"हो... हो मी लगेच निघतो डोन्ट वरी तुम्ही तिथेच थांबा मी येई पर्यंत." राघव म्हणाला
आणि तडक हॉस्पिटल कडे रवाना झाला.
काही वेळा नंतर...
यशोदा हॉस्पिटल...
"हॅलो पोलीस... या हॉस्पिटल मध्ये कुणी आत्ता ऍडमिट झालय का आणि ते कुठल्या वॉर्ड मध्ये आहेत " राघव ने विचारलं
"हो सर ते दोन व्यक्ती आहेत कार चा ऍक्सीडेन्ट झाला जनरल वॉर्ड मध्ये आहे" रिसेप्शनीस्ट ने सांगितलं
"ओके थँक्स." राघव म्हणाला
आणि लगेच जनरल वॉर्ड कडे निघून गेला
काही वेळा नंतर...
सागर राघवची वाट बघतच होता तोच राघव आला
"हॅलो, राघव." हँडशेक करत राघव म्हणाला
"हाय मी तुमचीच वाट बघत होतो मी सागर मीच घेऊन आलोय दोघांना." हँडशेक करत सागर ने सांगितलं
"गुड नेमक काय झाल होत सांगू शकाल का." राघवने विचारलं
"सर मला जास्त काही माहित नाही पण आजूबाजूचे लोक सांगत होते एका भरदाव येणाऱ्या बाईक मुळे ऍक्सीडेन्ट झाला त्याची स्पीड इतकी होती की त्याचा कुणाला नंबर देखील घेता आला नाही." सागर ने सांगितलं
"अच्छा त्या बाईक बद्दल काही सांगता येईल का म्हणजे त्याच वेगळेपण." राघवने विचारलं
"अं... हो ती एक नवी कोरी बाईक होती म्हणजे नुकतीच लॉन्च झालेली आणि त्याची स्पीड खुपच जास्त होती ग्रे कलर होता त्या बाईक चा आणि हो इगल च टॅटू होत त्या बाईक ला लावलेलं." सागरने सांगितलं
"ओह ग्रेट ही इतकी माहिती पुरेशी आहे थँक्स अजुन काही माहिती हवी असल्यास कळवेन" राघव म्हणाला.
तोच डॉक्टर रवींद्र आले डॉक्टर रवींद्र युवी आणि स्वराज ची ट्रीटमेंट करत होते.
"ओह डॉक्टर काही इंप्रूव्हमेंट?" राघवने विचारलं
"तस काही काळजी करण्यासारखं नाहीये मी बँडेज केलय बस थोडा त्यांना आराम करण्याची गरज आहे मला वाटत त्यांच्या घरच्यांना कळवायला हव" डॉक्टर म्हणाले
"ठिक आहे डॉक्टर ते मी बघून घेतो पण दोघांना मी भेटू शकतो का" राघवने विचारलं
"हो.. हो तुम्ही भेटू शकता." डॉक्टर म्हणाले
आणि तिथून निघून गेले.
"हाय मी राघव तुमच्याच डिपार्टमेंट ला आहे आता तुमची दोघांची तब्येत कशी आहे" राघव ने विचारलं
"मार लागला आहे जरा पण ओके आहे" युवीने सांगितलं
"पण सर हे झालं कस?" राघवने विचारलं
"अरे काही नाही आम्ही दोघ माझ्या अजुन एका मित्राला भेटायला निघालो होतो तर मागून एका बाईकने धडक दिली तीचा वेग इतका होता की काही समजलच नाही बघ साधा नंबर सुद्धा घेता आला नाही तुला कस कळल माझा ऍक्सीडेन्ट झाला आहे ते." युवीने विचारलं
"मला कुणीतरी सागर म्हणून होते त्यांचा फोन आला होता त्यांनीच तुम्हाला इथे आणलं बर तुम्हाला कुणावर शंका आहे का कोणी केलय हे काय वाटत तुम्हाला" राघवने विचारलं
"खर सांगू का सर आत्ता हे सगळ विचार करण्याची आमच्यात कॅपेसिटीच राहिली नाहीये आमच्या घरच्यांना हे सगळं कळाल तर काय होईल याचीच काळजी वाटत आहे मला." स्वराज ने सांगितलं
"हे बघा ही एक रुटीन इंक्वायरी असते यातूनच कदाचित काही माहिती मिळेल म्हणून आम्ही विचारत असतो तुम्ही काळजी करू नका मी तुमच्या आणि सरांच्या घरी कळवण्याची व्यवस्था करतो तुम्ही दोघ आराम करा आणि काही लागलं तर कळवा मला हं मी निघतो आता. बर सर मी त्या गाडीचा काही तपास लागतो का ते पहातो आणि तस तुम्हाला कळवतो येऊ मी." राघव म्हणाला
आणि सेल्यूट करून निघून गेला. तोच दोघ ही एकमेकांकडे बघू लागले
काही वेळा नंतर...
"कोण असेल गाडी वाला स्वराज आपण जातोय अशोकला भेटायला हे कुणा कुणाला माहित होत रे तु सांगितलं होतस का कुणाला." विचार करता करताच युवी ने विचारलं
"नाही रे मी तर कुणालाच काही बोललो नाही फक्त घरातून निघताना वहिनीला सांगितलं मी बाहेर जाऊन येतोय वेळ लागेल बस इतकच" स्वराज म्हणाला
"तस नाही रे पण काही तरी गल्लत होतीये इतकं नक्की बर मला सांग तु इंटरव्हयू दिलास त्या नंतर काही तुला वियर्ड जाणवलं जस तुझ्यावर कुणी तरी नजर ठेऊन आहे अस काही कारण आत्ता पर्यंत तुझा इंटरव्हयू बऱ्याच लोकांनी बघितला असणार बघ न म्हणजे तु इंटरव्हयू दिलास आणि आज आपल्यावर हमला झालाय हे विचित्र वाटत नाहीये तुला." युवीने विचारलं
"हो रे, हे तर माझ्या लक्षातच नाही आल तु म्हणत आहेस त्यात तथ्य तर आहे पण आता शोधायचं कस आणि अजुन अशोक ची पण भेट नाही झाली त्याला कळवायला हव तो आपली वाटत बघत असेल." स्वराज म्हणाला
"हो.. हो.. लाव त्याला फोन उगीच त्याचा खोळंबा नको व्हायला." युवी म्हणाला
आणि लगेच त्याने फोन लावला.
अशोक दोघांची वाटच बघत होता तोच फोनची रिंग वाजली.
"स्वराज चा फोन." मोबाईल बघत मनाशीच अशोक म्हणाला
"हाय अरे काय झालं मी वाट बघतोय किती वेळ ची तु येणार होतास न काय झालं?" अशोकने विचारलं
"अरे हो.. हो जरा श्वास घे आम्ही खर तर निघालोच होतो तुझ्याकडे यायला पण वाटेत आमचा ऍक्सीडेंट झाला आम्ही यशोदा हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहोत." स्वराजने सांगितलं
"काय? कोण दोघ तु तर एकटाच येणार होतास न." अशोकने विचारलं
"अरे हो फक्त मीच येणार होतो पण वाटेत युवी च घर लागलं म्हणलं आपण खुप वर्षांनी भेटतोय तर त्याला ही घेऊन चलू तर आधी त्याच्या कडे गेलो त्याला घेतल मग दोघ तुझ्याकडे यायला निघालो तर वाटेत हे सगळ घडलं तु उगीच वाट बघशील म्हणून कॉल केला मी." स्वराज म्हणाला
"अच्छा ठिक आहे मी तिकडेच तुम्हाला भेटायला येतो फार लागलं नाही न तुम्हाला." अशोकने विचारलं
"नाही नाही आम्हाला फार लागलं नाहीये बस थोडा मुक्कामार लागलाय." स्वराज म्हणाला
"ठिक आहे मी यशोदा हॉस्पिटल मध्ये येतो मग बोलुत सगळं." अशोक म्हणाला
"ठिक आहे ये तु भेटूत आपण." स्वराज म्हणाला
आणि लगेच दोघांनी आपापले फोन ठेऊन दिले.
काही वेळा नंतर...
यशोदा हॉस्पिटल...
"हॅलो, मी अशोक मला युवराज, आणि स्वराज ला भेटायचय ते कोणत्या वॉर्ड ला आहेत सांगू शकाल का." अशोक ने विचारलं
"सर ते दोघ जनरल वॉर्ड ला आहेत समोरून जा." रिसेप्शनीस्ट ने सांगितलं
आणि लगेच अशोक जनरल वॉर्ड कडे निघून गेला.
यशोदा हॉस्पिटल च जनरल वॉर्ड...
"हाय अरे काय तुम्ही लोक एकतर इतक्या वर्षांनी भेटताय ते ही अस अं कस काय झालं हे सगळ." बेडवर बसत अशोकने विचारलं
"काही बोलू नको यार बहुतेक आपली भेट इथेच होणार होती बर ते सोड मला सांग तुझ काम कस चालू आहे बरच नाव गाजतय हल्ली तुझ." युवी म्हणाला
"आमचं नाव गाजणार च यार सध्या सायबर गुन्हे किती घडताएत या गुन्हेगारांना खुपच आठवण येतीये आमच्या सारख्या सायबर एक्सपर्ट ची म्हणूनच तर हल्ली जास्तच पेपरमध्ये माझ नाव येतय ते सोड तुझ सांग हा तर इतक्या वर्ष गायबच झाला होता तुझ काय तुला मला भेटावसं वाटलं नाही." अशोक म्हणाला
"तस नाही यार तुला तर कल्पना असेलच न आमची पोलिसांची ड्युटी पण काही वेगळी नसते एकदा का एखादी केस हाती लागली तर ती केस सॉल्व होई पर्यंत आम्हाला सुटका नाही आणि आजकाल तर किती नवनवीन पद्धतीचे गुन्हे घडत आहेत समाजात." युवी म्हणाला
"हो न ते तर आहे बर तुझ काय आणि तु आपल्या वसु च्या हॉटेलमध्ये रहात होतास न मग आज अचानक बाहेर कस काय पडलास आणि हे आपल्या संगीत विद्यालयाच काय प्रकरण आहे." अशोकने विचारलं
"अरे तेच बोलायला म्हणून तर आम्ही तुझ्याकडे निघालो होतो आणि आता मी हॉटेल मध्ये नाही तर घरी परतलोय अशोक यार मला राहून राहून अस वाटतय की आपल स्वरसाक्षी धोक्यात आहे का कुणास ठाऊक पण मला गडबड वाटतीये आणि हे ट्रेंडिंग हॅशटॅग च ही कळत नाहीये मला काही त्याचा ही शोध घ्यायचा आहे म्हणून तर तुला भेटायला येत होतो आम्ही." स्वराज ने सांगितलं
"अच्छा, मला फार याची कल्पना नव्हती अरे पण तु काळजी करू नकोस मी याचा तपास लावतो हं बस तु आता तुझ्या लाईफ कडे फोकस कर परत एकदा तुला नव्याने जगासमोर उभ राहायचं आहे काय. तुझा इंटरव्हयू बघितला बर का मी बघून खुप छान वाटलं कळतय मला स्वराज तु खुप काही भोगलं आहेस पण आता ते दिवस संपले आता एक नवा सूर्य जन्माला आलाय बस त्या तेजाने जगाला उजळून टाक." अशोक समजावत म्हणाला
"खरय तुझ मी आता मागे वळून कधीच बघणार नाही पण मागच्या आयुष्यात जे काही घडलय ते तर निस्तराव लागेलच न ते सगळ होतच राहील तु बस त्या टॅगलाईन आणि हॅशटॅग च काय आहे ते बघ बाबा एकदा." स्वराज म्हणाला
"नक्कीच तुझे सोशल मीडिया चे अकाउंट तेच आहेत न अजुन." अशोक ने विचारलं
"हो तेच आहेत पण हे ट्रेंडिंग क्स वर सुरु आहे." स्वराज म्हणाला
"ठिक आहे मी चेक करतो ते आजच टीमला कामाला लावतो बघू काय होत ते." अशोक म्हणाला
"ठिक आहे. आणि मला ही कळवत रहा हं." स्वराज म्हणाला
"हो नक्कीच बर येतो मी काही लागलं तर सांगा पूर्ण रेस्ट घ्या हं येऊ मी." अशोक म्हणाला
"हो ये खुप छान वाटलं तुला भेटून." स्वराज म्हणाला
"हो न आता वरचे वर भेट होतच राहील." युवी म्हणाला
"नक्कीच चल बाय." अशोक म्हणाला
आणि निघून गेला.
क्रमशः...
