Login

ट्रेंडिंग लव हॅशटॅग - स्वररागिणी (भाग - पंचवीस )

या भागात तुम्ही वाचाल स्वराज आणि युवराज दोघांचा ऍक्सीडेन्ट झालाय तर अशोक आता ट्रेंड चा शोध घेणार आहे
"ठिक आहे मी चेक करतो ते आजच टीमला कामाला लावतो बघू काय होत ते." अशोक म्हणाला

"ठिक आहे. आणि मला ही कळवत रहा हं." स्वराज म्हणाला

"हो नक्कीच बर येतो मी काही लागलं तर सांगा पूर्ण रेस्ट घ्या हं येऊ मी." अशोक म्हणाला

"हो ये खुप छान वाटलं तुला भेटून." स्वराज म्हणाला

"हो न आता वरचे वर भेट होतच राहील." युवी म्हणाला

"नक्कीच चल बाय." अशोक म्हणाला

आणि निघून गेला.

गाडीत बसताच... अशोकचे विचारचक्र सुरु झाले.

"खरच कोण असेल ही व्यक्ती आणि जर तिला आम्हाला काही सांगायचं च होत तर तीने सोशल मीडिया चा का आधार घेतला ती व्यक्ती सरळ सरळ स्वराज ला ही येऊन भेटू शकतच होती की नक्कीच काही तरी मोठी भानगड आहे ही एक काम करतो सोशल मीडिया चेक करतो काही तरी समजेल." अशोक मनात म्हणाला

आणि लगेच सोशल मीडिया चेक करू लागला.

"स्वर साक्षी संगीत विद्यालय नवीन अपडेट्स." अशोक ने टाईप केल तोच पहिलीच पोस्ट ट्रेंड ची दिसली आणि तो एक एक ट्विट्स नीट तपासून वाचू लागला व नोट्स काढु लागला.

काही वेळा नंतर...

"हं ऑफिस वर गेल्यावर हे अकाउंट्स चे आय पी ऍड्रेस चेक करतो एकदा स्वराजचे फॉलोवर्स तसेच रागिणी चे फॉलोवर्स देखील चेक करावे लागतील आणि स्वरसाक्षी चे सोशल अकाउंट देखील चेक करावे लागतील." विचार करत करत अशोक म्हणाला

आणि लगेच त्याने स्वराज चे सोशल अकाउंट चेक करायला सुरवात केली.

"इंस्टाग्राम अकाउंट : स्वराज कुलकर्णी. हं हेच आहे स्वराज च अकाउंट किती फॉलोवर्स हं 17k एकदा सगळी नावांची लिस्ट तयार करून ठेवलेली बरी
1) पूनम कौर
2) आदेश साठे
3) गंधार कुमार
4) मेहविश कुरेशी
5) आनंद कुलकर्णी
6) वसुंधरा जोशी
7) राधिका सप्रे
8) रुपेश जोगदंड
एकदा या रुपेश च अकाउंट चेक करूयात." अशोक ने एक लिस्ट बनवत मनात विचार केला

आणि लगेच रुपेश च अकाउंट चेक करू लागला.

"अरे हे काय? याच्या अकाउंट मध्ये स्वराज साठी पोस्ट हं म्हणजे हा आपला एक ससपेक्ट असु शकतो थोड अजुन चेक करूयात." अशोक मनात म्हणाला

आणि परत अकाउंट चेक करू लागला. तोच त्याला त्याच्या अकाउंट मध्ये अजुन एक अकाउंट दिसल "swaraj_soulof_music" त्याने लगेच नावाची नोंद करून घेतली आणि ठरवलं.

"हं इथून आपली सुरुवात असेल गुड." अशोक मनात म्हणाला.

आणि लॅपटॉप बंद करून घर येण्याची वाट पाहू लागला.

इकडे...

यशोदा हॉस्पिटल..

जर्नल वॉर्ड मध्ये...

युवराज आणि स्वराज दोघ अराम करत असतात तोच आनंद आणि त्याची फॅमिली तसेच युवराज चे आई वडिल दोघांना बघायला येतात.

"स्वराज... बेटा अरे काय हे सांगायचं तरी आम्हाला अं आणि हे झालं कस? आत्ता इन्स्पेक्टर राघव नी आम्हाला सांगितलं म्हणून कळाल आम्हाला." आनंद ने काळजीने विचारलं.

"हो, न अशी कशी गाडी चालवता रे पोर तुम्ही अं काही झालं असत म्हणजे." लगेच युवराज ची आई काळजीने म्हणाली

"आई, दादा उगीच तुम्ही इतकी काळजी करत आहात डॉक्टर म्हणाले आहेत काळजी करण्यासारखं नाही आम्हाला फक्त आराम करण्याची गरज आहे कशाला तुम्ही इतकी काळजी करताय हे बघा आम्ही अगदी ठणठनीत आहोत." युवी समजावत म्हणाला

"हो न आणि आजच कदाचित आम्हाला डिस्चार्ज सुद्धा देतील." लगेच स्वराज म्हणाला

"डॉक्टर कोण आहेत आम्ही भेटून येतो." आनंद ने विचारलं

लगेच दोघ एकमेकांकडे बघू लागले.

"डॉक्टर रवींद्र." भानावर येत युवराज ने सांगितलं

"आम्ही डॉक्टरांना भेटून येतो तुम्ही बसा चला काका." आनंद म्हणाला

लगेच आनंद आणि युवराज चे दोघ ही डॉक्टरांना भेटायला गेले.

यशोदा हॉस्पिटल चे रिसेप्शन...

"हॅलो मॅडम मी आनंद स्वराज चा मोठा भाऊ डॉक्टर रवींद्र चे केबिन कुठे आहे कळेल का?" आनंद ने विचारलं

"ते समोरच आहे पण तुम्हाला वेट करावा लागेल सर आत्ताच राऊंडला गेले आहेत." रिसेप्शनीस्ट ने सांगितलं

"या बसा मग आता आता काय दोन तास वाट पाहावी लागणार हे दवाखाना म्हणलं की असच असत." खुर्ची वर बसत आनंद म्हणाला

"हो न अगदी खरय तुझ." खुर्चीवर बसत युवराज चे वडील म्हणाले

"तुम्ही कसे आहात खुप वर्षांपूर्वी भेटलो होतो आपण आणि त्यानंतर आज भेटतोय." आनंद ने विचारलं

"हो न दिवस पण किती पटकन निघून जातात नै स्वराजच गाणं सुरु होत तेव्हा अधून मधून आपली भेट व्हायची त्यानंतर आज भेटतोय आपण. बाकी तु कसा आहेस आणि स्वराज घरी कधी आला परत." गिरीराज जींनी विचारलं

"कालच परत आला तो आणि बघा न आज हे अस होऊन बसलं." आनंद म्हणाला

"काळजी करू नको रे होईल सगळ ठिक आता डॉक्टर आले की भेटून घेऊ त्यांना बघुत काय म्हणतात ते मला तरी वाटतय काळजी करण्यासारखं नसेल काही." गिरीराज समजावत म्हणाले

काही वेळा नंतर...

आनंद आणि गिरीराज दोघ ही गप्पा मारण्यात मग्न होते तोच राउंड घेऊन डॉक्टर रवींद्र आले आणि लगेच दोघांची त्यांच्या वर नजर गेली.

"चला आले डॉक्टर भेटून घेवूत आपण कुणी केबिन मध्ये जायच्या आत." आनंद म्हणाला

आणि लगेच दोघ ही जागेवरून उठले.

"मॅडम आम्ही डॉक्टरांना भेटू का." आनंद ने विचारलं

"हो भेटू शकता." रिसेप्शनीस्ट म्हणाली

आणि लगेच दोघ डॉक्टरांना भेटायला गेले.

"आम्ही आत येऊ का? डॉक्टर." आनंद ने विचारलं

"अरे हो या की बसा." डॉक्टर रवींद्र म्हणाले

लगेच दोघ केबिन मध्ये आले.

"मी आनंद स्वराजचा मोठा भाऊ आणि हे गिरीराज शेळके युवराज चे वडील आम्ही दोघांबद्दल जाणून घ्यायला आलो आहोत." आनंद ने सांगितलं

"डॉक्टर काही काळजी करण्यासारखं नाही न नेमक काय झालय दोघांना." गिरीराज जी नी विचारलं

"अहो, गिरीराज सर काही ही काळजी करण्यासारखं
नाहीये पण बर झालं तुम्ही दोघ भेटायला आलात मला
थोड दोघांशी बोलायचच होत तस दोघां बाबतीत काळजी करण्यासारखं नाहीये पण सध्या दोघांना ही बरच लागलं आहे त्यामुळे दोघांना आरामाची गरज आहे जितक दोघ आराम करतील तितक्याच लवकर दोघांना बर वाटेल मी दोघांसाठी गोळ्या लिहून देतोय त्या तेवढं वेळेवर द्या आपण आज एम आर आय सुद्धा करून घेऊ आणि रिपोर्ट चांगला आला तर आजच डिस्चार्ज ही देऊ." डॉक्टरांनी सांगितलं

"डिस्चार्ज? डॉक्टर अहो दोघांना खुपच लागलय." आनंद म्हणाला

"हो न." काळजी ने गिरीराज म्हणाले

"अहो तुम्ही दोघ ही काळजी करू नका मान्य आहे ऍक्सीडेन्ट मोठा होता पण सुदैवाने दोघांवरच संकट टळलय त्यांना फक्त आराम करण्याची गरज आहे हो पण ते पायावरच बँडेज इतक्यात काढु नका फॉलोअप ला याल तेव्हा काढु मी 1 महिन्याच्या गोळया लिहून देतो तेवढं त्यांना द्या." डॉक्टर म्हणाले

आणि लगेच प्रिस्क्रिप्शन लिहू लागले.

"डॉक्टर एम आर आय कधी करून घ्यायच मग." आनंद ने विचारलं

"दुपारी करून घेऊ मी बोलून घेतो स्टफ शी ते सांगतील तुम्हाला." प्रिस्क्रिप्शन देत डॉक्टर म्हणाले

"ओके चालेल." दोघ म्हणाले

आणि प्रिस्क्रिप्शन घेऊन केबिन मधून बाहेर पडले.

इकडे...

अशोक अजुन ही स्वरसाक्षी संगीत विदयालय च्या च विचारात होता तोच घर आल आणि ड्रायवर म्हणाला.

"साहेब घर आल." कार थांबवत ड्रायवर म्हणाला

तोच अशोक भानावर आला. आणि घराकडे गेला.

इकडे...

यशोदा हॉस्पिटल..

यशोदा हॉस्पिटल च मेडिकल...

"या गोळया.." प्रिस्क्रिप्शन देत आनंद म्हणाला

लगेच मेडिकल वाल्याने दोन्ही प्रिस्क्रिप्शन घेतली आणि गोळ्या काढु लागला.