Login

ट्रेंडिंग लव हॅशटॅग - स्वररागिणी (भाग बारा )

ही कथामालिका रंजक होत चालली आहे वाचत रहा आता काय काय होईल ते
त्यांच बोलण ऐकून सगळ्यांना च आनंद झाला लगेच ऋग्वेदने सगळ्यांचा निरोप घेतला आणि स्वराज ऋग्वेद रागिणी आणि मॅनेजर कौस्तुभ गुरुकुलाकडे रवाना झाले.

दोन तासा नंतर...

स्वरसाक्षी सांगित विद्यालय...

स्वराजची कार गुरुकुला समोर येऊन थांबली तस ऋग्वेद हळूच बाहेर डोकावून बघू लागला त्याच्या डोळ्यातली चमक संगीत शिकण्याची जिद्द त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होती.
त्याच्या मनात एकच इच्छा जन्म घेत होती ती म्हणजे "मी ही स्वराज सरांसारखं गाणार" याच विचाराने ऋग्वेद आपल्या तरल डोळ्यांनी संगीत विद्यालयाला न्याहाळत होता.

तोच सेक्युरिटी गार्ड ने दरवाजा उघडला आणि स्वराजची कार गुरुकुला समोर येऊन थांबली.

"(दारावर नॉक करत) आत येऊ का सर" स्वराजने विचारलं

त्यावेळी अनिरुद्ध सर एका कामात बिझी होते तोच स्वराजचा आवाज ऐकून त्यांची नजर दरवाज्याकडे गेली.

"अरे, स्वराज ये न आज कस काय येणं केलस?" अनिरुद्ध सरांनी विचारलं

"आज वेळ होता आणि बऱ्याच दिवसापासून मनात ही होतच यायचं म्हणलं मारावी चक्कर. पण यावेळी मी एकटा आलो नाहीये. (ऋग्वेदला) जुनिअर आत ये असा बाहेर का उभा आहेस" स्वराज म्हणाला

लगेच ऋग्वेद केबिनमध्ये आला.

"मी आत येऊ सर." हळूच केबिन मध्ये प्रवेश करत ऋग्वेद ने विचारलं

"ये... ये.. बाळ कोण तु?" अनिरुद्ध जींनी विचारलं

"सर माझ नाव ऋग्वेद मी शांतीनिकेतन अनाथाश्रमात राहतो" ऋग्वेदने सांगितलं.

"सर एकदा याचा आवाज ऐका मग मी सविस्तर सांगतो" स्वराज म्हणाला

"जुनिअर तुला आवडणार एखाद छान गाणं म्हणतोस" स्वराजने विचारलं

"हो, सर नक्कीच आवडेल मला" ऋग्वेद म्हणाला

आणि लगेच त्याने आपला पहिला सुर लावला. जस त्याने सुर लावला त्याच्या गाण्यात सगळे तल्लीन झाले आणि त्याला ऐकतच राहिले.

काही वेळा नंतर...

"स्वराज अरे हा कोण आहे? एवढ्याशा वयात इतका सुंदर आवाज मला तर तुझच बालपण आठवलं खुप सुंदर" अनिरुद्ध जींनी विचारलं.

"हो न सर, मला ही पहिल्यांदा ह्याला ऐकल्यावर असच वाटलं. हा माझा एकलव्य आहे आणि मी ह्याचा द्रोणाचार्य." स्वराजने सांगितलं

"हा तुझा एकलव्य आणि तु द्रोणाचार्य? मग मी कोण" हसत हसत अनिरुद्ध जींनी विचारलं

"(हसून) सर तुम्ही तर सगळ्यांचेच गुरु आहात. आणि माझी इच्छा आहे याला ही तुमचा शिष्य कराव" स्वराजने विनंती केली

"अरे का नाही ह्याचा इतका सुंदर आवाज आहे हे माझ भाग्य असेल मी याला गाणं नक्की शिकवेन (ऋग्वेदला) काय रे बाळ माझ्याकडून गाणं शिकशील न?" अनिरुद्ध जींनी विचारलं

"हो सर नक्कीच मला आवडेल तुमच्या कडून गाणं शिकायला आणि मला माहितीये स्वराज सरांनी आणि रागिणी मॅमनी सुद्धा तुमच्या कडूनच गाणं शिकलं आहे हो न." आनंदून ऋग्वेद म्हणाला

"(हसून ) हो.. हो.. अगदी बरोबर हे माझे पहिले शिष्य आहेत पण तुला कस माहित रे" अनिरुद्ध सरांनी विचारलं

"मला सगळ माहितीये. मला न सर स्वराजसरांसारखं गाणं म्हणायचं आहे." ऋग्वेद म्हणाला

"सर आता मी तुम्हाला एक सांगतो. ऋग्वेद एक अनाथाश्रमात राहतो आणि हा माझा इतका मोठा फॅन आहे न कि याने माझ्यासारखं बनायचं स्वप्न पाहिलं आहे. तुम्हाला सांगतो मी जस्ट एका इव्हेंट साठी गेलो होतो तिथे हा मला भेटायला आला होता माझ्याबरोबर सगळेच फोटो काढायला माझा ऑटोग्राफ घ्यायला उत्सुक होते पण हा. ह्याला मला ह्याच्या कडे जो मौल्यवान खजिना आहे तो दाखवायचा होता. आणि जेव्हा मी ते कलेक्शन बघितल त्याच्या आश्रमातली त्याची खोली बघितली मी थक्क झालो सर म्हणजे कुणी इतका मोठा फॅन कुणाचा कस असू शकत माझ्या तर हे विचारा पलीकडचं आहे. याच आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा गाणं एकटा माझे व्हिडीओज बघून शिकला आहे. म्हणून मला वाटलं हा फक्त व्हिडीओज बघून इतका सुंदर गातो तर याला कुणी गुरु मिळाले तर हा किती पुढे जाईल मी हा विचार केला आणि सरळ याच्या वॉर्डन सरला ताईंना भेटलो आणि तडक इथे घेऊन आलो मी योग्य केल न सर." स्वराजने विचारलं

"तुझा अभिमान तर मला पहिल्यापासून होताच स्वराज पण तु दुसऱ्यांचा ही विचार करतोस हे बघून मला खरच आता स्वतःचा ही अभिमान वाटतोय कि मी तुला शिकवलय खरच एखाद्याला आपली ओळख मिळवून देण ही खरच खुप चांगली गोष्ट आहे तु अगदी योग्य केल आहेस." अभिमानाने अनिरुद्ध जी म्हणाले

वर्तमानात...

"काय सुंदर काळ होता न तो एक नवीन उमेद होती. आज ही त्याला नुसतं आठवलं तर त्याचा आवाज कानात ऐकू येतो. मग हा हॅशटॅग ऋग्वेदने तर सुरु केला नसेल आमची ओळख लोकांमध्ये कायम राहण्यासाठी? असू शकत मी गेल्या कित्तेक वर्षांपासून लईमलाईट पासून दूर देखील आहे न असच असू शकत एकदा तो सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आहे का ते बघतो म्हणजे कळेल." खिडकीतून डोकावून बाहेर बघत स्वराज विचार करू लागला.

काही क्षणा नंतर...

आणि लगेच तो सोशल मीडिया वर ऋग्वेदच अकाउंट चेक करू लागला तोच त्याच नाव टाकताच तो अवाक झाला आज ऋग्वेद 25 वर्षाचा राजबिंडा एकदम देखणा सुपर सिंगर बनला होता आज त्याला भेटून तब्बल 11 वर्ष उलटली होती.

"खरच वाटत नाही हा तोच निरागस छोटासा 15 वर्षाचा ऋग्वेद आहे तब्बल 11 वर्षा नंतर याला बघतोय मी कुठे 15 वर्षाचा तो सर सर हाक मारणारा ऋग्वेद आणि कुठे हा. हा तर पूर्णपणे बदलला आहे एखाद्या चित्रपटातल्या हिरो सारख व्यक्तिमत्व झालं आहे याच. एक सुंदर स्वप्न बघितल होत याने माझ्यासारखं बनण्याच आणि आज हाच ऋग्वेद दुसरा स्वराज बनला आहे. पण मी? मी कुठे आहे मग माझा तर नामोनिशाण नाहीये. हा स्वराज कुलकर्णी आहे? ज्याच्या सारख ऋग्वेदला बनायचं होत? नाही नाही हे बरोबर नाही.. आता खुप झालं खरच खुप झालं या 15 वर्षाच्या ऋग्वेदने माझ्यासारखं गायक होण्याचं स्वप्न बघितल आणि हाच ऋग्वेद गायक झाला ही आणि मी काय केल जो ऋग्वेदचा आयडलं होता तो स्वराज आयुष्यात एका नकळत झालेल्या चुकीमुळे कायमचा सांगितपासून दूर झाला हे बरोबर नाही मला आता बाहेर पडायलाच हवं आणि मी माझ्या गिल्ट मधून बाहेर पडणार. आता हा ऋग्वेद चा आयडलं हार मानणार नाही" स्वराज ऋग्वेदच अकाउंट बघता बघता विचार करू लागला

त्याच्या अकाउंट मध्ये स्वराज चेच फोटोज आणि फोटोजला सुंदर सुंदर कॅप्शन्स दिलेले असतात ते बघून स्वराज थक्कच होतो त्याच्या डोळ्यात पाणी येत आणि तो मनोमन ठरवतो. "आपण आता गिल्ट मध्ये जगायचं नाही तर जगाचा सामना करायचा आणि ज्या स्वराजला पूर्वी पसंद केल जायचं त्या स्वराजला पुन्हा एकदा जगासमोर उभ करायचं." आणि लगेच ऋग्वेद च अकाउंट बंद करून लॅपटॉप बंद करतो.

पण त्याचा तरी एक प्रश्न अनुत्तरीतच असतो आणि तो त्याचा विचार करू लागतो.

"आज खुप वर्षांनी ऋग्वेदला बघितल पण ऋग्वेदच्या अकाउंट मध्ये हॅशटॅग बद्दल काहीच इन्फॉर्मशन नव्हती मग ऋग्वेदच हे काम नाही तर मग कोण आहे छे हा पेच तर वाढतच चालला आहे. पण काही असो या वेळी हार मानायची नाही तर पुनः एकदा उभ राहायचं." स्वराज मनात विचार करू लागतो.

क्रमशः...
0

🎭 Series Post

View all