प्रियाला विचित्र हसण्याचा आवाज आला. तिने डोळे उघडून पाहिलं. ती माया मोठ्याने हसत होती.
आता पुढे.....
माया पुन्हा प्रियाला बघू लागली. तिची नजर तिच्या सर्वांगावर फिरत होती.
" माझी तपश्चर्या फळाला आली. शैतान खुश झाला. त्याला माहित आहे मला काय हवंय. त्याचा जययकार असो." म्हणत ती पुन्हा हसू लागली. हसता हसता तिने चुटकी वाजवली. प्रियाने पाहिलं, रवी आणि मालक उठून उभे राहिले. एव्हाना मायाने मायावी रूप घेतले होते. तिचं ते रूप पाहून क्षणभर प्रीयाही हरखून गेली. गोरिगोरीपान. काजळ घातलेले काळेभोर मोठे डोळे, लांबसडक केसांची वेणी. पण तिचे केस....केसांची आपोआप वेणी घातली जात होती. आता ते केस नागिनिसारखे वळवळत मायाच्या समोर आले. नंतर ते रवी आणि मालकांच्या समोर आले आणि त्या केसांनी प्रीयाकडे इशारा केला. तसे रवी आणि मालक दोघेही तिच्याकडे पाहू लागले.
प्रियाला काहीतरी गडबड आहे याचा अंदाज आला. तिने आजुबाजुला पाहिले. दरवाजा बंद होता. त्या पूर्ण रूम मध्ये एक दरवाजा आणि एक खिडकी याशिवाय बाहेर जाण्यासाठी मार्ग नव्हता. रूम तिसऱ्या मजल्यावर होती खिडकी उघडी होती. आता तिला त्या खिडकीचाच काय तो आधार होता. ती त्या खिडकीच्या दिशेने जाईल तोच रवीने तिच्या केसांना पकडले आणि फरफटत त्या मोठ्या दगडावर आणले. त्या मायला एव्हाना माहिती पडले की ती प्रियाला हात सुध्दा लावू शकत त्यामुळे ती आता रवी आणि मालक यांचा वापर करत होती. रवी आणि मालक माया च्या अधीन होते. मालकांनी प्रियाच्या डोक्यावर मुर्तिजवळचे कसलेसे भस्म लावले आणि तलवार हाती घेतली. आता फक्त मायाच्या इशाऱ्याची गरज होती.
प्रियाच्या डोळ्यासमोर आता फक्त आई बाबा दिसत होते. तिला त्यांची खूप आठवण येत होती. तिचे डोळे पाण्याने डबडबले होते. तिला काय करावे सुचेना. तिने डोळे मिटुन घेतले. काही क्षण सर्व स्तब्ध झाले.
" प्रिया....आज माझी आठवण नाही काढलीस. काय करणार....तू फार बिझी होतीस ना. मज्जा करण्यात. एरव्ही सारखी बडबड.... माऊली आज असं झालं, माऊली आज तास झालं. मग...आज का नाही सांगितलस. एवढीच का आपली मैत्री... अम्म ssss"
प्रियाला समोर काही दिसत नव्हतं. फक्त एक प्रकाशमय आकृती. तीही धुरकट. हळू हळू ती आकृती दूर जात होती.
" नाही नाही माऊली मी येते मला मदत कर मी येते तुझ्याबरोबर. मला सोडून नको जाऊस. माऊली......" म्हणत प्रियाने सर्व शक्तिनिशी आपले हात झटकले. त्या सरशी रवी मालकावर आपटला आणि दोघे खाली पडले. प्रिया धावत त्या आकृतीच्या मागे मागे गेली आणि तिने एक झेप घेतली. रवी मालक आणि माया यांना काही कळायच्या आत प्रियाने खिडकीच्या बाहेर उडी मारली होती. मायाने रागात एक मोठी किंचाळी फोडली. पूर्ण जंगल त्या आवाजाने हादरलं.....
" प्रसादभाऊ अहो काय झालं...? त्याच्यावर विश्वास नाही का तुमचा...? अहो नका काळजी करू, ती त्रिमूर्ती जरी एका जागी असली तरी तिचा लक्ष सगळीकडे आहे." आबा काका
" पण आबा माझीच प्रीयुच का ? या जगात अजुन कुणी नाही का या कामासाठी ? " प्रसदाभाऊ
" हे बघा... त्याच्या मनात काय आहे ते कुणाला कळल आहे का ? वेळ आली की सर्व व्यवस्थित होईल. चला बघू तुम्ही घरी. नाहीतर एक काम करू आपण, आजची रात्र आपण माऊलीवर अभिषेक करू आणि सहस्त्र नामजप करू. जेणेकरून प्रियाला तिच्या कामात मदत होईल." आबा
" चालेल....नाहीतरी माझी पोर तिथे संकटात असताना माझं लक्ष नाही लागणार आणि प्रियाच्या आईला लगेच कळेल की काहीतरी गडबड आहे. तिला सांगितलं तर ती काय करेल काय माहित." प्रसादभाऊ
दोघेही रात्री मंदिरात येतात. आबा काका अभिषेक करतात आणि दोघेही नामजप सुरू करतात.
" दत्त माऊली माझी मुलगी तुझ्या विश्वासावर सोडतो ती आता तुझी जिम्मेदारी. तू तिला सुखरूप आणशील. तू असशील तिच्या मदतीला माझा विश्वास आहे तुमच्यावर. जय श्री गुरुदेव दत्त." प्रसादभाऊ डोळे मिटून जप सुरू करतात." श्री गुरुदेव दत्त... श्री गुरुदेव दत्त... श्री गुरुदेव दत्त"....
प्रिया खिडकी बाहेर झेप घेते. ती वेगाने खाली पडते. पूर्ण शरीर दुखत होतं पण तिला तिथे थांबून उपयोग नव्हता. ती उठली तिला माऊलीचे शब्द आठवले. खरंच होतं ते. आज पूर्ण दिवस तिने माऊलीचे नाव काय तिची आठवण सुद्धा नाही काढली.
"माऊली माफ कर मला. खूप वाईट आहे मी. पण तू माझी खरी मैत्रीण आहेस. " म्हणत प्रिया वाट दिसेल तिथे पळत होती. तिला आता कशाही परिस्थितीत या जंगलातून बाहेर पडायचं होतं.
" अरे ये मुरखांनो ....ती पळाली. "म्हणत मायाने रागात त्यांच्यावर तलवारीचा घाव घालणारा एवढ्यात. " नाही मी तुम्हाला नाही मारणार. जा तिला शोधा. शोधून आणा तिला. बारा च्या आत तिचा बळी द्यायचा आहे. जा शोधा तिला. नाहीतर तुमचं काही खरं नाही."
रवी आणि मालक दोघेही प्रियाच्या मागे जातात. प्रिया ज्या खिडकीतून खाली उडी घेते ते तिथे येतात पण प्रिया तेथे नसते. ते पुन्हा मायाकडे येतात. माया त्यांच्या कडे एक नजर टाकते. तिचे डोळे पूर्ण काळे होतात ती त्यांच्याकडे बघत काहीतरी पुटपुटत एका हाताने बाजूची भुकटी घेते आणि त्यांच्यावर फुंकते. " जा....तिच्या ताज्या रक्ताच्या वासाने तुम्ही तिला शोधू शकता. जा...." माया पुन्हा आपल्या कामात व्यग्र होते. रवी आणि मालक दोघेही प्रियाच्या मागे जातात.
पूर्ण जंगल त्या मायाच्या प्रभावाखाली असते. अमावस्या असल्यामुळे काळोख. प्रियाला पायाखाली काही दिसत नव्हते तरीही ती पळत असते. तिला तिच्याच पावलांचा आवाज येत होता. ती स्वतःच्या पावलांच्या आवाजाने दचकत होती. ती फार दमली होती. जागोजागी जखमा झाल्या होत्या. कडाक्याच्या थंडीत सुध्दा तिला घाम येत होता. ती घामामुळे चिंब भिजली होती. पूर्ण जंगल आता गोल गोल फिरत आहे असा प्रियाला भास झाला. समोर काही दिसत नव्हते. ती थांबली. काहीसा अंदाज घेऊन हाताने चाचपून ती एका झाडाला टेकली. तिने डोळे मिटले. " माऊली रस्ता दाखव...." प्रिया मनोमन माऊलीला प्रार्थना करत होती. अचानक तिला कुणा च्या तरी चालण्याचा आवाज आला. हळूहळू तो आवाज मोठा येऊ लागला. तिला तिथे थांबणे धोक्याच होतं. ती पुन्हा पळू लागली.पण तीच शरीर आता थकलं होतं तिचा तोल जात होता आणि अचानक.......तिचा पाय कशात तरी अडकला आणि गोटांगळ्या खात गुद्गुडत उतारावरून खाली पडली. तिच्या पडण्याच्या आवाजाने एक लाईट तिच्यावर पडली. ती मोठ्या कष्टाने त्या प्रकाशाकडे बघण्याचा प्रयत्न करत होती. तिचे डोळे दिपतात....
" प्रिया...प्रिया...."
त्या आवाजाने प्रियाला थोडा धीर आला. आवाजही ओळखीचा वाटला. तिने डोळे उघडले....
"अर्णव... नाही ...नाही...तू अर्णव नाही. सोड मला...." म्हणत प्रिया धडपडत उठली.
" हे...प्रिया काय करतेस ...?"
प्रियाने बाजूचा एक दगड उचलला आणि ती त्यावर मारायला गेली. त्या बरोबर त्याच्या आजुबाजुला असणाऱ्या लोकांनी प्रीयावर बंदुका ताणल्या. पण अर्णव ने त्यांना इशाऱ्याने बंदुका खाली घेण्यास सांगितले. तो प्रियकडें बघून पुन्हा तिला हाक मारू लागला.
" प्रिया...मी आहे अर्णव. तो दगड खाली टाक बघू. मी आलोय ना. टाक बघू तो दगड..." म्हणत अर्णव तिच्या जवळ जाऊ लागला पण प्रियाने तो दगड त्याचा दिशेने भिरकावला आणि ती पळण्यासाठी मागे वळली आणि समोरच्या झाडावर आपटून खाली पडली.
"प्रिया sssss...." अर्णव ओरडतच तिच्या जवळ गेला. तिला आपल्या मांडीवर घेऊन तिच्याकडे पाहिलं...ती बेशुद्ध झाली होती.
तो तिच्या चेहऱ्याकडे बघत राहतो. पूर्ण चेहरा कोमेजलेला. डोक्यावर जखम झाली होती. जागोजागी ड्रेस फाटला होता. रक्ताने ड्रेस माखला होता. अर्णव ने तिला उचलून घेतलं आणि गाडी सोडायला सांगितली.
अर्णव ने तिला हळून बेडवर ठेवले. एरव्ही नेहमी नाकावर राग असणारे सर आज एवढे भाऊक सुद्धा असू शकतात तेही एका मुलीसाठी....?? अर्णवच्या सहकाऱ्यांना प्रश्न पडला होता.
मात्र अर्नवच लक्ष पूर्णपणे प्रीयकडेच होता. तिचा चेहरा पूर्ण मलूल झाला होता. पूर्ण शरीरावर कुठेना कुठे खरचटलं होते. त्यातून रक्त येऊन ड्रेसही लाल झाला होता. पूर्ण केस मोकळे होते. डोक्यालाही लागलं होतं. काय झालं असेल....? विचार करून करून अर्णवचं डोकं फुटायची वेळ आली होती. जोपर्यंत प्रियाला शुद्ध येत नाही तोपर्यंत काही कळायला मार्ग नव्हता. अर्णव रूमचा बाहेर आला.
