आणि दुकानात ल्या वस्तू बघू लागला.
काही वेळा नंतर...
त्याने सगळ्यासाठी काही न काही खरेदी केली आणि त्याचे पैसे देऊन तो परत हॉटेल कडे निघाला.
काही वेळा नंतर....
हॉटेल ब्लुशाईन....
"राघव जा सगळ्यांना बोलावून आण आणि तुझ्या मॅडम आल्या का मिटिंग करून?" रिसेप्शन जवळ येताच स्वराजने विचारलं
"हो साहेब झाली त्यांची मिटिंग आता त्या केबिन मध्ये बसल्या आहेत त्यांना ही बोलवायचं आहे का?" वेटर राघवने विचारलं
"नको त्यांना तिथेच राहू दे मी स्वतः च भेटेन त्यांना तु बाकीच्यांना बोलावून आण." स्वराज म्हणाला
लगेच राघव सगळ्यांना बोलवायला गेला.
काही वेळा नंतर...
स्वराज सगळ्यांचे गिफ्ट्स व्यवस्थित ठेवतच होता तोच सगळे जमले.
"साहेब, तुम्ही बोलावलं आम्हाला." एकाने विचारलं
"अरे, आलात तुम्ही सगळे बर आज मी तुम्हाला सगळ्यांना गिफ्ट्स आणले आहेत या समोर एक एक जण." स्वराज म्हणाला
लगेच रामदीन समोर आला.
"हे घे रामदीन तुझ गिफ्ट. तु माझ्यासाठी खुप काही केलस त्यासमोर खर तर हे काहीच नाही पण फुल नाही तर फुलाची पाकळी सही गोड मानून घे" गिफ्ट देत स्वराज म्हणाला
"धन्यवाद साहेब पण हे कशासाठी मी जे केल ते माझ कर्तव्यच होत." रामदीन गिफ्ट घेत म्हणाला
लगेच तुषार एक विस वर्षाचा मुलगा समोर आला.
"हे तुझ गिफ्ट तुषार. लक्षात ठेव ही जागा तुझ्यासाठी टेम्पररी आहे तुला खूप काही अचिव्ह करायचं आहे अभ्यासाकडे देखील लक्ष दे हं." गिफ्ट देत स्वराज म्हणाला
"हो दादा मी अभ्यासाकडे सुद्धा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी माझ्या अभ्यासाकडे सुद्धा लक्ष देईन पण हे गिफ्ट्स कशाला सगळ्यांना." कुतूहलाने तुषारने विचारलं
"अरे बाळा तुम्ही सगळ्यांनी माझ्यासाठी आजपर्यंत खुप काही केलत याची मी परतफेड तर करू शकणार नाही पण गिफ्ट्स दिल्याने मी तुमच्या आठवणीत तर राहील तुमचा इतक्या वर्षाचा मला सहवास लाभला त्यामुळे तुम्ही मला कायम लक्षात राहाल पण मी देखील तुमच्या लक्षात राहायला हवं न म्हणून फुल नाही तर फुलाची पाकळी." स्वराजने सांगितलं
"दादा तुम्ही आम्हाला तस ही लक्षात राहणारच आहात पण ठीक आहे या गिफ्ट साठी खुप खुप धन्यवाद." तुषार म्हणाला
"अरे बाप रे खूपच मोठा झाला बाबा हा. बर सविता ताई कुठे आहेत?" स्वराजने विचारलं
"साहेब सविता ताई किचन मध्ये आहेत मी त्यांना ही बोलावलं होत पण मी नंतर भेटते अस म्हणाल्या त्या." राघव म्हणाला.
"बर तुमच्या ताईसाहेबांच आटपलं का म्हणजे त्यांना पण गिफ्ट देतो कस?" स्वराजने विचारलं.
तोच केबिन मधून वसुंधरा बाहेर आली आणि म्हणाली.
"आटपलं हो आमचं साहेब." हसून वसुंधरा म्हणाली
तोच सगळे हसायला लागले.
"बर हे तुझ गिफ्ट बघ आवडत का नाही तर आपण बदलून आणूत. आणि हो मला जरा तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे." स्वराज गिफ्ट देत म्हणाला
"बर राघव सविता ताईना चहा सांग आम्हाला दोघांना आणि तुम्ही सगळे मिळालं न तुम्हाला सगळ्यांना गिफ्ट्स चला आता कामाला लागा. (स्वराजला ) हं बोल आता काय बोलायचं होत." वसुंधरा म्हणाली
"तुला आपलं नेहमीच शॉप आठवतय जिथून तु मी आणि रागिणी कायम शॉपिंग करायचो त्या काळी ते शॉप मॉल पेक्षा ही भारदस्त वाटायचं आणि तिथे गर्दी देखील असायची खुप मी ते शॉप विकत घ्यायचं ठरवलं आहे." स्वराज म्हणाला
"काय? मग तुझ संगीत... तु तुझ्या क्षेत्रात नाव कमावणार होतास न मग हे मध्येच कुठलं खुळ घेतलस डोक्यात?" आश्चर्याने वसुंधरा ने विचारलं
"हो अग मी एक गायक म्हणूनच पुढे येणार आहे पण कस न एखादी लाईन जर आपण मध्येच सोडली तर परत त्यात जम बसायला वेळ लागतो त्यानंतरही प्रेक्षक परत तसच स्वीकारतील याची गॅरंटी नाही म्हणून मी अस ठरवलं लहान गोष्टी पासून सुरवात करायची मग पुढे पाऊल टाकायचं आणि इतके वर्ष एक बहीण म्हणून तु केलच की माझ अजून किती करणार आहेस तसच आई बाबांनी देखील खुप काही केलय माझ्यासाठी मी आता त्यांच्याकडुन देखील अपेक्षा नाही ठेऊ शकत आता म्हणून जे काही करायचं ते स्वतः च करायचं दुसरं म्हणजे आपले काका अग दोन वर्षांपूर्वी वारले आता त्यांचा मोठा मुलगा शॉप सांभाळतो त्याच्या दोन्ही भावंडानी आपापले मार्ग निवडले आता पूर्ण घराची जबाबदारी त्याच्या एकट्यावर आली आहे त्यातून कर्जबाजारी झाले आहेत म्हणून तो शॉप विकून टाकणार होता मग मीच बोललो त्याला, "मी काकांच्या खुप जवळचा होतो जर हे शॉप तु मलाच विकलस तर माझ्याजवळ काकांची आठवण राहील आणि तुमचं शॉप ही तुमच्या जवळ राहील एवढच की मी तुला याचे पैसे नाही देऊ शकणार वाटलं तर तु मला जॉईन हो बघ पटलं." अस सांगून तर आलो आहे मी बघू काय रिप्लाय येतो आता त्याचा. बर हे तुझ गिफ्ट नाही म्हणू नकोस." स्वराज म्हणाला
"बर हे गिफ्ट मी आज घेते पण मला माझ खर गिफ्ट तेव्हाच मिळेल जेव्हा तु एक सुप्रसिद्ध गायक म्हणून जगासमोर ताठ मानेने उभा राहशील आणि मी हेच माझ खर गिफ्ट समजेन." गिफ्ट हातात घेत वसुंधरा म्हणाली
"बर बाई तुला ते ही गिफ्ट वेळ आली की मिळेल बर तुझ आवरलं आहे का कारण तुला अजून एक सरप्राईज मिळणार आहे आपल्याला नेहमीच्या ठिकाणी जेवायला जायचय तुला बोललो होतो न मी आज सगळा दिवस तुझा असेल म्हणून लवकर आवर." स्वराज म्हणाला
"सरप्राईज? आता अजून कसल सरप्राईज देणार आहेस?" आश्चर्याने वसुंधरा ने विचारलं
"ते तुला तिथे गेल्यावर समजेल तु आधी पटकन तयार हो बस." स्वराज म्हणाला
"ठीक आहे बाबा होते मी तयार आलेच." वसुंधरा म्हणाली
आणि लगेच आवरायला निघून गेली.
काही वेळा नंतर...
स्वराज वसुंधरा ची वाटच बघत उभा होता तोच वसुंधरा सुंदर ड्रेस घालून स्वराज समोर येऊन उभी राहिली. आणि त्याच्या तोंडून एकच उदगार बाहेर पडले.
"खुप गोड दिसत आहेस तो तर तुला बघतच राहील." तिला बघताच तो मनात पुटपुटला.
"कोण तो?" स्वराजच बोलण ऐकताच वसुंधरा ने विचारलं
"कोण तो? (थोडस थांबून ) मी अस म्हणालो का? अग मला म्हणायचं होत कुणीही तुला बघितल तर बघतच राहील अस म्हणायचं होत मला. बर सोड ते चल लवकर नाही तर ते आपली जागा दुसऱ्या कुणाला तरी देतील." स्वराज म्हणाला
तस हलकस वसुंधरा हसली आणि लगेच दोघ ही बाहेर पडले.
काही वेळा नंतर...
हॉटेल विघ्नेश्वर...
"हं, आज आपण किती वर्षांनी या हॉटेल मध्ये आलो नई एकदम सगळ्या आठवणी डोळ्यांसमोर येऊन गेल्या." हॉटेलवरून नजर फिरवत स्वराज म्हणाला
"हो न आम्ही सुद्धा पहिल्यांदा इथेच भेटलो होतो." आपल्या आठवणींना उजाळा देत हळूच वसुंधरा पुटपुटली
"अं.. तु काही म्हणालीस का?" हळूच स्वराजने विचारलं
"नाही. आत जाऊयात आपण?" भानावर येत वसुंधरा ने विचारलं
"हो, चल (मनात ) पण मला कळाल तुला काय म्हणायचं आहे ते वसू." वसुंधरा कडे एकटक बघत स्वराज म्हणाला
"स्वराज कुठे लक्ष आहे तुझ हॉटेलमध्ये जायचं आहे न की नाही." स्वराजला भानावर आणत वसुंधरा म्हणाली
तोच स्वराज भानावर आला आणि दोघ ही हॉटेल मध्ये शिरले.
क्रमशः...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा