"अरे हो... हो.. येतीये जरा धीर धर कोण आल आहे ते तर सांग आधी" जागेवरून उठत सरला ताईनी विचारलं.
पण उत्तर द्यायला ऋग्वेद भानावर होता कुठे तो सरळ सरला ताईंना स्वराज जवळ घेऊन आला.
आणि.. सरला ताई दोघांना बघतच राहिल्या आनंदाने त्यांच्या मनात अनेक विचारांनी घर केल होत त्यांना विश्वासच बसत नव्हता की कुणीतरी डेट्स न देता वाट पाहायला न लावता आपल्या आश्रमाला भेट द्यायला आलं आहे एरवी कितीही तारखा देऊन देखील वाट पाहायला लावणारे सेलिब्रेटीज शेवटी तारीख नाहीये अस सांगून पळ काढतात आणि आज चक्क युथ आयकॉन स्वराज आपल्या को सिंगर बरोबर आश्रमात आलाय ह्या विचाराने सरला ताईंचा उत्साह अगदी शिगेला पोहोचला होता. डोळ्यात अश्रू आणि चेहऱ्यावर आनंद अशी परिस्थिती सरला ताईंची झाली होती याच खर तर एक कारण हे ही होत की, ऋग्वेद ज्याला टीव्ही वर बघायचा ज्याची गाणी ऐकायचा त्याच हे स्वप्न पूर्ण झाल होत. स्वराज आणि रागिणीला बघून सरलाताईंना इतका आनंद झाला होता की, दोघांना आश्रमात घ्यायला ही त्या विसरल्या. त्यांची ती परिस्थिती बघून शेवटी ऋग्वेदनेच त्यांना भानावर आणलं.
"माई... कुठे हरवला तुम्ही? त्यांना आपला आश्रम दाखवा न किती वेळचे बाहेरच आहेत ते." ऋग्वेद सरला ताईंना भानावर आणत म्हणाला
तोच त्याचा आवाज ऐकून सरला ताई भानावर आल्या आणि म्हणाल्या.
"अग बाई, विसरलेच मी या न आत या." सरला ताई म्हणाल्या
आणि लगेच दोघ आश्रमात आले. आत येताच स्वराजनी आश्रमावरून एक नजर फिरवली त्याला थोडी भिंतीवर ओल आल्याचं जाणवलं ते बघून स्वराजने सरला ताईंना विचारलं.
"मॅडम आधी मला संपूर्ण अनाथाश्रम दाखवता का?" स्वराज ने विचारलं
"हो या की मी तुम्हाला सगळा आश्रम दाखवते" सरला ताई म्हणाल्या
आणि तिघ आश्रम बघायला निघून गेले
"हे बघा हे आमचं किचन इथे आम्ही मुलांना देखील स्वयंपाकात मदत करण्याची सवय लावली आहे आठवड्यातून एक दिवस हा त्यांचा असतो जेव्हा ते स्वतः ग्रुप करून स्वयंपाक करतात. आणि ह्या आमच्या वसुधा ताई आहेत ह्यांच्या कडे किचन ची जबाबदारी आहे मुलांच्या टर्न ज्या दिवशी असतो तेव्हा सुद्धा ह्या सगळ्या मुलांना हवी ती मदत करतात" किचन आणि वसुधाची ओळख करून देताना सरला ताई म्हणाल्या
तोच स्वराज ने परत एकदा किचन वरून आपली नजर फिरवली.
"आपण पुढे जाऊयात का?" स्वराज म्हणाला
"हो जाऊयात न चला" लगेच सरला ताई म्हणाल्या
आणि सगळे पुढे मुलांच्या ऍक्टिव्हिटी रूम कडे गेले.
"ही मुलांची ऍक्टिव्हिटी रूम अभ्यास झाल्या नंतर मूल इथे आपले छंद जोपासतात ऋग्वेदला तुमच्या गाण्यांची आवड इथेच लागली." सरला ताई म्हणाल्या.
त्यांच बोलण ऐकून स्वराज ने लगेच स्मित हास्य केल.
तोच सगळे पुढे अजून काय काय आहे ते बघायला गेले.
"ही मुलांची स्टडी रूम शाळेतुन आल्यावर मूल इथे अभ्यास करतात" रूम दाखवत सरला ताई म्हणाल्या
"खुप छान, आता मुलांच्या रूम्स कुठे?" स्वराजने विचारलं
"या तुम्हाला मुलांच्या रूम्स दाखवते" सरला ताई म्हणाल्या
आणि सगळे लगेच मुलांच्या रूम्सकडे वळले.
काही क्षणा नंतर...
सरला ताई तिथे असलेल्या प्रत्येक मूला मुलींच्या रूम्स दाखवू लागल्या.
काही क्षणा नंतर...
"आणि ही ऋग्वेदची रूम" सरला ताई रूम दाखवत म्हणाल्या.
ऋग्वेदची रूम स्वराज बघतच राहिला त्याच्या मनात एकच प्रश्न उभा राहिला तो म्हणजे "कुठलंही नातं नसताना कुणी इतकं प्रेम कस करू शकत एखाद्यावर" त्याच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले.
ते बघून सरला ताई सांगू लागल्या.
"खुप लहान होता ऋग्वेद जेव्हा तो आमच्या आश्रमात आला होता खर सांगायचं तर ऋग्वेद कडे अस काहीच नव्हत ज्याने आम्हाला त्याची ओळख करून देता येईल. होता फक्त आवाज त्याचा गोड गळा. आज ही सकाळची प्रार्थना ही त्याच्या तोंडूनच आम्ही ऐकतो. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल पण ती जी ऍक्टिव्हिटी रूम आहे त्या रूमची कल्पना देखील त्याचीच होती. खर तर त्याच्या कडे कलात्मकता आहे सुंदर गळा आहे नाहीये फक्त आई वडिलांचे प्रेम आणि एका गुरुचा आशीर्वाद त्याला एखाद्या चांगल्या गुरूंची सोबत मिळाली न तर आमचा ऋग्वेद कुठल्या कुठे जाईल बघा." सरला ताई ऋग्वेद बद्दल भरभरून बोलत होत्या
आणि स्वराज मात्र भारावून गेलेल्या अवस्थेत त्यांच बोलण अगदी मन लावून ऐकत होता. सरला ताईंच बोलण संपताच स्वराज भानावर आला आणि म्हणाला.
"सरला ताई ऋग्वेद नाही, आता त्याच नाव 'जुनिअर स्वराज' आहे. मला तुमच्याशी जरा वेगळ्या विषयावर बोलायचं आहे आपण तुमच्या ऑफिस मध्ये बसून बोलायचं का" स्वराजने सांगितलं.
"हो.. हो.. का नाही चला." लगेच सरला ताई म्हणाल्या
आणि सगळे ऑफिस कडे रवाना झाले.
काही वेळा नंतर...
सरला ताईंचे ऑफिस...
"या... आत या बसा काय बोलायचं आहे तुम्हाला आधी काय घेणार तुम्ही" आदराने सरला ताईंनी विचारलं
"तुमचा ऋग्वेद." क्षणाचा ही विलंब न करता स्वराज ने उत्तर दिल.
त्याच बोलण ऐकून एक क्षण सरला ताई विचारातच पडल्या.
"अहो इतका विचार करू नका आज माझा एक कार्यक्रम होता मी आणि रागिणी तिथे चीफ गेस्ट होतो त्यामुळे तिथे माझे बरेच फॅन्स देखील आले होते आणि त्याच फॅन्स मध्ये माझी ऋग्वेदशी ओळख झाली मी बोललो ऋग्वेदशी जेव्हा त्याने मला त्याच्या बद्दल सांगितलं तेव्हा मी स्वतः हुन त्याला गायला लावल आणि जेव्हा मी त्याचा आवाज ऐकला मी परत माझ बालपण जगतोय की काय अस मला वाटलं ताई मी ऋग्वेद ची आणि त्याच बरोबर अनाथाश्रमाची संपूर्ण जबाबदारी घ्यायचं ठरवलय मी आत्ता आश्रम बघत होतो तेव्हा मला जाणवलं या आश्रमाची बरीच डागडुजी करण्याची गरज आहे आणि त्यासाठी आज मी हा 60,000 रुपयांचा चेक तुम्हाला देतोय. हे या करता नाही की तुम्ही ऋग्वेदला मला द्यावं तर ही माझी आत्मिक इच्छा आहे प्लिज याला नाही म्हणू नका. आज जेव्हा ऋग्वेदचा आवाज ऐकला तेव्हा वाटलं त्याच लाईफ त्याच स्वप्न अस वाया जायला नको आपण याच्या साठी काही तरी करायला हवं म्हणून मी याच्या संगीताची जबाबदारी स्वतःवर घेतली आहे आणि जीथे मी संगीत कलेचा अभ्यास करून मोठा झालो माझ्या त्याच गुरुकुलात मी त्याच ऍडमिशन कराव अस मला वाटतय जर तुमची परवानगी असेल तर हेच मी इथे आज बोलायला आलो होतो. खर तर प्रत्येक व्यक्ती ला मोठं होण्याचा मोठी स्वप्न बघण्याचा अधिकार आहे एवढचं की कुणाची स्वप्न अर्धवट राहतात तर कुणाला मार्गदर्शक मिळतो आणि जर आज माझे सरच जर याला शिकवायला तयार झाले तर ऋग्वेदच आयुष्य बदलेल अस मला वाटत." स्वराज अगदी पोटतीकीने बोलत होता.
स्वराज च बोलण ऐकून सरला ताई मात्र भारावून गेल्या. त्यांच्या मनात आलं "आज पर्यंत मुलांसाठी डोनेशन देणारे किंवा त्यांना आपल्या घरी नेणारे बघत आलीये आज एखाद्याच भविष्य घडवणारा पहिल्यांदा च बघतीये."
त्या विचारात पडलेल्या असतात तोच स्वराज ने विचारलं.
"काय झाल ताई माझ काही चुकलं का?" स्वराज ने विचारलं
"नाही हो खर तर आम्ही हेच स्वप्न बघत आलोय की इथल्या प्रत्येक मुलांचं स्वप्न पूर्ण व्हावं. खर सांगू का तुम्हाला आज पर्यंत मुलांसाठी डोनेशन देणारे किंवा त्यांना आपल्या घरी नेणारे बघत आलीये आज एखाद्याच भविष्य घडवणारा पहिल्यांदा च बघतीये. माझ मन मानत नाहीये पण स्वराज च्या आयुष्यात एक उमेदीचा प्रकाश येणार असेल तर नक्की घेऊन जा त्याला माझी परवानगी आहे." सरला ताई आनंदाने म्हणाल्या
त्यांच बोलण ऐकून सगळ्यांना च आनंद झाला लगेच ऋग्वेदने सगळ्यांचा निरोप घेतला आणि स्वराज ऋग्वेद रागिणी आणि मॅनेजर कौस्तुभ गुरुकुलाकडे रवाना झाले.
क्रमशः…
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा