"हो, तोच लहानपणीचा शेंबड्या ज्याला बघून तु नेहमी मला चिडवायचास आणि मी ही ते ऐकून चिडायचे आणि मग तुलाच माझी समजून काढावी लागायची किती छान दिवस होते न रे आपले का निघून गेलास तु काका मी खुप मिस केल तुला भंडायचो आपण दोघ पण गरज सुद्धा मला तुझीच लागायची माझ्या प्रत्येक परिस्थिती मध्ये सगळ्यात जास्त हेल्प करणारा तुच होतास आणि जेव्हा तु घरातून निघून गेलास तेव्हा मात्र मी एकटी पडले होते पण आता तु आला आहेस न आता परत सगळं पाहिल्यासारखं होईल खात्री आहे माझी. आणि हो शेंबड्या आता पहिल्यासारखा राहिला नाही बर का फिल्म इंडस्ट्रीतला सगळ्यात फेमस दिग्दर्शक झालाय आणि एकदम हँडसम सुद्धा आहे तुझा जावयी बर का." अंतराने चिरागच कौतुक करत सांगितलं
स्वराज तीच बोलण ऐकून नुसता हसला आणि तीला जवळ घेतल.
"काका, तु पहिल्यासारखा राहिला नाहीस हं तु तर मी काही बोलले तर लगेच मला चिडवायला सुरु करायचास आणि आता ठरवलं आहेस न तु तु एक नवीन सुरवात करणार आहेस म्हणून मग आता का अस. हे बघ सगळ ठिक होईल तु असा चांगला नाही वाटत बाबा तु न पहिल्या सारखाच रहा मस्ती करणारा चिडवणारा असा." समजावून सांगत अंतरा म्हणाली
"वेळ बदलत असते अंतरा परिस्थिती समोर आली कि माणसाला बदलावच लागत." स्वराज म्हणाला
तोच मुलाकडचे पाहुणे आले आणि एकच गोंधळ सुरु झाला. स्वराज आणि अंतरा ही खाली आले तोच गुरुजींनी साखरपुड्याचे विधी सुरु केले
काही वेळा नंतर...
दोघांनी एकमेकांना अंगठ्या घातल्या आणि एकमेकांना पेढा भरवला थोड्याच वेळात फोटो सेशन सुरु झाले प्रत्येकजण दोघांबरोबर फोटो काढण्यात उत्सुक होते पहिले मुलाकडचे आले आणि त्यानी फोटो काढून घेतले मग चिरागचे मित्र मैत्रिणी आल्या त्यांनी ही फोटो काढले असेच त्याची भावंडानी सुद्धा फोटो काढले.
मग अंतराचे आई बाबा आले त्यानी ही फोटो काढले मग स्वरा अंतराची आत्या आणि तिची फॅमिली आले त्यानी ही फोटो काढले मग स्वराज स्टेजवर आला आणि चिराग ला भेटला.
"काय जावई बापू आहे का ओळख? मी म्हणालो होतो न हीच जोडी बनणार अभिनंदन दोघांचं ही" स्वराज हात मिळवत म्हणाला
तोच दोघांनी स्माईल केली अंतरा तर एकदम गोड दिसत असते आणि चिराग सुद्धा तिघांनी फोटो काढले तोच अंतराच्या मैत्रिणी आल्या आणि स्वराज स्टेजवरून खाली उतरला आणि मैत्रिणींनी ही फोटो काढले नंतर अंतराच्या फॅमिलीने एक फॅमिली फोटो काढला नंतर चिरागच्या फॅमिलीने फॅमिली फोटो काढला आणि शेवटी चिराग आणि अंतराचे फोटो सेशन झाले.
जस जस सगळ्यांचे फोटो काढून होत ते सगळे जेवायला निघून जात मध्ये मध्ये नवीन नवीन लोक येऊन दोघांना शुभेच्छा देऊन ते ही जेवणाच्या हॉल कडे निघून जात.
काही वेळा नंतर...
अंतरा आणि चिराग च फोटो सेशन झालं मग दोघांची पूर्ण फॅमिली जेवणाच्या हॉल मध्ये आली आणि त्यांची पंगत जेवायला बसली. आणि त्याच बरोबर साखरपुडा संपन्न झाला.
वेळ रात्रीची....
अंतराची खोली...
अंतरा आपलं आवरत होती तोच चिरागचा फोन आला.
एक प्रेम गीताच मधुर संगीत वाजलं...
"हाय जान काय चालू आहे कसा गेला आजचा दिवस." लाडात अंतराने विचारलं
"तुझा कसा गेला ते सांग आधी" लगेच चिरागने विचारलं
"माझा तर खुप छान गेला दिवस माझा लाडका काका भेटला तु खुप वेळ बरोबर होतास सगळच छान होत पण आता परत तुला मिस करतीये मी." अंतरा म्हणाली
"हाहाहा... अग वेडू, ही तर वेळ असती न आठवणीत जगायची आणि आपल्या कडे आता फक्त साखरपुडा ते लग्न इतकेच दिवस आहेत एकमेकांना समजून घ्यायला आता फक्त एकमेकांना छान मिस करायचं मग आठवणीत एकमेकांना कधी भेटून तर कधी फोन करून छान आठवणी तयार करायच्या म्हणजे लग्ना नंतर याच गोष्टी असतात ज्या आपल्याला आपलं नात अजून घट्ट करायला मदत करतात समजल." चिरागने समजावत सांगितलं
"ओहो, तु असा मला सांगत आहेस की तु कुठे खुप दूर जाऊन बसला आहेस वाह." अंतरा म्हणाली
"अस नाही ग मी सहज बोललो तुला बर आता छान आराम कर उद्या शूट वर भेटूत आपण उद्या काही फ्रेंड्स येणार आहेत भेटायला ते साखरपुड्याला येऊ शकले नाही न म्हणून." चिराग म्हणाला
"बर चालेल तु मला घ्यायला ये मी तयार राहते चल ठेऊ मी फोन आता." अंतरा म्हणाली
"तुला अस नाही का वाटत तु काही तरी विसरली अहेस." चिरागने विचारलं
"मी? मी काय विसरले...? (नकली आठवत ) नाही रे मी तर काहीच विसरले नाही." हळूच हसत अंतरा म्हणाली
"बर ओके जस तु म्हणशील... चल मी फोन ठेवतो शूट सुरु झाली आहे आय लव यु." चिराग म्हणाला
"चल बाय." परत गोड हसत अंतरा म्हणाली
तोच दोघांनी फोन ठेऊन दिला. स्वराज दोघांचं बोलण ऐकत होता तोच त्याला रागिणीची आठवण आली आणि तो आपल्या खोलीत निघून गेला त्याच्या डोळ्यात पाणी होत.
इकडे अंतराच्या खोलीत...
काही क्षणा नंतर....
आपल्या फोन कडे बघत हळूच अंतरा हसली आणि लगेच मेसेज केला.
"आय लव यु टु" गोड हसत अंतराने मेसेज केला.
आणि लगेच फोन ठेऊन आपलं आवरू लागली.
स्वराजच्या खोलीत...
स्वराज खिडकीत उभा होता तोच त्याला रागिणीचा भास होऊ लागला तस तो तिच्या आठवणीत हरवून गेला.
काही वेळा नंतर...
रागिणी एकटीच आपल्या खोलीत विचारमग्न खिडकीत उभी होती तिच्या मनात अनेक विचारांनी एकाच वेळी गर्दी केली होती.
डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा होता स्वरसाक्षी विद्यालय धोक्यात होत त्याचा तपास लावायचा होता आणि स्वराज. स्वराजचे विचार तर होतेच मनात एकाच वेळी सगळे विचार मनात घर करून बसले होते तोच फोन वाजला.
"हॅलो, कोण बोलतय?" रागिणीने विचारलं
तोच खुप वर्षांनी रागिणीचा आवाज ऐकून एकक्षण स्वराज स्थब्धच झाला त्याच्या मनात आनंद आणि डोळ्यात अश्रू अश्या दोन भावना एकदम उसळून आल्या तीचा आवाज ऐकून त्याच्या तोंडातून एक ही शब्द फुटेना तेव्हा समोरून काहीही आवाज न आल्याचे बघून रागिणीने पुन्हा एकदा विचारलं.
"हॅलो, कोण बोलतय कळेल का एकदा?" रागिणीने विचारलं
"मी, मी बोलतोय स्वराज." भानावर येत स्वराज म्हणाला
"कोण? (आश्चर्याने ) स्वराज तु?" आश्चर्याने रागिणीने विचारलं
स्वराज चा आवाज ऐकून रागिणीची देखील स्वराजसारखीच अवस्था झाली आणि दोघ ही परत एकमेकांमध्ये गुंतून गेले त्यांना त्यांच्या सगळ्या गोड आठवणी एका क्षणात आठवून गेल्या एकत्र केलेले संगीत प्रोग्रॅम, एकत्र घालवलेला वेळ, दोघांचं बालपण सगळ्या सगळ्या आठवणी एकदम डोळ्यासमोर येऊन गेल्या.
काही क्षणा नंतर...
"कशी आहेस?" हळू आवाजात स्वराज ने विचारलं
"तु कसा आहेस?" रागिणीने विचारलं
"मी (स्मित हास्य करत ) ठिक आहे तुझ गाणं कस चालू आहे आणि घरचे कसे आहेत." स्वराज ने विचारलं
"गाण (स्मित हास्य करत ) स्वराज माझ गाण तुझ्या शिवाय अधुरं अधुरं आहे आपण स्वररागिणी आहोत मग मी एकटी कशी गाऊ शकते तु माझ्या आयुष्यातून गेल्या पासून माझ गाण ही माझ्या पासून दूर गेलं आहे आणि घरचे म्हणशील तर आता ते ही मला सोडून कधीच दूर निघून गेले आयुष्यभरासाठी... मी माझ्या आयुष्यात एकटीच राहिले आहे. माझ सोड तु सांग तुझ काय सुरु आहे आणि इतक्या वर्षांनी माझी कशी काय आठवण आली तुला." रागिणीने विचारलं
तीच बोलण ऐकून स्वराज एकदम स्तब्धच झाला आणि काही क्षणातच भानावर येऊन त्याने विचारलं
"काय? तुझे घरचे सगळे तुला सोडून गेले? कस झालं हे सगळ" वाईट वाटून स्वराज ने विचारलं
"काय असत न स्वराज देवानी आपली परीक्षा घ्यायची ठरवली न तर तो चारी बाजूनी परीक्षा घेतो असच काहीस झाल ते सोड आता तु सध्या काय करत आहेस तु तर गाणं सोडल आहेस न." रागिणीने विचारलं
"माझ्या ही आयुष्यात देवाने परीक्षा च घ्यायची ठरवली आहे रागी पण आता मी ठरवलं आहे आपलं आयुष्य पुन्हा एकदा नव्याने आपल्या हातात घ्यायचं माझ्या या निर्णयात मला पुन्हा एकदा नव्याने साथ देशील?" स्वराजने विचारलं
"काय? मी इतक्या वर्षा नंतर... म्हणजे आपण दोघ म्हणजे तु मला विचारत आहेस?" आश्चर्याने रागिणीने विचारलं
खर तर रागिणी इतके वर्ष याच क्षणाची वाट पहात होती आणि तो क्षण आला ही पण त्याच हे बोलण ऐकून तीला तिच्या कानावर विश्वासच बसला नाही तीला कळेच ना आपण यावर काय बोलाव आणि ती स्वराजच बोलण ऐकून एकदम शांतच झाली. आणि स्वराज देखील तिच्या उत्तराची वाट पाहू लागला.
क्रमशः...
