तिघेही जीपमध्ये बसले आणि पुन्हा हॉटेलवर आले.
आता पुढे....
रात्रीचे साडे अकरा झाले होते. प्रियाला फार भीती वाटत होती. म्हणे... "मी तयार आहे..." आली मोठी डेरिंगबाझ आता हवा ताईट झाली ना..." प्रिया स्वतः लाच दोष देत मनात बोलत होती. तिला सारखे त्या मांत्रिकाचे बोल आठवत होते...." तू कितीही प्रयत्न केलास तरीही आजच्या रात्री...ती तुझा ताबा घेईल..." ती सारखा विचार करत होती की कसं तिला मी हरवू शकते.
" गाडीतून उतरायचं नाही का....आपल्याला आत जावं लागेल..." अर्णव ने तिच्या डोळ्यासमोर चुटकी वाजवली आणि तिला तंद्रीतून बाहेर काढत बोलला. ती फक्त हसली आणि गाडीतून खाली उतरली. वाघमारे गाडी पार्क करायला गेला तर अर्णव आणि प्रिया आत गेले.
त्यांनी पाहिलं. हॉटेल पूर्ण अस्ताव्यस्त झालं होतं. तिथे असणारे ऑफिसर जखमी अवस्थेत आजुबाजुला पडले होते. जणू त्या हॉटेल मध्ये मोठ्ठं तुफान आल असावं, अशी त्याची अवस्था झाली होती. दोघेही तिथेच थबकून उभे राहिले.
वाघमारे गाडी पार्क करून तिथे आला.. " अरे ही दोघं इथेच उभे का....?" तो मनात विचार करत त्यांच्या कडे आला आणि समोरील दृश्य पाहून तोही थबकला.
" हे कोणी केलं....?" तो जवळजवळ ओरडलाच.
अर्णव ने पटकन एका हवालदाराला उठवलं. तो फार जखमी झाला होता. त्याच डोकं फुटलं होतं. शरीरावर ही थोड्याफार जखमा झाल्या होत्या.
" हवा.डिसोजा काय झालं....? वाघमारे लवकरात लवकर अँब्युलन्स बोलावा." अर्णव ने काळजीने वाघमारे ला ऑर्डर दिली.
" सर...ते लोक फार भयानक आहेत. तूम्ही जा इथून. ते लोक तुम्हाला नाही सोडणार ...तुम्ही जावा." हवा. डिसोजा ने माहिती दिली. तो फार जखमी झाला होता. त्याला नीट बोलताही येत नव्हते. त्याला बघून अर्णव चा पारा चढला होता.
" कोणी तुमची ही हलत केली ? सांग मला.... साल्याला नाय थर्ड डिग्री दिली तर नाव नाय सांगणार अर्णव म्हणून. " अर्णव दातओठ खात बोलला.
"सर...तुम्ही....तू. ..म्ही..." म्हणत डिसोजा बेशुद्ध पडला.
थोड्याच वेळात अँब्युलन्स आली सर्वांना दवाखान्यात दाखल केले.
अर्णव ने एकवार प्रिया कडे पाहिलं. प्रिया भीतीने लटलट कापत होती. त्याने वाघमारे ला त्याची एक टीम बोलवायला सांगितली. " आता जे होईल ते होईल..." अर्णव ने आता निश्चय केला त्याने वाघमारे ला गाडी काढायला सांगितली.
"प्रिया...आपल्याला आता निघायला हवं..." प्रिया ने होकारार्थी मान हलवली आणि ती त्याच्याबरोबर गाडीत जाऊन बसली.
जसं जशी वेळ जवळ येत होती तस तशी प्रिया ची धडधड वाढत होती.
गाडी चालू झाली. प्रिया मागच्या सीटवर बसली होती. तिने अर्णव कडे पाहिलं आणि डोळे मिटले.
त्या मांत्रिकाने दिलेला मंत्र ती आठवू लागली पण काही केल्या तिला तो मंत्र आठवेना. तिने दत्त गुरूंचे नाव घ्यायला सुरुवात केली.
