ट्रॅप्ड इन टॉयलेट
राजकिरण सोसायटीत खाली कॉमन एरियात ४–५ जण गप्पा मारत होते. संध्याकाळची वेळ होती. अंधार अजून पडला नव्हता. इतक्यात त्यांना “हेल्प… हेल्प…” अशा आरोळ्या ऐकू आल्या. सर्वांनी चमकून इकडे-तिकडे पाहायला सुरुवात केली. पण कुठेच कोणी संकटात सापडल्याचं दिसलं नाही. ही पार्किंग एरिया होती आणि बिल्डिंगच्या मागच्या बाजूस होती. रस्त्यावरचा आवाज इथपर्यंत पोचणं शक्य नव्हतं. सगळेच गोंधळात पडले.
त्यांच्या पैकी एकाने आवाज दिला,
“कोण ओरडतंय? काय प्रॉब्लेम आहे?” – काटकर, एक निवासी.
“मी प्रतिमा शिंगोटे. एफ बिल्डिंग, ७०३ नंबरचा फ्लॅट. प्लीज मदत करा.” – प्रतिमा.
“अरे, प्रतिमा वहिनी, काय झालं? थांबा, आम्ही आलोच.” – काटकर.
सगळे सातव्या मजल्यावर धावतच चढले, कारण लिफ्ट अकराव्या मजल्यावर होती. यायला वेळ लागला असता. प्रतिमाच्या घराचा दरवाजा बंद होता आणि आतमधून छोट्या दोन वर्षांच्या मुलाचा रडण्याचा आवाज येत होता.
“वहिनी, आम्ही आलो आहोत. काय झालं आहे?”
प्रतिमा बोलली, पण बाहेर नीटसं ऐकू आलं नाही. फक्त ती टॉयलेटमध्ये अडकली आहे एवढंच कळलं. काटकरांचं घर प्रतिमाच्या फ्लॅटच्या अगदी समोर होतं.
“काटकर, तुमच्या घराच्या संडासाच्या खिडकीमधून बोला. दोन्ही खिडक्या समोरासमोर आहेत.” – दिनेश.
काटकर धावत संडासात गेले. खिडकीच्या काचा काढल्या. आता समोरची खिडकी स्पष्ट दिसत होती.
“वहिनी, काय झालं ते नीट सांगा. घाबरू नका. आम्ही आहोत मदतीला.” – काटकर.
“अहो, मी संडासात आहे. प्रदीपने बाहेरून कडी लावून टाकली. त्याला काढ म्हणते तरी त्याला समजत नाहीये. बाहेर तो एकटा आहे.” प्रतिमा म्हणाली. ती आता रडकुंडीला आली होती.
प्रदीप म्हणजे प्रतिमाचा मुलगा. वय वर्षे दोन.
“ठीक आहे, आम्ही बघतो.”
सर्व प्रतिमाच्या फ्लॅटसमोर उभे राहिले. खरं म्हणजे कोणालाच काय करावं ते सुचत नव्हतं. लोखंडी सेफ्टी दरवाजासुद्धा आतून बंद होता आणि पलीकडचा लाकडी दरवाजाही बंद होता.
दिनेश म्हणाला की कोणाजवळ बारीक तार असेल तर लोखंडी दरवाजाची कडी काढता येईल, मग लाकडी दरवाजा तोडता येईल.
मग कोणीतरी तार आणली. त्याचा आकडा करून कडी काढायची कवायत सुरू झाली. पण सुरक्षेच्या दृष्टीने लोखंडी दरवाज्याचे गज इतके जवळजवळ लावले होते की बाहेरून हातच जाणार नव्हता.
सबनीस प्रयत्न करत होते. पाच मिनिटांनी त्यांची बायको म्हणाली,
“कडी दिसते आहे का?” – बायको.
“नाही, पण प्रयत्न करतो आहे.” – सबनीस.
“समोर असलेला डबा तुम्हाला दिसत नाही आणि न दिसणारी कडी काढता आहात? या, शिवानीला करू द्या प्रयत्न. ती हुशार आहे.” – बायको.
शिवानी ऐटीत समोर आली.
पण आता अंधार पडायला लागला होता आणि घरात तर पूर्णच अंधार झाला होता.
छोटा प्रदीप आता बावचळला होता. एकदा संडासाच्या दारावर ठोकत होता आणि रडत-रडत बाहेरच्या दारावर ठक ठक करत होता. आता त्याने जोरात भोकाड पसरलं.
प्रतिमाच्या काळजाचं तिकडे पाणी-पाणी होत होतं. ती ओरडून म्हणाली की लवकर काहीतरी करा. आता तिचाही बांध फुटला आणि तीही रडायला लागली.
मग कोणीतरी म्हणालं, “अरे, कोणाजवळ मोबाईल आहे? ताबडतोब फायर ब्रिगेडला फोन करा.”
१०१ नंबरवर फोन केला, पण तो लागत नव्हता. मग दिनेशने १०० नंबर फिरवला. तो लागला. त्याने पोलिसांना सगळी कल्पना दिली.
दहा मिनिटांत पोलीस आले. अजून पाच मिनिटांनी अग्निशमन दलाचे लोकही आले.
मग काटकरांनी प्रतिमाला सांगितलं की फायर ब्रिगेड आली आहे, आता ते नक्कीच सोडवतील.
आता प्रदीप घाबरला होता आणि तो संडासाच्या दारावर धडका मारत होता. “आई… आई…” करत रडत होता. प्रतिमा त्याला आतून समजावत होती, पण तिची अवस्थाही काही वेगळी नव्हती.
प्रतिमाचा नवरा ऑफिसच्या कामाने टूरवर गेला होता.
अग्निशमनच्या लोकांनी दाराची तपासणी केली. पण छोटा प्रदीप दाराच्या मागे असण्याची शक्यता असल्याने लोखंडी दरवाजा तोडण्याची कल्पना दूर सारली.
मग हॉलची खिडकी तोडायची ठरली. पण तिच्यापर्यंत पोचायचं म्हणजे अकराव्या मजल्यावर असलेल्या गच्चीवरून उतरावं लागणार होतं.
त्यांनी एका माणसाला कमरेला दोर बांधून खाली सातव्या मजल्याच्या खिडकीपर्यंत उतरवलं. तोपर्यंत खाली गॅस कटर सेटची ट्रॉली येऊन पोहोचली होती.
“वेल्डिंग करायची मशीन कशाला आणली आहे?” काटकरांनी विचारलं.
“ही वेल्डिंग मशीन नाहीये. हा गॅस कटिंग टॉर्चचा सेट आहे. यानेच खिडकीची ग्रिल कापणार आहोत.” – फायर ऑफिसर.
गॅस टॉर्च आणि दोन्ही रबरी पाइप दोरीला बांधून वर खेचली. पण ती पाचव्या मजल्यापर्यंतच पोचली. मग ट्रॉलीसकट सगळ थोडं अंतर पुढे नेऊन वर ओढला.
मग फार वेळ लागला नाही. भराभर ग्रिल कापली. खिडकीतून माणूस आत शिरला. संडासाचं दार उघडलं.
प्रतिमा बाहेर आली. बाळाकडे पाहिलं, तर बाळ अंधाराला घाबरून आणि रडून-रडून ग्लानीत गेला होता.
बाहेरचा दरवाजाही उघडला. लोक आत आले.
दृश्य खूपच करुण होतं. प्रतिमा बाळाला कवटाळून बसली होती. सारखी गालावरून हात फिरवत हाका मारत होती.
कोणी तरी धावत जाऊन पाणी आणलं आणि बाळावर शिंपडलं, पण बाळ निपचित पडला होता.
खाली अॅम्ब्युलन्स आली होती. त्यातले डॉक्टर आणि दोघं बाहेर लॉबीमध्ये होते. ते आत आले. डॉक्टर आले म्हणल्यावर सर्व जरा बाजूला सरकले. डॉक्टरांनी बाळाच्या छातीला कान लावला. स्टेथोस्कोप ने चेक केलं. सगळ्यांचा श्वास रोखला गेला.
क्षणभर… फक्त सायरनचा आवाज आणि प्रतिमाचं रडणं.
“श्वास चालू आहे… पण खूपच मंद आहे,” डॉक्टर म्हणाले. आणि त्यांनी ऑक्सिजन मास्क बाळाच्या नाकावर ठेवला. डॉक्टर त्याच्या छातीवर हलकेच थाप देत म्हणाले,
“प्रदीप… बाळा… आई इथेच आहे…”
प्रतिमा धावत पुढे आली. तिचा आवाज थरथरत होता.
“प्रदीप… आई आहे रे… बघ…”
क्षणभर काहीच हालचाल झाली नाही.
आणि मग…
प्रदीपच्या ओठांची हलकीशी हालचाल झाली. त्याने खोल श्वास घेतला… आणि अचानक जोरात रडायला सुरुवात केली.
त्या रडण्याचा आवाज ऐकताच सगळ्यांच्या डोळ्यांतून पाणी आलं.
“तो शुद्धीवर आला आहे,” डॉक्टर म्हणाले.
प्रतिमाने त्याला घट्ट मिठीत घेतलं. तिचं रडणं आता वेगळंच होतं – सुटकेचं, कृतज्ञतेचं.
“आई… आई…” प्रदीप हळू आवाजात कुजबुजला.
प्रतिमाणे त्याचा पापा घेतला.
“आई इथेच आहे रे… कुठेही जाणार नाही.”
डॉक्टर शांतपणे म्हणाले,
“धोका टळलाय. पण निरीक्षणासाठी हॉस्पिटलमध्ये नेऊ.”
अॅम्ब्युलन्सच्या दरवाज्यात उभी राहून प्रतिमाने मागे वळून पाहिलं. सगळे शेजारी स्तब्ध उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि थकवा दोन्ही होतं.
दरवाजा बंद झाला.
सायरन पुन्हा वाजू लागला.
आणि राजकिरण सोसायटीत त्या संध्याकाळी एक गोष्ट सर्वांना शिकवून गेली —
“कधी कधी सगळ्यात लहान कडी, सगळ्यात मोठं संकट उभं करू शकते…
आणि माणुसकीच, त्यातून बाहेर काढू शकते.”

दिलीप भिडे.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा