"स्वराज कुठे लक्ष आहे तुझ हॉटेलमध्ये जायचं आहे न की नाही." स्वराजला भानावर आणत वसुंधरा म्हणाली
तोच स्वराज भानावर आला आणि दोघ ही हॉटेल मध्ये शिरले.
"अजून ही हे हॉटेल जश्याच्या तस आहे न काहीच बदल झाला नाही हॉटेल मध्ये." हॉटेलवरून नजर फिरवत वसुंधरा म्हणाली
"हो न अजून ही तसच आहे जस पहिले होत मला तर आपले पहिले दिवस आठवले." हॉटेल वरून नजर फिरवत स्वराज म्हणाला
आणि लगेच दोघ एकमेकांकडे बघून हसले.
"चल अरे ते बघ आपली नेहमीची जागा ही रिकामीच आहे चल जाऊयात." वसुंधरा म्हणाली
तोच दोघ ही हॉटेलमध्ये शिरले आणि आपल्या नेहमीच्या जागी येऊन बसले.
"तुला आठवत स्वराज दिवाळी कॉन्सर्ट होत आणि तु मी रागिणी आणि... (तोंडातून एकच शब्द बाहेर पडला). विजय..." विजय ला बघून वसुंधरा म्हणाली
"हो, न तो दिवस मी कसा विसरेन तुम्ही दोघ पहिल्यांदा याच हॉटेलमध्ये भेटला होतात न विजय एका बँड चा मेंबर होता आणि नेमक त्याची कोसिंगर त्यादिवशी आलीच नाही मग तु त्याला साथ दिलीस तेव्हा पासून तुम्ही दोघ एकत्रच गात होतात हो न." स्वराज आपल्याच धुंदीत सांगत होता.
"ते नाही रे तो बघ विजय खरच इथे आला आहे मला एक सांग तु तर त्याला इथे बोलावलं न्हवत न." विजय कडे बघत वसुंधरा ने विचारलं
"मी... नाही तर तुला अस का वाटलं? ऍक्च्यूली हो मीच त्याला बोलावलं होत." स्वराजने सांगितलं
"तु माझ्याशी खोटं बोललास मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती स्वराज. विसरलास तो तुझ्याशी कस वागला आहे" दुःखी चेहऱ्याने वसुंधरा म्हणाली
"चुका होतात माणसाकडून वसू कालांतराने लोक बदलतात कदाचित त्याला काही गैरसमज झाला असेल पण जोपर्यंत तुम्ही दोघ एकमेकांशी बोलणार नाही तो पर्यंत कस सगळं समजणार आहे." समजावत स्वराज म्हणाला
"हे बघ स्वराज तुझ्या बद्दल कुणी चुकीचं बोललेलं मला नाही चालत हे तुला चांगलच माहित आहे तरी सुद्धा..." वसुंधरा म्हणाली
"तु माझ्यासाठी खुप काही केल आहेस वसु आता तु स्वतःचा विचार कर किती दिवस अस एकट्याने आयुष्य जगणार आहेस तु प्रत्येकाला आयुष्यात कुणाची न कुणाची गरज लागते तेव्हाच आयुष्य पूर्ण होत असत हा समाज अस एकट्याला जगू देत नाही ग आणि जर माझा विचार करत असशील तर मी कुठे पळून जाणार आहे तुला सोडून अं तुझ्या एका हाकेच्या अंतरावर तर असेल मी कधी ही हक्काने आवाज दे धावत येईन हं." वसुंधरा च्या हातावर हात ठेवत स्वराज म्हणाला
तोच वसुंधरा च्या डोळ्यात पाणी आलं. आणि आपले डोळे पुसत लगेच वसुंधरा म्हणाली.
"ठीक आहे तु निर्णय घेतलाच आहेस माझ्या आयुष्याचा तर मी काही म्हणत नाही होऊ दे तुझ्या मनासारखं." आपले डोळे पुसत वसुंधरा म्हणाली
"बघ, तु जर असा विचार करणार असशील तर मला ही वाईट वाटेल आता." स्वराज डोळ्यात पाणी आणत म्हणाला
"नाही रे अस काही नाही सोड तो विषय ठीक आहे बोलून घेवूत त्याच्याशी ओके." स्वराजला समजावत वसुंधरा म्हणाली
"मी नाही फक्त तु बोलणार आहेस त्याच्याशी आधी तुम्ही तुमच्यातले वाद मिटवा मग मी भेटतो दोघांना मी समोरच्या टेबलावर आहे बसलेलो आणि माझ्यामुळे त्यानी तुझी आधीच खुप वाट बघितली आहे तेव्हा माझ्याबद्दल तो बोलला तरी ऐकून घे तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे हं काळजी करू नकोस सगळं ठीक होईल एक गोष्ट कायम लक्षात ठेव जीवनात इतके वर्ष एकाच व्यक्तीची वाट बघणारे फक्त सिनेमात दिसतात प्रत्यक्षात नाही तो बरेच वर्ष तुझ्यासाठी थांबला आहे आता जर तो म्हणाला आपण एकत्र येऊ तर वाट बघू नकोस हं मी आहे समोर बोलव त्याला." वसुंधराला समजावत स्वराज म्हणाला
आणि लगेच दुसरीकडे बसायला गेला. इकडे स्वराज दुसरीकडे बसायला जाताच विजयला बघताच वसुंधराला तिचे पहिले प्रेमाचे काही क्षण आठवून जातात आणि ती त्यात हरवून जाते.
काही क्षणा नंतर...
विजय स्वराज आणि वसुंधरा ला शोधतच असतो तोच त्याच लक्ष वसुंधरा कडे जात आणि तो ही पहिल्या भेटीच्या आठवणीत हरवून जातो.
काही क्षणा नंतर...
विजय भानावर येतो आणि वसुंधराला भेटायला जातो.
"हाय, वसु कशी आहेस?" चुटकी वाजवून वसुंधराला भानावर आणत विजय विचारतो.
"मी? मी ठीक आहे तु कसा आहेस. कुठे होतास इतके वर्ष? बैस न." भानावर येत वसुंधरा म्हणाली
तोच विजय खुर्चीवर बसला.
"एकटीच आली आहेस स्वराज सुद्धा येणार होता न." विजय ने विचारलं
"हो आलाय न तो समोर बसलाय त्याची इच्छा होती आधी आपण भेटावं मग तो भेटेल आपल्याला एकांत मिळावा म्हणून दुसरीकडे बसलाय." वसुंधरा म्हणाली
"त्याची इच्छा होती म्हणून? आणि तुझी इच्छा? तुला कधी मला भेटावसं वाटलं नाही का ग कधी वाटलं नाही मला भेटून सगळ काही सॉल्व करावं." विजयने विचारलं
"वाटलं न खुप वाटलं पण मग विचार केला तुला माझ म्हणणं पटेल का? ज्या दिवशी आपलं भांडण झालं होत मी तुझी समजूत काढायला दुरपर्यंत आले होते खुप आवाज देखील दिला होता पण माझा आवाज तुझ्यापर्यंत पोहोचलाच नाही मग वाटलं तु आत्ता थांबला नाहीस मग पुढे कस मला समजून घेशील." वसुंधरा म्हणाली
"काय? तु मला इतकच ओळखलस वसु तुला खरच अस वाटलं अग एकदा बोलून तरी बघायचं मला घेतल असत मी तुला समजून. असो काय करतेस सध्या लाईफ कशी सुरु आहे तुझी." विजय ने विचारलं
"कशी सुरु असणार माझी लाईफ जस तु मला सोडून गेलास मी अजून ही तशीच आहे तुझी वाट बघत." वसुंधरा म्हणाली
"एक विचारू? माझ्या आयुष्यात येशील परत एकदा मी ही अजून तुझीच वाट बघत आहे." विजयने विचारलं
त्याच बोलण ऐकून एक क्षण वसुंधरा स्तब्धच झाली तीला आपण काय बोलाव हेच समजत नव्हत. खर तर वसुंधरा ह्याच क्षणाची अगदी आतुरतेने वाट बघत होती आणि तोच क्षण आता तिच्या समोर होता.
"तु अस एकदम विचारशील मला वाटलच नव्हत विजू मी हा क्षण फक्त स्वप्नात अनुभवत होते मी खरच स्वप्न तर बघत नाही न." आश्चर्याने वसुंधरा ने विचारलं
"अग वेडे स्वप्नच नेहमी खरी होत असतात अस समज तुझ हे स्वप्न आता खर झालय मग काय समजू मी." विजय ने परत विचारलं
इकडे स्वराज मात्र मनातल्या मनात हसत होता. शेवटी न रहावून तो मध्ये बोललाच.
"काय राव तुम्ही दोघ मी इतकी छान दोघांना संधी दिली बोलायची आणि हे काय स्लो मोशन सुरु आहे तुमचं (वसुंधराला). आणि तु ग इतके वर्ष याच क्षणाची वाट बघत होतीस न मग इतकं छान विचारलं आहे त्यानी दे की मग पटकन उत्तर हे बघ वसु गाडी फक्त तुझ्या स्टेशनं वर एकदाच थांबेल आणि जास्त विचार करत बसलीस तर गाडीला अजून बरेच स्टेशन्स आहेत एवढं लक्षात ठेव." स्वराजने वसुंधरा ला समजावल.
तोच विजय आणि वसुंधरा दोघ ही खळखळून हसले आणि त्यांना बघून स्वराज ही हसू लागला.
"हं म्हणजे मी गाडी तर." हसत विजयने विचारलं
"नाही मी स्टेशनं रे अस म्हणायचं आहे त्याला." वसुंधरा ही हसत म्हणाली
"अरे परत दोघ सुरु झाले भावना पोहोचल्या न दोघांपर्यंत ते महत्वाचं आहे. काय तुम्ही पण" दोघांना शांत करत स्वराज म्हणाला
तोच परत तिघ ही हसायला लागले.
क्रमशः...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा