मराठीतील टॉप १० चित्रपट
(Top 10 Marathi Films )
मराठी चित्रपट आजकालच्या हिंदी, इंग्रजी आणि तेलगू भाषेच्या चित्रपटांसमोर जणू कालबाह्य होत आहे परंतु आज तुमच्यासाठी अगदी हृदयाला भिडणारे आणि टचकन डोळ्यात पाणी आणणारे आपले TOP १० मराठी चित्रपट मी घेऊन आली आहे .
१)पिंजरा (Pinjara)१९७२
आजही मराठी चित्रपटसृष्टीमधील सर्वात अजरामर म्हणून गणल्या जाणाऱ्या चित्रपटांमध्ये पिंजरा या चित्रपटाची नोंद ठेवली जाते. वि . शांताराम यांचा दिग्दर्शित हा चित्रपट आपल्याला आजही खूप प्रसिद्ध लावण्या देऊन गेला आहे.
छबिदार छबी, मला लागली कुणाची उचकी, ई.तसेच हा पहिला रंगीत चित्रपट म्हणून सुद्धा ओळखला जातो. तर पिंजरा हा चित्रपट एका एकनिष्ठ शिक्षकाची केवळ एका परस्त्री/तमासगीर स्त्रीच्या क्षणिक मोहाच्या पिंजऱ्यात अडकून झालेली अवस्था ,दुर्बलता आणि सामाजिक बहिष्क्रीत केलेली स्थिती दर्शवतो . अनेक प्रसिद्ध नट आणि नटींनी या चित्रपटात आपले योगदान दिले आहे. निळू फुले ,उषा नाईक ,डॉ . श्रीराम लागू इ . हा चित्रपट disney hotstar आणि mx player यावर उपलब्ध आहे. तसेच या चित्रपटास IMDB वरून १०/८.५ इतकी मान्यता आहे .
२)मी शिवाजी राजे भोसले बोलतोय ( Me Shivajiraje Bhosale Boltoy) २००९
मराठी माणूस म्हणून जगायला आजही कोणाला लाज वाटत असेल तर त्याने तर हा चित्रपट नक्कीच बघावा .संतोष मांजरेकर यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट मराठी माणसाची त्याच्या आपल्या मुंबई आणि महाराष्ट्रात होणारी घालमेल दर्शवतो . आपल्या मुंबई मध्ये मराठी लोक रहातच नाही या विचारांनी खचून गेलेला सचिन खेडकर कशाप्रकारे एका रात्रीत मराठी असल्याचा गर्व अनुभवतो आणि आयुष्य भर तो गर्व बाळगतो याची उत्तम कहाणी या चित्रपटामध्ये मांडली आहे. कशाप्रकारे छत्रपती शिवाजी महाराज त्याला मराठी असल्याची जाणीव करून देतात हे बघणे रंजक आहे. महेश मांजरेकर आणि सचिन खेडकर यासोबतच अनेक कलाकारांनी आपली भूमिका बजावली आहे . हा चित्रपट SONY LIV आणि AMAZON PRIME या वर उपलब्ध आहे. या चित्रपटास IMDB वरून १०/८.० इतकी मान्यता आहे
३) हरिश्चंद्राची फॅक्टरी( Harishchandrachi Factory) २०१०
मराठी चित्रपटसृष्टीचे जनक अर्थात दादासाहेब फाळके यांच्या जीवनावर आधारित पहिला चित्रपट. परेश मोकाशी हे या चित्रपटाचे लेखक,दिग्दर्शक आणि निर्माते होते. आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर चालणारी हि चित्रपटसृष्टी नक्की सुरु तरी कशी झाली आणि ती सुरु करताना किती अडचणी आल्या आणि किती गमती घडल्या याचे अगदी सुंदर असे वर्णन या चित्रपटात पाहायला मिळते . दादासाहेब फाळके यांनी किती परिश्रमाने हि चित्रपटसृष्टी आपल्यापर्यंत पोहचवली आहे हे जाणून घ्यायचे असेल तर नक्कीच एकदा तरी हा चित्रपट तुम्ही बघितलाच पाहिजे . नंदू माधव यांनी हरिश्चंद्र यांची तर विभावरीदेशपांडे यांनी त्यांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे . हा चित्रपट netflix वर उपलब्ध आहे आणि तसेच IMDB वरून या चित्रपटास १०/८. ४ इतकी मान्यता आहे.
४)बालगंधर्व (Balgandharv)२०११
रंगभूमी वर नेहमीच नट आणि नटी अभिनय करत असतात असे विचार जर आजही तुमच्या मनात असतील तर ते थांबवायला मला आवडेल . रवींद्र जाधव यांचा दिग्दर्शित चित्रपट बालगंधर्व याचे जिवंत उदाहरण आहे . बालगंधर्व हा त्या कलाकारांविषयी आपल्याला सांगतो ज्यांनी २० व्या शतकात स्त्रीची भूमिका करून गंधर्वांची उपमा कमावली होती . ही कहाणी आपल्याला अभिनेते नारायण श्रीपाद राजहंस यांच्याविषयी सांगते . यात त्यांनी समाजाकडून अनुभवलेले अनेक कडू आणि गोड वागवणूकीची उदाहरणे दाखवली आहे. सुबोध भावे यात मुख्य भूमिकेमध्ये आहे. हा चित्रपट you tube वर उपलब्ध आहे आणि तसेच IMDB वरून या चित्रपटास १०/७. ९ इतकी मान्यता आहे.
५)फॅन्ड्री (Fandry)२०१३
नागराज मंजुळे एक दिग्दर्शक म्हणून स्वतःची ओळख निर्माण करणारे एक उत्तम दिग्दर्शक . फॅन्ड्री ही कहाणी एका खालच्या जातीच्या मुलाच्या निस्वार्थ प्रेमाची . अल्लड वयातल्या आकर्षणाची आणि त्या आकर्षणाला प्रत्यक्षात अनुभवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची मांडणी आहे .जब्या नावाचा एक खालच्या जातीचा मुलगा असतो ज्याचे प्रेम एका उच्च जातीच्या मुलीवर जडते. परंतु वेळेनुसार त्याला देखील आपल्या परिवाराला निवडून आपली कर्तव्ये पूर्ण करावी लागतात याचे अगदी साधारण पण हृदयस्पर्शी असे उदाहरण दिग्दर्शकाने मांडले आहे. हा चित्रपट zee ५ वर उपलब्ध आहे आणि तसेच IMDB वरून या चित्रपटास १०/८.३ इतकी मान्यता आहे.
६) येलो (Yellow)२०१४
शारीरिक आरोग्य आपण नेहमीच जपतो पण तेच जर कोणाच्या मानसिक आरोग्याचा विषय घेतला तर मात्र कोणी मनावर घेत नाही आणि त्यात जर मानसिक व्यंगा सोबत कोणी जन्मले तर मात्र आपल्याकडे त्या व्यक्तीकडे एक वेगळ्याच दृष्टिकोनातून आणि सहानुभूतीने पहिले जाते , असाच मानसिक आजाराला एक व्यंग न बनू देता समाजात आपले एक अढळ स्थान निर्माण करू इच्छिणाऱ्या आईच्या अथक प्रयत्नांची आणि तिच्या त्या मुलीची कहाणी आपल्याला या चित्रपटातून पाहण्यास मिळते. महेश लिमये दिग्दर्शित या चित्रपटात गौरी गाडगीळ आणि म्रीणाल कुलकर्णी मुख्य भूमिकेत आहे . हा चित्रपट zee ५ वर उपलब्ध आहे आणि तसेच IMDB वरून या चित्रपटास १०/८.६ इतकी मान्यता आहे.
७)नटसम्राट(Natsamrat) २०१६
कुणी घर देत कां घर? तू नट म्हणून भिकारडा तर आहेस पण तू माणूस म्हणून सुद्धा नीच आहेस ... आणि कित्येक अशा विलक्षण संवादांचा भरपूर खजिना म्हणजे महेश मांजरेकर निर्मित चित्रपट नटसम्राट. नाना पाटेकर यांची भूमिका बघून जर डोळ्यात अश्रू नाही आले तर प्रेक्षक म्हणून तुम्ही नापास आहेत. कुसुमाग्रज यांचे एक गाजलेलं नाटक म्हणजे नटसम्राट आणि त्याची निर्मिती करून प्रेक्षकांसमोर मांडणे जणू दुसरे सर्वात कठीण काम . अभिनयाचा सर्वोत्कृष्ट नमुना म्हणजे नटसम्राट. हा चित्रपट neflix ,ऍमेझॉन prime वर उपलब्ध आहे आणि तसेच IMDB वरून या चित्रपटास १०/८.८ इतकी मान्यता आहे.
८)मुरांबा(Muramba) २०१७
आजकालच्या पिढीत प्रेम हे जणू क्षणिक झाले आहे. या प्रेमात शाश्वती नसते आणि जिथे मिळेल ते नशीब असत ... अशीच प्रेमाच्या नात्यातली गुंतागुंत आणि गोडव्यासोबतच आंबटपणा सुद्धा दर्शवणारा नात्यांचा मुरांबा . वरून नार्वेकर दिग्दर्शित आणि अमेय लिमये सोबतच मिथिला पालकर यांचा हा चित्रपट नात्यातले प्रेमासोबतच भीती.. लाज... आणि कित्येक असे वेगवेगळे टप्पे दाखवतो . हा चित्रपट neflix ,sony liv वर उपलब्ध आहे आणि तसेच IMDB वरून या चित्रपटास १०/८.१ इतकी मान्यता आहे.
९)आनंदी गोपाळ (Anandi Gopal)२०१९
देशातली पहिली महिला डॉ . आणि त्या पदवीमागचे कष्ट घेणाऱ्या आनंदी बाई जोशी आणि त्यांचे पती गोपाळराव जोशी यांच्या प्रयत्नांची कथा किंवा आनंदी बाई यांचा बायोपिक म्हणजे आनंदी गोपाळ . समीर विध्वंस दिग्दर्शित या चित्रपटामध्ये ललित प्रभाकर आणि भाग्यश्री मिलिंद हे मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट zee ५ वर उपलब्ध आहे आणि तसेच IMDB वरून या चित्रपटास १०/८.८ इतकी मान्यता आहे.
१०)पावनखिंड (Pawankhind) २०२२
छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे जीवाला जीव देणारे मावळे यांच्यातले नाते बघून तर मुघलांना सुद्धा मत्सर वाटला .. असाच मुघलांची जणू स्वतःच खिंड बनलेला बाजीप्रभू देशपांडे यांच्या आयुष्यावरचा चित्रपट म्हणजे पावनखिंड .दिगपाल लांजेकर दिग्दर्शित हा चित्रपट अंगावर शहारे उभे करतात. तसेच अजय पुरकर आणि चिन्मय मांडलेकर यात मुख्य भूमिकेत पाहावयास मिळतात. हा चित्रपट या amzon prime वर उपलब्ध आहे आणि तसेच IMDB वरून या चित्रपटास १०/८.४ इतकी मान्यता आहे.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा