INFLUENCER म्हणजे काय बरं ? प्रभावक .. अर्थात समाजावर ज्यांचा प्रभाव पडतो किंवा समाज त्यांना अनुसरतो पण मग हिंदी प्रभावक तर खूप आहे . बीबी की वाईन्स आशिष चांचलानी , मिथिका द्विवेदी परंतु यात मराठी कोणी दिसत नाही वाटत पण थांबा ! अरे मराठी INFLUENCER सुद्धा कमी नाही आणि ते सुद्धा विविध भागातून . चला तर मग आज जाणून घेऊ आपल्या अस्सल मराठी INFLUENCER अर्थात प्रभाविकांविषयी . आणि हे सर्व इंस्टाग्राम तसेच यू ट्यूब वर देखील खूप प्रसिद्ध आहे बरं का . फक्त शोध घेताना नावानिशी नाही तर कंसातील नावानिशी घ्या शेवटी INFLUENCER ना!
मराठीतील १० INFLUENCER (TOP10 MARATHI INFLUENCER )
१)प्राजक्ता कोळी(MOSTLYSANE) - आपल्या मुंबई ची मुलगी प्राजक्ता कोळी . प्राजक्ता कोळी ने इंस्टग्राम पूर्वी यु ट्यूब वर आपले वर्चस्व स्थापित केले होते . आज युवापिढीमध्ये अनुसरत केली जाणारी ती प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर आहे. याव्यतिरिक्त तिने हिंदी चित्रपटामध्ये आणि खयाली पुलाव या शॉर्ट फिल्म मध्ये सुद्धा काम केले आहे आणि मिसमॅट्च्ड या वेबसिरीस मध्ये सुद्धा ती झळकलेली आहे. मास मीडिया मध्ये तिने तिचे शिक्षण पूर्ण केलेलं आहे . तसेच २०१५ मध्ये तिने तिचा यु ट्यूब चॅनेल सुरु केलेला आहे.आज ही २९ वर्षांची युवती ७७ लाख लोकांची आवडती इन्फ्लुएन्सर आहे . दैनंदिन जीवनातील किस्से आणि घटनांवर हीचे विडिओ असतात .mostlysane या नावाने हिचे व्हिडीओ प्रसिद्ध आहे .
२) नील(just neel things )- नील सालेकर आपल्या हटके आणि अनोख्या व्हिडीओ क्रिएशन साठी प्रसिद्ध आहे. नील मूळचा मुंबई चा आहे . नीलने पहिले भाडीपा या मराठी चॅनेल सोबत सुद्धा काम केले आहे . नीलने त्याचे शिक्षण मुंबईच्या जे जे कॉलेज ऑफ आर्टस् मधून पूर्ण केले आहे . २०१८ मध्ये नीलने एक इनफ्लुएन्सर म्हणून खऱ्या अर्थाने या प्रवासास सुरुवात केली. ३२ वर्षांच्या या तरुणाने २८ लाख लोकांचे प्रेम आतापर्यंत कमावले आहे. नील इनफ्लुएन्सर सोबतच एक फिल्ममेकर सुद्धा आहे . तसेच नीलने यु ट्यूब वरील काही वेब सिरीस मध्ये सुद्धा काम केले आहे . just neel things या नावाने यांचे व्हिडिओ प्रसिद्ध आहे.
३)करण सोनवणे (focusedindian )- करण सोनवणे हा मूळचा मुंबईचा आहे. तसेच इंग्रजी साहित्यामध्ये याने स्वतः चे शिक्षण पूर्ण केले आहे . ११ लाख लोकांचा हा आवडता इन्फ्लुएन्सर आहे. कॉमेडी आणि फक्त कॉमेडी च्या जोरावर त्याने स्वतःचे वर्चस्व स्थापित केले आहे . covid पूर्वी त्याने खूप वेळा नवीन नवीन गोष्टी आजमावल्या परंतु खरी प्रसिद्धी त्याला covid मध्ये मिळाली . करनने सर्वात जास्त प्रसिद्धी इंस्टाग्राम वरून मिळवली आहे .करणने सुद्धा यु ट्यूब वरील सिरीस मध्ये काम केलेले आहे . कारण त्याचे व्हिडीओस focuesdindian या नावावरून शेअर करत असतो . २५ वर्षांचा हा तरुण १० लाख लोकांचे प्रेम घेऊन याची वाटचाल करत आहे.
४)मंगेश काकड ( mangaaji)-मंगाजी उर्फ मंगेश काकड ... ओ पप्पा.. पाटील अशा संवादांची ओळख म्हणजे मंगाजी. मंगेश काकड मूळचा नाशिकचा आहे. एक influencer म्हणून पुढे येण्यापूर्वी तो एक इंजिनिअर आहे आणि सोबतच एक थिएटर आर्टिस्ट सुद्धा आहे . मंगाजी ने इंस्टाग्राम वर 7 लाख लोकांचे प्रेम कमावले आहे. एक इंजिनियर म्हणून आयुष्य व्यतीत करण्याऐवजी स्वतःचे पॅशन फॉलो करणाऱ्या मंगाजीला आपण असेच आपले प्रेम देत राहू.
५)हर्ष राणे (harsh rane )- हर्ष राणे सध्या मुंबई मध्ये स्थित आहे. हर्ष राणे हा त्याच्या वेगळ्या आणि अनोख्या व्हिडीओस साठी प्रसिद्ध आहे . हर्ष राणेला घरातून सुद्धा यासाठी नेहमीच प्रतिसाद होता . हर्षचे वडील नेव्ही ऑफिसर असून सुद्धा त्यांनी नेहमीच त्याला त्याच्या स्वप्नपूर्तीसाठी पाठिंबा दिला तसेच लहानपानापासूनच त्याला अभिनयाची सुद्धा गोडी होती . हर्ष राणे १९ वर्षांचा असून ५ लाखांपेक्षा जास्त लोकांचे प्रेम घेऊन त्याची वाटचाल चालू आहे .
६)सौरभ घाडगे (saurabhghadge_vines)- सौरभ मूळचा मुंबई चा आहे आणि मुंबई युनि्हर्सिटीमध्ये तो सध्या त्याचे ग्रॅज्युएशन पूर्ण करीत आहे. covid मध्ये सौरभ ने सर्वात पाहिले त्याचे व्हिडिओ टाकण्यास सुरवात केली . आणि तिथूनच तो प्रकाश झोतात आला. 23 व्या वर्षी सौरभ चे 20 लाख अनुसयी आहे. सौरभ शाळेपासूनच क्रिकेटर बनू इच्छित होता परंतु वेळेनुसार त्याला जाणवले की तेवढा फिटनेस त्याला शक्य नाही नंतर सुद्धा कधी त्याचे काही निश्चित नव्हते परंतु आपल्या हिंदी इन्फ्ल्यून्सरने सौरभ खूप प्रभावित झाला आणि हळूहळू तो वाटचाल करत राहिला . सौरभने इंस्टाग्राम व्यतिरिक्त फिल्टरकॉपी मध्ये सुद्धा काम केले आहे.
७)अथर्व सुदामे (atharvasudame)- पुणे तिथे काय उणे अर्थात अस्सल पुणेकर म्हणजे अथर्व सुदामे . अथर्वने पुण्यातूनच बी . कॉम पूर्ण केले आहेत . याची खासियत म्हणायची म्हणजे अस्सल पुण्याची ओळख म्हणजेच अथर्वच्या कॉन्टेन्टचा विषयच असतो पुणे . वैयक्तिक मला सुद्धा याचे व्हिडीओस खूप आवडतात . २४ वर्षाच्या अथर्वचे इंस्टाग्राम वर ६ लाखांपेक्षा जास्त अनुसयी आहेत . अथर्वचे सुद्धा असे काही नव्हते कि इन्फ्लुएन्सरच बनायचे आहे परंतु फक्त अभिनयाचा एक छंद होता आणि covid मध्ये त्यालाही त्याचे पॅशन गवसले . अथर्व सुदामेने देखील यु ट्यूब वरील सिरीस मध्ये काम केले आहेत .
८)विनायक माळी (iam_vinayakmali)- दादूस , शेठ … अशा नावांची ओळख म्हणजे विनायक माळी . विनायक मूळचा पनवेलचा आहे . विनायकने इंस्टाग्राम तसेच यु ट्यूब वर प्रसिद्धी मिळवली आहे. विनायकने पहिले विप्रो या कंपनी मध्ये सुद्धा काम केले आहे . परंतु काही काळांनंतर त्याने एल .एल . बी मध्ये शिक्षण पूर्ण केले सुरवातीला विनायकला सुद्धा घरातून विरोध होता म्हणूनच त्याने स्वतःहून कधीच सांगितले नाही परंतु व्हिडीओस इतके वायरल झाले कि घरून सुद्धा संमती भेटली . विनायकने सुरवातीला हिंदी मध्ये व्हिडीओस बनवले परंतु त्यास प्रतिसाद मिळाला नाही आणि तेव्हा त्याने त्याच्या गावरान भाषेत व्हिडीओस बनवले आणि तिथेच तो चमकला ,
बावलट , इ . २८ वर्षांच्या विनायकचे ९ लाखांपेक्षा जास्त अनुसयी आहेत . या व्यतिरिक्त विनायकला स्वतः चे हॉटेल सुद्धा उभे करायचे आहे.विनायकने वेब सिरीस मध्ये काम केले आहेत .
९)अंकिता प्रमोद प्रभू वालावलकर (kokanheartedgirl)- नावावरूनच कळते ही मुलगी कोकणचीच आहे . अंकिता एक फूड ब्लॉगर , एक आंतरप्रोनोर कारण ती एक रेस्तोरेंरन्ट सुद्धा चालवते , ट्रॅव्हलर , मॉडेल ,सोबतच ती एक इनफ्लुएन्सर सुद्धा आहे. अंकिता शाळेपासून हुशार होती आणि म्हणूनच ती एक इंजिनिअर सुद्धा आहे. २५ वर्षांच्या अंकिताचे ३ लाखापेक्षा जास्त अनुसयी आहेत . अंकिता खास करून दैनंदिन जीवनातले प्रसंग व्हिडिओस द्वारे शेअर करते.
१०) प्रसिका (prasika_official)- प्रसिक अर्थात प्रसाद अँड दीपिका . प्रसिका हा एक शाळेपासून ते लग्नापर्यंतचा प्रवास गाठणाऱ्या जोडप्यांचा चॅनल आहे . ज्यावर ते खास करून खाद्यप्रकारांच्या विविध रेसिपीएसचे व्हिडिओस शेअर करतात. प्रसिकाचे आतापर्यंतचे अनुसयी ६ लाखांपेक्षा जास्त आहे . या व्यतिरिक्त त्यांचे वैक्तिक अनुसयी आणि यु ट्यूब वर देखील अनुसयी आहेत.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा