आणि स्वराज अशोकच्या ऑफिसकडे रवाना झाला.
गाडीत बसताच त्याने युवीला ही कॉल केला.
ट्रिंग... ट्रिंग...
"अरे, हाय कसा आहेस आणि काय आपण भेटणार होतो काहीच बोलला नाहीस नंतर... काय झाल." फोन उचलून युवीने विचारलं
"अरे थोडा कामात बिझी होतो मी बर मी तुला यासाठीच फोन केलाय तु सध्या आहेस कुठे मी आत्ता अशोकला भेटायला निघालो आहे तु म्हणत असशील तर तुला घ्यायला येतो मी." स्वराज ने विचारलं
"अं... ठिक आहे तसही मी आज फ्रीच आहे ये तु घ्यायला भेटूत आपण मी तुला ऍड्रेस सेंड करतो." युवी म्हणाला
"ओके मला लगेच ऍड्रेस सेंड कर मी तुला घ्यायला येतो." स्वराज म्हणाला
आणि लगेच दोघांनी आपापले फोन ठेऊन दिले. तोच युवीने ऍड्रेस सेंड केला आणि ऍड्रेस बघून स्वराजने आपली गाडी युवीच्या घराकडे वळवली.
साधारणतः दोन तासा नंतर...
भाग्योदय निवास...
समोर आलिशान दरवाजा आणि दरवाज्या समोर भाग्योदय बंगला दिमाखात उभा होता युवी म्हणजेच युवराज शेळके गिरीराज शेळकेंचा मोठा मुलगा स्वराज अशोक आणि युवी तिघ ही पक्के मित्र गुरुकुलात एकत्रच वाढलेले अशोक आणि युवी इन्स्ट्रुमेंट शिकायला आले होते आणि स्वराज संगीत शिकायला आला होता एकत्रच मोठ होता होता स्वराजने आपल संगीत चालूच ठेवलं मात्र अशोक ने आपल सायबर एक्सपर्टच करिअर निवडलं तर युवी एक पोलीस अधिकारी बनला तिघांचे मार्ग वेगळे झाले पण एक गोष्ट कॉमन होती ती म्हणजे त्यांची मैत्री.
भाग्योदय निवास च आलिशान मेन गेट नेहमी बंदच राहायचं तस आज ही होत तोच काही क्षणात स्वराजची कार मेन गेट वर येऊन थांबली सेक्युरिटी गार्ड नेहमी सारखा आजही झोपेतच होता तोच स्वराजने हॉर्न वाजवला आणि सेक्युरिटी गार्ड ची झोप उडाली आणि आपली थोंडावर वेडीवाकडी ठेवलेली टोपी नीट करत गार्ड जागेवर उठून उभा राहिला आणि त्याने स्वराजला विचारलं.
"कोण पाहिजे साहेब तुम्हाला मी अस कुणाला आत सोडू नाही शकत." सेक्युरिटी गार्ड रघु ने विचारलं
"युवराज साहेब आहेत का घरी त्यांना जाऊन सांग स्वराज आलाय." स्वराज म्हणाला
तोच गार्ड घरात सांगायला गेला.
"साहेब, कुणी तरी स्वराज कुलकर्णी म्हणून भेटायला आलय." गार्ड ने निरोप दिला
युवी नाश्ता करण्याच्या गडबडीत होता तोच गार्ड च बोलण ऐकून जागेवरच थांबला आणि म्हणाला.
"अरे त्याला बाहेर का उभ केलस माझा खुप जवळचा मित्र आहे तो त्याला आत घेऊन ये." युवी म्हणाला
लगेच गार्ड बाहेर गेला आणि त्याने युवीचा निरोप दिला व स्वराजला घेऊन आला.
"हाय कसा आहेस मित्रा बऱ्याच वर्षांनी भेटतोय आपण ये न." अलिंगन देत युवी म्हणाला
"अरे नाही यार आज खर तर बसायला वेळ नाहीये ते अशोकला भेटण खुप गरजेच आहे आज मी त्याला लवकर येतो म्हणून सांगितलं आहे तु तयार आहेस का." स्वराज ने विचारलं
"अरे हो मी तयार आहे फक्त माझा नाश्ता बाकी आहे म्हणून तुला थोडयावेळ बस म्हणालो मी लगेच नाश्ता करून घेतो मग निघू बर तु करतोस नाश्ता." युवीने विचारलं
"अरे नाही मी घरूनच करून निघालो बर तु कर लवकर नाश्ता मग निघुत आपण." स्वराज म्हणाला
"घरातून? म्हणजे तु आता..." खुर्चीत बसत युवीने विचारलं
"अरे हो मी आता हॉटेल मध्ये नाही रहात मी घरी आलोय आता." खुर्चीत बसत स्वराज म्हणाला
"ही तर तु खुप चांगली बातमी दिलीस स्वराज खुप छान झाल तु घरी परातलास." आनंदाने युवी म्हणाला
"हो अस किती दिवस दुसरीकडे राहणार न आणि कधी न कधी बदल तर करावा लागणारच होता म्हणून घेतला निर्णय." स्वराज म्हणाला
"नाही खर तर हा तुझा खुप चांगला निर्णय आहे अरे आणि जितक मला माहितीये तु कुठलाच गुन्हा करणार नाहीस पण मग त्या मुलीच काय झाल?" युवीने नाश्ता करता करता विचारलं
"त्याचा ही शोध घ्यायचा आहे अरे पण आत्ता सध्या त्या हॅशटॅग चा तपास लावायचा आहे फॅन्स ट्रेंड्स वगैरे करतात पण त्यांचे असे मेसेज नसतात बघ न काय तर म्हणे "स्वराज सर तुम्ही कुठे आहात मला तुमची मदत हवी आहे." दुसरा मेसेज आहे "तुम्ही ठिक तर आहात न?" हा मेसेज बघ त्याच अकाउंटचा "तुमची स्वरसाक्षी ला गरज आहे प्लिज मला भेटा." आणि हे मेसेजेस बघ "तु जे केल आहेस न ते मला माहित आहे मी तुझ्यावर लक्ष ठेऊन आहे." हे असे बरेच मेसेज आहेत या टॅगलाईन मध्ये आता याचा काय अर्थ लवायचा आपण म्हणून जायचं आहे बर मला एक सांग तुला अननोन ईमेल आला आहे का काही." ट्रेंडिंग ची टॅगलाईन दाखवत स्वराजने विचारलं
"हो अरे मी तुला बोलणारच होतो पण कामाच्या नादात राहून गेल मला ही स्वरसाक्षी संदर्भात एक मेल आलाय चल अशोकला भेटून घेऊच माझ झालय निघुयात आपण." हात धुउत युवी म्हणाला
काही क्षणा नंतर...
दोघ गाडीत बसले आणि अशोक च्या ऑफिस कडे रवाना झाले.
"बर अजुन काय सुरु आहे काय करणार आहेस पुढे?" युवीने विचारलं
"सध्या माझ्यावर बऱ्याच जबाबदाऱ्या आहेत युवी स्वरसाक्षी च सत्य शोधायचं आहे ऋग्वेद ला भेटायचं आहे हा ट्रेंड ज्याने सुरु केला त्याचा शोध घ्यायचा आहे त्या मुलीचा शोध घ्यायचा आहे जीचे आयुष्य माझ्यामुळे बरबाद झाले काय माहित ती कुठे असेल आत्ता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रागिणीला परत आयुष्यात आणायचं आहे माझ तस बोलण झाल तिच्याशी प्रेम पण काय चीज असते न युवी तीने यार मी तिच्या आयुष्यात नव्हतो तर तीने ही गाणं सोडल यार तीने माझ्यासाठी गाण्याचा त्याग केलाय तर आता तीच नाव ही उंचवाव ही माझी जबाबदारी आहे आणि आता ह्याच स्वररागिणी जोडीला टॉपवर आणण्याची जबाबदारी देखील माझीच आहे बस ह्याच जबाबदाऱ्या पुर्ण करायच्या आहेत आता." गाडी चालवत स्वराज म्हणाला
"होईल होईल सगळं छान होईल अरे जे चांगले असतात न त्याच कुणीच वाकड करू शकत नाही अरे तो वर बसलेला बघतोय न सगळ काही कोणी तुझ्यावर अन्याय करू शकणार नाही बघ." युवी म्हणाला
स्वराजच लक्ष गाडी चालवण्यात तसेच युवीशी गप्पा मारण्यात होत त्याला माहित ही नव्हत त्याचा पुढे घात होणार आहे आणि तोच एका दुचाकी स्वाराने त्याच्या कार ला धडक दिली आणि दोघांचा ऍक्सीडेंट झाला.
तो बाईक वाला त्यांना न बघताच तिथून भरदाव निघून गेला त्याची स्पीड इतकी होती की कुणाला त्याच्या बाईक चा नंबर घेण सुद्धा शक्य नव्हत.
काही क्षणा नंतर...
तो ऍक्सीडेन्ट मोठा होता पण मारेकऱ्याचा मोटिव्ह फक्त चेतावणी देण्याचा होता त्यामुळे दोघ बचावले
ऍक्सीडेन्ट झाल्याचं बघताच लोकांची गर्दी जमली जो तो कुतूहलाने त्यांच्या कारीला बघत होत आणि आपापसात चर्चा करत होते.
काही वेळा नंतर...
एक जण पुढे आला आणि दोघा तिघांच्या मदतीने त्याने दोघांना आपल्या कार मध्ये बसवलं आणि हॉस्पिटल मध्ये नेलं.
काही वेळा नंतर...
इन्स्पेक्टर राघव एका केसवर काम करण्यात मग्न होते तोच फोन वाजला.
देशभक्ती पर रिंगटोन वाजली...
"हॅलो, राघव स्पिकिंग... कोण बोलतोय?" राघवने विचारलं
"हॅलो सर मी सागर बोलतोय विरार चौकात एक ऍक्सीडेन्ट झालाय त्यात तुमचे एक ऑफिसर देखील आहेत मला त्यांच्या फोन मधून तुमचा नंबर मिळाला त्यांना मी यशोदा हॉस्पिटल मध्ये भर्ती केल आहे तुम्ही येऊ शकाल का?" सागरने सांगितलं
"हो... हो मी लगेच निघतो डोन्ट वरी तुम्ही तिथेच थांबा मी येई पर्यंत." राघव म्हणाला
आणि तडक हॉस्पिटल कडे रवाना झाला.
क्रमशः
