"थँक्यु तुझा सहवास मला मिळाला हे माझ मी भाग्य समजते स्वराज तुझ्या सारखा भाऊ मिळण ही भाग्याची गोष्ट आहे तु नको काळजी करुस मी ठीक आहे फक्त घरी गेल्यावर या वेड्या बहिणीला मात्र विसरू नकोस." आपले डोळे पुसत वसुंधरा म्हणाली
आणि काही क्षण दोघ ही आपल्या नात्यात हरवून गेले.
काही क्षणा नंतर...
"बर. चल आपले डोळे पुस आणि एक लक्षात ठेव आपल्या मध्ये रक्ताचं नात नसलं तरी सुद्धा हा तुझा भाऊ कायम तुझ्या पाठीशी उभा असणार आहे तुला मी कधी ही अंतर देणार नाही कधी ही स्वतःला एकटं समजायचं नाही हं अगदी रात्री जरी फोन करावासा वाटला तर लगेच करायचा मी कितीही बिझी असलो तरी तुझा फोन लगेच उचलेल हं." वसुंधरा चे डोळे पुसत स्वराज म्हणाला
"बर... बर... आता इतका सेंटी होऊ नकोस स्वतः ही डोळ्यात पाणी आणत आहेस आणि माझा ही मेकअप खराब करत आहेस चल सोड सगळ आता मी माझ्या मिटिंग्ज आटपून घेते मग प्लॅन करुत ओके." आपले डोळे पुसत वसुंधरा म्हणाली
आणि दोघ हसू लागले.
काही वेळा नंतर...
वसुंधरा मिटिंग्ज करायला स्टडी रूम मध्ये गेली आणि स्वराज आपल्या रूम मध्ये आवरायला गेला.
स्वराजची रूम...
आज स्वराजला खुप हलक वाटत होत कित्येक वर्षांपासून च मनावरच ओझं आज दूर झाल्यासारखं त्याला वाटत होत. आणि त्याच समाधानात तो आपलं आवरू लागला.
"चला बॅग तर पॅक झाली आज किती तरी वर्षांनी घरी जाणार आहे हे सगळच मला अगदी स्वप्नवत वाटतय. काय म्हणतील सगळे मला स्वीकारतील न. (आपल्या कुटुंबाच्या फोटो कडे बघत ). आई, बाबा दादा ताई तुम्ही सगळे मला स्वीकाराल न? माझी नकळत झालेली एक चूक पोटात घेऊन मला दुसरी संधी द्याल न कराल न मला माफ?" फोटो कडे बघून डोळ्यात पाणी आणून स्वराज मनाशीच बोलला.
काही क्षणा नंतर...
लगेच भानावर येत त्याने फोटो बॅगेत ठेवला आणि बॅग बंद केली व आपल्या जागेवर ठेऊन दिली आणि थंड हवा खायला आपल्या खोली बाहेर आला आज स्वराज प्रसन्न वाटत होता मनावरच मळभ दूर झालं होत आता त्याला ध्यास लागला होता पुढे जाण्याचा नव्याने आयुष्य जगण्याचा आज त्याच्या मनात उदासीनता नव्हती तर स्वतःवरचा आदर होता आणि इतरांकरता कृतज्ञतेची भावना होती.
त्याने मनात ठरवलं ज्यांनी ज्यांनी मला साथ दिली त्या प्रत्येकासाठी आपण काही तरी घेतलं पाहिजे आणि हाच विचार करून तो खुप वर्षांनी बाहेर पडला
काही वेळा नंतर....
आज त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. तो ब्ल्यू शर्ट जीन्स पायात स्पार्क चे शूज गोरा चेहरा आणि मनात एक वेगळाच आत्मविश्वास घेऊन आज त्याने कैक वर्षांनी आपली आवडती बाईक बाहेर काढली आणि सुसाट थंड वाऱ्याचा आनंद घेत आपल्या मार्गाने चालू लागला
काही वेळा नंतर...
बऱ्याच वेळा नंतर त्याला एक ओळखीचं खुप मोठं शॉप दिसलं आणि त्याच्या आठवणी परत जाग्या झाल्या.
"हे दुकान? हे दुकान अजूनही तसच आहे? पूर्वी किती इथून शॉपिंग करायचो आम्ही तिघ हे दुकान अजून ही तसच आहे इतक्या वर्षा नंतर ओळखतील का दुकानाचे मालक मला बघू तरी आत जाऊन हे अस एकमेव दुकान होत जीथे सगळ्या वस्तू एका छताखाली मिळायच्या." स्वराज मनात विचार करू लागला
आणि लगेच त्याने बाईक पार्क केली व दुकानात शिरला. आणि दुकानात वस्तू बघू लागला. एका क्षणातच त्याला कळाल दुकानात खुप बदल झाला आहे जीथे एकसारखी गर्दी असायची तिथे आज तूरळक गर्दी आहे सामान सुद्धा कमी केल गेलं आहे खुप दयनीय अवस्था झाली आहे.
खर तर ते दुकान स्वराजच्या ओळखीच्या व्यक्तीचं होत त्याला त्यांच्या घराची परिस्थिती माहित होती आणि म्हणूनच त्याला दुकानाची अवस्था बघून वाईट वाटलं त्याने लगेच दुकानदाराची चौकशी केली.
