"क्या बात हैं , रसिकहो तुमची एक दाद कलाकाराच प्रोत्साहन असत तुम्ही त्यांना प्रोत्साहन दिलत तर ते तुमच्या साठी दिलखुलास गाऊ शकतील. बर आता आपल्या भेटीला येत आहे तो आवाज ज्याने लहान वयात तर लोकांची मने जिंकलीच होती आणि आज ही तो तरुणांच्या मनावर राज्य करत आहे. ऐकणार आहात त्याच गाण ? हो अगदी बरोबर ओळखलं तुम्ही मी स्वराजला विनंती करते त्यानी आमच्यासाठी एक सुमधुर गीत गाव" भाग्यश्री स्वराजला स्टेजवर येण्याची विनंती करते.
तोच ऋग्वेद उत्साहित होऊन त्याचा नावाचा जयघोष करतो आणि त्याच चिअर करण बघताच सगळे हसू लागतात आणि ते ही त्याला चिअर करतात.
त्याच चिअर्स करण स्वराजला आवडतं आणि तो मनात हसतो आणि लगेच स्टेजवर पोहोचतो आणि लगेच भाग्यश्री स्टेज सोडते मागे बँड रेडीच असतो स्वराजला स्टेजवर आलेलं बघून म्युझिशियन्स देखील खुश होतात तोच स्वराज गायला सुरवात करतो त्याच्या लाईव्ह परफॉर्म्स ने सगळेच मंत्रमुग्ध होतात हा त्यांच्यासाठी एक आद्वितीय क्षण होता कारण व्ह्युअर्स मध्ये रागिणी आणि समोर स्वराज होता ज्या स्वराजने आपला पहिला सुर लावला त्या क्षणी सगळे एकदम शांत झाले स्वराजच गाणं सुरु झाल
काही वेळा नंतर…
स्वराजच्या गोड आवाजातलं गाणं कधी संपलं हे श्रोत्यांना समजलच नाही सगळे त्याच्या आवाजाने इतके मोहित झाले होते गाणं संपलं तोच एकच टाळ्यांचा कडकडाट झाला आणि कॉन्सर्ट ची सांगता झाली स्वराज स्टेजवरून खाली आला आणि लगेच भाग्यश्री ने आपली जागा घेतली.
"वाह, यावेळी स्वराजजींचं गाणं आपल्यासाठी एक पर्वणीच होती खरच हा सोहळा अगदी आठवणीत राहण्यासारखा झाला बघा न एक से बढकर एक परफॉर्मन्स त्यात स्वराजजींचं गाणं बघता बघता वेळ कधी संपली कळलच नाही. मी स्वराज जी आणि रागिणीजींना विचारू इच्छिते तुम्हा दोघांना हा कार्यक्रम कसा वाटला पण तत्पूर्वी दोघांना मी स्टेजवर येण्याची विनंती करते." निवेदक भाग्यश्रीने दोघांना स्टेजवर बोलावले.
लगेच दोघ स्टेजवर आले.
"खूपच छान वाटला आपल्या संगीत क्षेत्रात अस ही टॅलेंट आहे बघून खुप छान वाटलं आणि समाधान ही." स्वराजने उत्तर दिल
"आणि तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला रागिणी जी?" भाग्यश्री ने रागिणीला विचारलं
"अप्रतिम खरच मी तर दोघां तिघांना बरोबर परफॉर्म देखील केलय आज तोच फील आला मला थँक यु ऑल ऑफ यु." रागिणी ने उत्तर दिल
"आजच्या तुमच्या सारख्या युथला काय संदेश द्याल?" भाग्यश्री ने विचारलं
"स्वतः च्या पायावर उभं रहा पण आपल्या लोकांना धरून आयुष्य खूप लहान आहे ते मन मुराद जगा आनंदाने जगा कुणा साठी उपयोगी पडतील अस जगा आणि सतत आपल्या ध्येयांवर काम करा" स्वराज म्हणाला
"जीवनात मागे न थांबता पुढे जाण्याचा विचार करा आपले मार्ग काय आहेत याचा विचार करून हार न मानता सतत आपल्या गुण दोषांवर काम करा आणि ध्येयाकडे वाटचाल करा त्यासाठी शिकत रहा" लगेच रागिणीने ही उत्तर दिलं
"वाह काय सुंदर विचार आहेत दोघांचे खरच ही प्रेरणा घेऊन आजच युथ नक्कीच विचार करेल आणि आता याच नोट वर हा कार्यक्रम संपला अस मी जाहीर करते थँक्यु" भाग्यश्री ने कार्यक्रमाची सांगता केली
तोच टाळ्यांचा कडकडाटात सगळे हॉलच्या बाहेर पडले. पण एक चेहरा मात्र अगदी आतुरते स्वराजची वाट पहात होता तो म्हणजे ऋग्वेद चा ऋग्वेद अगदी डोळे लाऊन स्वराजची वाट पहात होता.
इकडे हॉल मधून सगळे बाहेर आल्यावर परत एकदा फॅन्स स्वराज आणि रागिणी ला घेराव घालून उभे राहिले परत कुणी प्रश्न विचारू लागले कुणी त्याच गाण कस झालं याच गुण गाण करू लागले तर कुणी फोटो काढू लागले पण ऋग्वेद मात्र एकटाच उभा होता दोघांची वाट पहात तोच स्वराजच त्याच्या कडे लक्ष गेल आणि तो त्याच्या जवळ येत म्हणाला.
"अरे ज्युनिअर स्वराज असा एकटाच का उभा आहेस? तिकडे चल सगळेच उभे आहेत" ऋग्वेद जवळ येऊन स्वराज म्हणाला
आपल्याला अचानक स्वराज म्हणाल्याच ऐकून ऋग्वेद एक क्षण विचारातच पडला आणि स्वराजला म्हणाला.
"सर मी स्वराज?" आश्चर्याने ऋग्वेद म्हणाला
"अरे, विसरलोच मी स्वराज तर मी आहे न? पण इथून पुढे आता तुला ही हाक मारतील लोक 'जुनिअर स्वराज' तु अगदी माझ्या सारखच गाणं म्हणालास न त्यामुळे आता तुला माझ्या नावानेच सगळे ओळखतील आणि इथून पुढे तुला या नावाची जबाबदारी देखील पेलावी लागणार आहे. करशील न?" स्वराजने विचारलं
लगेच ऋग्वेदने एक स्मित हास्य केल. आणि म्हणाला
"स्वराज सर हे नाव माझ्या साठी खुप मोठं आहे आणि हे माझ भाग्य आहे की तुम्ही एका अनाथ मुलाला आपलं नाव दिलत मी या नावाला जितकं तुम्ही मोठं केलत त्याहून अधिक मोठं करेल नक्कीच" ऋग्वेद म्हणाला
आणि एकच टाळ्यांचा कडकडाट झाला. व काही क्षणातच फोटो सेशन झाल आणि कार्यक्रमाची सांगता झाली. व सगळे आपापल्या घरी निघून गेले.
पण स्वराजने मात्र वॉर्डनला भेटायचं ठरवलं होत तो त्याच्या मॅनेजरला म्हणाला.
"कौस्तुभ, आपण आता एक काम करुत ऋग्वेदला त्याच्या आश्रमात सोडून येउत म्हणजे वार्डनला ही भेटता येईल काय म्हणतोस" स्वराजने विचारलं
"हो, चालेल की, तुम्हाला सुद्धा सरांना भेटायचं होतच खुप दिवस झालेत गुरुकुलात जाऊन तसच करुत" लगेच कौस्तुभ म्हणाला
व त्याने ड्राइव्हरला कार काढायला सांगितली. तोच रागिणीने विचारलं.
"तुम्ही आजच जाणार आहात का गुरुकुलात" रागिणीने विचारलं
"विचार तर तसाच आहे आज तसही वेळ आहे आणि आपण ऋग्वेदला शब्द दिला आहे त्याची एक सुरवात देखील होईल. तु येणार आहेस का गुरुकुल मध्ये?" स्वराजने विचारलं
"हो, अरे मी पण बरेच दिवस झालेत सरांना भेटून मला ही भेटता येईल." रागिणी म्हणाली
"ठीक आहे मग सगळेच जाऊत आधी वॉर्डन ना भेटून घेवूत मग जाऊत सरांकडे" स्वराज म्हणाला
काही क्षणात...
सगळे गप्पा मारत असतानाच कार समोर येऊन उभी राहिली.. आणि स्वराजने ऋग्वेदला विचारलं.
"ऋग्वेद, तुला तुझा ऍड्रेस माहित आहे का?" स्वराजने विचारलं
"हो, सर माहित आहे मी तुम्हाला घेऊन चलतो चला" ऋग्वेद म्हणाला
"बर आधी ऍड्रेस तर सांग ड्रायवर काकांना सांगावं लागेल न" स्वराज म्हणाला
"शांतीनिकेतन अनाथाश्रम, जयमंगला रोड, प्रभाकर चौक, दादर (पूर्व), मुंबई – ४०००१४ हा माझा ऍड्रेस आहे" लगेच ऋग्वेदने ऍड्रेस सांगितला
आणि सगळे कारमध्ये बसले व कार भरधाव अनाथाश्रमाकडे निघाली.
काही वेळा नंतर...
शांतीनिकेतन अनाथश्रम...
अनाथालयातील सरला ताई आपल्याच कामात व्यस्त होत्या तोच स्वराजची कार आश्रमासमोर येऊन उभी राहिली. आणि कार मधून ऋग्वेद खाली उतरला
त्याला अस कार मधून उतरलेलं बघून सगळेच चकित झाले तो सरला ताईंना आवाज देत देतच कारमधून उतरला.
त्याचा तो आनंद बघून कुणाला काही कळतच नव्हत तो सरळ सरला ताईंच्या ऑफिस मध्ये गेला आणि म्हणाला.
"माई, मी कुणाला घेऊन आलो आहे बघा चला न माझ्या बरोबर उठा." उत्साहित होऊन ऋग्वेद म्हणाला
"अरे हो... हो.. येतीये जरा धीर धर कोण आल आहे ते तर सांग आधी" जागेवरून उठत सरला ताईनी विचारलं.
पण उत्तर द्यायला ऋग्वेद भानावर होता कुठे तो सरळ सरला ताईंना स्वराज जवळ घेऊन आला.
क्रमशः