"इन्स्पेक्टर शिंदे एरिया सील केला ??" अर्णव
"Yes sir..." इन्स्पेक्टर शिंदे
"रिपोर्ट केली का पोलिस स्टेशन ला.....?" अर्णव
"Yes sir..." इंस्पे. शिंदे
" हवालदार डिसोजा...." अर्णव ने करड्या आवाजात हाक दिली तसा हवा. डिसोजा ने " yes sir..." म्हणत सलामी ठोकली.
" डॉक्टरला कॉल केला का....? किती वेळात पोहोचतील....? "
"साहेब येतील ते थोड्याच वेळात. " हवा. डीसोजाने माहिती पुरवली.
" ह्म्म...शिंदे एक काम करा. त्या एरिया इन्स्पेक्टर ला बोलवा. नक्की लफडेकाय आहे ? काही तरी गडबड आहे....पण काय....?" अर्णव पुन्हा विचार करू लागला.
" सर....डॉक्टरसाहेब आलेत." हवा. डीसोजाने डॉक. साहेबांना आता आणून सोडले व पुन्हा आपल्या जागी गेला. अर्णवणे डॉक्टर ला रूम मध्ये नेले. प्रिया अजुन बेशुद्ध होती. डॉक्टरने तिला थोडावेळ तपासले आणि उठून अर्णव कडे आले.
" Don\"t warry...she is all right. थोड्यावेळाने येतील शुध्दीवर पण आराम करू द्या." म्हणत डॉक्टरने काही औषध लिहून दिली आणि ते निघून गेले.
अर्णव बाहेर आला तेव्हा त्या एरियाचा इन्स्पेक्टर तिथे आला होता. अर्णवला पाहतच त्याने सलामी दिली आणि सावधान स्थितीत उभा राहिला. त्याने हातानेच त्याला खाली बसायला सांगितले.
" सर...खर तर...या पूर्ण एरियात हा एक जांगलाचाच भाग असा आहे जो....जो नेहमी चर्चेत राहिला आहे. सर..." म्हणत त्याने एक फाईल अर्नवला दिली. अर्णव ने ती फाईल उघडली.
" What rabbish.... इन्स्पे.वाघमारे तुम्ही शिकलेले असून सुधा या गोष्टीवर विश्वास ठेवता. " म्हणत अर्णव ने फाईल जोरात टेबलावर आपटली.
" सर...मी जेव्हा पहिली वेळ ही फाईल हाती घेतली तेव्हा मी ही असाच react झालो होतो. पण जस जसा इथे राहून अनुभव घेतला तेव्हा माझा विश्वास बसला. हो खरंच त्या जंगलात काहीतरी आहे. तिथे रात्रीचे चित्र विचित्र आवाज येतात. जे लोक ते जाणून घेण्यासाठी गेले ते....ते...पुन्हा केव्हाच परत नाही आले. दर अमावस्या पौर्णिमेला इथे काहीतरी विपरीत घडत. सर...मागच्या वेळीचीच घटना...एक फोर व्हीलर ज्यात दोन मुली आणि दोन मुलं होती. रात्री पार्टी आणि मजामास्ती साठी गेली होती. रात्री याच रस्त्यावरून जाताना अचानक त्याची गाडी बंद पडली. दुसऱ्या दिवशी सर फक्त गाडी मिळाली. त्या मुलांचा काही पत्ताच नाही लागला. कितीतरी दिवस त्यांचा तपास चालू होता. शेवटी ती केस बंद करण्यात आली आणि सर ही एकच केस नाही जी बंद केली. अश्या अनेक केसेस आहेत ज्या अश्याच बंद करण्यात आल्या."
" विषय गंभीर होता पण नक्की काय आहे त्या जंगलात ? खरंच का तिथे....नाही नाही." म्हणत अर्णव ने मान हलवली. आता जे काही आहे ते प्रिया शुध्दीवर आल्याखेरीज कळणार नाही.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा