Login

ट्रेंडिंग लव हॅशटॅग - स्वररागिणी (भाग - नऊ)

ट्रेंडिंग लव हॅशटॅग - स्वररागिणी चा पुढचा भाग
"ठीक आहे मग आजपासून तुझ्या संगीताची जबाबदारी माझी. आजच कॉन्सर्ट संपलं की मला भेट हं (कौस्तुभ ला) याला तुझ्या बरोबर बसव(ऋग्वेद ला) तु राहायला कुठे आहेस" स्वराजने विचारलं

"मी शांतीनिकेतन अनाथाश्रम मध्ये" ऋग्वेद म्हणाला.

"कौस्तुभ मला शांतीनिकेतन अनाथ आश्रमाचा ऍड्रेस हवा आहे मला तिथले वॉर्डनशी ऋग्वेद बद्दल बोलायच आहे इतक्या टॅलेंटेड मुलाच नुकसान व्हायला नको त्याच बरोबर मी आपल्या सरांशी देखील ऋग्वेद बद्दल बोलणार आहे ऋग्वेद आता माझी जबाबदारी आहे ऋग्वेद ला मी गाणं शिकवणार" स्वराजने सगळ्यांसमोर अनाउन्स केलं

त्याची अनाउन्समेंट ऐकुन प्रत्येकाला धक्काच बसला पण ऋग्वेद मात्र मनातून आनंदित झाला जस काही त्याला सगळ्यात मोठं गिफ्टच मिळालं आहे.

काही वेळा नंतर...

स्वराज आपल्या फॅन्स शी संवाद साधतच होता की पत्रकारांची ही फौज त्याच्या समोर येऊन उभी राहिली. आणि त्यांची प्रेस कॉन्फरन्स सुरू झाली.

"नमस्कार मी योगिता न्युज लाईव्ह मधुन माझा प्रश्न स्वराजजींना आहे? सर आत्ता तुम्ही एक निर्णय घेतलात त्याच काही खास कारण होत का?" योगिताने विचारलं

"खास कारण म्हणजे हेच की आज मी ज्या पोझिशनला आहे तिथं पर्यंत माझ्या फॅन्स नी सुद्धा पोहोचण्याचा प्रयत्न करावा आज तो फक्त १५ वर्षाचा मुलगा ज्याच्या पुढे मागे कुणी नाही तो एक गायक होण्याचं स्वप्न बघतोय त्याला आपल्यासारख्या कुठल्याच सवलती नाहीत तरी पण तो आपलं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे आणि आपल्याला सगळ्या सुख सोयी असून आपण रडत बसतो तो एवढासा मुलगा त्याच्या जवळ काही नसून आनंदी आहे हाच विचार करून मी हा निर्णय घेतला" स्वराज ने सांगितलं

"मी आराध्या न्यूज विश्वभारती मधुन माझा प्रश्न रागिणी जी ना आहे मॅम तुम्ही दोघ नेहमी एकत्रच परफॉम करता आम्ही कधी तुमचा सोलो परफॉर्मन्स बघितला नाही अशा वेळेस आम्हाला तुमचा एकट्यांचा परफॉर्मन्स बघायला मिळेल का? आणि दुसर असं जेव्हा फॅन्स असा प्रश्न विचारतात तेव्हा तुम्ही कस डील करता?" आराध्याने विचारलं

"मुळात हा प्रश्न च चुकीचा आहे खर तर आमची जोडी आमच्या फॅन्स ना आवडते आणि म्हणून आम्ही एकत्र परफॉर्म करतो दुसर म्हणजे जेव्हा फक्त माझ्या साठी किंवा स्वराज साठी एखादी गायनाची संधी आली तर तुम्हाला नक्कीच आमचा दोघांचा पण सोलो परफॉर्मन्स नक्कीच बघायला मिळेल" रागिणीने सांगितल

"हॅलो मी गिरीश न्यूज सत्यजीवन मधून माझा प्रश्न तुम्हा दोघांसाठी आहे नेहमी तुम्ही एकत्रच गाता मग आता तुमचे नेक्स्ट प्लॅन्स काय आहेत?" गिरीश ने विचारलं.

"प्लॅन्स असे काहीच नाही सध्या आम्ही आमच्या करिअर वर फोकस करायचं ठरवलं आहे जेव्हा प्लॅन्स करायची वेळ येईल तेव्हा सगळ्यात आधी तुम्हाला सांगूत." स्वराजने उत्तर दिलं

त्याच उत्तर ऐकून सगळेच हसू लागले. तोच स्पॉन्सर विजय दिवाण पत्रकार परिषदेत आले.

"माफ करा पण पत्रकार परिषद मध्येच थांबवावी लागेल कारण कार्यक्रमाची वेळ झाली आहे तेव्हा आपण परिषद नंतर घेऊत." विजय दिवाण म्हणाले

लगेच सगळ्यांनी संमती दर्शवली आणि परिषदेची सांगता करून सगळे हॉल मध्ये गेले.

काही क्षणा नंतर…

"नमस्कार, आजच कॉन्सर्ट खास आहे कारण या कॉन्सर्टसाठी जी जोडी आपल्याला भेटली आहे तीच मुळात खूप खास आहे आणि ती जोडी आहे स्वराज आणि रागिणी या नव्या दमाच्या संगीत सम्राट व सम्राज्ञीची मी दोघांना ही विनंती करेन त्यांनी रंगमंचावर येऊन देवी शारदेच्या फोटोला हार घालून या कॉन्सर्टची सुरवात करावी" निवेदिका भाग्यश्री यांनी विनंती केली

तोच लगेच दोघ स्टेजवर आले आणि त्यांनी देवी शारदेच्या प्रतिमेला हार घातला व कॉन्सर्टला सुरुवात केली.

"हाय आता ज्या क्षणाची सगळे आतुरतेने वाट पहात होते तो क्षण आलाय चला तर मग स्वागत करूया बहारदार गीत गाऊन ज्याने आजपर्यंत तरुणांच्या मनाला भुरळ घातली आहे तो म्हणजे वेदांत गाडगीळ याचे वेदांतने आजपर्यंत चार अल्बम केले आहेत तसेच पाच चित्रपटांचे प्लेबॅक सिंगींग देखील केले आहे आणि आता हाच आवाज घेऊन आला आहे एक सुमधुर गीत खास तुमच्या भेटीला." भाग्यश्री ने नाव अनाउन्स केलं आणि स्टेज सोडलं

आणि लगेच स्टेजची धुरा वेदांतने सांभाळली आणि एक खूप सुंदर गीत गायलं.

काही वेळा नंतर...

"खूप सुंदर वेदांत जी तुमचा आवाज मनाला स्पर्शून जाणारा आहे. आता आपल्या समोर येत एक अशी गायिका जिला तुम्ही स्पर्श नावाने ओळखतात. आज ती आपल्यासमोर गाणार आहे एक सुमधुर भावगीत,
'केव्हा तरी पहाटे' हे गीत. मी स्पर्शला स्टेजवर बोलावते." भाग्यश्री ने नाव अनाउन्स केलं.

आणि परत स्टेजवरून खाली आली .

काही क्षणा नंतर…

स्पर्श स्टेजवर आली दिसायला देखणी सुंदर कुणाच्या ही मनाला लगेच स्पर्श करणारी तिचा आवाज तर इतका गोड होता की कुणाला ही तिची भुरळ पडेल तिची गायनाची एक वेगळीच शैली होती ती पहिले प्रेक्षकांशी संवाद साधायची आणि मग आपलं गाण सादर करायची.

"काय म्हणत आहे सगळी पब्लिक मजेत ना आज मी तुमच्यासाठी जे गाण घेऊन आले आहे खर तर ते गाण माझ्या खूप जवळच आहे कारण ज्या वेळी मी आणि माझी मोठी बहीण दुर्गा रियाज करायला बसायचो त्यावेळी माझे बाबा आमच्या दोघींकडून हे गाण म्हणून घ्यायचे पण व्हायचं अस की ताईला चाल लक्षात रहायची आणि मी मात्र गाण पाठ करत बसायचे पण याच रियाजा मुळे आज मला मेहनतीच महत्व पटलं आणि ते गाण आहे आशा जींनी गायलेल 'केव्हा तरी पहाटेव'" स्पर्श नी माहिती सांगितली

आणि लगेच गायला सुरूवात केली.

तिचा गोड आवाज ऐकून सगळेच मंत्रमुग्ध झाले. स्वतः स्वराज आणि रागिणी देखील तीच गाण तल्लीन होऊन ऐकत होते.

काही क्षणा नंतर…

आपल्या सुरेल आवाजाने गाण सादर करून स्पर्शने आपलं गाण संपवताच एकच टाळ्यांचा कडकडाट झाला तोच तीने आदराने झुकून नमस्कार केला व स्टेजवरुन खाली आली.

आणि लगेच निवेदिका भाग्यश्री स्टेजवर आल्या.

"वाह आत्ता फक्त दोनच परफॉर्मन्स झाले आहेत तर ही हालत आहे, पुढे अजून तर एक से बढकर एक परफॉर्मन्स बघायचे बाकी आहेत मग काय होणार तुमचं तयार आहात न सगळे?" भाग्यश्री सगळ्यांना चेअरप करायला विचारते.

तोच सगळे प्रेक्षक एक सुरात " होकार" देतात.


आणि तोच भाग्यश्री परत कार्यक्रम पुढे सुरू करते.

"क्या बात हैं , रसिकहो तुमची एक दाद कलाकाराच प्रोत्साहन असत तुम्ही त्यांना प्रोत्साहन दिलत तर ते तुमच्या साठी दिलखुलास गाऊ शकतील. बर आता आपल्या भेटीला येत आहे तो आवाज ज्याने लहान वयात तर लोकांची मने जिंकलीच होती आणि आज ही तो तरुणांच्या मनावर राज्य करत आहे. ऐकणार आहात त्याच गाण ? हो अगदी बरोबर ओळखलं तुम्ही मी स्वराजला विनंती करते त्यानी आमच्यासाठी एक सुमधुर गीत गाव" भाग्यश्री स्वराजला स्टेजवर येण्याची विनंती करते.

तोच ऋग्वेद उत्साहित होऊन त्याचा नावाचा जयघोष करतो आणि त्याच चिअर करण बघताच सगळे हसू लागतात आणि ते ही त्याला चिअर करतात.