Login

ट्रेंडिंग लव हॅशटॅग - स्वररागिणी (भाग - पंधरा )

आज स्वराज ने आपल्या स्वतः च्या घरी जाण्याचा निर्णय घेतला देतील का त्याला घरचे साथ.
"स्वराजची न खासियतच ही आहे. मी एकटीच नाही तर स्वराजने कळत नकळत पणे बऱ्याच जणांच आयुष्य बदललं आहे. मी वसुंधरा रागिणी स्वराज आणि मी आम्ही तिघांनी एका पाठोपाठ एक  स्वरसाक्षी मध्ये प्रवेश घेतला होता फरक एवढाच आहे की मी हॉटेल लाईन मध्ये आले आणि या दोघांनी पुढे आपलं गाणं सुरु ठेवलं. खर तर गोष्ट त्यावेळेस ची आहे जेव्हा मी स्वरसाक्षी मध्ये प्रवेश घेतला होता खुप लहान होते मी मला भावानी सांभाळल होत आणि पहिल्यांदाच मी तब्बल 24 वर्षांसाठी आपल्या भावापासून दूर राहणार होते मला आठवत त्या दिवशी माझा दादा मला सरांजवळ सोडून आपले ओले डोळे पुसत निघत होता तोच कुठून माहित नाही एक गोरासा सडपातळ असा मुलगा आला आणि त्याने दादाचा हात धरला आणि म्हणाला. "तुम्ही रडू नका आजपासून ही माझी पण बहीण आहे मी हिची काळजी घेईन चल मी तुला गुरुकुल दाखवतो." त्याक्षणी मी माझ्या मोठया भावाला ही विसरले तुम्हाला माहित आहे तो कोण होता तो दुसरा तिसरा कुणी नसून स्वराजच होता. आजही त्याने आमचं हे नात जपलं आहे." स्वराजकडे बघत त्याच्या हातावर हात ठेऊन वसुंधरा म्हणाली.

आणि तोच स्वराजने एक स्मित हास्य केल.

"खर सांगायचं तर वसूला माझी स्तुती करण्याची संधीच हवी असते एकदा तीला संधी मिळाली की तीला रात्र देखील पुरतं नाही. असो मी काही मोठी व्यक्ती नाही एक साधारण आयुष्य जगणारी व्यक्ती आहे. पहिले सुद्धा मी असाच होतो गाण्यावर प्रेम करणारा आनंदाने आपलं आयुष्य जगणारा पण ते म्हणतात न. "जीथे आपल्याला सगळ चांगलच दिसत असत तिथे काही तरी चुकीचं हे घडतच असत. मी माझ्या कुटुंबा बरोबर मित्र मैत्रिणींन बरोबर खुप सुखी होतो. पण एक क्षण माझ्या आयुष्यात असा आला ज्याने माझ आयुष्यच बदलून टाकलं तो क्षण म्हणजे माझ्या भूतकाळात झालेली एक चूक. त्या दिवशी माझ्या एका मित्राने माझ्यासाठी सक्सेस पार्टी ठेवली होती आम्ही मोजकेच त्या पार्टीला जमलो होतो आणि त्याच पार्टीत मला कुणी तरी ड्रग्ज चा ओव्हर डोस दिला आणि कायम देतच राहिले जो पर्यंत मला त्याची सवय लागली नव्हती. काही दिवसातच मी ड्रग्जच्या पूर्ण आहारी गेलो होतो आणि त्यातच मी एका मुलीच्या आयुष्याशी देखील खेळून बसलो आणि त्यातच मी माझ पूर्ण आयुष्य हरवून बसलो. पण जेव्हा मी भानावर आलो तेव्हा आयुष्यात फक्त अंधार उरला होता आज ही मला त्याची खंत वाटते आणि स्वतःचा राग ही येतो हा विचार करून की आपण असे या सगळ्यात कस काय अडकलो पण ते म्हणतात ना "चुकीची वेळ कधी ही सांगून येत नसते हे आपल्या वर असत आपण किती अलर्ट राहतो." त्या दिवशी ती एक चूक माझ्या हातून झाली नसती तर आज चित्र काही वेगळच असत. तर हे आहे माझ आजपर्यंत मी लाईम लाईट पासून दूर राहण्याच कारण. " स्वराजने सांगितलं

"आता ती मुलगी कुठे आहे? तुम्हाला अस नाही का वाटलं कधी आपण तीचा शोध घ्यायला हवा होता?" एकाने प्रश्न केला

"वाटलं न खुप वाटलं पण कधी तीला फेस करण्याची हिम्मतच झाली नाही मी कमजोर पडलो आणि पडतच गेलो पण आता नाही आता खुप झालं आता वेळ आली आहे स्वतःला सावरण्याची आणि नव्याने ताठ मानेने पुनः उभ राहण्याची आणि आज हेच तुम्हाला सांगायला मी इथे बोलावलं आहे आत्ता पासून मी पुनः एकदा आपले पाय म्युझिक इंडस्ट्रीमध्ये रोअणार आहे. आणि आपल्या आयुष्याची परत एकदा नव्याने सुरवात करणार आहे यात मला तुमची साथ लागेल तुम्ही द्याल मला साथ?" स्वराजने विचारलं.

"हो, सर आम्ही आहोत तुमच्या बरोबर तुम्ही आता मागे वळून बघू नका आम्ही तुमच्या प्रत्येक कार्यात सोबत आहोत." सगळे एकदम म्हणाले

"कुणाला अजून काही प्रश्न?" वसुंधरा ने विचारलं

पण कुणी काहीच उत्तर दिल नाही.

काही क्षणात...

"आता इथे पत्रकार परिषद संपली अस मी जाहीर करते तुम्ही सर्व अगदी वेळात वेळ काढून आला या बद्दल सर्वांचे मनापासून आभार. तुमची खाण्या पिण्याची व्यवस्था बाहेर केली आहे त्याचा आनंद घेऊन मगच जा आल्याबद्दल धन्यवाद." वसुंधरा म्हणाली

सगळ्यांनी नाश्त्याचा आनंद घेतला आणि सगळे आपापल्या कामाला निघून गेले.

"तुला माहितीये स्वराज आज तुझ्याबद्दल बोलत असताना एकदम सगळं गुरुकुलतलं बालपण डोळ्या समोर येऊन गेलं रे किती मस्ती धिंगाणा घालायचो नई आपण ते दिवसच खुप वेगळे होते रे." वसुंधरा म्हणाली

"हो न. माझ आणि रागिणीच कधी जमलच नाही छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडत सुटायचो आम्ही आणि आमचं भांडण सोडायला तु तयारच राहायचीस ते तुझ अगदी अंगवळणी पडलेलं कामच झालं होत. आणि आता भांडता भांडता आम्ही कधी एकमेकांपासून दूर झालो कळलच नाही." डोळ्यातले अश्रू पुसत स्वराज म्हणाला

"अस का म्हणतोस रे आता तुच ठरवलं आहेस न सगळं नीट करायचं म्हणून मग असा उदास राहिलास तर कस होणार सर्व." वसुंधरा समजावत म्हणाली

"माझ सोड, तुझ काय तुला नक्की बालपणच आठवत होत की..." मध्येच थांबत स्वराज ने विचारलं

"काय तु पण? आपलच बालपण आठवणार न मला आजून कोण आठवणार? विषय भलती कडे नेऊ नकोस" थोडीशी लाजत वसुंधरा म्हणाली

तीच लाजण बघून स्वराजने ओळखलं.

"वसू तु लाजतीयेस चक्क? बैस खाली बैस खर तर मला तुझ्या बद्दल बोलायचं च होत मला खर खर सांग तो अजून ही तुला भेटतो का ग?" स्वराजने विचारलं

"तो? तो कोण तु कुणाबद्दल विचारत आहेस मला काही कळत नाहीये बर सोड मला उशीर होतोय" बोलण मध्येच तोडत वसुंधरा म्हणाली

"वसू मी परत घरी जाण्याचा विचार करत आहे." स्वराज म्हणाला

ते ऐकून वसुंधरा खालीच बसली तिच्या डोळ्यात पाणी होत तीने एकदाच त्याच्याकडे वळून बघितल आणि क्षणभर बघतच राहिली.

काही वेळा नंतर...

"कधी निघणार आहेस?" आपले डोळे पुसत वसुंधरा ने विचारलं

"निघेन एक दोन दिवसात पण त्या आधी मला तुझ्या बरोबर पहिल्या सारखा वेळ घालवायचा आहे तुला चालेल." स्वराजने आपले डोळे पुसत विचारलं

ते ऐकताच तिच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य उमटल.

"काय करायचं आहे बोल." आनंदाने वसुंधरा म्हणाली

"ओके तु तुझ काम आटपून घे मग सांगतो ठीक आहे." स्वराज म्हणाला

"ठीक आहे मी माझ आवरून घेते माझ्या दोन तीन मिटिंग्ज आहेत एक इव्हेंट आहे त्याची तयारी करायची आहे मिटिंग्ज झाल्या की मग बोलू आपण येऊ मी." वसुंधरा म्हणाली

"बैस न थोडयावेळ तुला काही बोलायचं आहे का? मनात कुठली ही गोष्ट ठेऊ नकोस तुला जे बोलायचं आहे ते अगदी मनमोकळे पणाने बोल. आणि मी इथून जाणार आहे तुझ्या मनातून नाही तु मला कधी ही हक्काने आवाज दे मी अगदी अर्ध्या रात्री तुझ्या साठी धावून येईन." स्वराज तिच्या हातावर हात ठेवत म्हणाला

"थँक्यु तुझा सहवास मला मिळाला हे माझ मी भाग्य समजते स्वराज तुझ्या सारखा भाऊ मिळण ही भाग्याची गोष्ट आहे तु नको काळजी करुस मी ठीक आहे फक्त घरी गेल्यावर या वेड्या बहिणीला मात्र विसरू नकोस." आपले डोळे पुसत वसुंधरा म्हणाली

आणि काही क्षण दोघ ही आपल्या नात्यात हरवून गेले.

क्रमशः...

0

🎭 Series Post

View all