भटकंती नवलाईची
भाग ३
इंदौर मांडु माहेश्वर आणि सिध्दवरकुट ओंकिरेश्वर
राखी आली की माझ्या सगळ्या दीर नंणदांना वेध लागतात, की कुठे असणार यंदाचा गेट-टुगेदर? आतापर्यंत कधी आम्ही एखाद्या रिसॉर्टला जमललो, कधी सापुतारा ला गेलो ,कधी रायगडावर गेलो, तर कधी मागे तुंगी ला गेलो.
पण यंदा मात्र सगळ्यांनी मिळून ठरवले की महाराष्ट्र बाहेर जायचे.
मग निघालो,हिंदुस्तानका दिल देखो म्हणत - मध्य प्रदेशला.
फिरायला सोबत असणाऱ्या सर्व मुलांना, इंदोरची खाद्यभ्रमंती करायचीच होती. त्यामुळे ठरले की इंदोर माहेश्वर मांडु आणि आमचं पवित्र तीर्थस्थान सिद्धवरकुट- ओंकारेश्वरला जाऊया.
खरे तर 15 ऑगस्ट च्या दरम्यान चा ,सुट्ट्यांचा काळ. सगळीकडे गर्दी असणार हे गृहीतच धरले होते,पण एवढ्या 20- 22 जणांच्या सुट्ट्या ऍडजेस्ट करायच्या तर, त्याच तारखा निवडणे भाग होते.
मग काय झाली तयारी सुरू. "कोणते ड्रेसेस? काय काय खायचं ?काय काय बघायचं ?कुठे राहायचं? खरेदी कशी करायची?" इंदोरला पोहोचण्याआधीच सर्व ग्रुप इंदोरमय झाला होता.
सकाळी भल्या पहाटे निघालो इंदूरला, नाशिक वरून. काही मंडळी नागपूरहून थेट पोचणार होती, तर काही मंडळी अहमदाबादहुन येऊन, थेट भेटणार होतो इंदोरला. ढाईदीप मंदिरात.
नाशिकहून निघालो तर वेळेवर ,पण काय करणार थोडेसे कर्म आड आले आणि आमच्या गाडीने धुळ्याच्या पुढे त्रास द्यायला सुरुवात केली. आमची व्हिंगर थोडी बिघडली. रिपेरिंग मध्ये दोन-तीन तास गेले. परंतु त्या गॅरेज जवळच्या हॉटेलमध्ये खाण्यापिण्यात आणि तिथल्या बाजेवर बसून वाट बघण्याची मजा होती ना, आणि तिथल्या ज्या गप्पा होत्या ,त्याला तोडच नाही.
पुढे निघालो आणि मग उशीर झाल्यामुळे थेट पोचलो "छप्पन चाटला. "इतर मंडळीही तिथेच भेटली, आम्हाला.
मग काय दीड दोन तास नुसतती खाद्यपदार्थांची रेलचेल. उपासाची कचोरी,कुल्हड पिझ्झा, आईस्क्रीम, मिल्कशेक, चाट आणि काय काय.... थोडसे फरसाण, जिरावण अशा खरेद्या तिथे करूनच घेतल्या.
पोट तुडुंब भरलले होतते, पण आमच्या मुलांना सराफा बाजार मध्ये ही जाऊन खाबुगिरी करायची होती. मग ते गेले सराफा बाजार ची शान बघायला, आणि आम्ही आलो ढाई दीप मंदिरात ,रात्री मुक्काम करायला.
सकाळी ढाईदीपचे दर्शन, नाश्ता, नंतर सुमतीधामचे दर्शन, करून निघालो आम्ही शॉपिंगला.
आधी इंदोरचे काच मंदिर राजवाडा बघायचे ठरवले,पण 15 ऑगस्ट असल्याने राजवाडा बंद होता. परंतु काच मंदिरच दर्शन झाले.
काचमंदिरसमोर इंदोरी पोहे, सँडविच खाऊन झा,ले आणि नंतर खरेदीची धमाल सुरू झाली.
ग्रुप ग्रुप करून लोक पांगले आणि मग थेट भेटले राजहंसाला दाल बाफले खायला. "राजहंस" या हॉटेलमध्ये दालबाफले खाणणे, हा एक सोहळाच होता. दाल बाफले ,आलू ची भाजी ,चोरम्याचा लाडू, आहाहा!!! काय ती चव.
तिथे चमच्याने आमची चाललेली, झटापट बघून , हॉटेलचे मालक आले आणि दालबाफले कसे खातात हाताने, हे आम्हाला शिकवले.
इंदोरला खाणे पिणे आटपून आम्ही निघालो माहेश्वरला. अहिल्याबाईंनी वसवलेला किल्ला, नर्मदा घाट बघायला आणि माहेश्वरी साड्या खरेदी करायला.
संध्याकाळी तिथे पोहोचलो, घाटावर प्रचंड गजबज हो.ती स्वच्छता तर नव्हतीच फारशी. पाच-सहा वर्षांपूर्वी मी गेले तेव्हा हा माहेश्वराचा किल्ला आणि घाट मला जेवढा आवडला होता, यावेळी त्याचे ते बदललेले थोडेसे गचाळच रूप बघून, मनाला दुःख झाले. असो चालायचेच.
माहेश्वरला आम्ही काही जणांनी साड्या खरेदी केल्या. माहेश्वर ची आठवण हवी ना सोबत .त्यानंतर रात्री आमचा राखीचा सोहळा पार पडला. दुसऱ्या दिवशी सकाळी माहेश्वराच्या सहस्त्रधाराला भेट देऊन, पुन्हा एकदा नर्मदेचा घाट बघायला आमच्यातले काही जण गेले. सकाळच्या प्रसन्न वेळी तो घाट थोडासा अनोखा भासला त्यांना.
त्यानंतर निघालो मांडूला.ही तिसऱ्यांदा भेट असल्यामुळे तिथले दगडही आता आपल्याला ओळखत असणार, असेच मनात आले.
रूपमतीचा महाल, इको पॉइंट ,जहाज महल, अश्रफी महल, जामा मस्जिद नेहमीचेच पॉईंट. प्रत्येक ठिकाणी प्रचंड गर्दी.गाईडची चित्रविचित्र माहिती. परंतु चार-पाच वर्षांपूर्वीच्या ,तुलनेत खूप सुधारणा झालेल्या बघून आनंदही झाला.
मांडू बघून रात्री पोहोचलो सिद्धवरकुटला, आमच्या जैन मंदिरात मुक्कामाला. रात्रभर तिथे राहिलो. सकाळी उठून सिद्धवरकुटला मंदिरामागे असणार्या नर्मदेच्या तिरी गेलो. तेथून ओंकारेश्वरला बोटीने जाता येते.
आम्हाला ओंकारेश्वरला जायचं नव्हतेच. परंतु त्या बोटीने एक दीड तासाची छान चक्कर मारून, आम्ही ओंकारेश्वरच्या मंदिरांना वरवरून बघून आलो.
तिथली ती शांत नर्मदा मैया मनाला सुखावून गेली. सिद्धवरकुटच्या बाजूने तीरावरती फारसा गजबजाट नसतो. त्यामुळे नर्मदातीरीची ती शांतता तिथे अनुभवता आली. नर्मदेची आठवण म्हणून तिथून एक दोन गोटे उचलून आणलेच घरी.
अशी तीन दिवसाची वर्षभर एनर्जी देणारी आमची राखी गेट-टुगेदर ची ट्रिप. आता पुढच्या वर्षी कुठे या चर्चेने आत्तापासूनच रंगलेली आहे.

भाग्यश्री मुधोळकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा