ट्रेंड
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025
टीम : वनिता
लघुकथा
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025
टीम : वनिता
लघुकथा
"तोंडाला काळ फासलं या पोट्टीने. कुठे म्हणून तोंड दाखवायला जागा ठेवली नाही. तोंड काळ करून आता कुठे दडून बसली? बाहेर निघ. कुठे गेली पोट्टी?" संतापाच्या भरात संजय हृताला घरभर शोधत होता.
काही वेळापूर्वीच हृता बाहेरून घरी परतली होती आणि काही न बोलता गपचूप रूममध्ये निघून गेली.
संजय तिच्या रूममध्ये गेला. तिला बघून त्याचा क्रोध अनावर झाला होता. तिचा हात पकडून तावातावाने ओढतच तिला बाहेर हॉलमध्ये आणलं.
"कुठे गेली होतीस तोंड काळ करायला? आमच्या ही तोंडाला काळ फासलं. कॉलेजमध्ये तोंड दाखवायला जागा ठेवली नाहीस तू. जनाची नाही तर निदान मनाची तरी लाज बाळगायची होती."
संतापलेल्या संजयने ताडकन हृताच्या जोरात कानफटात मारली.
संतापलेल्या संजयने ताडकन हृताच्या जोरात कानफटात मारली.
हॉलमधून जोरजोरात ओरडण्याचा आवाज येताच स्वयंपाक करता करता नमिता धावत बाहेर आली.
"काय झालं? झालं काय एवढं चिडायला? चिडताय का एवढं तुम्ही तिच्यावर? काय? केलं काय हृताने?" नमिताने विचारलं.
"तुझ्या पोरीला विचार? कुठे तोंड दाखवायला जागा ठेवली नाही या पोट्टीने." त्याने पुन्हा मारायला हात उचलला तशी हृता नमिताच्या मागे जाऊन लपली. नमिताने पण धाडस करून संजयचा हात पकडला.
"तरीच तुला सांगत होतो, नको एवढी ढील देऊस तिला. नको ते नाचगाणं आणि डान्स क्लासेस वगैरे.. काय होऊन बसलं बघ आता? वाट्याला आली आता बदनामी आणि फक्त नामुष्की!" तो पुन्हा हृताच्या अंगावर धावून आला. संजयच्या क्रोधावर आज नियंत्रणच राहील नव्हतं.
काय झालं? नमिताला काहीच कळत नव्हतं. हृता पण एका जागी थिजल्यासारखी स्तब्ध उभी रडत होती.
"काय झालं गं? का एवढे चिडले तुझे पप्पा? कॉलेजमध्ये काही घडलं का? तुझी तर आज ड्रायव्हिंग लायसन्ससाठी ट्रायल परीक्षा होती. तिकडे जाणार होतीस तू. कॉलेजला गेलेली का?" नमिताने विचारलं.
"अगं बाई.. रस्त्यावर कार चालवली की काय तू? कोणाचा अपघात वगैरे.. कोणी आलं का गाडीखाली? अरे देवा!" नमिताच्या डोक्यात क्षणात अनेक विचारांची गर्दी झाली.
"पण तू तर एजंट काकांसोबत जाणार होतीस ना!" नमिताने विचारलं.
"आई.. अगं मी कोणतेच नियम तोडले नाहीये. फोर व्हीलर ट्रायल द्यायला, मी एजंटकाका सोबत गेले होते. कॉलेजमध्ये तर आज मी गेलीच नाही." हृता रडायला लागली.
संजयच्या बोटांचे लाल गुलाबी वळ हृताच्या गालावर चांगलेच उमटले होते. 'आपल्या जीवाच्या तुकड्याला, लाडक्या लेकीला लहानपणापासून आजवर एक चापट सुद्धा मारली नाही आणि आज असं काय झालं?' या गांभीर्यात नमिताने आत जाऊन पाणी आणलं. संजयच्या हातात तिने पाण्याचा ग्लास दिला.
"हृता तू आत जा." नमिताने नजरेनेच तिला आत जाण्याचा इशारा केला. घाबरलेली हृता रडत रडत आत निघून गेली.
"काय झालं? एवढे का चिडलात तिच्यावर. काय चुकीची वागली ती? काय केलं तिने. कॉलेजमध्ये काही झालं का? हृता विषयी कोणी काही बोललं का?" नमिताने अगदी शांतपणे, पण मनातले सगळे प्रश्न संजयला एका दमात विचारून टाकले.
"तोंड दाखवायला जागा नाही ठेवली ह्या पोट्टीने. कुठे चुकलो गं आपण. आजवर लाडाकोडात वाढवलं, चांगले संस्कार केले. तिच्या आवडीनिवडी जपल्या. कुठे कमी पडलो आपण की.." संजयच्या डोळ्यात अश्रुंनी गर्दी केली.
"काय झालं? कशाबद्दल बोलताय तुम्ही?" नमिताचा धीर सुटत चालला होता तिने, पुन्हा विचारलं.
"काय विचारतेय मी, कळेल का मला?"
"काय विचारतेय मी, कळेल का मला?"
संजयने मोबाईलची गॅलरी ओपन केली आणि मोबाईल नमिताच्या हातात दिला.
"बघ काय दिवे लावले तुझ्या पोरीने. उजेडच उजेड पडलाय.. किती बदनामी होणार, किती काय काय सहन करावं लागणार. याच दिवसासाठी का प्रेमाने लहानाचं मोठं केलं तिला." संजयचे डोळे रागाने लाल झाले होते.
नमिताने एक एक फोटो बघायला सुरुवात केली. फोटो बघून ती ही अवाक् झाली "अहो काय हे? हे घाणेरडे फोटो. कुणाचे.. हृताचे?" तिला विश्वास बसत नव्हता.
"बघितलंस.. वाटलं ना नवल. आला ना राग तुलाही. माझ्या कॉलेजमध्ये तर उधाण आलंय चर्चेला. ज्याच्या त्याच्या तोंडी हाच विषय आणि या फोटोंवर चर्चा सुरू आहे. डिजिटल प्लॅटफॉर्म वर व्हायरल झालेत हे तिचे फोटो." बोलताना संजयचे अवसान गळून पडले होते. त्याने लांब श्वास घेतला.
"एवढे घाणेरडे फोटो.. कधी काढले? काही लाज लज्जा हिच्या जीवाला. माय बाप जिवंत आहेत अजून." गॅलरीत एका पाठोपाठ सगळे फोटो हृताचे बघून नमिताही संतापली.
"हृता.. हृता!" नमिता ओरडत हृताच्या रूममध्ये आली.
तिला प्रचंड राग आला होता.
"कधी काढलेस हे फोटो. असे फोटो काढताना जरा सुद्धा लाज वाटली नाही का तुला?" नमिताने मोबाईल हृतासमोर धरला.
तिला प्रचंड राग आला होता.
"कधी काढलेस हे फोटो. असे फोटो काढताना जरा सुद्धा लाज वाटली नाही का तुला?" नमिताने मोबाईल हृतासमोर धरला.
"आपण आपल्याच पप्पांच्या कॉलेजमध्ये विद्यार्थी आहोत. तेवढ तरी भान ठेवायचं होतंस. त्यांच्या इभ्रतीचा तरी निदान विचार करायचा होतास गं! कोण.. आहेत कोण ही मुलं? अफेअर वगैरे सुरू आहे का तुझं बाहेर? तसं असेल तर तेही सांग. किती मुलांसोबत असे फोटो काढलेस.. शी!" नमिता प्रचंड संतापली होती.
"किती नालायक आहेस गं तू.. हा फोटो बिकिनीतला आणि बघ ती फोटोतली मुलं. सावज मिळाल्यासारखे घुरतायत तुला बघून. सिगारेट कधीपासून प्यायला लागलीस. दारूचा ग्लास आणि तुझ्या हातात! दारू पण पितेस की काय? कुठे काढले? कधी काढले हे फोटो?" नमिता चिडली होती.
"मॉडेल आणि त्या टीव्ही मधल्या नट्या घालतात असे कपडे आणि फिरतात अशा उघड्या नागड्या. त्यांना शोभतं, पण आपल्यासारखे सर्वसामान्य लोक.. आपल्याला आपली इज्जत महत्त्वाची. आपली इज्जत आपण चार अंगभर कपड्यांच्या आत बंद करून ठेवतो." नमिताचे डोळे आता अश्रुंनी काठोकाठ भरले होते. तिचं डोकं आता ठणकायला लागलं होतं. डोक्यावर हात ठेवून ती तिथेच बसली.
"आई अगं हे फोटो माझे नाहीयेत." हृताने रडत रडत सांगितलं.
"काय?"
"तुझे फोटो नाहीयेत, मग कुणाचे आहेत ते फोटो?"
"खोटं बोलतेस ना तू!" नमिताने खडसावून विचारलं तशी हृताने नकारार्थी मान डोलावली.
"फोटोत तुझ्यासारखी दिसणारी अजून दुसरी कोण असणार. खोटं बोलू नको. खरं खरं काय ते सांग." नमिताने विचारलं.
"आई अगं खरंच हे फोटो माझे नाहीये. फोटोतला चेहरा जरी माझ्यासारखा अगदी तंतोतंत सारखा दिसत असला तरी मी हे फोटो काढले नाहीयेत. मी फोटोतल्या एकाही मुलाला ओळखत नाही. फोटोत दिसणारे मित्र माझे नाही. तो बिकिनीतला फोटो, दारूचा ग्लास, सिगारेट हातात घेतलेला फोटो माझा नाहीये. आई विश्वास ठेव माझ्यावर, प्लीज." हृताने खंबीरपणे आता डोळे पुसले होते.
"कॉलेज ग्रुप्सवर फोटो बघितले मी, पण थक्क झाले गं. घाबरले खूप. काय करू? कुणाला सांगू? काहीच कळतं नाहीये. आणि बाबा." हृताने आईला दोन्ही हातांनी घट्ट पकडून घेतलं आणि ती पटकन आईच्या कुशीत शिरली.
"आई विश्वास ठेव माझ्यावर.. आई मी काहीच चूक केली नाहीये गं. या फोटोमध्ये मी नाहीये. हे असले घाणेरडे फोटो कोणी बनवले? का बनवले? मला काहीच कल्पना नाहीये?" हृता तिची बाजू मांडत होती.
"खरं बोलते आहेस ना तू!" नमिताने स्पष्टच विचारलं.
"हो आई.. डबडबलेल्या डोळ्यांच्या धारा गालावर ओघळत होत्या. तिचे डोळे खरं बोलत आहेत. आपली लेक दोषी नाहीये." नमिताला विश्वास बसला होता.
"अहो.. अहो!" नमिता धावत रूममधून बाहेर आली.
"आपली हृता निर्दोष आहे. तिने हे फोटो काढलेले नाही. फोटोमधल्या एकाही मुलाला ती ओळखत नाही. कोणीतरी मुद्दाम केलंय, तिला बदनाम करण्याच्या दृष्टीने तिचे असे फोटो बनवून व्हायरल केलेत बहुतेक."
"आजकाल ते काय ट्रेंड सुरू झालंय ना! डिबली.. डेमोनी.. त्या ट्रेंडबद्दल आपण फक्त ऐकलं होतं. आज प्रत्यक्षात त्या ट्रेंडचे दुष्परिणाम अनुभवतोय. कुणीतरी तिच्या फोटोचा गैरवापर केलाय. मी खात्रीने सांगू शकते. मला माहिती आहे आपली हृता तशी नाही. हृतावर विश्वास ठेवायला हवा. तिच्या बाजूने आपण खंबीरपणे उभं रहायला हवं. आज तिला खरी आपल्या आधाराची गरज आहे."
नमिता पूर्ण विश्वासाने बोलत होती. तिने आपल्या लेकीला साथ देण्यासाठी जणू काही तिने कंबर कसली होती. तिने तिच्या डोळ्यातलं पाणी देखील पुसलं होतं.
नमिता पूर्ण विश्वासाने बोलत होती. तिने आपल्या लेकीला साथ देण्यासाठी जणू काही तिने कंबर कसली होती. तिने तिच्या डोळ्यातलं पाणी देखील पुसलं होतं.
"ट्रेंडचा वापर करून फोटो अशक्य नाहीये! खरयं आपली हृता असे फोटो कधीच काढणार नाही."
संजयला सुद्धा खात्री पटली. आपल्या लेकीसाठी आता लढायचं त्याने ठरवलं.
संजयला सुद्धा खात्री पटली. आपल्या लेकीसाठी आता लढायचं त्याने ठरवलं.
हृताला न्याय मिळवून देण्यासाठी आता तिचे आईपप्पा तिच्या सोबत खंबीरपणे उभे होते. सायबर ब्रांचला जावून त्यांनी तपशीलवार पोलिस कंप्लेंट नोंदवली. पोलिसांनी तपास सुरू केला. सर्वांची कसून चौकशी करण्यात आली. संजयने काहीच दिवसांपूर्वी कॉलेजमधल्या कॉपी पुरवणाऱ्या बहाद्दर टोळीचा पर्दाफाश करून पेपर फुटीचे प्रकरण उघडकीस आणले होते. त्याच टोळीतल्या मुलांनी हे दुष्कृत्य केल्याचं निदर्शनात आलं. हृताची काहीच चूक नसताना मात्र तिला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला होता.
आज डिजिटल मीडियावर वेगवेगळ्या ट्रेंडचे जणू पेव फुटलेले दिसून येते. प्रत्येक जण या ट्रेंडच्या मोहात पडलेला दिसतो. पण आपण पोस्ट केलेला डेटा किंवा फोटो किती सुरक्षित आहे? या गोष्टीचा विचार नक्कीच व्हायला हवा. तेव्हा जागरूकता महत्वाची. आपले फोटो डिजिटल मीडियावर शेअर करताना विचार करायला हवा.
शुभांगी मस्के.
शुभांगी मस्के.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा