भटकंती नवलाईची २०२५
भाग १
आग्रा मथुरा वृंदावन
2025 सालाला निरोप देण्याची वेळ आली आहे आणि 2026 सालाचे स्वागत आपण करणार आहोत.
या वर्षात मागे वळून बघितले, तर भरपूर प्रवास केला मी. काही ठिकाणी दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा गेले, तर काही ठिकाणे माझ्यासाठी ही नवीन होती.
माझ्या वाचकांनाही या सगळ्या सफरींवर घेऊन जायचे मनात आले आहे आणि म्हणूनच हा प्रवासवर्णनाचा प्रपंच.
जानेवारी 2025 ला एक तीन दिवसाची छोटीशी ट्रिप आखली. 26 जानेवारी च्या गर्दीत फिरणार होतो, पण अहोंच्या सुट्ट्यांमुळे याच तारखा निवडायला लागल्या.
नाशिकहून पकडली ट्रेन आणि पोहोचलो कृष्णाच्या भूमीत मथुरेला.
मथुरेला आमच्या जैन धर्म शाळेत मुक्कामी पोहोचलो.अंतिम केवली जंम्बुस्वामींचे मोक्षस्थान.
निर्वाणकांडात अनेकदा इलेला ऊल्लेख.
फ्रेश होऊन देवदर्शन करून, जेवण करून आराम केला. कारण मथुरा वृंदावनातली मंदिरे, संध्याकाळच्या आधी उघडतच नाहीत.
आराम करून तीन सव्वातीन वाजता निघालो, वृंदावनातले प्रेम मंदिर बघायला. इतरही अनेक गोष्टी,मंदिरे वृंदावनात आहेत, त्याही बघायच्या होत्या. पण त्या प्रेम मंदिरातच एवढे दंग झालो, की रात्रीचे आठ कसे वाजले? ते कळलेच नाही.
भरपूर फोटो ,कॅन्टीन मधली छानशी पेट पूजा, तिथल्या स्टॉलवरची खरेदी, संध्याकाळच्या वेळी सुरू झालेली रंग बदलणारी लाइटिंग, आणि चलत चित्रे.
कृष्णाच्या जीवनात आम्हीही दंग झालो. तिथे रमलो विसावलो आणि वृंदावनाचा फक्त प्रेम मंदिर पाहूनच निरोप घेताना, मन जडावले होते.
पण पुन्हा इथे येऊ असं मनाशी ठरवूनच, मथुरेला धर्मशाळेजवळच एका ठिकाणी जेवून ,आम्ही मुक्कामी पोहोचलो. दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो ,तेव्हाही प्रेम मंदिराच्या आठवणी मनात रेंगाळतच होत्या. पण आता जायचं होते, त्याही आधीच्या कृष्णाच्या जीवनात,म्हणजे श्रीकृष्ण जन्मभूमी बघायला.
श्रीकृष्ण जन्मभूमी मध्ये फोटो काढायला परवानगी नाही. मोबाईल आत नेताच येत नाहीत. तिथे रिक्षावाल्या जवळच मोबाईल ठेवताना, क्षणभरही हा निघून गेला तर.... अशी शंका मनात आली नाही. बिंनदिक्कत रिक्षावाल्याकडे मोबाईल ठेवून ,आम्ही श्रीकृष्ण जन्मभूमी बघायला गेलो. फोटोज काढायचे नसल्यामुळे, मनसोक्त सगळं काही डोळ्यातच साठवून घ्यायचचे होते. ज्या कारावासात कृष्ण जन्मला, त्या पवित्र भूमीचा आँरा वेगळाच होता. आणि तिथे उभारलेल्या प्रदर्शनी, मंदिर, "जय कन्हैया लाल की "म्हणत फिरणारे भक्तजन, सारं काही मन भारावून टाकणारे होते.
सकाळची वेळ प्रसन्न करणारे होते. तिथे साधारणता दोन ते तीन तास आरामात लागतात. आवारातच थोडीशी दुकानेही आहेत .अर्थातच खरेदी करणे मस्ट होते.
थोडी बहुत खरेदी केली .काही कृष्णाच्या किचेन, मोरपिसांच्या बासऱ्या, फ्रिजचे मॅग्नेट आणि सगळ्यात मुख्य म्हणजे प्रसाद. कृष्ण जन्मभूमीच्या तिथून बाहेर निघालो आणि नाष्टा केला. इथून धर्मशाळेत परत आलो. आता फत्तेपुर सिक्रीचा बुलंद दरवाजा बघायला जायचचे होते.त्यामुळे तिथे आमची गाडी वाट बघतच होती. गाडीवाल्याला "कुसुम सरोवराला" नेशील का गोवर्धनला? अहे विचारलले. कारण ते ऑन दवेच होते. गाडीवाला म्हणाला," आरामात होईल आपले."
घेऊन निघाला तो आम्हाला कुसुम सरोवरात. ब्रिज भूमीमध्ये जिथे राधाकृष्ण आणि गोपिकांनी अनेक लीला केल्या असतील,कृष्णाचा वावर जिथे झाला असेल, त्या कुसुम सरोवराला बघून थक्क व्हायला झाले. खरेतर त्या सरोवरा काठीच तासान तास बसून राहायला आवडले असतते, पण पुढे फत्तेपूर सिक्री चा किल्ला आणि बुलंद दरवाजा बघायचा होता. जड मन करूनच तिथून निघालो आणि फत्तेपूर सिक्री चा किल्ला बघितला.
किल्ला फार काही खास नव्हता. पुढे आग्र्याचा किल्ला बघितल्यावर तर, हा किल्ला न बघता दुसरे काहीतरी बघितले असते,तर चालले असते, असेही मनात आले.
संध्याकाळी पोहोचलो, आग्र्याला जगातील आश्चर्य बघायला.
हॉटेलवर चेक इन करून आराम केला. संध्याकाळी आग्र्याच्या गल्लीत फिरून ,थोडीशी पेट पूजा केली.
सकाळी साडेसहा वाजताच निघालो, ताजमहाल बघायला. एवढी सकाळ असूनही, तिथे भरपूर गर्दी होती. ताजमहाल डोळ्यामध्ये साठवताना, आणि मोबाईल मधल्या फोटोमध्ये सामावतांना, दमछाक झाली.
ती भव्यता, ते सौंदर्य, यावरून नजरच हटत नव्हती. पूर्ण ताजमहालला फेरी मारली. यमुना तीर बघितला. बाहेर येऊन थोडासा नाश्ता केला, एका जैन मंदिरात दर्शन केले, आणि नंतर निघालो आग्र्याचा किल्ला बघायला. आम्हाला लवकर लवकर आवरायचं होते,आणि साधारणतः इतिहास तर आपल्याला माहितीच असतो. त्यामुळे गाईड करून फिरण्यामध्ये फारसा रस नव्हता. आग्र्याच्या किल्ल्याला फेरी मारली. त्याची भव्यता बघितली. शिवाजी महाराज आणि औरंगजेबांचा इतिहास आठवला .आग्र्याहून सुटका हा धडाही आठवला, आणि त्या आग्र्याच्या किल्ल्याचा निरोप घेऊन निघालो.
आग्र्याचा पेठा आणि दाळमोट खरेदी व्हायलाच हवी. परतीच्या वाटेवर ,नाशिकला जातांना असंख्य आठवणी होत्या.
फत्तेपूर सिक्री ला न जाता, तो दिवस आपण वृंदावन, मथुरा ,गोवर्धन इथलेच काही ठिकाण बघण्यात, घालवला असता तर बरे झालले असतते अशी रुखरुख वाटली.पण असो .
कधीतरी मथुरेला जाऊन, चार-पाच दिवस राहूया आणि निवांतपणे, त्या ब्रिज भूमीतील श्रीकृष्णाला, शांतपणे अनुभवूया,असे ठरवूनच आम्ही या ट्रिपची सांगता केली.

भाग्यश्री मुधोळकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा