Login

ट्रेंडिंग लव हॅशटॅग - स्वररागिणी (भाग - दोन)

ट्रेंडिंग लव हॅशटॅग - स्वररागिणी चा दुसरा भाग
डेली न्यूज स्टुडिओ,

"पुन्हा एकदा तुमच्या आवडत्या शोमध्ये तुमचे स्वागत.
'जीथे फक्त सत्य शोधले जाते.' तर आजचा विषय आहे सोशल मीडिया चा योग्य वापर कसा करावा. आणि याच साठी आज आपल्या स्टुडिओत आले आहेत आजचे खास प्रमुख पाहुणे अजित ठाकूर हे एक सोशल मीडिया एक्सपर्ट तसेच एक एनलिटिकलं देखील आहेत आपले दुसरे खास पाहुणे आहेत जतीन वैद्य जतीन जी एक ब्लॉग रायटर आहेत तसेच एक एनफ्लून्सर देखील आहेत आणि आपले तिसरे प्रमुख पाहुणे एक असे पाहुणे आहेत जे करणार आहेत प्रेक्षकांच प्रतिनिधित्व विश्वास कुलकर्णी. विश्वास सुद्धा एक उत्तम लेखक आहेत आणि स्वतः सोशल मीडिया एक्सपर्ट देखील आहेत. चला तर मग आजच्या सेशनला सुरवात करू या पण तत्पूर्वी नुकतच हाती लागलेल्या माहिती नुसार आम्हाला अस कळाल आहे विश्वास हे एक उमदे ऍक्टर सुद्धा आहे." वैभवी सांगते.

"विश्वास जी आम्हाला नुकतच कळाल आहे तुम्ही एक उत्तम ऍक्टर देखील आहात काय सांगाल तुमच्या ऍक्टिंगच्या प्रवासा बद्दल आणि या प्रवासात तुम्ही सोशल मिडीयचा कसा वापर केलात ते ही सांगा." वैभवी विचारते

"हो, तुमच्या कडे अगदी योग्य माहिती पोहोचली आहे. मी एक ऍक्टर सुद्धा आहे पण मला आधी सांगा तुम्हाला हे कस कळल?" विश्वास विचारतात

"(स्मित हास्य करत). मी खर सांगू का मला तुमची माहिती सोशल मीडिया वरून समजली." वैभवी सांगते.

"हीच तर खरी गम्मत आहे सोशल मिडीयाची काय असत आजकाल प्रत्येकाचं खाजगी आयुष्य हे सोशली झाल आहे त्यामुळे मनात नसताना खाजगी आयुष्यातले अनमोल क्षण सुद्धा व्हायरल होऊन जातात. आता हेच बघ न मी एक लेखक आहे आणि जगासमोर मला माझी तेवढीच ओळख ठेवायची होती पण का कोणास ठाऊक मी ऍक्टर आहे ही गोष्ट मी एका सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर सहज शेअर केली आणि लगेच ती तुमच्या पर्यंत पोहोचली. अस म्हणतात आपल्या खाजगी आयुष्यात कुणाला ही ढवळा ढवळ करू देऊ नाई पण एकदा का एखादी गोष्ट व्हायरल झाली की त्या व्यक्ती च काहीच खरं नसत हा झाला एक भाग जेव्हा मी माझी एक्टिंगचा प्रवास सुरु केला तेव्हा मी माझ्या आयुष्यात खूप चढ उतरांचा ही सामना केला पण एक सांगतो तेव्हा मला सोशल मीडिया वरील माझ्या फॅन फॉलोईंग नी खूप सपोर्ट केला हं अगदी म्हणजे मी कुठे थांबलेलो असेल तर आवर्जून माझी विचारपूस करायचे आणि हे आज ही सुरु आहे. अस नाहीये की सोशल मीडिया वापरण अयोग्य आहे त्याचा पूर्ण वापर करा पण नवीन शिकण्यासाठी जाणून घेण्यासाठी. आणि समाजात घडणाऱ्या घटनांचा मागोवा घेण्यासाठी पण सगळी कडून सहानिशा करून मगच योग्य पोस्ट करा." विश्वास सांगतो

लगेच याच पुढचं बोलणं मीडिया एक्सपर्ट अजित ठाकूर सुरु करतात.

"अगदी बरोबर बोललात विश्वास जी तुम्ही. मी या क्षेत्रात गेली 20 वर्षांपासून काम करत आहे मी सोशल मीडिया मुळे लोकांना हताश झालेलं बघितलं आहे तसेच याच सोशल मीडिया मुळे नाव कमावलेलं ही बघितलं आहे मला ही असच वाटत सोशल मीडिया चा वापर करावा पण अति वापर करू नाही." अजित ठाकूर म्हणाले.

"सर हे ट्रेंडिंग काय असत." वैभवी ने प्रश्न केला.

"ट्रेंडिंग म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झाल तर एखाद्या टॉपिकला सोशल मीडिया वर टॉपला घेऊन येणे. ट्रेंडिंगची सोपी पद्धत असते तुम्हाला एक टॉपिक निवडायचा असतो मग तो कुठलाही असो एक चांगला चालणारा हॅशटॅग असावा टॉपिकशी निगडीत हॅशटॅग असावा आणि एक टॅगलाईन त्या टॉपिक शी निगडीत. उदा. आता एखादी व्यक्ती आजारी असेल तर तुम्ही टॅगलाईन ठेऊ शकता 'गेट वेल सून अनिश' मग ह्याच टॉपिकला घेऊन लोक आपलं म्हणणं शेअर करतात आणि टॅगलाईन आणि हॅशटॅग जोडून टॉपिक ट्रेंडिंग ला आणतात. हे असत ट्रेंडिंग मग जेव्हा हजारो लोक ह्यात शामिल होतात तेव्हा हॅशटॅग ट्रेंड करतो." अजित ठाकूर म्हणाले

"अरे वा, तुम्ही खूप छान एक्सप्लेन केलत सर. बर मला एक सांगा आज सोशल मीडिया वर हॅशटॅग ट्रेंड करतोय स्वररागिणी काय सांगाल या बद्दल?" वैभवी ने विचारलं

"मी खरं तर अजून ही याचा शोध घेतोय. मला किंचितस आठवतय स्वराज नावाचा कुणी तरी गायक होता आणि आता त्याचे इंडस्ट्री मध्ये नामो निशाण नाहीये आणि आता हा जो हॅशटॅग सुरु आहे मला वाटतय लोकांना त्याची आठवण व्हावी यासाठी तयार केला गेला आहे पण कोणी तयार केलाय हे सांगणं जरा कठीण आहे." अजित ठाकूर सांगतात.

"पण मग हॅशटॅग कुणी सुरु केला हे माहिती करून घेता येत का? त्याची काही प्रोसेस असते का?" वैभवी ने विचार

"मला तरी वाटत नाही काही प्रोसेस असेल अस कारण काय की सोशल मीडिया हे आज करोडो लोक वापरतात त्यामुळे कुठे तरी कोपऱ्यातुन एखाद्या व्यक्ती ने जर ही मोहीम सुरु केली असेल तर त्या एका व्यक्ती ला शोधण कठीण असत." अजित ठाकूर सांगतात.

"जतीन जी यावर तुमचा अनुभव काय सांगतो?" वैभवी विचारते

"मी एक ब्लॉग रायटर आहे आणि एनफ्लून्सर देखील आहे मला सोशल मीडिया वर एक्टिव्ह राहवच लागत नाही तर माझी प्रॉडक्ट्स लोकांपर्यंत कशी पोहोचणार मला वाटल एखादा लेख मॅगझीन मध्ये द्यावा तर नेमक तशी अपॉर्च्युनिटी कुठल्या मॅगझीन मध्ये आहे ते बघून मग मी त्या मॅगझीन साठी लिहितो चांगल पेमेंट सुद्धा करतात. आणि हीच माहिती मला सोशल मीडिया वर सर्च केल्यावर मिळते. मी सुद्धा हॅशटॅग्ज चा वापर करतो सोशल मीडिया वर प्रोमोशन ही करतो पण फक्त माझ्या कामा करता आता राहिला या ट्रेंडिंग हॅशटॅग चा प्रश्न मला अस वाटत हे आजकाल च्या मुलांचं फ्याड आहे अरे मी म्हणतो जगात इतके सारे प्रश्न आहेत त्यावर चर्चा करा न हे अश्या गोष्टी करून वेळ कशाला वाया घालतात जगासमोर उत्तम उदाहरणं ठेवायचं असेल तर स्वतः वर काम करा दुसऱ्याला वेळ देत बसू नका अस मला वाटत." जतीन वैद्य ने आपलं मत व्यक्त केल.

"खूप छान आणि सर्वांचे खूप खूप आभार. आजच हे सत्र खूपच छान रंगल नवीन माहिती मिळाली आणि एक संदेश मिळाला तुम्ही सोशल मीडिया वापरा पण जपून त्याचा गैरवापर होऊ देऊ नका नवीन गोष्टी शिकण्यासाठी आणि आत्ताच जतीन जी म्हणाले तस स्वतःला ग्रो करण्यासाठी सोशल मीडिया चा वापर करा. तुम्ही तिघे ही आजच्या सत्रासाठी उपस्थित राहिलात यासाठी तुमचे मनापासून आभार मला आशा आहे आजची माहिती लोकांपर्यंत पोहोचेल आणि ते ही यातून काही तरी शिकतील. आता आपण नवीन विषयासह एका नवीन पाहुण्यांसह तोपर्यंत मजेत रहा आणि प्रत्येक गोष्टीचा डोळसपणे विचार करा नमस्ते." शो संपवत वैभवी म्हणाली

काही वेळा नंतर…

शो संपतो आणि एका हॉटेलच्या रूम मधून 'तो' तो म्हणजे स्वराज कुलकर्णी शो बघत असतो तोच त्याच्या मेल आई डी वर एक अननोन मेल येतो ज्यात लिहिलेलं असत.

"गुरुकुल धोक्यात आहे तुला जर नव्याने सुरवात करायची असेल तर गुरुकुलात परत ये."