Login

ट्रेंडिंग लव हॅशटॅग - स्वररागिणी (भाग - आठ)

ट्रेंडिंग लव हॅशटॅग चा पुढचा भाग
"ओह स्वराज, सॉरी यार मोबाईल नवीन घेतलाय त्यामुळे नंबर ओळखू शकलो नाही बोल काय म्हणतोस कसा आहेस आणि आजकाल तुझी गाणी लागत नाही काय झालय." युवी काळजीने विचारतो.

"काही विचारू नकोस यार माझ लाईफ नुसतं प्रॉब्लेम्सनी भरलय बघ तु एक काम कर न मला भेटायला ब्लु शाईन हॉटेल मध्ये ये न आपण सविस्तर बोलूत" स्वराज म्हणाला

"हॉटेल ब्लु शाईन? पण तु तर अरवली चौकात राहतोस ना मी येऊन गेलोय घरी."युवीने विचारलं

"हो रे पण सध्या काहीच ठीक नाहीये आयुष्यच बदलून गेलय माझ तु भेट तर मला मग सगळ सविस्तर बोलुत" स्वराज म्हणाला

"ओके ठीक आहे मी तुला कॉल करतो फ्री झालो की ठेऊ फोन मी." युवीने विचारलं

"हो ठीक आहे आणि वेळ दिल्या बद्दल थँक यु हं" स्वराज म्हणाला

"अरे आता थँक्स म्हणून परकं करणार आहेस का मला इट्स ओके काही हरकत नाही चल मी कळवतो तुला हं काळजी घे" युवी म्हणाला

आणि लगेच दोघांनी फोन ठेऊन दिला.

काही क्षणा नंतर...

लगेच त्याने आपला बालमित्र अशोक ला ही कॉल केला..

अशोक शिर्के एक उमदे व्यक्तिमत्व आणि इमानदार सायबर पोलीस ऑफिसर होते ते दोघ बालमित्र होते अगदी पट्टी चे त्यामुळे स्वराजला पूर्ण विश्वास होता की अशोक त्याच्या मदतीला धावून येईलच आणि झाल ही तसच. स्वराजने अशोकला कॉल केला.

तोच देशभक्ती पर गीताच म्युझिक वाजलं आणि अशोक ने फोन उचलला.

"हॅलो, राज व्हॉट अ प्लेझेंट सरप्राईज किती वर्षांनी कॉल करतोएस. आहेस कुठे सध्या?" ऑफिसर अशोक ने विचारलं.

"बस यार, जीवन धकवण सुरु आहे आत्ता पर्यंत संगिताला सर्वस्व मानत होतो आणि खर तर एका चुकीमुळे त्या सांगितापासूनच दूर गेलो बघ सोड न तो विषय मला सांग तु मला हॉटेल ब्लु शाईनला भेटायला येऊ शकतोस मी युवी ला ही बोललोय तो कॉल करणार आहे मला." स्वराजने विचारलं

"म्हणजे काय हे काय विचारणं झाल बोल कधी भेटूयात?" अशोकने विचारलं

"मी तुला कळवतो तस फक्त माझ्यासाठी वेळ काढ बस." स्वराज म्हणाला

"तु काळजी नको करुस रे आपण नक्की भेटूत मला फक्त ऍड्रेस सेंड कर मी येईन मग आपण बोलुत ठीक आहे." अशोक म्हणाला

"ठीक आहे, मी लगेच तुला ऍड्रेस सेंड करतो" स्वराज म्हणाला

आणि दोघांनी फोन ठेऊन दिले.

तोच स्वराजला गतकाळ्यातल्या काही आठवणी आठवून गेल्या.

भूतकाळात...

विश्वजित हॉल प्रेक्षकांनी तुडुंब भरला होता. आणि प्रेक्षक वाट बघत होते ते स्वराज आणि रागिणीची. अगदी लोक हॉलच्या बाहेर उभं राहून दोघांची वाट बघत होते तोच हॉलमध्ये दोघ एकत्र आले तस पत्रकार आणि प्रेक्षकांनी दोघांना हेरलं.

सगळ्यांनी एकदम गर्दी केली...

"थांबा... थांबा.. अस गर्दी करू नका वाट सोडा प्लिज मूव्ह" गर्दी हटवत कौस्तुभ स्वराजचा मॅनेजर बोलला.

आणि वाट काढत दोघ हॉलमध्ये शिरले...

तोच हॉलच्या बाहेर उभा असलेला प्रेक्षक वर्ग ही लगेच हॉलमध्ये शिरला आणि त्यांनी परत दोघांना घेरले. कुणी ऑटोग्राफ साठी झटत होत तर कुणी फोटोग्राफ साठी झटत होत ते बघून शेवटी स्वराजच बोलला.

"कौस्तुभ थांब येऊ देत त्यांना. (फॅन्सना) या." स्वराज म्हणाला

लगेच फॅन्स गर्दी करू लागले आपापल्या पद्धतीने फोटोज काढु लागले कुणी ऑटोग्राफ घेऊ लागले. आणि स्वराज रागिणी ही मन मोकळेपणाने पोझ देऊ लागले सगळ्यांशी संवाद साधू लागले.

काही वेळा नंतर...

कॉन्सर्टला वेळ होता म्हणून कॉन्सर्टचे स्पॉन्सर्स विजय दिवाण यांनी पत्रकार परिषदेच ठरवलं.

"सर आपल्या कॉन्सर्टला थोडा वेळ आहे तर आपण पत्रकार परिषद घेऊन टाकायची का" विजय दिवाण यांनी विचारलं

"सर प्रत्येक कलाकारासाठी आपले फॅन्स माय बाप असतात आधी त्यांच्याशी संवाद साधूत मग पुढचं" स्वराज म्हणाला

त्याच बोलण ऐकून फॅन्स ही सुखावले. खर तर स्वराज आणि रागिणी दोघ ही फॅन्सना मान देणारे होते. आणि त्याच फॅन्स मध्ये होता ऋग्वेद

गोरासा, कुणाला ही बघताच क्षणी हिरो वाटेल असा वय वर्ष 15. त्याला गाण्याची फार आवड म्हणून त्याने स्वराजला फॉलो करायला सुरवात केली होती अगदी तो कुठे राहायला होता त्याने गाणं कुठे शिकलं होत अगदी त्याचे प्रत्येक फोटो त्याने जपून ठेवले होते. स्वराज जस काही त्याचा आदर्शच बनला होता आणि त्याला आता आपलं कलेक्शन स्वराजला दाखवायच होत. म्हणून त्याची धडपड सुरु होती. खुप गर्दीतून ही ऋग्वेद अगदीच उठावदार दिसत होता तो एक सारखा स्वराजला आवाज देत होता तोच त्याच ऋग्वेद कडे लक्ष गेलं. आणि त्याने ईशाऱ्याने मॅनेजर ला बोलावलं.

"हा मुलगा कोण आहे बघ जरा त्याच्या कडे आमचे बरेच फोटो दिसत आहेत" स्वराजने सांगितलं

"हो बघतो सर" कौस्तुभ म्हणाला

आणि लगेच ऋग्वेद ला स्वराज जिवळ घेऊन आला.

"तुला माझ्या सरांनी बोलावलं आहे चल" कौस्तुभ ने सांगितलं

हे ऐकताच ऋग्वेद आनंदीत झाला आणि लगेच आपल्या जवळच सगळ कलेक्शन घेऊन स्वराज जवळ आला.

"मी तुमचा खुप मोठा फॅन आहे सर तुम्ही माझी प्रेरणा आहात मी तुम्हाला खुप फॉलो करतो आणि तुमच्यासारखच मी रियाज करायचा ही प्रयत्न करतो हे बघा माझ कलेक्शन तुमचे कॉन्सर्ट मी नेहमी बघतो मोबाईल मी तुमचा एक एक विडिओ सेव करून ठेवलाय आणि मला तुम्हाला एक गिफ्ट पण द्यायचं आहे." उत्साहित होऊन ऋग्वेद बोलला.

"थँक यु सो मच पण तुझ नाव काय आहे आणि तु ही गाणं शिकतोस का?" स्वराज ने विचारलं

"मला तुमच्या सारख व्हायचं आहे सर पण मी अनाथ आहे ना आणि माझ्या जवळ पैसे पण नाहीत म्हणून मी तुमचे व्हिडीओ बघून बघून गाणी शिकतो" ऋग्वेद म्हणाला

"काय? तु माझे व्हिडीओज बघून गातोस? जरा ऐकव." आश्चर्याने स्वराज म्हणाला.

हे ऐकून ऋग्वेद ला खुप आनंद झाला आणि आपल्या आयडलं नी आपल्याला गायला सांगितलय हा विचार करून त्याने लगेच होकार दिला. आणि लगेच गायला सुरवात केली.

काही वेळा नंतर...

ऋग्वेद नी आपल्या सुरेल आवाजात स्वराजनी गायलेलं पाहिलं गाणं म्हणलं ते ऐकून सगळेच मंत्र मुग्ध झाले ऋग्वेद नी तर स्वराज आणि रागिणीच्या सगळ्या आठवणीच जाग्या केल्या. त्याचा तो मधुर आवाजा ऐकून स्वराज मनोमन सुखावला आपण गायलेलं पाहिलं गीताला कुणी तरी अजून ही वाली आहे असा त्याच्या मनात विचार येऊन गेला आणि त्याने मनात एक निर्णय घेतला.

"बाळ एवढ्याशा वयात तुझा आवाज खुप गोड आहे तुला शिकायचं आहे गाणं?" स्वराज ने विचारलं.

"गाणं? तुम्ही शिकवणार मला?" ऋग्वेद ने आनंदाने विचारलं

"हो, तुझ्या संगीताची सगळी जबादारी आजपासून मी घेतो तुला शिकायला आवडेल का?" स्वराज ने पुन्हा एकदा विचारलं.

"नक्कीच मी नक्की शिकेन." आनंदून ऋग्वेद म्हणाला

"ठीक आहे मग आजपासून तुझ्या संगीताची जबाबदारी माझी. आजच कॉन्सर्ट संपलं की मला भेट हं (कौस्तुभ ला) याला तुझ्या बरोबर बसव(ऋग्वेद ला) तु राहायला कुठे आहेस" स्वराजने विचारलं

"मी शांतीनिकेतन अनाथाश्रम मध्ये" ऋग्वेद म्हणाला.