"सर मी वसुंधरा बोलतीये ब्लुशाईन हॉटेल मधून आज आम्ही एक प्रेस कॉन्फरन्स आयोजित केली आहे त्यासाठी तुम्ही आमंत्रित आहात तुम्ही दुपारी 12 वाजता हॉटेल ब्लुशाईन मध्ये आपल्या टीम सह या." वसुंधरा सांगते.
"ठीक आहे मॅम आम्ही येऊन जाऊत." रुपेश म्हणतो.
आणि लगेच दोघ फोन ठेऊन देतात.
काही वेळा नंतर...
"कुणी आहे का तिकडे?" वसुंधरा ने विचारलं
तोच हॉटेलचा मॅनेजर सौरभ आला.
"मे आय कमीन मॅम." मॅनेजर सौरभ ने दारातून विचारलं
"यस, कमीन" वसुंधरा म्हणाली
"तुम्ही मला बोलावलत?" सौरभ ने विचारलं
"हो प्रेस वाले येणार आहेत एक तासाभरात तर तयारी करून ठेव बरोबर 12 वाजता प्रेस कॉन्फरन्स सुरु होईल आपल्या हॉटेल मधले बेस्ट फूड तयार करायला सांग आणि लवकरात लवकर." वसुंधरा ने सांगितलं
"ठीक आहे मॅम मी लगेच तयारी करायला घेतो." सौरभ म्हणाला
आणि लगेच त्याने कामाला सुरवात केली.
काही वेळा नंतर...
ब्ल्यू शाईन हॉटेलच्या हॉल मध्ये समोर एक बेंच दोन खुर्च्या ठेवल्या होत्या तर बेंच समोर पत्रकारांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
काही क्षणात...
हॉल पत्रकारांनी भरला आणि तोच स्वराजचा प्रवेश झाला. त्याला हॉल मध्ये आलेलं बघताच पत्रकार उठून उभे राहिले तस बसता बसताच स्वराज म्हणाला.
"बसा बसा हॉटेल जरा दूर आहे काही त्रास तर झाला नाही सर्वांना" खुर्ची वर बसत स्वराजने विचारलं
"अजिबात नाही, बातम्यासाठी आम्ही पत्रकार नेहमी कुठेही जायला तयार असतो त्यामुळे आम्हाला काही वाटल नाही पण आम्हाला हे कळाल नाही तुम्ही पत्रकार परिषद का बोलावली आहे." एका पत्रकाराने विचारलं
"सांगतो... सांगतो बसा सर्व, तर आजकाल सोशल मीडिया वर काय काय सुरु आहे हे सर्वांनाच माहित आहे मी बोलतोय ट्रेंडिंग हॅशटॅग्ज बद्दल. तुम्हाला माहित आहे का सध्या एक हॅशटॅग चांगलाच व्हायरल झाला आहे ते?" स्वराजने विचारलं
"हो सध्या 'स्वररागिणी' हॅशटॅग चांगलाच व्हायरल झाला आहे लोक या हॅशटॅगचा वापर करून त्या दोन व्यक्तींबद्दल बोलत आहेत त्यांना सपोर्ट करत आहेत आणि मोटिवेट ही करत आहेत पण ह्या दोन व्यक्ती कोण आहेत आणि त्यांचा हॅशटॅग इतका कसा काय व्हायरल झाला हे काही कळल नाही अजून. इनफॅक्ट वैभवी ने यावर न्यूज देखील बनवली आहे." एका पत्रकाराने सांगितलं.
"हो, अगदी बरोबर ते इंटरव्हयुज आणि न्यूज देखील बघितली आहे मी खुप छान एपिसोड झाला पण नेमक या मागे कोण आहे आणि ह्या दोन व्यक्ती कोण आहेत याचा कुणी शोध घ्यायचा प्रयत्न केला आहे का आणि मुळात हाच विषय आज इथे का घेण्यात येतोय याचा विचार कुणी केला आहे का?" पुन्हा एकदा स्वराज ने विचारलं
"नाही सर आम्हाला याची काहीच कल्पना नाही." वैभवीने सांगितलं
"ठीक आहे मी सांगतो या मागच रहस्य, जो सोशल मीडिया वर हॅशटॅग सुरु आहे तो माझ्या आणि रागिणी च्या नावाचा हॅशटॅग आहे तो स्वर म्हणजेच मी स्वराज कुलकर्णी." स्वराजने आपली ओळख करून दिली
जस स्वराजने आपली ओळख करून दिली तस सगळे काही क्षण स्तब्ध झाले.
काही क्षणा नंतर...
"तुम्ही स्वराज आहात तो हॅशटॅग तुमचा आहे? पण मग इतके वर्ष झाली तुम्ही होतात कुठे आणि अस काय झालं ज्यामुळे तुम्हाला तुमची ओळख विसरावी लागली आणि आता अचानक तुम्ही पत्रकार परिषद घेण्याचं कस ठरवलं?" वैभवी ने विचारलं
"सांगतो सगळं सांगतो. आज पर्यंत मी अनामिक अंधःकारात जीवन जगत होतो नेम फेम असून ही मला कुणी ओळखत नव्हत त्याच कारण म्हणजे माझा भूतकाळ. तुम्हाला प्रीतीत तुझ्या रंगले हे गाणं आठवत आहे." स्वराज ने विचारलं
"प्रीतीत तुझ्या रंगले. हो, नक्कीच ह्या गाण्याला किती तरी हिट्स मिळाले होते आठवतय मला हे गाणं कुणीतरी रागिणी नावाची गायिका होती तीला या गाण्यासाठी बेस्ट सिंगर चा अवॉर्ड देखील मिळाला होता त्या वेळेस." प्रितेश सांगतो
"तुम्हाला गायिका आठवते पण तिच्या बरोबर ज्याने आवाज दिला आहे त्या गायकला विसरलात सगळे. खरय तो काळचं वेगळा होता आणि इतक्या वर्षानंतर त्याला कुणी कस लक्षात ठेवेल." स्वराज म्हणाला
"म्हणजे सर ते गायक तुम्ही होतात मग इतके वर्ष कुठे होता तुम्ही आणि का अस अंधःकारात जीवन जगत होतात काय घडलं होत तुमच्या आयुष्यात अस." एका पत्रकाराने विचारलं
"हो सांगतो, खर तर मी कायमच माझ आयुष्य आपल्या शर्ती वर जगत आलोय जे मला हवं ते मी मिळवत आलोय मग ते काही ही असो माझ आयुष्य हे मी माझ्याच हातात आहे अस समजत आलो आणि खर तर तीच माझी सगळ्यात मोठी चूक ठरली. माझा जन्म मुंबईतला वरळीतला घरात संगीताचा वारसा म्हणून आपोआपच मी सांगिताकडे ओढला गेलो घरात कधी मैफिली व्हायच्या तर मी कुठेही असलो तरी येऊन बसायचो गाण्यात तल्लीन होऊन गाणं ऐकायचो हेच घरातल्यानी हेरलं आणि मला स्वरसाक्षी संगीत विद्यालयात भरती केल. विद्यालयाचे अनिरुद्ध सर आणि माझे बाबा पंडित रघुवीर कुलकर्णी दोघे ही चांगले मित्र त्यामुळे त्यांच घरी येणं जाण असायचं मैफिली व्हायच्या आणि त्यात मला ही एखाद गाणं म्हणायला लावायचे च लहान होतो त्यामुळे सगळ्यांना माझ विशेष कौतुक असायचं असच एका मैफिलीत अनिरुद्ध सरांनी माझा आवाज ऐकला आणि त्याच वेळी माझी रवानगी स्वरसाक्षी विद्यालयात करण्यात आली आणि तिथेच माझी पहिली भेट रागिणी शी झाली. माझ्या घरात आम्ही तीन भावंड माझा मोठा भाऊ आनंद माझी मोठी बहीण स्वरा आणि मी स्वराज तसेच माझी आई वरदा आणि बाबा रघुवीर असे पाच जण सगळे गाण्यातलेच आईच वेगळेपण सांगायचं झालं तर ती संगीता बरोबर देवा धर्मातली देखील होती चांगल्या संस्काराचे बाळकडू आम्हाला तिनेच दिले कारण बाबा प्रसिद्ध गायक असल्याने ते कायम फिरस्तीवरच असायचे त्यांच कधी आमच्याकडे लक्ष नसायचं च त्यामुळे आमच्यासाठी जे कुणी असायची ती फक्त आईच होती तिनेच आम्हाला वाढवलं मोठा गायक बनवल आमच्या पायावर आम्हाला उभ केल हं मी तिच्या संस्कारावर खरा उतरू शकलो नाही ती गोष्ट वेगळी." स्वराज डोळ्यात पाणी आणून सांगतो.
"अस का बोलतोस तु ही जगला आहेस तुझ्या संस्काराला आणि चुका होतात रे माणसांकडून पण त्याने सत्य नाही बदलत न." वसुंधरा समजावते
"तुम्ही रागिणी आहात का?" एका पत्रकाराने विचारलं
तोच दोघ एकमेकांकडे बघतात आणि हसतात.
"स्वराजची न खासियतच ही आहे. मी एकटीच नाही तर स्वराजने कळत नकळत पणे बऱ्याच जणांच आयुष्य बदललं आहे. मी वसुंधरा रागिणी स्वराज आणि मी आम्ही तिघांनी एका पाठोपाठ एक स्वरसाक्षी मध्ये प्रवेश घेतला होता फरक एवढाच आहे की मी हॉटेल लाईन मध्ये आले आणि या दोघांनी पुढे आपलं गाणं सुरु ठेवलं. खर तर गोष्ट त्यावेळेस ची आहे जेव्हा मी स्वरसाक्षी मध्ये प्रवेश घेतला होता खुप लहान होते मी मला भावानी सांभाळल होत आणि पहिल्यांदाच मी तब्बल 24 वर्षांसाठी आपल्या भावापासून दूर राहणार होते मला आठवत त्या दिवशी माझा दादा मला सरांजवळ सोडून आपले ओले डोळे पुसत निघत होता तोच कुठून माहित नाही एक गोरासा सडपातळ असा मुलगा आला आणि त्याने दादाचा हात धरला आणि म्हणाला. "तुम्ही रडू नका आजपासून ही माझी पण बहीण आहे मी हिची काळजी घेईन चल मी तुला गुरुकुल दाखवतो." त्याक्षणी मी माझ्या मोठया भावाला ही विसरले तुम्हाला माहित आहे तो कोण होता तो दुसरा तिसरा कुणी नसून स्वराजच होता. आजही त्याने आमचं हे नात जपलं आहे." स्वराजकडे बघत त्याच्या हातावर हात ठेऊन वसुंधरा म्हणाली.
आणि तोच स्वराजने एक स्मित हास्य केल.
क्रमशः