अचानक गाडी थांबली त्यामुळे प्रिया पुढच्या पुढे पडली. काय झालं म्हणून तिने स्वतः ला सावरून पुढे पाहिलं आणि तिच्या अंगावरुन सर्रकन काटा उभा राहिला. त्यांच्या गाडीसमोर मालक आणि रवी उभे होते. दोघांच्याही नजरा आता प्रियावर स्थिर झाल्या. ते दोघेही प्रियाच्या दिशेने येऊ लागले. तोच वाघमारे आणि अर्णव दोघेही गाडीतून खाली उतरले.
"ये... बाबांनो...तुम्हाला मारायचं आहे का...?" वाघमारे जरा मोठ्याने बोलला.
अर्णव ने ही त्यांना दुजोरा देत म्हटलं."आणि मरायला पण आमचीच गाडी भेटली का...?"
अर्णव ने समोर पाहिलं आणि तो घाबरून दोन पावले मागे झाला...."रवी....तू...असा काय....?"
अर्णव समोर रवी उभा होता त्याचे डोळे पूर्ण काळे झाले होते. चेहराही एकदम निस्तेज आणि पांढरा फटक झाला होता. तो सारखा आपले दात एकमेकावर घासत प्रियाला पाहत होता. प्रिया फार घाबरली. ती गाडीतून खाली उतरली. तसा रवी व मालक दोघेही तिच्याकडे यायला पुढे झाले पण वाघमारे ने झटकन पुढे मालकांचा हात पकडला आणि त्यांनां बाजूला केले. कितीही जोर लावला तरीही मालक काही तसूभरही जागचा हलला नाही. वाघमारे ने दोन्ही हातांनी त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला पण श्या ssss .....पण क्षणात मालकाने एका हाताने वाघमारे ला फटका मारला. वाघमारे लांब जाऊन पडला. तो जोरात आपटला त्यामुळे त्याला उठता येईना. आता मालक प्रियाच्या दिशेने चाल करून गेले. त्यांना प्रियाकडें जाताना पाहून अर्णव प्रीयला वाचवायला जाणार तोच रवीने अर्णव ला अडवले. त्याने अर्णावचा हात इतक्या जोरात मुरडला की तो त्याला प्रतिकार करू शकाल नाही. अर्णव ने पटकन दुसऱ्या हाताचा कोपरा रवीच्या पोटात मारला. रवीला त्याचं काहीच झालं नाही. त्याने अर्णव ला एकच फाईट मारली. अर्णव चार हात लांब जाऊन पडला. त्याचे डोक दगडावर आपटलं.
प्रिया पटकन अर्णव कडे धाऊन गेली. तिने अर्णव ला हाक मारली. तिने त्याचा हात हातात घेतला. तिच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले. तो तिच्यामुळे इथे होता "अर्णव..अर्णव...तू ठीक आहेस ना....? "तिने त्याचा एक हात त्याच्या डोक्यावर फिरवला.
तोच...मालकांनी तिच्या दंडाला पकडले आणि जोरात उचलले. अर्णव ने आता तिचा हात घट्ट पकडला होता. तिनेही त्याचा हात पकडला.
" नाही...नाही......सोडा तिला...सोडा." अर्णव ने पूर्ण शक्तिनिशी तिला आपल्याजवळ ओढायचा प्रयत्न केला पण त्याला झालेल्या जखमेमुळे त्याच्या डोळ्यासमोर अंधारी आली. त्याची पकड ढिल्ली होत होती. त्याचे मालकांच्या ताकदिपुढे काही चालेना. शेवटी तिचा हात अर्णव च्या हातून सुटलाच.
ती त्याच्या डोळ्यासमोर होती. नाही...नाही...ती त्याच्या समोरून दूर जात होती पण तिचा हात...अजूनही त्याच्याच दिशेने होता. ती त्याला मदतीला बोलावत होती. हळू हळू त्याचे डोळे मिटले.आणि त्याची शुद्ध हरपली.
" सोडा मला....रवी. अरे रवी....मी...मी प्रिया...plzzz. शुध्दीवर ये....रवी." प्रिया रवीला हाक मारून त्याला त्या मायाच्या जाळ्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होती.
एव्हाना ती जंगलाच्या मध्यभागी आली होती.पण तिथे हॉटेल नव्हतं. तिला अर्णव ची काळजी वाटून राहिली होती. काय झालं असेल... ? कोणी आलं असेल का त्याच्या मदतीला..? "अर्णव..... तू ठीक आहेस ना...? माऊली...plz.त्याची मदत करा...plz." ती मनातल्या मनात गुरुमाऊली प्रार्थना करत होती.
अचानक एक थंड वाऱ्याची झुळूक आली. तसे मालक आणि रवी दोघेही प्रियापासून थोडे दूर झाले. प्रियाला काही कळेना. तिला असं वाटू लागलं जणू कुणीतरी तिच्या जवळ आहे. तिच्या आसपास पण कोणी दिसत नव्हतं.
"प्रिया ssssss...अजुन किती वेळ माझ्यापासून दूर पळशिल.." प्रियाच्या कानाजवळ कुणीतरी बोललं पण कोण ? तिला तर कुणीही दिसत नव्हतं. ती आता पुरी घाबरली होती. अचानक....तिला कोणाचा तरी धक्का लागला आणि ती बेशुद्ध झाली.
" सर.....सर...तुम्ही ठीक आहात ना...सर" कुणीतरी त्याला उठवत होत. त्याने डोळे किलकीले करून पाहिलं. त्याला आठवलं...प्रिया.
" प्रिया....कुठे आहे ती......प्रिया. " अर्णव धडपडत उठला. त्याने आजूबाजूला पाहिले. त्याच्या बाजूला त्याची टीम उभी होती जी त्याने वाघमारे ला बोलवायला सांगितली होती.
त्याने डोळे मिटले आणि तो आठवायचा प्रयत्न करू लागला. त्याने आजुबाजुला पाहिले. तो अजूनही त्याचं ठिकाणी होता जिथे त्यांना रवी आणि मालक भेटले होते.
त्याने एका दिशेला पाहिले आणि...त्याने सगळ्या टीम कडे पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर आता एक निर्धार होता. त्याने एक मोठा श्वास घेतला आणि तो टीमला उद्देशून बोलू लागला.
ते सर्व त्याच्या बरोबर अनेक वर्ष काम करत होते. त्यांनी अनेक मोठमोठ्या मोहिमा फत्ते केल्या होते पण आता त्यांच्यासमोर जे संकट होते ते अकल्पित होते.
" So...my friends आता आपण ज्या मोहीमेवर जाणार आहोत त्यात जीवच धोका आहे आणि जे आपल्यासमोर येईल तेही फार भयंकर आहे. फार ताकदवान आहे. त्यांच्याशी आपल्याला लढताना फार त्रास होणार आहे. म्हणूनच ज्याला माझ्याबरोबर यायचं नसेल त्याने आत्ताच सांगावं." अर्णव
" काय यार...तू हे बोलतोयस ? अरे आपण ज्या ज्या मोहिमा फत्ते केल्या त्या सर्व एकत्र मिळून केल्या आहेत आणि ही सुध्दा यशस्वी करू. बघू काय होतंय ते... आम्ही तुझ्याबरोबर आहोत. तुझा प्लान तयार आहे ना ? मग झालं तर.?" सर्वजण ??त्याला डन करतात.
सर्वांनी जंगलात प्रवेश केला. सर्वात पुढे अर्णव होता. त्याला प्रथम प्रिया जिथे भेटली होती. सर्वजण तेथे पोहोचले. अर्णव सगळी कडे बारीक नजर करून सावधगिरीने पाऊले टाकत होता.
त्याने मांत्रिकाला त्या मायाचा ठावठिकाणा विचारला होता. त्यांच्या अंदाजानुसार मायाने प्रियाला त्याच ठिकाणी नेले असेल जिथे तिला मारलं होते. जिथे ती आपले सर्व होम हवन करत होती जिथे तिने सगळया माया मिळवल्या होत्या आणि ती जागा नक्की स्मशानभूमी किंवा तिच्या आजुबाजुला असेल."
अर्णव ने वाघमारे ल डॉक्टर कडे पाठवलं होतं पण जाण्याअगोदर त्या ठिकाणची स्मशानभूमी बद्दल विचारले होते आणि आता तो त्याचं दिशेने आगेकूच करत होता.
ते जंगल बाहेरून जीतके शांत वाटत होते तितकेच आतून फार भयानक वाटत होते. पूर्ण काळोख पसरला होता. गर्द झाडी जिकडे तिकडे पसरल्या होत्या. मोठमोठी झाडे चित्र विचित्र आकारात पसरली होती.. रात्रीच्या काळोखात बॅटरीच्या उजेडात ती झाडे अजूनच भयानक दिसत होती. पायाखाली येणाऱ्या सुक्या पाला पाचोळ्याचा आवाज काळजाचा ठोका चुकवत होता. रातकिडे त्यांचा कर्कश आवाजात पूर्ण जंगल जागवत होते. त्यात मध्येच कुठेतरी घुबड तिच्या अस्थित्वाची जाणीव करून देत होतं. सर्वच एकदम शांत....शांत....
सर्वजण चालत होते. अर्णव ला या जांगलापेक्षा प्रिया ची जास्त काळजी वाटत होती. सारखे तीचेच विचार येत होते. मायाने आपल्या जादूने तिला काही केलं तर नसेल ना ?आणि अचानक त्याला प्रियाचा तो अवतार आठवला....त्याच्या अंगातूना एक शिरशिरी गेली....I hope... मी जो विचार करतोय तस काही झालं नसेल.?. प्रिया...plzzzz हार नको मानुस. मी येतोय...पण तो पर्यंत plzzzz त्या मायाच्या मोहात अडकु नकोस...."
एव्हाना ते सर्व जंगलाच्या मध्यभागी पोहचले. त्यांना चित्र विचित्र आवाज ऐकू येऊ लागले तस अर्णव ने त्याच्या टीम ला ईशारा केला. तस सर्वजण झाड्याच्या आडोशाला लपले व पुढे होणाऱ्या हालचालींवर लक्ष ठेवू लागले.
एका मोठ्या झाडाखाली मायाने हवन सुरू केला होता. त्या झाडाला एकही हिरवं पान नव्हतं. त्या झाडाच्या समोरच एक सपाट जागा होती. मायाने त्या झाडाच्या समोरच आपलं बस्तान मांडलं होतं. तिच्या डाव्या बाजूला दोन पुरुष उभे होते. त्यांच्या समोरच रवी आणि मालक गुढग्यावर मान खाली घालून बसले होते. त्या मायाच्या उजव्या बाजूला सोना पल्लवी वहिनी आणि सर्व बायका होत्या. बहुतेक सर्व बायका, सोना आणि पल्लवी वहिनी चांगल्याच शुध्दीवर आल्या होत्या आणि समोरचं दृश्य पाहून फार घाबरल्या होत्या.
मायाच्या समोर तिने हवन पेटावला होता. त्या हवानाच्या समोर एका पांढऱ्या रिंगणात प्रिया बेशुद्ध पडली होती.
माया हातात भस्म घेऊन त्याला ओठांकडे नेऊन मंत्र म्हणत होती आणि त्या हवन मध्ये टाकत होती. तो भस्म हवन मध्ये पडताच एक मोठ्ठा आगीचा भडका उडायचा आणि पुन्हा शांत व्हायचा. सर्वजण त्या मायाचं आणि तिच्या आसपासच निरीक्षण करत होते पण अर्णव चे डोळे प्रियाला शोधत होते.
सर्वजण अर्णवच्या इशार्याची वाट पाहत होते.
"निक सर....अर्णव सर नक्की कशाची वाट पाहत आहेत ? त्यांच्या चेहऱ्यावर एवढे इमोशनल एक्स्प्रेशन कधीच पाहिले नव्हते." सरमजित
" सरमजीत.....मला काही कळायला मार्ग नाही. एक काम करा तुम्ही सर्वजण इथेच थांबा." अस म्हणत निक अर्णव कडे गेला.
"अर्णव...तुझा काय प्लान आहे ? म्हणजे आम्ही कधी अटॅक करायचा ?" निक
अर्णव ने पुन्हा एकदा सगळीकडे पाहिले. शेवटी त्याच्या चेहऱ्यावर एक मंद स्मित हास्य पसरल. तो मागे वळला आणि बोलू लागला.
"ओके....तुम्ही सर्वांनी पहिलाच असेल, आपण वीस जन आहोत. तर आपल्या दोन गट तयार होतील. एक जी रवी आणि नाईकांना( मालक) वाचवेल. दुसरी जी तिथे असणाऱ्या सर्व बायकांना वाचवेल. निक तू रवी आणि नाईकांना वाचावशिल आणि जित( सरामजित) तू सर्व बायकांना इथून सहिसलामत बाहेर न्यायचं आहेस समजलं." अर्णव.
" आणि अर्णव तू काय एकटा त्या बाईशी लढणार आहेस का ? ते काही नाही मी तुझ्याबरोबर येणार आहे." निक
" अस मी कुठे म्हणतोय ? हे बघ....ती माया फार हुशार आहे. तुम्ही जोपर्यंत सर्वांना इथून नेत नाहीत तोपर्यंत तिचं लक्ष मी माझ्यावर केंद्रित करणार आहे आणि जस तुमचं काम होईल तस तुम्ही मला मदत करायला या." अर्णव ने त्याची योजना सांगितली.
सर्वजण तयार झाले. सर्वांनी गोल केला आणि एकमेकांच्या हातावर हात ठेवला." जय हिंद....जय हिंद " सर्व जोशात पण हळू एकमेकांना ऐकू येईल एवढ्या आवाजात बोलले आणि आपापल्या पोजिशनवर गेले. दोन्ही टीमला एकाच वेळी काम करायचं होतं. त्यांनी आपली जागा घेतली आणि अर्णव ला इशारा केला.
अर्णव ने मायाकडे पाहिले. ती ध्यानस्थ बसली होती. सर्वत्र भयाण शांतता पसरली होती.
अर्णव मायाच्या दिशेने चालू लागला. त्याने बाजूच्या झाडाची टणक फांदी हातात घेतली आणि मायाला जोरात हाक मारली.
" ओ हॅलो मॅडम....तुम्ही इथे काय करताय ? आणि या सर्वांना इथे का असं का ठेवलंय ? " त्याने तिला विचलित करायला सुरुवात केली. पण मायाच्या चेहऱ्यावर तसू भरही फरक जाणवला नाही. तसा त्याने हातातली काठी घेऊन तिच्या समोर उभा राहिला.
मायाने डोळे मिटले होते. ती ध्यान करत होती. तिला पाहताच अर्णव ला प्रियाचे शब्द आठवले.' त्या मायाला पाहताच कोणीही तिच्या सौंदर्यात सहज अडकेल....' आणि खरंच अर्णव तिला पाहतच राहिला क्षणात त्याने तिच्यावरून नजर हलवली.
त्याने हातानेच इशारा केला. तस निक आणि जित दोघेही आपापल्या कामाला लागले. निक व त्याची टीम सोना आणि पल्लवी वहिनी जिथे होत्या त्यांच्याकडे आले. त्यांनी सर्वांना लवकरात लवकर उठून बाजूला असलेल्या त्यांच्या सुरक्षित ठिकाणी जायला सांगितले. सर्वजण अजूनही काय चाललंय हे न कळल्याने संभ्रमित होते. निक ने पटापट सर्व बायकांना उचलायला सुरुवात केली. त्याने त्याच्या सहकाऱ्यांना सर्व बायकांना नीट घेऊन जायला सांगितले. निक ने सोनाच्या दंडाला धरून उचलले आणि तिला तिथून जायला सांगितले पण ती काही हलायला तयार नाही. तिचा लक्ष रविवर होता. रवी फार थकल्यासारख वाटत होता तो आणि मालक मान खाली घालून बसले होते.. सोनाने रवीला हाक मारली. तस रवीने मान वर केली.
"रवी....रवी ...." सोना
" हे बघा आम्ही त्यांना सुधा सोडवू पण तुम्ही चला इथून plz..." निक ने तिला समजावले.
जित आणि त्याचे सहकारी नाईकांना(मालक) व रवीला वाचवायला गेले. त्यांच्यासमोर खरं तर मोठं आव्हान होते. कारण ते दोघे जिथे होते तिथेच अजुन दोन मुष्टांडेही होते आणि त्यांच्याकडे पाहून तरी ते माणूस आहेत यावर विश्वास बसत नव्हता.
दोघेही रंगाने काळे, मजबूत बांधा, पिळदार शरीरयष्टी, एखाद्या आखाड्यातील जणू पैलवानच. निक ने त्यांना एक नजर पाहिले आणि क्षणात त्यांना धारातीर्थी केले.
हे सर्व एवढ सोप्पं होतं....??
अर्णव ने एकदा पुन्हा माया कडे पाहिलं आणि त्यानंतर त्याने त्याच्या टीम कडे पाहिले. निक ने त्याला??? असं केला.
"नाही...नक्कीच नाही. काहीतरी गडबड आहे. ही माया एवढी शांत कशी काय ?" त्याने पुन्हा माया कडे पाहिलं.
अर्णव ने निक कडे पाहिलं आणि मायाला इथून घेऊन जाऊया असा इशारा केला. पण अचानक निक ....जित आणि त्यांच्या बाजूला असणाऱ्या सर्वांच्या चेहऱ्यावर एक अनामिक भीती दिसू लागली. अर्णव ला काही कळेना.त्याने मागे वळून पाहिले आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली.
"प्रिया ssssss......"???

प्रियाला पाहून त्याच्या काळजात चर्र झालं. ती एक फूट वर हवेत तरंगत होती. तिचे लांबसडक केस थोडे तिच्या चेहऱ्यावर तर बाकीचे मोकळे हवेत उडत होते. तिचा पांढराफटक चेहरा आणि मोठे काळेभोर डोळे पाहून तर तो दोन पावले मागे गेला.
प्रियाच्या चेहऱ्यावर एक अमानवीय हास्य पसरलं होतं. प्रियाने सर्वांवर नजर फिरवली आणि एक मोठ्ठं हास्य करत गोल गोल फिरून लागली. तिने एक झेप घेतली. तिने निक च्या बाजूला असणाऱ्या दोघांना भुईसपाट केले. ती त्यांच्या छाताडावर बसली आणि त्याच्या नरडीचा घोट घेणार एवढ्यात जित ने चपळाईने तिच्यावर हल्ला केला. ती त्याच्यापासून थोडे दूर झाली पण आता तिच्या नजरेला सर्व बायका दिसल्या. ती चार पायांवर चालत चालत त्यांच्याकडे जाऊ लागली. तिची हालचाल एखाद्या श्र्वपदाप्रमाने होती. ती जसजशी जवळ येत होती. तिच्या चेहऱ्यावर हिंस्र अधाशी भाव दिसू लागले. तिला पाहून सोनाने एक किंचाळी फोडली तशी प्रियाने तिच्यावर झेप घेतली. सोनाला काही कळायच्या आत प्रिया तिच्यावर एखाद्या मांजरिप्रमाने चढली. तिने तिच्या ताज्या तरुण रक्ताचा वास घ्यायला सुरुवात केली. सोनाला तिचं वजन पेलावेना. तिचा मागे मागे तोल जाऊ लागला आणि एका झाडावर जाऊन आदळली. प्रियाने तिच्या डोळ्यात खोल पाहिले. सोना एकदम शांतच झाली. तशी प्रियाने तिच्या हाताचा चावा घेतला. सोनाने पुन्हा किंचाळली फोडली. निक ने तिला पूर्ण जोराने सोनापासून दूर करण्याचा प्रयत्न करू लागला पण जसजसा तो ताकदीने तिला सोना पासून दूर करत होता तसतशी प्रिया सोनावरील पकड मजबूत करत होती. निक ला मदत करण्यासाठी आता जित आणि दोनतीन जण आले त्यांनी प्रियाला सोना पासून दूर करायला लागले.
अर्णव ला तर काय करावं ते सुचेना. तो तर एका जागी उभा राहून काय चाललंय ते पाहत होता. त्याला काही कळत नव्हतं. त्याला फक्त प्रिया दिसत होती पण ती त्याची प्रिया नव्हती. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहून गालावरून खाली गेला.
सोना एका बाजुला पडली. प्रिया आणि तिला ओढणारे एका बाजूला पडले. रवीने झटकन सोनाला जवळ घेतले आणि तिच्या जखमेवर रुमाल बांधला.
"रवी....रवी...प्रिया....अरे ती....?"सोनाला काय बोलावे ते सुचेना. ती मोठं मोठ्याने हुंदके देऊन रडू लागली. रवीने तिला शांत केलं. जित आणि निक दोघेही पडल्या जागेवरून उठले. प्रिया तिथे कुठेच नव्हती. त्यांनी आजुबाजुला पाहिले आणि त्यांनी आपली बंदूक काढली.
"गाईझ...सर्वांना घेरून घ्या. याद राखा यांच्यापैकी कुणालाही काही होता कामा नये. निक तिला आता सोडायचं नाही. " जित ने रागात ऑर्डर दिली. सर्व टीम मेंबर आता रवी, मालक आणि सर्व बायकांना घेरून आजुबाजुला काय होतंय यावर लक्ष देऊ लागले.
निक ने अर्णव ला हाक मारली. तो अर्णव कडे गेला.
" यार आता ही कोण ?? तू तर फक्त मायाबद्दल बोलला होतास.आता हिला पण ..."
" नाही...हिला काहि होता कामा नये."अर्णव ने निक ला रागातच सांगितले.
निक त्याच्याकडे आश्चर्य चकित होऊन पाहू लागला.
अर्णव मात्र अजूनही काय करावे या विचारात होता. अचानक कुठूनतरी प्रिया आली. तिने निक वर हमला केला. ती त्याच्या मानेवर बसली होती. तिचे दोन्ही हात त्याच्या गळ्याभोवती होते जे हळू हळू त्याच्या गळ्याभोवती फिरू लागले. ती त्याच्या खांद्यावर बसल्यामुळे जित ला तिच्यावर नेम धरायला मिळत नव्हता. त्यात निक जोरजोरात हलत तिला स्वतः वरून बाजूला करत होता. त्यामुळे तर नेम लावणं अजूनच अवघड होत होते.
अर्णव ने माया कडे पाहिले. त्याला तिच्या शांत रहण्यामगाच कारण समजलं होतं. त्याने पटकन पुढे होऊन निक ला वाचवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला पण प्रिया काही निकच्या खांद्यावरून खाली येईना.
अर्णव ने तिचा एक हात पकडला आणि दुसऱ्या हाताने त्याने आपल्या खिशात हात घातला. त्याने खिशातून मांत्रिकाने दिलेला कागद काढला आणि त्याने मनातल्या मनात मंत्र म्हणायला सुरुवात केली.
तो जसजसा मंत्र म्हणू लागला तशी प्रिया जोरजोरात ओरडू लागली. ती नीक च्या खांद्यावरून खाली पडली.निक एकाबाजूला झाला. तो पहीलि वेळ इतका घाबरला होता. जित निक ला सावरायला त्याच्याजवळ आला. ते आता अर्णव कडे पाहू लागले. सगळेच अर्णव कडे पाहत होते.
प्रियाला त्रास होऊ लागला. तशी मायाचीही हालचाल झाली. अर्णव च तिच्यावरही लक्ष होता. त्याने प्रिया चा हात घट्ट पकडला आणि आता तर तो मोठमोठ्याने मंत्र म्हणू लागला....
"श्रीपाद श्रीवल्लभ त्व सदैव श्री दत्त स्पनपाही
देवाधिदेव भवग्रह्या कलेशहरींसुकिरते घोरतकष्टत
दुध्वरास्मनमस्ते "
प्रिया त्याचा हात सोडवू लागली. तिने त्याचा गळा पकडला आणि ....आणि त्याला एका हाताने हवेत उचलला. तरीही अर्णव ने मंत्र न थांबता म्हणत होता. पण त्याचा श्वास गुदमरू लागला. त्याला श्वास घेत येईना. निक आणि जित त्याच्या मदतीला आले. त्यांनी प्रिया वर बंदूक ताणली. तो शूट करणार एवढ्यात प्रियाने अर्णव ल दूर फेकला आणि निक च्या थोबाडीत ठेवून दिली. तो भेदराला. त्याच्या नाकातून रक्त येवू लागलं. तस जित ने ट्रिगर दाबली. गोळी प्रियाच्या हाताला चाटून गेली. अर्णव ने जित ला धक्का मारला.
"आर यू क्रेजी ? ??प्रिया....प्रिया....?" अर्णव प्रियाच्या दिशेने गेला पण प्रियाला त्या जखमेची काही पर्वा नव्हती ती जितला रागात पाहत होती. ती त्याच्याकडेच येत होती. अर्णव ला कळलं की आता प्रिया जित ला नाही सोडायची. त्याने डोळे मिटले.
" हे माऊली....प्रिया ची मदत करा. plz....मी कधी तुमच्यावर विश्वास ठेवला नाही पण प्रिया चा तुमच्यावर विश्वास आहे आणि तुमची तिच्यावर कृपा...plz." अर्णव
"प्रिया....शुध्दीवर ये. प्रिया...."अर्णव ने जितक्या शांततेने होईल तेवढ्या शांततेने तिला हाक मारली. त्याचाही आता संयम सुटला होता. त्याने तिचा हात पकडला आणि तिला जवळ ओढले. ती दात ओठ खात त्याकडे रागाने पाहत होती. त्याने तिचे दोन्ही हात घट्ट पकडले आणि तिच्या नजरेला नजर देत त्याने तिला पुन्हा हाक मारली. "प्रिया...प्रिया...तू अशी हरू शकत नाहीस. समजलस....प्रिया..."अर्णव चे डोळे भरले होते.
त्याने हळू तिचे हात सोडले. एका हाताने त्याने निक ला माया कडे इशारा केला. निक आणि जित ने माया कडे पाहिले आणि ते तिच्याकडे जाऊ लागले.
अर्णव ने तिच्या चेहऱ्यावर आलेले केस हाताने बाजूला केले आणि हळूच तिच्या दोन्ही भुवयांच्या मध्ये स्वतः च्या कपाळावर असलेला मांत्रिकाने लावलेले भस्म लावला.
क्षणात प्रिया भोवळ येऊन खाली पडली.
क्रमशः
( नमस्कार वाचकहो ?जस मी पूर्वीही सांगितलं आहे, ही माझी पहिलीच कथा आहे. त्यामुळे भरपूर चुका झाल्या असतील. पण मला समजत नाही की नक्की काय चुकतंय. कारण वाचक संख्या फारच कमी आहे आणि ज्यांनी कथा वाचली त्यांनी समीक्षा नाही केली. त्यामुळे plz....plz....मला सांगा की कथा कशी वाटली. त्यामुळे मला कथा लिहायला उत्साह येतो.आणि हो...त्याचबरोबर मी एक प्रेमकथाही लिहायला घेतली आहे. त्याचे तीन भाग अपलोड केले आहेत ती कथा कशी वाटली तेही सांगा.
समीक्षा नाही केली तरी निदान??असे ईमोजी जरी पाठवले तरी चालेल.धन्यवाद?.)
ज्योती
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा