"आज खुप वर्षांनी ऋग्वेदला बघितल पण ऋग्वेदच्या अकाउंट मध्ये हॅशटॅग बद्दल काहीच इन्फॉर्मशन नव्हती मग ऋग्वेदच हे काम नाही तर मग कोण आहे छे हा पेच तर वाढतच चालला आहे. पण काही असो या वेळी हार मानायची नाही तर पुनः एकदा उभ राहायचं." स्वराज मनात विचार करू लागतो.
आणि वसुंधरा ला कॉल करतो.
"हॅलो, एक बोलायचं आहे जरा वेळ आहे का तुझ्याकडे?" स्वराजने विचारलं
"हो, बोल की काय झालं?" वसुंधरा म्हणाली
"वसू एक अनाउन्समेंट करायची आहे प्रेस कॉन्फरन्स घेता येईल का?" स्वराजने विचारलं
"काय सांगतोस तुला अनाउन्समेंट करायची आहे चक्क पण नेमक काय?" वसुंधरा ने विचारलं
"वसू थांब जरा घाई करू नकोस मला माहितीये तस तुझे कान ऐकायला अधीर झाले आहेत आणि किती तरी वर्षांपासून तु वाट ही बघत होतीस माझ्याकडून ऐकण्याची खर तर तेच कारण आहे ज्याची तु वाट बघत होतीस पण मला हे तुला एकटीला सांगायचं नाही तर संपूर्ण जगासमोर सांगायचं आहे एक काळ असा होता ज्यावेळी मी ह्याच जगासमोर ओरडून हार मानून सांगितलं होत मी कायमच गाणं सोडतोय आमची स्वररागिणीची जोडी तोडतोय आणि आता मला ह्याच जगासमोर उभ राहून सांगायचं आहे की, मला परत उभ राहायचं आहे परत एकदा गाण्याचा आनंद घ्यायचा आहे माझ्या ऋग्वेद साठी आपल्या गुरुकुलासाठी अनिरुद्ध सरांसाठी आणि (थोडस थांबून ) माझ्या." स्वराज मध्येच बोलून थांबतो.
"रागिणीसाठी. बरोबर न तुला हेच म्हणायचं होत न स्वराज. स्वराज माझे कान अनाउन्समेंट ऐकायला अधीर झाले आहेत प्लीज मला लवकर सांग न खरच अरे तु जे बोलास मला तेच तर ऐकायचं होत तुझ्याकडून मी तुला सांगू शकत नाही मी किती खुश आहे ते." वसुंधरा म्हणाली
"हो वसू मला हेच म्हणायचं होत. मला माहितीये ग किती तरी वर्षांपासून तु मी परत गाणं सुरु कराव याची वाट बघत होतीस आणि आता मी तेच ठरवलं आहे परत एकदा ताठ मानेने जगासमोर येऊन उभ राहायचं आणि ह्याची जाणीव खर तर मला माझ्या प्रेरणेने करून दिली म्हणजे ऋग्वेदने करून दिली आधी मी त्याची प्रेरणा होतो आणि आता तो माझी प्रेरणा बनला आहे ग कुणाला तरी माझ्यासारखं बनायची इच्छा होती आणि तो बनला सुद्धा पण मी जीथे होतो तिथेच राहिलो इतके वर्ष म्हणून मी ठरवलं आहे आता स्वतःला ताठ मानेने उभ करायचं आणि परत आपला प्रवास नव्याने सुरु करायचा." स्वराज म्हणाला
"स्वराज तु इतका बदलशील अस वाटलच नव्हत मला तु जो निर्णय घेतला आहेस न तो खुपच छान आहे मला तुझा अभिमान आहे आणि हा निर्णय ऋग्वेदने ऐकल्या वर त्याला ही तुझा अभिमान वाटेल तु काळजी करू नकोस मी लगेच कॉन्फरन्सची तयारी करायला घेते" वसुंधरा म्हणाली
"ठीक आहे मी वाट बघतो तुझ्या रिप्लायची." स्वराज म्हणाला
आणि लगेच दोघांनी फोन ठेऊन दिला.
"(कौस्तुभ ला फोन लावत). हॅलो, कौस्तुभ ज्या दिवसाची आपण इतक्या वर्षांपासून वाट पहात होतो तो दिवस आला आहे आपल्याला प्रेस कॉन्फरन्सची तयारी करायची आहे तेही आजच तयार व्हा महाशय आता आपण खुप बिझी होणार आहे." वसुंधरा म्हणाली
"तुम्ही काय सांगत आहात मला काहीच कळत नाहीये मॅम नेमक काय करायचं आहे?" कौस्तुभ ने विचारलं
"अरे अस काय करतोस ज्या बॉसकडे काम करत होतास त्यालाच विसरलास त्यानेच सांगितलं आहे प्रेस कॉन्फरन्सची तयारी करायला म्हणजे स्वराजने सांगितलं आहे आणि आपल्या कडे वेळ खुपच कमी आहे म्हणून तयारी करायला घे." वसुंधरा म्हणाली
"तो भेकडं? तुला माहित नाही का मी कधीच जॉब सोडला आहे त्याचा असो मला वेळ नाही त्याचा विचार करत बसायला मी निघालोय जॉबला तु तुझ बघ आणि मला परत फोन करू नकोस" कौस्तुभ तिरकस पणे बोलतो.
