"अरे परत दोघ सुरु झाले भावना पोहोचल्या न दोघांपर्यंत ते महत्वाचं आहे. काय तुम्ही पण" दोघांना शांत करत स्वराज म्हणाला 
तोच परत तिघ ही हसायला लागले.
काही वेळा नंतर...
"बर ते सोड तु सांग कसा आहेस तु?" विजयने विचारलं
"कसा असणार चालू आहे लाईफ आत्ता पर्यंत एकट्याने जीवन जगत होतो पण आता आयुष्यात पुढे सरकायच ठरवलय म्हणूनच तुला ही बोलावून घेतल होत विजय." स्वराजने सांगितलं 
"हो, बोल की स्वराज मी काय मदत करू शकतो तुझी माझ्या आवाक्यात असेल तर मी नक्की करेन तुझी मदत." विजय म्हणाला 
"मला तुझ्याकडून एकच मदत हवी आहे विजय मी आता बाहेर पडायचं ठरवलं आहे त्यामुळे वसुंधरा ची जबाबदारी आता तु घ्यावीस अस मला वाटत हिने माझ्यासाठी खुप काही केलय इतकच काय तर तुम्ही दोघ माझ्यामुळेच वेगळे झालात वसुला माझा साथ द्यायचा होता म्हणून तर तीने तुझ्याबरोबर लग्न पण करायचं नाकारलं. खर तर तु माझ्या बद्दल चुकीचं बोललास याच ही तीला वाईट वाटल खर तर तुझ्या ठिकाणी मी असतो तर कदाचित मी पण तेच केल असत जे तु केलस मला याचा राग नाही बस खंत ही आहे माझ्या मुळे तुम्ही एक होऊ शकला नाहीत पण आता चित्र पालटल आहे त्यामुळे तु आणि वसु परत एकत्र या याल न?" अगतिक होऊन स्वराजने विचारलं
"मला थोडा वेळ हवाय रे विचार करायला मी एकदम कस उत्तर देऊ आणि घरचे पण विचारतील न मला मी त्यांना काय उत्तर देऊ आणि या पेक्षा ही वसुची याला सहमती आहे का" विजयने विचारलं
"तु तुझ सांग विजय आणि ही तीच मुलगी आहे विजय जिच्या बरोबर कधी काळी तु पळून जायला तयार होतास विसरलास का?" स्वराज म्हणाला 
"सगळ लक्षात आहे माझ्या स्वराज तेव्हाचा काळ वेगळा होता आत्ता सगळ बदललं आहे आता मला घरच्यांचा ही विचार करावा लागेल. हे बघ माझा नकार अज्जीबात नाहीये मला फक्त वेळ दे बाकी मग मी बघतो सगळ." समजावत विजय म्हणाला 
"ठिक आहे घे तु तुझा वेळ पण एक लक्षात ठेवा दोघ पण प्रेम ठरवून होत नसतं आणि रोज रोज ही होत नसतं पाहिलं प्रेम हे पहिलच असत तेव्हा जो काही निर्णय घ्याल तो विचारपूर्वक घ्या. बर आता काही खायचं की गप्पांनीच पोट भरणार आहात दोघ." मजा घेत स्वराजने विचारलं
तोच विजयने वेटरला बोलावलं.
"वेटर..." विजय ने वेटरला बोलावलं 
काही क्षणा नंतर...
"काय घेणार साहेब?" वेटर रघु ने विचारलं
"तीन तंदुरी रोटी, दोन पनीर भाजी आणि तीन दाल जिरा राईस आणि स्टार्टर मध्ये मसाला पापड घेऊन ये पटकन." स्वराज ने ऑर्डर दिली 
"तुला आमची आवड अजून लक्षात आहे?" आश्चर्याने विजय ने विचारलं
"त्यात काय आपण फ्रेंड्स आहोत मग लक्षात राहणार नाही." स्वराज म्हणाला
"स्वराजला सगळं लक्षात आहे असाच आहे हा." मध्येच वसुंधरा म्हणाली 
"अरे किती कौतुक होणार आहे माझ बस आता एवढं काही नाही तु आता स्वतः कडे लक्ष दे माझा विचार सोडून दे खुप काही केल आहेस तु ऑलरेडी वसु माझ्यासाठी अजून किती करणार आहेस शेवटी तुझ ही आयुष्य आहे." स्वराजने समजावत सांगितलं
तोच वेटर रघु ऑर्डर घेऊन आला..
"साहेब तुमची ऑर्डर.." डिश ठेवत वेटर म्हणाला 
आणि तिघांनी जेवण केल..
काही वेळा नंतर...
जेवण करून चांगल्या मेमरीज घेऊन तिघ ही घराकडे निघाले.
ब्लुशाईन हॉटेल...
स्वराज आणि वसुंधरा दोघ ही खुपच खुश होते आणि त्याच आनंदात दोघ ही हॉटेलमध्ये आले.
"खुप छान वेळ गेली न आज." वसुंधरा ने आनंदात विचारलं
"हो खरच की काय खुपच खुश दिसत आहेस तु काही घडलं आहे का?" मजा घेत स्वराज ने विचारलं
"काय तु पण? मला कळतय तु चेष्टा करत आहेस माझी हो न." थोडस लाजत वसुंधरा ने विचारलं
तोच स्वराज हसला.
"वसु अग मला हेच हवं होत तु खुश असलीस न की मला ही बर वाटत बघ. असच कायम आनंदी रहा अजून काय हवय मला." स्मित हास्य करत स्वराज म्हणाला
"किती काळजी करतोस रे माझी मी तुझी मानलेली बहीण आहे तरी तु इतकं करतोएस माझ्यासाठी." डोळ्यात पाणी आणून वसुंधरा म्हणाली 
"अग वेडे हे अश्रू लग्नासाठी ठेव तुझ्या बरोबर सगळ्यांना रडवणार आहेस तु पण आत्ता नको बर चला झोपुयात आता सकाळी निघायचं आहे न." वसुंधरा चे डोळे पुसत स्वराज म्हणाला 
"चल खरच झोपुयात आणि तु ही जो पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहेस न खुप छान आहे आता मागे वळून बघू नकोस कारण मी आणि रागिणी कायम तुझ्या सोबत असूत मागे नाही." स्माईल करत वसुंधरा म्हणाली 
तोच स्वराजने ही स्माईल केली आणि आपल्या रूम मध्ये झोपायला गेला.
काही वेळा नंतर...
स्वराज आपल्या रूम मध्ये आला तर खरा पण त्याच मन आता रागिणीत गुंतल होत त्याला सारखी रागिणीची आठवण येत होती म्हणून तो फ्रेश झाला आणि त्याने खुप दिवसानी परत एकदा आपली डायरी काढली जी त्याने रागिणी साठी बनवली होती.
"23/5/2026,
आज पुन्हा तुझ नाव आठवणीत आलं....
रागी आज पुन्हा तुझ नाव ओठांवर आलं तुला ही येते का ग माझी आठवण तुझा सहवास तुझ हसणं तुझ बोलण आज पुन्हा एकदा सगळ आठवून गेल खुप दिवसानी आपल्या नेहमीच्या हॉटेल मध्ये जेवायला गेलो होतो तिथे मी वसु आणि विजय ही होता तिथे सगळं काही होत फक्त तु नव्हतीस माहित आहे मला मीच म्हणालो होतो जो पर्यंत मी म्हणत नाही तो पर्यंत मला भेटू नकोस पण आता आपला विरह संपला आहे मी तुला लवकरच भेटणार आहे तु ही मला भेटशील न ग?
ग्रॅटिट्युड नोट :
थँक यु सो मच युनिव्हर्स माझ्यात सकारात्मक ऊर्जा भरण्यासाठी थँक यु सो मच रागिणी मला परत स्वीकारण्यासाठी."
स्वराजने खुप दिवसानी आपल्या डायरीत नोंद केली आणि झोपला 
दुसऱ्या दिवशी सकाळी...
आज स्वराज आत्मविश्वासाने उठला फ्रेश झाला जुन्या रुटीन प्रमाणे वॉकिंग करून आला आणि फ्रेश मनाने त्याने काही निर्णय घेतले आणि ते ही आपल्या दुसऱ्या डायरीत लिहून ठेवले.
" 24/5/2026
आजचा दिवस माझ्या आयुष्यातला एकदम खास दिवस आहे कारण -
मी निर्णय घेतले आहेत.
1) रागिणीशी असलेलं माझ नात परत एकदा नीट करीन
2) आयुष्यात पुन्हा एकदा नव्याने ताठ मानेने उभा राहीन
3) ऋग्वेदचा शोध घेईन
4) संगिताला पुन्हा एकदा नव्याने आत्मसात करीन
5) स्वरसाक्षी विद्यालयाच्या खऱ्या गुन्हेगाराला शोधेन
6) तसेच ट्रेंडिंग हॅशटॅग कोणी व्हायरल केला याचा ही शोध घेईन
मी हे निर्णय लवकरात लवकर पूर्ण करीन."
मी निर्णय घेतले आहेत.
1) रागिणीशी असलेलं माझ नात परत एकदा नीट करीन
2) आयुष्यात पुन्हा एकदा नव्याने ताठ मानेने उभा राहीन
3) ऋग्वेदचा शोध घेईन
4) संगिताला पुन्हा एकदा नव्याने आत्मसात करीन
5) स्वरसाक्षी विद्यालयाच्या खऱ्या गुन्हेगाराला शोधेन
6) तसेच ट्रेंडिंग हॅशटॅग कोणी व्हायरल केला याचा ही शोध घेईन
मी हे निर्णय लवकरात लवकर पूर्ण करीन."
स्वराजनी आपली नोंद पूर्ण केली आणि रूम मधून बाहेर आला. सगळे त्याची नाश्त्यासाठी वाट बघतच होते त्याला बघून वेटर्स नी त्याला वाकून नमस्कार केला आणि स्वराज व वसुंधरा नाश्ता करायला बसले.
काही वेळा नंतर...
दोघांनी आपापला नाश्ता उरकला आणि स्वराजने सगळ्यांचा निरोप घेतला.
"ही आपली शेवटची भेट आहे अस अजिबात समजायचं नाही कारण जेव्हा जेव्हा मला सगळ्यांची आठवण येईल मी सगळ्यांना त्रास द्यायला इथे येत जाणार आहे आपली आणि वसुची काळजी घ्या आता माझ्या नंतर तुम्हीच आहात इथे काय येऊ मी.?" स्वराज ने सगळ्यांचा प्रेमाने निरोप घेतला 
आणि डोळ्यात खुप सारी स्वप्न घेऊन मनात एक आत्मविश्वास घेऊन घराकडे रवाना झाला.
साधारणत: चार तासानी..
स्वरसंध्या निवास...
वेळ दुपार ची...
स्वरसंध्या निवासात आज खुपच लगबग सुरु होती. पाहुण्यांची देखील रेलचेल चालू होती तोच स्वराज घरी पोहोचला.
क्रमशः...
