वेळ दुपार ची...
स्वरसंध्या निवासात आज खुपच लगबग सुरु होती. पाहुण्यांची देखील रेलचेल चालू होती तोच स्वराज घरी पोहोचला.
स्वरसंध्या निवास...
आज स्वरसंध्या मध्ये पाहुण्यांची रेलचेल सुरु होती आणि कारण होत ते आनंद म्हणजेच स्वराजचा मोठा भाऊ. आनंद ची एकुलती एक मुलगी अंतरा चा साखरपुडा. घरातले सगळेच जण तयारीत मग्न होते गुरुजी देखील येऊन बसले होते कुणी स्टेजवर गुरुजींना मदत करत होत कुणी नुसतच देखरेख करत होत वडिलधारी माणसं सूचना देत होते तर बाकीचे लोक खुर्ची वर स्थानापन्न झाले होते सगळीकडे उत्साहाच वातावरण झालेलं होत तोच...
"आई बाबा दादा वहिनी कुठे आहात रे सगळे हे बघा मी आलोय सगळ्यांबरोबर राहायला परत आहात कुठे." स्वराज घरात प्रवेश करत म्हणाला
तोच त्याची नजर पंडित रघुवीर कुलकर्णी आणि त्यांची पत्नी दोघांच्या फोटोवर गेली आणि तो जोरात किंचाळला.
"आई, बाबा.. हे, हे कस झालं तुम्ही मला सोडून कसे गेलात बाबा मला तुमच्या दोघांची माफी मागायची सुद्धा संधी दिली नाहीत तुम्ही हे कस झालं मी इतका वाईट आहे का हो सांगा न मला आई बाबा बोला न हो काही बघा बघा मी परत पहिल्या सारखा झालोय मी माझी इमेज बदलण्याचा निर्णय घेतलाय पण माझ यश बघायला तुम्हीच या जगात नाहीत आता मी माझ प्रत्येक यश कुणा बरोबर शेअर करू माझ्याच बाबतीत अस का होत हो." फोटो समोर रडत स्वराज बोलू लागला.
तोच त्याच्या खांद्यावर कुणी तरी हात ठेवला आणि स्वराज मागे वळला.
"दादा" स्वराज आनंदला बिलगून रडला
"स्वरू खुप उशीर झाला रे घरी परतायला बघ न आई बाबा तुझ्या आठवणीत आपल्याला सोडून गेले आपण पोरके झालो रे." आनंदला अश्रू आवरत नव्हते तो त्याच परिस्थितीत स्वराजला म्हणाला
"पण दादा हे झालं कस कधी झालं? मला याबद्दल कुणीच काही बोललं नाही" आपले डोळे पुसत स्वराजने विचारलं
"एक वर्ष झालं आई बाबांना जाऊन दरवाज्याकडे डोळे लावून बसायचे रे तुला कस सांगणार होतो आम्ही तु रागात घर सोडून गेलास तो गेलासच एकदा सुद्धा मागे वळून बघितल नाहीस आम्हाला कस समजणार होत कुठे आहेस कसा आहेस तुझ्या सगळ्या मित्र मैत्रिणींना आम्ही फोन केले पण तुझा पत्ता कुणालाच नव्हता मग सांग आम्ही कस शोधणार होतो तुला." आनंद स्वराजच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला
"इतकं सगळं होऊन गेलं खरच दादा चुकलंच माझ चुकलं नाही गुन्हा च घडलाय माझ्याकडून आणि आता त्या गुन्ह्यातून मनात असून सुद्धा सुटका होऊ शकणार नाही माझी एवढच की बाबा नेहमी सांगायचे आपलं गाण हा आपला श्वास असतो बाबा हे वाक्य नेहमी पाळायचे आता मी ही पाळीन या निमित्ताने बाबांची एक तरी आठवण जपल्या सारख वाटेल मला. ठरलं आता मागे वळून बघायचं नाही हार मानायची नाही आणि अस व्हायचं की आई बाबांनी बघितल्यावर त्यांना मला बघून प्राऊड फिल होईल दादा हे डेकोरेशन कशाला आपल्या कडे आज काही आहे का." स्वराजने आपले डोळे पुसत विचारलं
"अरे हो, आपली अंतरा आता मोठी झाली आहे एवढीशी चिमुरडी होती तुझ्या मागे मागे काका काका म्हणत पळायची आता फिल्म इंडस्ट्री मध्ये नाव कमावती आहे आज तीचा साखरपुडा आहे अगदी वेळेवर आला आहेस बघ तु. जे झालं ते विसरून जा आणि नव्याने आपलं आयुष्य सुरु कर." स्वराज ला समजावत आनंद म्हणाला
"काय? म्हणजे दादा तुझा माझ्यावर कसलाच राग नाही तु माफ केलस मला." स्वराजने विचारलं
"अरे माफ करणारा मी कोण तुला तर आई बाबांनी सुद्धा कधीच माफ केल होत हे बघ आम्हाला सगळ्यांना तुझ्यावर पूर्ण विश्वास होता पण तु इतका धिर सोडला होतास की आम्हाला आमचं म्हणणं बोलून दाखवायची तु संधीच दिली नाहीस. बर तो भूतकाळ आता पूर्ण सोडून दे आणि आपल्या अंतराचा आज साखरपुडा आहे तेव्हा साखरपुड्यात खुल्या मनाने आनंदाने शामिल हो जा बघ आई बाबांनी जिवंत असे पर्यंत आणि नंतर आम्ही सुद्धा तुझी रूम जशीच्या तशी ठेवली आहे जा तुझ्या रूम मध्ये आवरून ये छान." स्वराजला समजावत आनंद म्हणाला
त्याच बोलण ऐकून लगेच स्वराज आनंद च्या पाया पडला आणि आपल्या रूम कडे निघून गेला.
काही वेळा नंतर...
स्वराज आपल्या रूममध्ये प्रवेश करतो रूम बघून स्वराज च मन भरून येत एकदम सगळ्या आठवणी जाग्या होतात त्याच्या रूम मध्ये एकूण एक वस्तू जिथल्या तिथे ठेवलेल्या असतात तो एक एक वस्तू वर हात फिरवत आपल्या आठवणींना उजाळा देत रूममध्ये सगळीकडे फिरतो तोच रूम मध्ये तिन्ही भावंडाना सांभाळलेल्या राधाक्का येतात.
"छोटे साहेब मी आत येऊ का?" राधाक्का दारावर नॉक करत विचारतात
तोच स्वराजच लक्ष जात.
"अरे राधाक्का तुम्ही ओळखलत कसे आहात तुम्ही आणि मुलं कशी आहेत तुमची?" आत्मीयतेने स्वराजने विचारलं
"सगळे ठिक आहेत साहेब तुम्ही कसे आहात कुठे होतात इतके वर्ष किती वाळून गेला आहात बघा सगळ ठिक आहे न" राधाक्काने काळजीने विचारलं
"हो, हो राधाक्का सगळ काही ठिक आहे आणि आता तसच राहणार आहे तुम्ही अजिबात काळजी करू नका." स्वराज समजावत म्हणाला
"बर मोठ्या साहेबांनी हा ड्रेस पाठवला आहे तुम्ही तयार व्हा आणि हॉल मध्ये या पाहुणे कधी ही येतील बघा." कपडे देत राधाक्का म्हणाल्या
आणि तिथून निघून गेल्या
काही वेळा नंतर...
स्वराज नेहमी पेक्षा जास्तच छान दिसत होता आपलं आवरून तो जिन्यात येऊन उभा राहिला आणि हॉलच वातावरण न्याहाळू लागला तोच अंतरा ही आवरून हॉल मध्ये आली आणि स्वराजच तिच्या कडे लक्ष गेलं तो तिच्याकडे बघतच राहिला आणि मनात विचार करू लागला.
"ही आपली अंतराच आहे? किती गोड दिसतीये छोटीशी चिमुरडी होती माझ्या मागे मागे धावायची आणि आता तिचाच अजून एक प्रवास सुरु होणार आहे खरच दिवस किती पटकन पुढे सरकतात न." स्वराज विचार करू लागला
तोच अंतरा मध्ये त्याला रागिणी दिसली आणि तो रागिणीच्या आठवणीत हरवला.
"रागि किती सुंदर दिसतीयेस तु? आज पर्यंत मी तुला या नजरेने कधी बघितलच नाही खरच आज मला कळतय मी माझ्या आयुष्यात काय मिस करत होतो थँक्यु सो मच माझ्या आयुष्याचा हिस्सा बनण्यासाठी." रागिणी च्या हनुवटी वर बोट ठेऊन स्वराज म्हणाला
"खरच मग आता बघ मी तर कायम तुझ्या बरोबर होते आणि राहील सुद्धा आता आपलं खऱ्या अर्थाने आयुष्य सुरु होईल." लाजून रागिणी म्हणाली
तोच स्वराज परत तिच्यात हरवून गेला.
काही क्षणा नंतर...
अंतराच त्याच्याकडे लक्ष गेलं आणि ती त्याच्या जवळ आली व त्याला भानावर आणत म्हणाली.
"काका, अरे काय हे तुझ्या लाडक्या पुतणीचा साखरपुडा आहे आणि तु कुणाचा विचार करतोएस बाहेर माझ्यासाठी कुणी तरी काकू शोधलीस वाटत." थोडीशी मजा घेत अंतराने विचारलं
"अंतू तुझी फक्त एकच काकू होऊ शकते हे तर तुला ही चांगलच माहितीये अं.. बर माझ सोड तु कुणाला शोधलस ते आधी सांग आणि काय ग आपलं ठरलं होत न तुझ्या साठी मुलगा मी शोधेन म्हणून मी घरातून निघून काय गेलो तु तर माझ्या आधीच बाजी मारलीस." स्वराजने विचारलं
"काका तु निवडलेल्या मुलाशीच करतीये लग्न मी." अंतराने सांगितलं
"मी निवडलेल्या? मी इतक्या वर्षांनी आज भेटतोय तुला मी कधी तुझ्या साठी मुलगा निवडला." आश्चर्याने स्वराजने विचारलं
"बघ तुझ वय झालं आहे काका विसरलास न तु आठव बर मी लहान होते तेव्हा तु कुणाच्या नावानी मला चिडवायचास?" अंतराने आठवण करून देत विचारलं
"चिराग ओह माय गॉड म्हणजे मी बोललेलं तु खर केलस कि काय." आश्चर्याने स्वराजने विचारल
"हो, तोच लहानपणीचा शेंबड्या ज्याला बघून तु नेहमी मला चिडवायचास आणि मी ही ते ऐकून चिडायचे आणि मग तुलाच माझी समजून काढावी लागायची किती छान दिवस होते न रे आपले का निघून गेलास तु काका मी खुप मिस केल तुला भंडायचो आपण दोघ पण गरज सुद्धा मला तुझीच लागायची माझ्या प्रत्येक परिस्थिती मध्ये सगळ्यात जास्त हेल्प करणारा तुच होतास आणि जेव्हा तु घरातून निघून गेलास तेव्हा मात्र मी एकटी पडले होते पण आता तु आला आहेस न आता परत सगळं पाहिल्यासारखं होईल खात्री आहे माझी. आणि हो शेंबड्या आता पहिल्यासारखा राहिला नाही बर का फिल्म इंडस्ट्रीतला सगळ्यात फेमस दिग्दर्शक झालाय आणि एकदम हँडसम सुद्धा आहे तुझा जावयी बर का." अंतराने चिरागच कौतुक करत सांगितलं
स्वराज तीच बोलण ऐकून नुसता हसला आणि तीला जवळ घेतल.
क्रमशः...
