Login

ट्रेंडिंग लव हॅशटॅग - स्वररागिणी (भाग - सहा )

ट्रेंडिंग लव हॅशटॅग - स्वररागिणी चा भाग सहावा
"ठीक आहे मग तुझी हीच इच्छा असेल तर मी आता काहीच बोलणार नाही आता तु मला आवाज जरी दिलास तरी मी तुझ्या कडे परत येणार नाही येते मी." आपले डोळे पुसत रागिणी म्हणाली.

आणि तिथून निघून गेली परत कधी ही न येण्या साठी..

स्वराज मात्र बघत राहिला तिच्या परतीच्या वाटेवर डोळे लावून...

"रागिणी..." स्वराजच्या तोंडून एकच शब्द बाहेर पडला.

वर्तमान काळात...

आपल्यातच गुंग असलेली रागिणी अचानक पणे भानावर येते. आणि तोंडावर पाणी मारते. एक क्षण तीला काही सुचतच नाही सगळ काही एका क्षणात सगळ्या आठवणी तिच्या नजरे समोरून जातात आणि ती विचार करू लागते.

"काय चुकलं होत माझ? तु का असा माझ्या आयुष्यातून निघून गेलास आणि मला एकटं सोडलस तुझ्या शिवाय माझ आयुष्य आता मला एकट एकट वाटत आहे स्वराज कस शोधू मी तुला आणि तु ही मला शोधत असशील का रे आणि आता त्यातून हा हॅशटॅग काय सुरु आहे हे मी जितकं तुझ्या पासून दूर जायचा प्रयत्न करते तु तितका मला आठवतोएस छे." रागिणी मनाशीच बोलत विचार करू लागली.

तोच रूम मध्ये मॅनेजर आला आणि त्याने दारावर नॉक केल.

"मी आत येऊ का मॅम?" स्वरूप रागिणीच्या मॅनेजरने नॉक करत विचारलं.

"यस, ये आत." रागिणीने आपले डोळे पुसत सांगितलं.

आणि तीच बोलण ऐकून स्वरूप रूम मध्ये आला.

"मॅम काही पत्रकार आले आहेत तुम्हाला भेटायला काय सांगू त्यांना." स्वरूपने विचारलं.

"हे बघ त्यांना सांगून टाक मी सध्या कुणाला ही भेटू शकत नाही मला सध्या कुणालाच भेटायचं नाहीये तेव्हा त्यांना जायला सांग" भिंती कडे वळून रागिणी म्हणाली

"ठीक आहे मॅम मी त्यांना कळवतो तस पण मॅम अस किती दिवस आपण प्रोग्रॅम, मीडिया ला टाळणार आहोत? कर्जदार आता दारा समोर यायला लागले आहेत आणि जे भूतकाळात घडलं त्यात तुमचा काहीच दोष न्हवता मग त्याच नुकसान तुम्ही का भोगायच " स्वरूप समजावत बोलला.

"तु एक मॅनेजर आहेस स्वरूप फक्त मॅनेजरच काम कर मला शिकवायला जाऊ नकोस जेवढं तुला काम करायला सांगितलं आहे तेवढ कर जा आता आणि त्यांना कळव सध्या मी कुठलेच इंटरव्हयू देऊ इच्छित नाही जेव्हा वेळ येईल तेव्हा मी स्वतः सगळ्यांना बोलावून घेईन ये आता" चिडक्या स्वरात रागिणी म्हणाली.

आणि लगेच तिथून रूम मध्ये निघून गेली.

स्वरूप सुद्धा पत्रकारांना सांगायला निघून गेला.

"हे बघा, रागिणी मॅडम सध्या बिझी आहेत त्यामुळे त्या इंटरव्हयू देऊ शकणार नाही त्या जेव्हा फ्री होतील तेव्हा मी तुम्हाला कळवतो आता या तुम्ही." स्वरूप म्हणाला

स्वरूप पत्रकारांना म्हणाला आणि दार लावून तिथून निघून गेला.

काही वेळा नंतर…

रूमच्या खिडकीत उभ राहून रागिणी परत विचार करू लागली.

"हे काय चालू आहे माझ्या आयुष्यात? जो धागा कधीच तुटला आहे तो आता का जोडला जातोय हा नियतीचा खेळ आहे की परत कुणी तरी आमच्या आयुष्यात येऊ पाहतय? काहीच समजतं नाही आणि आमच्या गुरुकुलाची काय भानगड आहे कुणाला माहित असेल रघुनाथ सरांना विचारू का फोन करून कदाचित त्यांना माहित असेल काय प्रॉब्लेम आहे?" रागिणी मनाशीच विचार करते.

आणि लगेच रघुनाथ जी ना फोन करते.

एक सुंदर रिंगटोन वाजते...

तोच रघुनाथ जी फोन उचलतात...

"हॅलो कोण बोलतय?" रघुनाथ जी विचारतात...

त्यांचा आवाज ऐकताच रागिणीच्या सगळ्या आठवणी ताज्या होतात. आणि ती परत एकदा त्या आठवणीत हरवून जाते.

काही वेळा नंतर…

परत एकदा रघुनाथ जी विचारतात.

"हॅलो कोण बोलतय समजेल का मला." रघुनाथ जी विचारतात.

"सर मी बोलतीये रागिणी कसे आहात तुम्ही." रागिणी हळू आवाजात सांगते

"कोण? स्वराज ची रागिणी? कशी आहेस बाळा ठीक आहेस न. आणि आजच सगळ्यांना माझी कशी काय आठवण येत आहे ह." रघुनाथ जी म्हणाले.

"सगळ्यांना? म्हणजे स्वराज चा ही तुम्हाला फोन आला होता का? कसा आहे तो?" उत्सुकतेने रागिणीने विचारलं

"तुला अजून ही स्वराज लक्षात आहे वाटत? मग त्याला सोडून का गेलीस बेटा?" रघुनाथ जींनी विचारलं

"नाही मी सहज विचारलं आणि सर मी त्याला नाही सोडल उलट त्याने मला सोडल. बर जाऊ द्या त्याचा विषय मी त्याला कधीच मागे सोडल आहे मी तुम्हाला एका वेगळ्याच कारणासाठी फोन केला होता." रागिणी ने सांगितलं

"हो, बोल की काय म्हणतेस?" रघुनाथ जीं नी विचारलं

"सर मला सांगा ह्या स्वररागिणी हॅशटॅग ची काय भानगड आहे सोशल मीडियावर आमच्या नावाने हे काय सुरु आहे आणि गुरुकुलाची काय भानगड आहे मला एक मेल आलाय त्यात सांगितलं आहे "स्वराजला भेटायचं असेल तर गुरुकुलात ये" कोणी केल असेल हे काही माहिती आहे का तुम्हाला?" काळजीने रागिणी विचारते

"म्हणजे? तुला ही मेल आलाय?" आश्चर्याने रघुनाथ जी विचारतात.

"तुला ही म्हणजे? अजून ही कुणाला असाच मेल आलाय का? सर तुम्ही काही माझ्या पासून लपवत नाहीयेत ना" रागिणी काळजीने विचारते.

खर तर स्वरसाक्षी संगीत विद्यालयाची आणि संगीताचार्य अनिरुद्ध यांची खासियतच तशी होती की त्यांच्या प्रत्येक विद्यार्थ्यांना आपल्या गुरुकुलाची आणि अनिरुद्ध जींची ओढ लागत असे. त्यांच शिकवण संगीताचा अभ्यास अगाध होता म्हणूनच तर त्यांना संगीताचार्य ही पदवी मिळालेली होती.

"नाही बेटा मी काहीच लपवत नाहीये खर तर हे प्रकरण नेमक काय आहे हे मला ही समजतं नाहीये मला ही असाच मेल आलाय आणि वसूला ही एक मेल आलाय तिच्या मुळेच मला समजलं माझ तर मेल चेक करणं पण होत नाही आजकाल." रघुनाथ जीं नी सांगितलं

"काय? वसू म्हणजे स्वराजची मानलेली बहीण बरोबर न, बर मला एक सांगा सध्या गुरुकुल कोण बघतय आमचे जेव्हा गुरुकुलात काही दिवसच शिल्लक होते तेव्हा सरांच स्वराजला त्यांच पद देण्याचं सुरु होत पण नंतर आम्ही सगळ्यांनीच गुरुकुल सोडल आणि आमच्या आमच्या करिअरला लागलो पुढे काय घडलं कोणी पदभार सांभाळला काहीच कल्पना नाही" रागिणीने विचारलं

"हो, खरय तुझ पण तुम्ही सगळे गेल्या नंतर मी सुद्धा गुरुकुल सोडल त्यामुळे मला ही त्याची काहीच कल्पना नाही ग सरांशी बोलण होत पण हा विषय निघत नाही त्यामुळे काहीच सांगता येणार नाही मला." रघुनाथ जी म्हणाले

"ठीक आहे तुम्ही काळजी करू नका माझ्या ओळखीत बरेच सायबर एक्सपर्ट आहेत मी बोलते त्यांच्याशी पाहुयात काय होत ते ओके मी ठेवते फोन आता." रागिणी सांगते.

आणि दोघ ही आपापले फोन ठेऊन देतात.

इकडे...

स्वराज देखील त्याच विचारात असतो.

"कोण आमच्या नावाने ट्रेंड सुरु केला असेल अचानक पणे आमचे एवढे फॅन्स कुठून आले असतील.? कलाकारांचे फॅन्स असतात माहितीये कोणी फेक अकाउंट बनवून सपोर्ट करत तर कोणी ट्रोल देखील करत पण हा काही तरी वेगळाच प्रकार दिसत आहे मला काय करावं?" सोशल मीडिया वर नजर टाकत स्वराज विचार करत असतो.