आणि फोन कट करतो.
वसुंधरा त्याच बोलण ऐकून सुन्नच होऊन जाते विचार करू लागते.
"काय माणसं असतात एक एक जगात हा तोच मुलगा होता ज्याला एके काळी स्वराजने आपल्या पायावर उभ राहायला शिकवलं होत आणि आता स्वराजला त्याची गरज आहे तर चक्क याने पाठच फिरवली वाह रे दुनिया." वसुंधरा विचार करते.
काही क्षणात...
वसुंधरा भानावर येत आपली मैत्रीण वैभवी नाईक ला फोन करते.
देशभक्तीपर गीताच म्युझिक वाजत....
"हॅलो, वैभवी फ्रॉम डेली न्यूज." वैभवी फोन उचलून सांगते.
"हो, वैभवी तूच बोलत आहेस मला माहितीये ते." हसून वसुंधरा म्हणते.
"अय्या, तु किती दिवसानी वसू सॉरी यार न्यु मोबाईल आहे त्यामुळे सगळेच नंबर उडून गेले आहेत मोबाईल मधले. तु सांग कशी आहेस आणि आज कसा काय फोन केलास काय करतीयेस सध्या." आनंदित होऊन वैभवी विचारते.
"अग हो.. हो.. जरा श्वास घे एकदम एवढे सारे प्रश्न. प्रेसवाल्यांसंबंधी काम आहे तर त्यांनाच कॉल लावणार न मी. एक प्रेस कॉन्फरन्स घ्यायची आहे तर म्हणलं आधी मैत्रिणीला फोन करावा." वसुंधरा सांगते
"कोणत्या खुशीत काही खास घडलं आहे का एनी गुड न्यूज." वैभवी विचारते.
"हो गुड न्यूज च आहे तशी आणि आजच प्रेस कॉन्फरन्स घ्यायची आहे आणि तु आमंत्रित आहेस." वसुंधरा सांगते
"बर बर मी नक्की पोहोचेन आता तु स्वतः इंव्हाईट करत आहेस म्हणल्यावर मी तुला नाही कस म्हणू शकते बर प्रेस कॉन्फरन्स कधी आहे आणि कुठे आहे." हसून वैभवी म्हणते.
"प्रेस कॉन्फरन्स ब्लु शाईन हॉटेल च्या कॉन्फरन्स रूम मध्ये आहे आणि दुपारी 12 वाजताची वेळ आहे नक्कीच ये टीमला घेऊन." वसुंधरा म्हणते.
"ठीक आहे मी आणि माझी टीम आम्ही बरोबर 12 वाजता पोहोचतो." वैभवी सांगते.
लगेच दोघी फोन ठेऊन देतात.
आणि वसुंधरा पत्रकार प्रितेशला फोन करते.
फोनची रिंग वाजते आणि जर्नलीस्ट प्रितेश फोन उचलतो.
"हॅलो, कोण बोलतय?" प्रितेशने विचारलं
"नमस्कार, मी वसुंधरा बोलतीये हॉटेल ब्लुशाईन मधून आज इथे एक प्रेस कॉन्फरन्स आयोजित केली आहे आणि तुम्ही आमंत्रित आहात तेव्हा तुमच्या टीम सह 12 वाजता हॉटेल ब्लुशाईन मध्ये या." वसुंधरा म्हणाली
"पण मॅडम विषय काय आहे समजेल का?" प्रितेशने विचारलं
"तुम्ही या तर आधी विषय तुम्हाला आल्यावर समजेल." वसुंधरा म्हणाली
"ठीक आहे मी आणि माझी ब्लुशाईन हॉटेलमध्ये 12 वाजता पोहोचतो.
"ठीक आहे." वसुंधरा म्हणते
आणि दोघ ही फोन ठेऊन देतात.
लगेच वसुंधरा पत्रकार रुपेशला फोन लावते.
फोन ची रिंग वाजते...
आणि रुपेश फोन उचलतो.
"हॅलो कोण बोलतय?" रुपेश ने विचारलं
"नमस्कार, मी रुपेश जींशी बोलतीये का?" वसुंधरा विचारते
"हो, मी पत्रकार रुपेश बोलतोय आपण कोण?" रुपेश विचारतो.
"सर मी वसुंधरा बोलतीये ब्लुशाईन हॉटेल मधून आज आम्ही एक प्रेस कॉन्फरन्स आयोजित केली आहे त्यासाठी तुम्ही आमंत्रित आहात तुम्ही दुपारी 12 वाजता हॉटेल ब्लुशाईन मध्ये आपल्या टीम सह या." वसुंधरा सांगते.
"ठीक आहे मॅम आम्ही येऊन जाऊत." रुपेश म्हणतो.
आणि लगेच दोघ फोन ठेऊन देतात.
क्रमशः...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा