आपलं करिअर अगदी उच्च शिखरावर पोहोचलेलं असताना अचानक पणे आपली ओळखच पूर्णपणे पुसून जावी असा तुम्ही कधी अनुभव घेतला आहे का?
मग अशा वेळी तुम्ही काय केलत? मेहनत घेऊन परत उभे राहिलात की अजून काही? आणि मुख्य म्हणजे जर का तुमच करिअर खाली घसरण्यात तुमची चूक नसेल तर मग तुम्ही काय केलत? सामना केलात न जगण्याचा. मी ही अश्याच प्रयत्नात होतो मी ही सामना केला झगडलो पण शेवटी हार मानलीच आणि एक अज्ञात जीवन जगू लागलो नेम फेम करिअर सर्वकाही सोडून आजही जगत आहे असाच अज्ञानात.
मी स्वर. स्वराज कुलकर्णी.
माझ्या बाबांनी खूप शान मध्ये संगीत क्षेत्राशी निगडीत नाव ठेवलं कारण ते त्यांच स्वप्न माझ्यातून बघत होते पण त्यांना काय माहित होत मी हा असा निघेल असो,
आज तुम्ही जे काही अनुभवणार आहात ती माझी कथा असेल आज सगळ्यांना कळेल. 'हॅशटॅग स्वररागिणी' काय आहे. मग तयार आहात न माझ्या आयुष्यातला थरार अनुभवायला?
मग अशा वेळी तुम्ही काय केलत? मेहनत घेऊन परत उभे राहिलात की अजून काही? आणि मुख्य म्हणजे जर का तुमच करिअर खाली घसरण्यात तुमची चूक नसेल तर मग तुम्ही काय केलत? सामना केलात न जगण्याचा. मी ही अश्याच प्रयत्नात होतो मी ही सामना केला झगडलो पण शेवटी हार मानलीच आणि एक अज्ञात जीवन जगू लागलो नेम फेम करिअर सर्वकाही सोडून आजही जगत आहे असाच अज्ञानात.
मी स्वर. स्वराज कुलकर्णी.
माझ्या बाबांनी खूप शान मध्ये संगीत क्षेत्राशी निगडीत नाव ठेवलं कारण ते त्यांच स्वप्न माझ्यातून बघत होते पण त्यांना काय माहित होत मी हा असा निघेल असो,
आज तुम्ही जे काही अनुभवणार आहात ती माझी कथा असेल आज सगळ्यांना कळेल. 'हॅशटॅग स्वररागिणी' काय आहे. मग तयार आहात न माझ्या आयुष्यातला थरार अनुभवायला?
ट्रेंडिंग लव हॅशटॅग - स्वररागिणी...
वेळ सकाळची 9 वाजताची...
"तर कोण आहेत स्वर आणि रागिणी? काय कहानी आहे यांची? स्वररागिणी का ट्रेंड करत आहेत? याचे कुणी उत्तर देऊ शकेल का? हाय, मी वैभवी राजपूत सोशल मीडिया इम्पॅक्ट या आपल्या शो मधून सर्वांचे स्वागत करते. आज सोशल मीडिया इतकं पुढे गेलं आहे की लोक जे मनाला येईल ते पोस्ट करत सुटले आहेत. लोकांना विषयाच भान असायला हवं काय काय खर काय खोटं याची जाण असायला हवी खोट्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचउन आपण खूप ग्रेट काम करत नाहीओत हे आता लोकांना समजायला हवं आणि हाच विषय आज आपण या सत्रात घेणार आहोत. तर, आधी आपण थोड पब्लिक ओपिनियन घेवूत मग सत्राला सुरवात करुत.
हाय, मी वैभवी डेली न्यूज ची रिपोर्टर, तुम्ही सोशल मीडियाचा वापर करता का?" वैभवीने आपल्या हातातला माईक समोर करून प्रश्न केला.
हाय, मी वैभवी डेली न्यूज ची रिपोर्टर, तुम्ही सोशल मीडियाचा वापर करता का?" वैभवीने आपल्या हातातला माईक समोर करून प्रश्न केला.
"हो, निश्चितच प्रत्येक जण करतात." समोरच्याने लगेच उत्तर दिल
"तुम्हाला ओव्हरऑल सोशल मीडिया इम्पॅक्ट बद्दल काय वाटत? कोणते ट्रेंड्स फॉलो करता तुम्ही?" वैभवी ने विचारलं
"मॅम, खरं सांगू का समाजाला सोशल मीडिया च भान असायला हवं ट्रेंड तुम्ही कुठले ही फॉलो करा पण स्वतः च भान असू द्या काय पोस्ट करायचं काय नाही याचा विचार करून सोशल मीडिया वर पोस्ट करावी अस मला वाटत कारण मी आधी सगळी सहा निशा करतो विचार करतो मी जे पोस्ट करणार आहे ते योग्य असेल की नाही मगच पोस्ट करतो." त्याने उत्तर दिल.
"खूप छान मला सांगा हॅशटॅग स्वररागिणी बद्दल तुम्हाला काय माहित आहे?" वैभवी ने विचारलं.
"अहो, मॅडम कोण हे स्वररागिणी इथे खायला फुरसत मिळत नाही तर ह्या दोघांचा विचार कुठून करणार आम्ही साधी माणसं हं, सध्या हा हॅशटॅग खूप व्हायरल झाला आहे एवढच मी सोशल मीडियावर बघितलं आहे या व्यतिरिक्त नाही." त्याने सांगितलं
"चला आजही समाजात जाणकार लोक शिल्लक आहेत बघून बर वाटलं खूप छान उत्तर दिलीत तुम्ही थँक यु." वैभवी ने त्याचे आभार मानले.
