Login

त्र्यंबकेश्वर मंदिराचे रहस्य

त्र्यंबकेश्वर मंदिराची माहिती संकलन
*ञ्यंबकेश्वर मंदिराचे अद्भुत रहस्य ..

नाशिकपासून आवघ्या २८ कि मी वर असलेले "ञ्यंबकेश्वर जोतिर्लिंग "हे ञ्यंबक ह्या शहरात आहे .निसर्गाने व ऋषीमुनींनी पावन असे ञ्यंबकेश्वर हे एक प्राचिन तिर्थश्रेञ म्हणुनही प्रसिध्द आहे ,सर्व बारा जोतिर्लिंगापैकी ञ्यंबकेश्वर हे एक विषेश असे जोतिर्लिंग आहे.ञ्यंबकेश्वर जोतिर्लिंग हे एक स्वयंभू मंदिर आहे .ह्या मंदिराचे खास वैशिष्टे म्हणजे येथे एक नाही तर त्रिनेत्री शिवलिंग अस्तित्वात आहेत..

*ञ्यंबकेश्वरचा अर्थ काय?...

भगवान शिवांचे अस्तित्व असलेल्या ह्या ठिकाणी भगवान ब्रम्हा ,भगवान विष्णु व भगवान शिवाचे अस्तित्व असल्याने .तीन मुख असलेले लिंग असून गोदावरी ,वारुणी व थरूणी ह्या तीन नद्याचाही त्रिवेणीसंगम म्हणजेही "त्र्यंबकेश्वर" .उजैन व ओंकारेश्वर सारखेच त्र्यंबकराजालाही त्र्यंबकचे महाराज म्हणुन संबोधतात.
अशी आख्यांकिका आहे की दर सोमवारी त्र्यंबकराजा आपल्या प्रजेची खुशहाली बघण्यासाठी गावात भ्रमंती करतात .

*ञ्यंबकेश्वराबाबत पौराणिक कथा

पुराणात अस म्हटल जात की ञ्यबंक भुमी ही ऋषींमुनींचे अस्तित्व असणारी भुमी आहे.असे म्हणतात की,अनेक श्रेष्ठ ऋषीमुनी ह्याठिकाणी एकत्र वास्तव्यास होते .परंतु त्यातील काही ऋषी गौतम ऋषींचा तिरस्कार करत‌ व कमी दाखवण्याचा प्रयत्न करत .असेच एकदा ह्या ऋषींनी गौतम ऋषींवर गो हत्येचा अरोप लावला व‌ तो मिटवण्यासाठी देवी गंगेला ह्या ठिकाणी प्रकट करण्याची अट घातली . गौतम ऋषींनी हा अरोप नष्ट करण्यासाठी शिवलिंगांची स्थापना करत तपश्चर्येला सुरवात केली .गौतम ऋषींच्या तपश्चर्येला प्रसन्न होवून भगवान शिव ,माता पार्वतीसोबत प्रकट झाले .जेव्हा भगवान शिवांनी गौतम ऋषींना वर मागण्यास सांगितला तेव्हा गौतम ऋषींनी त्यांना "गंगेला ह्या ठिकाणी पाठवण्याची विनंती केली".भगवान शिवांनी गंगेला येथे प्राचारण केल असता गंगेने भगवान शिवांना सांगितल कि ,"भगवान शिव जर तुम्ही ह्या ठिकाणी रहाल तरच मी येथे राहिल".
गंगामातेच्या विनंतीने व गौतम ऋषींच्या तपश्चर्येने भगवान शिव त्र्यंबकेश्वरला जोतिर्लिंग स्वरूपात वास्तव्यास आले.

*त्र्यंबकेश्वर जोतिर्लिंगाचा इतिहास..

त्र्यंबकेश्वर हे जोतिर्लिग बारा जोतिर्लिंगापैकी एक असून एक धार्मिक केंन्द्र आहे.त्र्यंबकेश्वर मंदिर हे जवळपास १००० वर्ष जुने मंदिर आहे. त्र्यंबकमधील ब्रम्हगिरी टेकडीच्या पायथ्याशी वसलेल्या ह्या ठिकाणाची उंची समुद्रसपाटीपासून ३००० फुट उंचीवर आहे .पुर्वी ते एक पुरातन मंदिर होते पण इ सन.१७४० -१७६० ह्या काळात तिसरे पेशवे बाळाजी बाजिराव ह्यानी मंदिराचा जिर्णोध्दार केला.(असेही म्हटले जाते कि औरंगजेबाने हे मंदिर १६९० मध्ये उध्दवस्त करून तेथे मशीद बांधली होती पण पेशव्यांनी १७५४ मध्ये मशीद पाडून मंदिर पुन्हा उभारलं) .
ह्या मंदिराच्या बांकामासाठी जवळपास १७ लाख रूपये खर्च झाल्याचे सांगण्यात येते .हे ठिकाण भगवान शिवाचे एक पवित्र स्थान असून शिवाच्या निराकार व शाश्वत शक्तींचे प्रतिनिधीत्व करते..

ञ्यंबकेश्वरमधील शिवलिंग हे तीन मुखी असून ते शिवलींग सोने व मौल्यवान दगडांपासून बनवण्यात आलेल आहे .ह्या मंदिरातील शिवलिंगावरील मुकुट हा पांडवांनी दान दिला आहे असे म्हटले जाते.ञ्यंबकेश्वर मंदिर हे स्थापत्य कलेच एक उत्तम उदाहरण आहे.काळ्या दगडावरील कोरिव काम व मंदिराच्या भव्यतेसाठी ते जगभर प्रसिध्द आहे.संपुर्ण काळ्या दगडात बनवलेले हे मंदिर चौकोणी मंडप व खास मोठे दरवाजे हे मंदिराचे वैभवच आहे.

*त्र्यंबकेश्वर मंदिराची खाशियत...

त्र्यंबकेश्वर मध्ये अनेक छोटे मोठे जीवंत झरे असून ब्रम्हगिरीत उगम पावणारी गोदावरी नदी ही मध्येच गुप्त झालेली आहे .त्र्यंबकमध्ये कुशावर्त हा एक पविञ कुंड आहे .पुराणात असे सांगितले जाते कि कुशावर्तात स्नान केल्याने आपल्या सगळ्या पापांचे क्षालन होते.त्र्यंबकेश्वरला ह्याच कुशावर्तापासून सिंहस्थ कुंभमेळ्याची सुरवात होते.जो कुंभमेळा १२ वर्षांनी एकदा येत असतो.त्यावेळी दुनियाभरातील अनेक साधू संत ह्या ठिकाणी स्थान करतात.

*ब्रम्हगीरी...

त्र्यंबकेश्वर ब्रम्हगीरी पर्वताच्या पायथ्याशी असले तरी मुळ गोदावरी व त्र्यंबक शिवलींग हे ब्रम्हगिरी पर्वतावर आहे .ह्याठिकाणी जाणे तसे सोपे नव्हते १९०८ मध्ये कराचीस्थित एक शेठ लालचंद जशोदानंद भाम्भांनी व शेठ गणेशदासजी यांनी मिळून ५०० पायर्यांची निर्मिती केली आहे .असे म्हणतात की तेव्हा ह्या पायर्या बनवण्यासाठी जवळपास ४०००० रूपये खर्च आला होता.

ब्रम्हगीरीवरून वाहणारी गोदावरी नदी ही तीन दिशाने वहातांना दिसते.पुर्वेकडे वहाणार्या प्रवाहाला गोदावरी ,दक्षिणेकडे वाहणार्या प्रवाहाला वैतरणा तर पश्चिमेकडे वाहाणार्या प्रवाहाला पश्चिम गोदावरी म्हटले जाते.तसेच आहिल्या नदी ही मंदिराजवळ गोदावरीला मिळते व हे चक्र पुर्ण होत.
अस म्हटले जाते कि संतान प्राप्तीसाठी आहिल्या व गोदावरीच्या संगमावर पुजा केल्याने संतान प्राप्ती होते.


*गंगाद्वार-

ब्रम्हगिरी पर्वताच्या मध्यात हे गंगाद्वार आहे.येथे गंगेचे एक मंदिर आहे .येथेच गोदावरी नदीचा उगम बघायला मिळतो .त्यानंतर गोदावरी ब्रम्हगीरी पर्वतातून गायब होते व
ब्रम्हगिरीच्या पायथ्याशीच ती प्रकट झालेली दिसते.गंगाद्वार हे गोमुखी असून त्याच्या मुखातून पाण्याचा प्रवाह वाहतांना दिसतो.

*आहिल्या संगम तिर्थ-

त्र्यंबकेश्वरच्या रहस्यातील अजून‌ एक आख्यांकिका म्हणजे गौतम ऋषी जेव्हा तपश्चर्या करत होते .त्यावेळी त्यांची तपश्चर्या भंग करण्यासाठी गंगामातेची सखी "जटिला" हिने गौतम ऋषींच्या आर्धांगिनेचे रूप घेऊन तपश्चर्या भंग कण्याचा प्रयत्न केला .हे ऋषींच्या लक्ष्यात आल्याने गौतम ऋषी संतापले व तिला शापित करून नदीच्या स्वरूपात आणले .पण जटिलाने गौतम ऋषींची क्षमा मांगत विनंती केली व क्रोध शांत केला .त्यावेळी गौतम ऋषींनी तीला माफ करून गोदावरी नदीसोबत येथेच वाहण्यास सांगितले .त्यामुळे ह्या संगमाला आहिल्या(जटिलाचे बदली रूप)संगम म्हटले जाते.त्या ठिकाणी संगमेश्वर महादेव मंदिर आहे..

*निवृत्तीनाथ समाधी-

ऋषीमुनीनी पावन ह्या भुमीत निवृत्ती महाराजही आपल्या भावंडांसोबत ह्या पविञ ठिकाणी ज्ञान ग्रहण करत होते .निवृत्तीनाथांचे गुरू हे गहिणीनाथ होते व तेही ह्याच ठिकाणी होते त्यामुळे निवृत्तीनाथांची समाधी ही त्र्यंबक मध्येच आहे.

*त्र्यंबकेश्वरात होणार्या पुजेचे महत्व-

पितृपक्षात ह्या ठिकाणी केल्या जाणार्या श्राध्द पुजेचे विशेष महत्व आहे .पितृपक्ष म्हणजे आपल्या पितरांचे ऋण माणन्याचा काळ . आपल्या पुर्वजांमुळे आपल्याला जन्म मिळतो .ते जेव्हा मृतात्मे होतात तेव्हा ते "पितर "बनतात त्याचे ऋण माणण्यासाठी त्यांना प्रसन्न करण्यासाठी ,त्यांच्या अतृप्त इच्छा पुर्ण करण्यासाठी पुजन ,दर्पण व आन्नदान केल जात .ते त्र्यंबकेश्वरात केल्याने विषेश पुण्य लाभते कारण येथे वाहणारी गोदावरी दक्षिण दिशेकडेही वाहते दक्षिण दिशा ही पितरांची दिशा असल्याने ह्या ठिकाणाचे विशेष महत्व आहे. भगवान रामाने दशरथ राज्याचे श्राध्द येथे केल्याचा उल्लेख आढळतो..

ह्यासोबतच नारायण नागबली पुजा जी व्यवसायाय प्रगती,भुत प्रेत पिश्चाच बाधा , आरोग्य तक्रारी कुटुंबात अस्थिरता ,लग्नातील अडथळे ह्यातून मुक्ती मिळण्यासाठीची ही पुजा येथे फक्त त्र्यंबकेश्वरलाच केली जाते.

त्रिपिंडी आपल्या आई वडिलांच्या आत्माच्या शांतीसाठी आन्न व जल आर्पण करण्याचा विधी त्र्यंबकला केल्याने विशेष फळ मिळत अस माणल जात .

ह्यासोबतच महामृत्यंजय मंञ पुजा,कुंभविवाह पुजा,रूद्राकभिषेकपुजा ह्यासारखे विधी त्र्यंबकेश्वरात केले जातात.असे म्हणतात की त्र्यंबकेश्वरला वरिल सर्व पुजा केल्याने मोक्ष मिळतो .ब्रम्हगीरी पर्वतावर उगम पिवणारी गोदावरी ही औंदुबर वृक्षाच्या मुळांमधून वहाते .त्यासोबत भगवान गणेशांचे जन्मस्थान,त्रिसंध्या गायत्रीचे स्थान आहे.सर्व ऋषीमुनी व देवतांचा ह्या ठिकाणी वास असल्याने कोणतेही कार्य लववकर फळास येते ‌.त्यामुळे धार्मिक पुजा व श्राध्दविधी त्र्यंबकेश्वरात केले जातात...

माहिती संकलन -सौ.वैशाली देवरे