"कोण आमच्या नावाने ट्रेंड सुरु केला असेल अचानक पणे आमचे एवढे फॅन्स कुठून आले असतील.? कलाकारांचे फॅन्स असतात माहितीये कोणी फेक अकाउंट बनवून सपोर्ट करत तर कोणी ट्रोल देखील करत पण हा काही तरी वेगळाच प्रकार दिसत आहे मला काय करावं?" सोशल मीडिया वर नजर टाकत स्वराज विचार करत असतो.
तोच फोन वाजतो...
"हॅलो कोण बोलतय?" सोशल मीडिया वर नजर टाकता टाकता स्वराज विचारतो.
"हाय राज, मी निखील बोलतोय आठवलं तुमच्या नंतरची बॅच." निखील सांगतो.
"ओह यस बोल बोल." स्वराज म्हणतो
"अरे, यार काय बोलू मी हे सगळ सोशल मीडिया वर काय सुरु आहे तुमच्या बद्दल आणि तु कुठे आहेस सध्या मला वाटत स्वराज आता सगळ्यांनीच एकदा भेटण्याची वेळ आली आहे परत काय वाटत तुला?" निखील विचारतो
"तुझ म्हणणं मला पटतय निखील पण जरा थांब आधी थोड आपापल्या परीने याचा तपास तर लावून बघुत अजून याच मूळ कुठे आहे हेच आपल्याला कळाल नाहीये आपण भेटून काय बोलणार." स्वराज समजावत म्हणाला.
"तु न भित्रा ते भित्राच राहिला आहेस स्वराज ना तुला तुझी ओळख सांभाळता आली ना तुझ गाणं आणि आता परत तुला स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळत आहे तर तु नाकारत आहेस काय म्हणायचं याला." निखील चिडक्या स्वरात म्हणाला
"तुला नक्की काय म्हणायचंय मला कळाल नाही." स्वराजने विचारलं
"तुला खरच कळाल नाही की कळून न कळल्या सारख करतोएस स्वराज तुझ अख्ख करिअर वेशी वर टांगलय रे लोक स्वराज हे नाव देखील विसरत चालली आहेत आता तरी जागा हो एनीवे. मला सांग तुला गुरुकुल बद्दल काही कळलं का?" निखील ने समजावत विचारलं
"ह मला मेल आलाय गुरुकुल बद्दल आणि मी आणि वसू आम्ही दोघ याचा विचार करत आहोत पण मला अस काही वाटत नाही काही प्रॉब्लेम असेल अस." स्वराज म्हणाला
"काय अरे आपलं गुरुकुल ज्याने आपल्याला एक नवी ओळख दिली ते गुरुकुल धोक्यात आहे स्वराज ही गोष्ट सुद्धा तु गांभीर्याने घेत नाहीयेस काय म्हणू मी तुला आता." निखील म्हणाला
"तुला काय माहित आहे निखील मी आत्ता काय करत आहे. मला कळतय मी माझ्या प्रेमा पासून माझ्या करिअर पासून खुप दूर आलोय पण त्याचा आता काय उपयोग. बर ते जाऊ दे काय म्हणणं आहे तुझ आपण सगळे भेटावं एवढच न पण मला एक सांग आज ज्यांना ज्यांना असे मेल्स आले असतील काय केल असेल त्यांनी? बर ते ही सोड आपण सगळेजण भेटण्याचा मोटिव काय असेल ठीक आहे कुणा कडे गुरुकुल धोक्यात असल्याच काही सोल्युशन असेल तर गोष्ट वेगळी. आहे का कुणाकडे याच उत्तर तुझ्याकडे आहे तु शोधलं आहे भेटून काही निष्पन्न निघत असेल तर सगळेच भेटू न मला काहीच प्रॉब्लेम नाही" वैतागून स्वराज म्हणाला.
"ठीक आहे मर्जी तुझी मला वाटलं होत भेटलो असतो तर बोलण झाल असत निघालं असत काही तरी सोल्युशन एनीवे चल मी फोन ठेवतो बाय." जरास नाराजीनेच निखील बोलला.
आणि लगेच त्याने फोन ठेवला
स्वराज मात्र त्याला आवाज देत राहिला...
काही वेळा नंतर...
स्वराज एकटाच खिडकीत बघत उभा होता एकदम विचारमग्न.
"निखील जे म्हणत होता ते अगदीच चुकीचं नव्हतं खर आपण उगीच हेखेखोर पणे वागलो त्याच्याशी एकदा फोन करून बघुत त्याला तसही तो गुरुकुलच्या हिताचाच तर विचार करत होता" स्वराज आपल्याच मनाशी विचार करतो.
आणि लगेच निखीलला फोन लावतो.
फोन ची रिंग वाजते तस निखील फोन उचलतो.
"हं स्वराज बोल काय झाल?" निखील विचारतो.
"काही नाही रे, तुझ्या बोलण्यावरच विचार करत होतो तुझ म्हणणं पटलय मला मला म्हणून कॉल केला मी बोल कुठे भेटूयात? आज तुझ्या मुळे ही सही खुप वर्षांनी बाहेर पडेल मी थँक्स." स्वराज म्हणतो.
"अरे, थँक्स कसल त्यात तुझ्याच चांगल्यासाठी बोललो होतो मी शेवटी फ्रेंड्स आहोत आपण आणि गेले कित्येक वर्ष गुरुकुलमुळे आपण एकत्र दिवस घालवले आहेत संगीत सभा असो, किंवा समारोह असो एखादी स्पर्धा असो प्रत्येक गोष्टीत आपण एकत्र होतो आणि तुला ही देवाने इतका गोड गळा दिला आहे ते अस वाया जायला नको रे म्हणून वाटत बस." समजावत निखील म्हणाला.
"हं, खरय तुझ माझ्या ही आयुष्यात ती घटना घडली नसती तर मी गाण्यापासून दूर गेलो नसतो खर तर गाणं आपल्याला जगणं शिकवत पण मी माझ जगणच विसरून गेलो काय करू" स्वराज म्हणाला
"स्वराज, एक विचारू का तुला?" निखील विचारतो.
"मला माहित आहे तुला नेमक काय विचारायचं आहे पण मला ते सगळ आठवायचच नाहीये रे जाऊ देत सोड तो विषय." स्वराज म्हणतो
"ठीक आहे मला नको सांगुस पण उद्या बाकीच्यांच काय तुला भेटल्यावर ते ही तुला असच विचारतील मग काय करणार आहेस तु? हे बघ मनातलं बोलल्यावर मन हलक होत अरे मार्ग सापडतात तूच म्हणालास न माझ्यामुळे तु बाहेर पडणार आहेस मग पूर्णपणे पणे बाहेर पड अर्ध नको" निखीलने स्वराजला पुन्हा एकदा समजावलं
"बर आपण भेटायचं कुठे ते सांग कोण कोण येणार आहे कसे कसे येणार आहेत ते ही सांग म्हणजे माझे दोन तीन मित्र आहेत सायबर एक्सपर्ट आहेत ते मी त्यांना ही घेऊन येतो म्हणजे त्यांच्या मदतीने आपल्याला मेल चा तरी तपास लावता येईल कळेल तरी कोण आहे याच्या मागे आणि इतक्या वर्षांनंतर कस काय समोर आलय सगळ" विषय बदलत स्वराज म्हणाला
"हं, खरय तुझ ऍक्चूली तु पहिलाच होतास ज्याला मी फोन लावला. खर तर सोशल मीडिया वर तुमचं दोघांचं नाव बघितल आणि लगेच तुझा नंबर आठवला म्हणून कॉल लावून बघितला म्हणलं विचारावं तरी हे सोशल मीडियावर नेमक काय सुरु आहे म्हणून कॉल लावला. आता तु तयार आहेस तर बाकीच्यांना ही विचारून बघतो ते काय म्हणतात ते आणि कळवतो तुला तस ओके." निखील सांगतो.
"ठीक आहे मला लवकर कळव सगळे काय म्हणतात ते मग मी मित्रांना ही तस बोलतो आणि मग वसू मी आणि माझे मित्र सगळे एकत्रच येउत." स्वराज म्हणतो.
"ठीक आहे चल मी ठेवतो फोन आता हं बाय." निखील म्हणतो
"ओके बाय" स्वराज म्हणतो.
आणि लगेच दोघ आपापले फोन ठेऊन देतात.
काही वेळा नंतर...
स्वराज आपल्या मित्राला युवीला कॉल लावतो
फोन ची रिंग वाजते...
आणि युवी कॉल घेतो...
"हॅलो, हु इज स्पिकिंग?" युवी विचारतो.
"अरे मी बोलतोय, लगेच विसरलास का?" स्वराज म्हणतो.
"ओह स्वराज, सॉरी यार मोबाईल नवीन घेतलाय त्यामुळे नंबर ओळखू शकलो नाही बोल काय म्हणतोस कसा आहेस आणि आजकाल तुझी गाणी लागत नाही काय झालय." युवी काळजीने विचारतो.
क्रमशः…