"हाय, कसे आहात तुम्ही? तुम्ही सरपोतदार काकांचा मोठा मुलगा न?" स्वराजने चौकशी करत विचारलं
"हो पण तुम्ही कस ओळखलत तुम्ही बाबांना ओळखता का?" विरेन सरपोतदार ने विचारलं
"खर तर, खुप वर्षांपूर्वी मी इथूनच खरेदी करायचो पण मधल्या काळात मी स्वतःच माझ्या काही अडचणीत अडकलो होतो त्यामुळे बाहेरच्या जगात काय सुरु आहे त्यापासून पूर्ण अनभिज्ञ होतो आज ठरवलं जगाचा सामना करत उभ रहायचच आणि हा विचार करून आज बाहेर पडलो तुम्ही मला ओळखत नाहीत पण मी ओळखतो तुम्हाला मला काका नेहमी आपल्या कुटूंबा बद्दल सांगायचे एकदा तर त्यांनी मला सगळ्यांचे फोटो सुद्धा दाखवले होते कसे आहेत ते आता? खर तर ते असताना दुकान नुसतं भरलेलं असायचं आज बघितल तर खुप तूरळक गर्दी आहे दुकानात आणि सामान देखील तुम्ही खुप कमी केलेलं दिसतय." स्वराजने विचारलं
"हो आमच्या घराची परिस्थिती जरा वाईट आहे आणि दुकान बघायला ही मी एकटाच आहे बाकी सगळ्यांना आपापले मार्ग निवडले त्यामुळे वडिलांना हा धक्का सहन झाला नाही आणि त्यातच दोन वर्षांपूर्वी ते आम्हाला सोडून गेले आता हे दुकान मीच बघतो." विरेननी सांगितलं
"ओह खूपच वाईट झालं पण मग आता दुकानाचं काय? तुमच्याकडे माणसं जास्त आहेत आणि या दुकानातून भागत का सगळ मग?" स्वराज ने विचारलं
"नाही अहो भागत तर नाही आणि म्हणून आता मी सुद्धा वेगळा विचार करायचा ठरवलं आहे मी काही दिवसात च हे दुकान विकणार आहे बघू काय होत ते?" दुःखी स्वरात वीरेन सांगितलं.
"काय सांगताय वडिलांची आठवण आहे ही आणि त्या आठवणीलाच आपल्या पासून दूर करणार तुम्ही आजपर्यंत मी आपल्या कुटुंबापासून खुप दूर होतो त्यामुळे मला कुटुंबाच महत्व माहित आहे तुम्ही या दुकानाला विकू नका प्लिज. याला खुप मोठं करा." स्वराज ने समजावत सांगितलं
"सल्ला देण खुप सोपं असत हो पण जेव्हा जबाबदाऱ्या त्रास द्यायला लागतात न तेव्हा कळत असो बघतो काय करता येत ते तुम्ही काही विकत घ्यायला आला होतात का?" वीरेन ने विचारलं
"हो मी गिफ्ट घ्यायला च आलो होतो पण तुमच्या दुकानाची अवस्था बघून मीच विचारात पडलो आहे. तस खरेदी देखील मी करणारच आहे पण एक विचारू का तुम्हाला?" स्वराज ने विचारलं
"हो, विचारा की?" वीरेन म्हणाला
"तुम्ही मला तुमचं दुकान विकाल का काकांशी माझ जवळच नात आहे ते मला आपला मुलगा मानायचे आणि मला ही परत नवीन सुरवात करायची आहे. पण माझ्याकडे पैसे नाहीत हवं तर जे काही दिवस भरात वस्तू विकल्या जातील त्याचा खर्च आपण वाटून घेवूत या निमित्ताने तुमचं दुकान तुमच्या जवळ राहील आणि माझी सुद्धा एक नवीन सुरवात होईल हं पण सगळे चालवायचे निर्णय माझे असतील चालेल तुम्हाला" स्वराज ने विचारलं
"तुम्हाला दुकान चालवायचा अनुभव आहे का?" विरेननी विचारलं
"मी अस मानतो जगात माणसाला कुठल्याच गोष्टीचा अनुभव नसतो तो शिकत शिकतच पुढे जात असतो हे खर आहे माझ काम खुप वेगळ आहे पण माझ्या कामात जम बसायला ही मला बराच वेळ लागेल आणि त्यासाठी मला कुठून तरी सुरवात करावीच लागेल दुसरं म्हणजे हे दुकान काकांनी त्यांच्या काळात खुप छान चालवलं होत आज जर ते दुसऱ्यांच्या हातात गेलं तर कदाचित ते त्याची व्हॅल्यू करणार नाहीत आणि काय माहित जर मी याला चालवायला घेतलं तर उद्या तोच रुदबा या दुकानाला मिळेल म्हणून मी बोललो विचार करा आणि कळवा मला हा माझा नंबर आहे." आपला नंबर देत स्वराज म्हणाला
आणि दुकानात ल्या वस्तू बघू लागला.
काही वेळा नंतर...
त्याने सगळ्यासाठी काही न काही खरेदी केली आणि त्याचे पैसे देऊन तो परत हॉटेल कडे निघाला.
क्रमशः...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा