खर तर रागिणी इतके वर्ष याच क्षणाची वाट पहात होती आणि तो क्षण आला ही पण त्याच हे बोलण ऐकून तीला तिच्या कानावर विश्वासच बसला नाही तीला कळेच ना आपण यावर काय बोलाव आणि ती स्वराजच बोलण ऐकून एकदम शांतच झाली. आणि स्वराज देखील तिच्या उत्तराची वाट पाहू लागला.
"ऐकतेस न मी तुला काही तरी विचारलं आहेस का फोन वर तुला माहित आहे न ग मी एकदम बोलून जातो नाही विचार करू शकलो मी तुझ्या ही मनात काही तरी सुरु असेल सॉरी मी काही चुकीचं बोलून गेलो असेल तर पण अस शांत नको राहूस ग." अगदीक होऊन स्वराज बोलला
तोच रागिणी भानावर आली आणि म्हणाली.
"तु न स्वराज थोडस देखील बदलला नाहीस हं किती बोलतोस तु मला विचारावस हेच मी किती तरी वर्षा पासून स्वप्न बघत आलीये पण तु मला अस फोन वरून विचारशील हे अनएक्स्पकटेड होत मला आणि ते ही इतक्या वर्षांनी ही उपरती कशी झाली तुला." रागिणी ने भानावर येत विचारलं
"काय सांगू तुला खर तर न जेव्हा माणूस आयुष्यातून निघून जातो न तेव्हा त्याची खरी किंमत कळत असते मी तुला माझ्या आयुष्यातून जा तर म्हणालो पण तुला कधी विसरू शकलो नाही आणि तुझी देखील अशीच अवस्था असेल अस गृहीत धरून मी तुला विचारलं पण आता मला कळतय तु तुझा वेळ घे घाई करू नकोस उत्तराची पण ऍटलीस्ट आपण भेटू तर शकतो न एक निखळ मैत्रीतून." स्वराजने विचारलं
"अरे थांब थांब एवढी फास्ट गाडी नेऊ नकोस माझ्यात एका मागून एक धक्के पचवायची ताकत नाहीये आधीच पहिल्या धक्क्या तुन सावरले नाहीये मी तर लगेच दुसरा धक्का एनीवे सांग कधी भेटूयात." स्वतःला सावरत रागिणीने विचारलं
"काय? खरच तु भेटशील मला " आनंदाने स्वराजने विचारलं
"हो स्वराज मी तुला भेटेन नक्कीच तु सोडून गेला होतास मला मी नाही मी तर अजुन ही तुझीच वाट बघत आहे काय करणार प्रेम आहे न तुझ्यावर अजुन ही भेटूत आपण." रागिणी म्हणाली
"तु एवढं प्रेम करतेस माझ्यावर एकदा ही मला विचारलं नाहीस त्या मुली बद्दल तुला प्रश्न पडत नाही का ग." आपले डोळे पुसत स्वराजने विचारलं
"प्रश्न त्यांना पडतात ज्यांना विश्वास नसतो मी तर तुझ्या बरोबर आपल बालपण देखील बघितल आहे आणि इतकी तर तुला ओळखतेच मी असो आता डोळे पुस आणि सांग आपण कधी भेटायचं कधी काम सुरु करायचं झाला की ब्रेक घेऊन आता आता खुप पुढ जायचं आहे साहेब." रागिणी म्हणाली
तीच बोलण ऐकून स्वराज हसला आणि म्हणाला.
"इंटरव्हयू बघितलास वाटत माझा एनीवे तु भेटायला तयार झालीस यातच आलं सगळ लवकरच भेटू आपण बर म्युझिक कस सुरु आहे तुझ." स्वराजने विचारलं
"म्युझिक? ते ही तुझ्यासारखं कधीच मागे पडलं रागिणीचा स्वरच नाहीसा झाला होता मग कसल म्युझिक." निराश होऊन रागिणी म्हणाली
"काय माझ्या साठी तु संगीत सोडलस काय हे रागी मी नाही तर काहीच नाही? अस करून कस चालेल आपल संगीत आपल्या दोघांमुळे आहे विसरलीस का ते काही नाही आपण गाण परत सुरु करायचं ते ही दोघ मिळून खुप हार मानली आता बास." स्वराजने समजावलं
"आता पटल न तुला आम्ही सगळे तुला हेच समजावत होतो आता सगळं विसरून परत एकदा भेटूत हं खुप बोलायचं आहे तुझ्याशी चल आता फोन ठेवते मी कळव मला कधी भेटूयात बाय." रागिणी म्हणाली
आणि दोघांनी फोन ठेऊन दिला.
पण स्वराजच्या मनातून विचार काही जातं नव्हते राहून राहून त्याच्या मनात रागिणी चेच विचार येत होते आणि त्याच विचारात त्याने मनाशी ठरवलं.
पण स्वराजच्या मनातून विचार काही जातं नव्हते राहून राहून त्याच्या मनात रागिणी चेच विचार येत होते आणि त्याच विचारात त्याने मनाशी ठरवलं.
"कुणी आपल्यावर इतकं प्रेम कस करू शकत? आणि आपण तेच नात दुर करायला निघालो होतो ते काही नाही आता स्वतः बरोबर रागिणीची ही ओळख तीला मिळवून द्यायची." स्वराज तिच्या फोटो कडे बघत म्हणाला
आणि एकटक त्या फोटो कडे बघत राहिला.
काही वेळा नंतर...
तो फोटो कडे बघत बघत झोपी गेला.
दुसऱ्या दिवशी सकाळी...
स्वराजचा आपल्या खोलीतला आज दुसरा दिवस होता आज तो पूर्ण मुक्त होता आणि आता त्याची आपल्या आयुष्याकडे सकारात्मकतेने बघण्याची वेळ आली होती. आता त्याला शांत बसून चालणार नव्हत आणि तसे त्याने पाऊल उचलायला सुरवात केली होती.
स्वराज आज लवकर उठला आणि फ्रेश होऊन नाश्त्याला खाली आला.
"वाहिनी आज नाश्त्याला काय बनवलं आहेस ग प्लिज लवकर दे न थोड बाहेर जाऊन यायचं आहे." स्वराज खुर्चीत बसता बसता बोलला
"हो, स्वराज आणते थोडा धिर धर आणि एवढ्या सकाळी सकाळी कुठे निघाली स्वारी." किचन मधून गार्गी ने विचारलं
"आई तु विसरतीएस का काका आता एकटा नाहीये मला वाटत तो काकूला भेटायला जातं असणार." मजा घेत अंतरा म्हणाली
"अंतरा काय बोलण आहे हे तुम्ही दोघ आता लहान नाही आहात थोड भान ठेवत जा बोलण्यात तुझा साखरपुडा झाला आहे आता." थोडस चिडून गार्गी म्हणाली
"राहू दे ग वाहिनी लहानच आहे ती अजुन बोलू दे तीला परत सासरी गेल्यावर थोडी अस बोलता येणार आहे तीला. आणि अंतू बाळ सध्या तरी तो दिवस लांब आहे बर का आमचा अग वहीनी तुला अशोक आठवतो आज मी त्याला भेटायला जातोय महत्वाचं काम आहे जरा म्हणून." स्वराज म्हणाला
"बर बर थोड खाऊन घे मग बाहेर पड हं." गायत्री म्हणाली
आणि लगेच नाश्ता घेऊन आली. लगेच सगळे नाश्ता करू लागले.
काही वेळा नंतर...
स्वराज परत आपल्या रूम मध्ये गेला आणि अशोक ला फोन करू लागला
देशभक्ती पर म्युझिक वाजलं...
"हॅलो बोल स्वराज आज कशी काय आठवण झाली." अशोकने विचारलं
"अरे वाह यावेळी आवाज ओळखलास माझा क्या बात है." स्वराज म्हणाला
"म्हणजे काय या आधी ही बोललोय अपाण मी तुझा नंबर सेव करून ठेवला होता बर ते सोड हॅशटॅग बद्दल काही समजल का?" अशोक ने विचारलं
"अरे त्या संदर्भात च मी तुला कॉल केला आहे हे बघ अशोक मला बऱ्याच गोष्टींचा तपास लावायचा आहे आणि यात मला तुच मदत करू शकतोस आपण आज भेटू शकतो का?" स्वराजने विचारलं
"आज? अं.. ठिक आहे मी तसा आज फ्री च आहे चालेल भेटूत किती वाजता भेटायचं म्हणजे हॉटेल वर किती वाजता येऊ." अशोक ने विचारलं
"ग्रेट, पण हॉटेल वर नको मी तस ही आता हॉटेल वर रहात नाहीये मी घरी परत आलोय तर मी तुला ऑफिसवरच भेटतो." स्वराज म्हणाला
"काय? तु स्वतःच्या घरी परत आला आहेस ही तर खरच खुप चांगली बातमी दिलीस बर ठिक आहे मग तु ऑफिसलाच ये भेटूत आपण मी तुला ऍड्रेस सेंड करतो." अशोक म्हणाला
"ठिक आहे तुला मला ऍड्रेस सेंड कर मी लगेच निघतो." स्वराज म्हणाला
"ठिक आहे बाय मी ऍड्रेस सेंड करतो." अशोक म्हणाला
आणि दोघांनी आपले फोन ठेऊन दिले
काही क्षणातच...
अशोक ने ऍड्रेस सेंड केला आणि तो ऍड्रेस वाचून लगेच स्वराज देखील बाहेर पडला.
"वहिनी मी येतो ग मला उशीर होईल वाट बघू नकोस माझी." जाता जाता स्वराज म्हणाला
"सावकाश जा रे लवकर ये घरी." गायत्री म्हणाली
आणि स्वराज अशोकच्या ऑफिसकडे रवाना झाला.
क्रमशः....
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा