे शिक्षण घेण्यासाठी नवीन महाविद्यालयात प्रवेश घेणे गरजेचे होते. तिने तसे प्रयत्न सुरू केले. पण  आता खाजगी शिक्षण संस्थेत प्रवेश घेण्यासाठी भरपूर फी होती. पण काय करणार? घरी सांगू शकत नव्हती. कारण ते आता लग्नाच्या मागे लागले होते. पण शर्वरीला स्वतः च्या पायावर उभे राहायचे होते. मैत्रिणींच्या मदतीने तिने काही नोकऱ्या शोधल्या. पण तेवढ पुरेसे नव्हते. पण अशावेळी कबीर तिच्या पाठीशी उभा राहिला. तिच्या कष्टाळू स्वभावाने त्याने मदतीचा हात पुढे केला. पण स्वाभिमानी शर्वरीला त्याची मदत नको होती.

"अग, हे पैसे तू कर्ज म्हणून घे हवे तर. तुझी नोकरी लागली की मला परत कर. पण तू तुझ्या स्वप्नांसोबत तडजोड करू‌ नकोस आणि हे बघ आपण काही ठिकाणी शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी प्रयत्न करू. मी तुला एका कंपनीत पार्ट टाईम जॉब शोधून देतो मग तर  झालं."

शर्वरीच्या एकीकडे लग्न आणि शिक्षण याचा संघर्ष सुरू झाला होता.

"कबीर घरचे लोक माझं लग्न ठरवत आहे. आधीच आर्थिक परिस्थिती नीट नाही. त्यात माझं पुढच शिक्षण घेणे त्यांना रुचत नाही."

"हे बघ, काहीही कर पण पुढचे शिक्षण महत्वाचे आहे. अगं आयुष्यात शिक्षणाची संधी परत परत दार ठोठावत नाही. तू विचार कर."

या सगळ्यात कबीर तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा होता. हळुहळु शर्वरीच्या मनात कबीर विषयी साॅप्ट काॅर्नर तयार होत होता. प्रेमाच्या रंगाचे कु़ंचले त्यांच्या सभोवती फिरू लागले. प्रेमाचे फुलपाखरु उडू लागले होते. पण तिच्या वर घरचे दडपण येत होते. सतत लग्नासाठी मागे लागत होऊ. हळुहळु ती त्याच्या प्रेमाच्या रंगात न्हाऊन निघाली.

एके दिवशी
"शर्वरी तू आत्ताच्या आत्ता घरी निघून ये."
अचानक आलेल्या फोनमुळे ती त्रस्त झाली."

"बाबा पुढच्या महिन्यात माझी परीक्षा आहे. तेव्हा मी नंतर येते."

"ते काही नाही. तू आत्ताच्या आत्ता निघून ये."

आई वडीलांच्या आग्रहास्तव शर्वरी गावी जाण्यासाठी निघाली. पण अचानक तिचा अपघात झाला. तिच्या आजुबाजुला गर्दी जमली होती आणि तिच्या जवळून एक कार वेगाने निघून गेली. तिला एका अनोळखी व्यक्तीने दवाखान्यात नेले. कबीरच्या कानावर ही बातमी जाताच तो धावतपळत दवाखान्यात पोहोचतो. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शर्वरीला  बघताच तो भांबावून जातो. "शर्वरी, शर्वरी, काय झाल हे? ".

"सर,  सांभाळा स्वतः ला. तुम्ही यांचे कोण?"

"डॉक्टर, मी शर्वरीचा मित्र. कशी आहे शर्वरी?"

"हे बघा आम्ही प्रायमरी चेकअप  करतो. मग बघू."

काही वेळात डॉक्टर बाहेर आले." हे बघा त्यांच्या मेंदूला मार लागला आहे. एम आर आय केल्यानंतरच कळेल. त्यांच्या पायाला सुध्दा मुका मार लागला आहे. रिपोर्ट आल्यानंतर कळेलच. तुम्ही त्यांच्या घरच्यांना बोलावून घ्या. आम्ही पोलिसांना फोन करतो."

"सर, शर्वरीला उडवलेल्या गाडीचा तुम्ही शोध घ्या प्लीज."

"हो, ज्या  ठिकाणी त्यांचा अपघात झाला. तिथे सीसीटीव्ही कॅमेरे आहे का आम्ही चेक करतो आणि कळवतो.'

"डॉक्टर, पेशंट कसा आहे? आम्हाला त्यांचे बयाण घ्यायचे आहे."

"हे बघा, त्यांची कंडिशन नीट नाही. तुम्हाला थोडी वाट बघावी लागेल."

"कबीर, यावर घरच्यांची सही हवी होती. ते कधी पोहोचतील?"

"मी करतो सही. त्यांना पोहोचण्यासाठी वेळ लागेल. तुम्ही उपचार सुरू करा." दोन तीन तासांतच रखमा आणि शंकर आपल्या दोन्ही मुलांना घेऊन दवाखान्यात आले. शर्वरीला असे बघून त्यांचा जीव खालीवर झाला.

"अरे देवा!  काय झालं माझ्या लेकाला." रखमा तर जोरजोरात रडायला लागली.

"काकू, शांत व्हा. इथे सगळे चांगले डॉक्टर आहे. तुम्ही काळजी करू‌ नका."

"तू कबीरच ना!  हे सगळं तुझ्यामुळे झाले." तू तिला तुझ्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले."

"काकू ,असं काही नाही. मी खरोखरच तिच्यावर प्रेम करतो आणि आयुष्यभर करत राहील."

तेवढ्यात डॉक्टर आले. "हे बघा, त्यांचे रिपोर्ट  नॉर्मल आले आहे. त्यांच्या मेंदूला जरी मार असला ‌ तरीही काळजी करण्याचे काम नाही. एक दोन दिवस अंडर ऑफजरवेशन ठेवू.  काळजी करू‌ नका. त्यांना दोन तीन  दिवसांतच सुट्टी मिळेल. त्या शुध्दीवर आल्या आहेत. तुम्ही भेटू शकता."

©® अश्विनी मिश्रीकोटकर
प्रेमकथा
अष्टपैलू लेखन स्पर्धा २०२५

🎭 Series Post

View all