"थँक यु मला ही तुम्ही बोलण्याची संधी दिलीत यासाठी." तो म्हणाला
आणि पुढे निघून गेला.
"तर आता पुढे कोण मिळतय बघुत." रस्त्यावरून इकडे तिकडे नजर फिरवत वैभवी स्वतःशीच म्हणाली.
तोच तिची नजर कॉलेजच्या एका ग्रुप वर गेली.
"चला, आता या ग्रुपशी थोडी चर्चा करूया जाणून घेवूत ते काय म्हणताएत या नव्या ट्रेंड बद्दल." वैभवी डेली न्यूज च्या युवर्सना म्हणाली.
आणि लगेच ग्रुप जवळ पोहोचली.
"हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे. मी वैभवी फ्रॉम डेली न्यूज. तुम्ही सोशल मीडिया ऍडीक्ट आहात का?" वैभवी विचारते.
"हो, ऑफकोर्स आम्ही सगळेच सोशल मीडिया वापरतो कारण ती काळाची गरज आहे." एकाने लगेच उत्तर दिल.
"अगदी बरोबर सोशल मीडिया काळाची गरज तर आहेच पण आपण याच गरजेच भान देखील ठेवलं पाहिजे काय म्हणाल यावर?" वैभवी ने प्रश्न केला
"मॅम याच उत्तर मी देतो मी एक कंटेन्ट क्रिएटर आहे. कुठल्याही विषयावरचा कंटेन्ट क्रिएट करण्या आधी मी शंभरदा विचार करतो मी जे पोस्ट करणार आहे त्याचा लोकांवर काय परिणाम होणार आहे तसच सोशल मीडिया वर येणाऱ्या प्रत्येक गोष्टी चा ही आपण विचार केला पाहिजे अस मला वाटत." राजस नावाचा ग्रुप मधला मुलगा म्हणाला.
"म्हणजे थोडक्यात, तुम्हाला अस म्हणायचं आहे का की, सोशल मीडिया वापरायच भान हे प्रत्येकाला असायलाच हवं? पण तसा विचार केला तर समज प्रत्येकाला असतेच पण तरी ही काही लोक असे असतात जे सारासार कुठलाही विचार न करता भेधडक पोस्ट अपलोड करून मोकळे होतात ते हे पण विचार करत नाहीत याचा परिणाम काय होईल यावर तुमचं काय मत आहे." वैभवी ने विचारलं.
"मॅम मला सांगा लोकशाही आहे त्यातून प्रत्येकाला आपलं मत मांडण्याची मुभा मग ती व्यक्ती विचार का करेल अहो सोशल मीडिया हे एक सशक्त माध्यम आहे व्यक्त होण्याचं कुठलाही प्लॅटफॉर्म घ्या कुणी तरी तिराहिताने एखादी पोस्ट टाकली त्यातून जर का तो फक्त म्युच्युअल फ्रेंड ज्याला आपण कॉमन फ्रेंड म्हणतो त्याच्या ही पोस्ट वर भरमसाठ कमेंट येतात. अहो आजकाल सोशल मीडिया च इतकं फ्याड निघालं आहे न मी बघते न सोशल मीडिया वर कोण ट्रेंडिंग मध्ये आहे यावर स्पर्धा चालते फॅन्स मध्ये वॉर होत अक्षरशः माझा आयडलं चांगला की तुझा हे ठरत फँडम च्या वॉर मध्ये इतकच काय तर आपल्या आयडल चा बर्थडे असेल किंवा त्याला कुणी तरी त्रास देत असेल तर लगेच त्याचा ही ट्रेंड सुरु होतो आत्ता सध्या कुणी तरी स्वररागिणी आहेत म्हणे तर ते ट्रेंडिंग मध्ये आहेत मला तर आता त्याचा कंटाळाचं आला आहे." संयोगिता नावाची मुलगी म्हणाली
आणि तीच बोलणं ऐकून सगळेच हसू लागले.
"तर सोशल मीडियात व्यक्त होणारे लोक जागरूक आहेत पण तरी सुद्धा एक प्रश्न उरतोच स्वररागिणी हॅशटॅग कुणी सुरु केला आणि हे स्वररागिणी कोण आहेत? या पब्लिक ओपिनियन मुळे इतकच तर कळाल समाजात दोन प्रकारची माणसं असतात एक ते जे समजदार असतात त्यांना समाजाचं भान असत आणि दुसरे ते समजदार असण्याचा आव आणतात त्यांना माहित तर सगळ असत पण त्यांच्यात आपलं मत हे प्रत्येक ठिकाणी व्यक्त व्हावं याची झिंग चढलेली असते आणि यामुळे काय योग्य काय अयोग्य ह्याचा विचार न करता पोस्ट अपलोड करत सुटतात. आता तुम्हीच विचार करा तुम्ही कोणत्या श्रेणित बसता समाजाचं भान असलेल्या लोकांच्या की समजदारीचा आव आणणाऱ्या लोकांच्या श्रेणीत विचार करा. तोपर्यंत आपण जाऊत स्टुडिओत आपल्या पाहुण्यांशी बोलायला. मी वैभवी नाईक कॅमेरा मॅन अनिल बरोबर" वैभवी म्हणाली
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा