प्रिया निपचित पडली होती.अर्णव ने तिला मांडीवर घेतले. त्याने तिच्या डोक्यावर हात फिरवला. की अचानक त्याच्या डोक्यावर एक जोरदार तडाखा बसला तोही क्षणात धाडकन जमिनीवर कोसळला. त्याचे डोळे हळू हळू बंद होत होते.
"रवी sssss....."अर्णव बेशुद्ध पडला..
मायाने हवन सुरू केला. प्रिया एका बाजूला पडली होती. तिच्या थोड्या दूर अर्णव पडला होता. आता सगळेच हताश हरले होते. रवी आणि नाईक(मालक) एका बाजूला मायाच्या समोर उभे होते. सोना त्याच्या कडे भेदरलेल्या अवस्थेत पाहत होती. पण तो आता पूर्णपणे बदलला होता .
प्रियाने डोळे उघडले आणि ती मायाच्या समोर उभी राहिली. तिच्या चेहऱ्यावर कोणतेच भाव नव्हते. निस्तेज चेहरा, डोळ्यात कोणतेच भाव नव्हते.अगदी निर्विकार...!
अजूनही ती मायाच्या अंमलातून बाहेर आली नव्हती. मायाने प्रियाला पाहिले. तिने एक क्रूर हास्य केले आणि बाजूला ठेवलेली तलवार प्रियाच्या हाती दिली.
" मला एक तरुण कुमारीचा बळी हवाय जा...घेऊन ये."मायाने प्रियाला आदेश दिला.
प्रिया मागे वळली तिने सोनाला पाहिले आणि ती तिच्या दिशेने येऊ लागली...तशी सोनाला दरदरून घाम फुटला. ती उठली नी मागे मागे जाऊ लागली. निक आणि जित दोघेही कसे बसे उठून उभे राहिले.
"जित...काहीही होऊ दे. मेलो तरी चालेल पण हिला यांच्यापैकी कुणालाही हानी पोहोचवू द्यायची नाही. and it\"s my order...copy that....!" निक
" येस...सर...."जित ने त्याला होकार दिला नी तो प्रियाशी दोन हात करायला सज्ज झाला. निक ही येणाऱ्या परिस्थितीला तोंड द्यायला तयार होता.
प्रिया आता सोनाच्या दिशेने येत होती की अचानक तिच्या पायाला स्पर्श झाला. तिने खाली पाहिले. तिला फक्त लालभडक शरीर दिसत होते. तिने त्या शरीराला निहाळले. त्याचं हृदय हळू हळू हलत होते. ती त्याच्याकडे पाहत होती. तिने पाहिले...त्याच्या चेहऱ्यावर खास करून कपाळावर दोन भुवयांच्या मध्ये एक दिव्य प्रकाश बाहेर पडत होता. ती त्या प्रकाशाकडे पाहतच राहिली.
ती खाली बसली आणि त्याच्या धडकणाऱ्या हृदयावर हात ठेवला.
"प्रिया ssssss....लवकर मला बळी हवाय."मायाने डोळे मोठे करत प्रियाला संगितले.
प्रिया उभी राहिली. तिने मायाला पाहिले आणि एकदा अर्णव कडे पाहिले. प्रियाने अर्णावला आपल्या दोन्ही हाताने उचलले आणि निक जित जवळ आणून ठेवले. तिने हळू त्याचा हात आपल्या हातात घेतला. ती अजुनही तेवढीच भयानक दिसत होती. तिचे ते पूर्ण काळे झालेले डोळे, पांढराफटक चेहरा, पण त्यात आता थोडा बदल झाला होता. तो म्हणजे तिच्या डोक्याला लागलेला भस्म. जो अर्णव ने तिला लावला होता.
मायाने हे पाहताच ती मोठ्याने ओरडली..." प्रिया ssssss......तुला हे फार महागात पडेल.... ?"असं म्हणत तिने काही मंत्र पुटपुटले आणि तिने आपला हात प्रियाच्या दिशेने झटकला. तशी प्रिया जिवाच्या आकांताने ओरडली.
"मला विरोध करशील तर असच होईल. ही...ही... हा..हा..."ती विकृत हसली.
मायाने पुन्हा डोळे मिटले आणि तिने मोठ्या आवाजात मंत्र म्हणायला सुरुवात केली. जस जशी ती मंत्र म्हणू लागली तसतसा वातावरणात बदल होऊ लागला.
काळया कुट्ट अंधारात अजूनच भयानक काळोख पसरला. थंडीच्या दिवसात आकाशात वीज चमकू लागली आणि ढगांच्या गडगडाटासह अनामिक शक्तीच्या आगमनाची चाहूल लागली.
प्रियाला असं वाटू लागलं जणू हजारो चाकू तिच्यावर वर करतायेत. तिच्या शरीराचे कुणीतरी लचके तोडत आहेत. तिच्या डोक्यातून तीव्र कळा येऊ लागल्या. प्रियाने दोन्ही हाताने तिचे डोके घट्ट पकडलेआणि जोरात किंचाळली. तिच्या आवाजाने पूर्ण जंगल हादरले. ती तशीच खाली बसली.
" नाही....मी अजुन तुला नाही सहन करू शकत....नाही. मला मला मारून टाक पण....माझ्यातुन निघून जा....plz."प्रिया काकुळतीने म्हणाली.
ती फार थकली होती. तिने डोळे मिटले." माऊली... मदत करा.....माऊली." अचानक पूर्ण वातावरण थिजल्या सारखं स्तब्ध झाले.
रवी आणि मालक जागीच कोसळले. माया आता तिच्या खऱ्या रूपात आली होती.

तिला पाहून सर्वजण फार घाबरले ती त्या झाडाकडे आली. जित आणि निक धडपडत अर्णव कडे आले आणि त्यांनी त्याला उचलले. प्रिया मात्र तिथेच बसली होती.
" ये....माझ्याकडे ये....मी तुला मुक्त करते...ये."माया
प्रिया जाग्यावरून उठली आणि एखाद्या यंत्रवत तिच्या जवळ गेली. तिची नजर खाली होती. मायाने मंत्र म्हणायला सुरुवात केली. तिने आपले दोन्ही हात त्या झाडाच्या दिशेने पसरले.
"कडाम्म....⚡" एक मोठ्ठी वीज चमकली आणि मायाच्या हातात एक तलवार आली. तिने त्या तलवार वर आपली टोकदार नखं फिरवली आणि ती प्रियाच्या दिशेने गेली. तिने प्रियाला त्या झाडाच्या समोरच एका दगडाजवळ नेले. तिचं सतत मंत्र पुटपुटन चालूच होतं.
"बस....आता बास झालं. मी तुला घाबरत नाही. तू माझ्यावर हुकुम चालवू शकत नाहीस...समजलीस. नाही चालवू शकत. " म्हणत प्रियाने मायाला स्वतः पासून दूर ढकलले.
अचानक अर्णवला कुणीतरी हाक मारली आणि त्याच्या डोक्यावरून कोणीतरी हात फिरवला. अर्णव ने डोळे उघडले. त्याने पाहिले निक आणि जित त्याच्या बाजूला उभे होते. पण त्यांचं लक्ष मात्र समोर होतं. त्याने ही पाहिलं समोर पाहिलं. त्याच्या काळजात धस्स ssss... झालं.
मायाने प्रिया चा गळा पकडला होता. प्रिया जमिनीपासून दोन फूट वर होती आणि ती मायाच्या हातातून निसटण्याचा प्रयत्न करत होती. ते पाहून अर्णव च्या शरीरात अचानक एक अजब शक्तीचा संचार झाला. तो चपळाईने माया वर धाऊन गेला आणि तिला जोरात ढकलले. ती थोडी दूर जाऊन पडली तर प्रिया तिथेच खाली पडली. अर्णव ने तिला पटकन उठवलेले. त्याने तिच्या चेहऱ्यावर हात फिरवला.
" तू ठीक आहेस ना..." अर्णव
तिने मानेनेच हो म्हटले. ती त्याच्याकडे भरल्या डोळ्यांनी पाहत होती की अचानक मायाने त्यांच्यावर वार केला. तसे दोघेही दोन बाजूने पडले.
"निक...जित.... जाळ पेटवा. आज हीचा निकाल लावूनच जाऊया."अर्णव माया कडे रोखून पाहत बोलला.
निक जित कामाला लागले. त्यांनी मायाने पेटविलेल्या हवन कुंडात बाजूची लाकड घातली.
माया अर्णव वर वार करायला तयार होती. तिने एक हात हवेत वर केला आणि मंत्र म्हणू लागली नी अर्णव च्या दिशेने हात झटकला. तसं अर्णव वर आजूबाजूचे दगड धोंडे येऊन बसू लागले. अर्णव खाली पडला. प्रिया ने मायला पाहिलं. तिच्या डोळ्यात प्रचंड राग दिसत होता. प्रियाला काय करावं सूचेना. तिने डोळे बंद केले आणि माउलींना हाक मारी लागली.
"धृत्वा कमंडलू करे दरेटंकमालिकंम् l
कौपिन मौजी भुजशास्त्रा मुखत्रिकेशावंम l
नित्य निवास औदुंबर छायी श्रीहरी l
दत्तात्रयम शरणम् भवकारकम्......" प्रिया.
अचानक प्रियाच्या मंत्रोच्चारा ने माया ची शक्ती कमजोर झाली. तसा अर्णव वर होणारा दगढोंड्यानाचा मारा थांबला.
"अर्थात....ज्याच्या हातात कमंडलू आहे. ज्याने रुद्राक्ष माला परिधान केल्या आहेत. ज्याचे हात अनेकविध शस्त्रांनी सज्ज आहेत. जो नित्य औदुंबर निवासी आहे. अश्या त्रिमूर्ती ला आम्ही शरण जात आहोत."अर्णव जाग्यावरून उठत म्हणाला.
प्रियाने जलद गतीने येऊन कमजोर झालेल्या मायाला आपल्या हातांनी जखडले.
"ब्रम्हानंद म् l परमसुखादं म् //
केवलंम् l ज्ञानमुर्तिम् ll
द्वंद्वातीतं l गगन सदृशं ll
तत्व मस्याधिलक्षणं l
एकनित्याम l विमलमचलं ll
सर्वाधि सक्षिभूतं ll
भवातीतं l त्रिगुण रहितं ll
सद्गुरू तम नमामि ll" प्रिया...
माया प्रियाच्या हातून सुटण्याचा प्रयत्न करू लागली. तसा अर्णव पुढे आला.
"अर्थात....जो ब्रम्हासारखा. म्हणजेच ब्रम्हानंद आहे. जो साक्षात ज्ञानाची मूर्ती आहे. जो चराचरी सामावलेला आहे आणि घडणाऱ्या घटनांचा एकमेव साक्षी आहे. तरिही त्रिगुण त्याचं काहीच करू शकत नाहीत. अश्या सद्गुरुला आम्ही नमन करतो?"
अर्णव ने मायाला समोरून पकडले आणि एका हाताने तिचे केस आपल्या हाती घेतले. आता तो प्रिया कडे पाहत होता. माया मात्र अजूनही त्यांच्या हातून सुटण्याचा प्रयत्न करत होती.
"काषाय वस्त्र म् .... करदंड धारीणं म्...
कमंडलू पद्मकरेनं म्....
शांख म्....चक्र म् ...
गदाभुशित भूषणाड्यं म्....
श्रीपाद राजनम् शरण्याम् प्रपद्ये...ll"
प्रियाने कचकन तिचे केस कापले....
"ज्याने कशाय वस्त्र परिधान केले आहे.ज्याच्या हाती शासित करण्यासाठी दंड आहे. तर पूर्ण सृष्टीला नवजीवन देणारे जलाचे कमंडलू त्यांच्या हाती आहे. म्हणजेच तेच जीवन देणारेही आहेत. तसेच एका हातात शंख, चक्र, गदा अशी शस्त्रे आहेत.
तरीही ते एखाद्या प्रेमळ राज्याप्रमाने आहेत, अश्या श्रीपाद श्री वल्लभ श्री सद्गुरूच्या चरणी आम्ही शरण जात आहोत."
अर्णव ने पूर्ण श्लोक चा अर्थ सांगितला. प्रियाने माया ला सोडले. ती एखाद्या जखमी निर्जीव वस्तू सारखी खाली कोसळली. प्रिया निक जित ने पेटविलेल्या अग्नी जवळ आली. तिने एकदा अर्णव ला पाहिले आणि एकदा माया वर नजर टाकली.
माया तिच्या कडे हिन दीन होऊन पाहत होती.
" नाही....नको प्रिया. मला नको मारूस. मी कोणालाही त्रास देणार नाही. मला सोडा...कृपया मला सोडा." माया अगदी काकुळतीला येऊन म्हणाली.
प्रियाने तिच्या कडे पाहिले.आपल्या दोन्ही हातात मायाच्या केसांचा पुंजका धरला. "श्री गुरु चरणारपंमस्तू" म्हणत तिने अग्नीत अर्पण केला.
मायाचे केस आगीत पडताच माया च्या शरीराला असंख्य छिद्रे पाडली. त्यातून काळा निळा धूर बाहेर पडला. ती मोठमोठ्याने किंचाळत होती. तिच्या कींचल्यानी पूर्ण जंगल हादरून जात होते. ती एखाद्या माष्याप्रमाने तडफडत होती. हळू हळू तिचे शरीर भस्म झाले आणि ती ज्या ठिकाणी पडली होती तिथे आता फक्त राख राहिली.
माया नष्ट होताच एक मोठ्ठी वीज चमकली आणि ते अक्राविक्राळ झाड जागीच पेटू लागलं.
सगळं शांत....शांत. हळूच जंगलातील घुप्प काळोख कुठच्या कुठे विरू लागला. सूर्यनारायण गगनात त्याचा पवित्र प्रकाश पसरवू लागले. पूर्ण जंगलामध्ये सोनेरी छटा पसरू लागली. वातावरणातील नकारात्मक शक्तीच्या जागी आता सकारात्मक प्रसन्न वातावरण होते. चराचरात एक चैतन्य निर्माण झाले.
"लुय.... लूय...?...?"आवाज करत दोन अँब्युलन्स सोबत दोन तीन पोलिस जीप तिथे येऊन थांबल्या.
त्यातून वाघमारे आणि त्यांच्याबरोबर काही ऑफिसर होते.
सर्वजण पटापट अँब्युलन्स मध्ये जाऊन बसले. शेवट अर्णव पोलिस व्हॅन मध्ये बसला. त्याच्या बाजूला वाघमारे बसला." वाघमारे....फारच लवकर आलात. नाही..??? अजुन जरा उशिरा आला असता तर ?"अर्णव
"काय सर...अहो आम्ही तर रात्रीच इथे आलो. पण ...." वाघमारे.
"पण...काय वाघमारे ?" अर्णव
"सर...हे जंगल आहे. आम्ही रात्री पासून या जंगलात फेऱ्याच मारतोय. ना बाहेर पडत होतो ना आत जायला कळत होत. ?आम्हाला चाकव्याने पकडलं. सकाळ झाली तेव्हा कुठे आम्ही चाकव्यातून सुटलो." वाघमारे.
सर्वांना जवळच्याच हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. नाईक, रवी आणि त्यांचे सहकाऱ्यांना कुठे ना कुठे लागलं, खरचटलं होतं. डॉक्टर सर्वांना चेक करून त्यांना मलम पट्टी करत होते.
निक आणि जित ला फार लागलं होतं त्यांना वेगळ्या रूम मध्ये ट्रीटमेंट दिल्या जात होत्या. अर्णवला ही भरपूर लागलं होतं. त्याच्या डोक्याला, हाताला, खांद्याला आणि बरंच ठिकाणी लागलं होतं. डॉक्टरने त्याला बँडेज वैगेरे केले. तसा तो बाहेर आला आणि सर्वांना पाहायला गेला. त्याने रवी आणि नाईकांना (मालक) पाहिले त्यांच्या बरोबर थोडा वेळ बोलला आणि तिथून निघाला.
तो खर तर प्रियाला शोधत होता. तो एका एका रूम मध्ये पाहत होता. शेवटी त्याला ती दिसली. तो आत जाणार तोच त्याने पाहिलं तिथे तिचे आई बाबा आणि....आणि तो मंत्रिकही होता. त्याने आत जाणं टाळलं. तो तिला लांबूनच पाहत होता.
" बाहेरून ती कशी आहे हे कळणार नाही. इन्स्पेक्टर साहेब...त्यासाठी आत येऊन तिच्याशी बोलावं लागतं. "मांत्रिक
त्यांच्या अश्या बोलण्याने सर्वजण विचारात पडले. तर अर्णव खजील होत दरवाज्यातून आत आला
"प्रिया ओळख करून नाही देणार का...??" मांत्रिक
"अम्...हो....आईबाबा...हे इन्स्पेक्टर अर्णव सरदेसाई. यांनीच मला वाचवलं ?"प्रिया काहीशी साशंक होत बोलली.
"नमस्कार...?"अर्णव
" धन्यवाद. आज तुमच्यामुळे माझी मुलगी सुखरूप आहे. खरंच फार फार आभार." बोलता बोलता प्रियाच्या बाबांच्या डोळ्यात पाणी आले. त्यांनी मनोमन गुरूंना नमस्कार केला.
"अहो यात आभार कसले मानता. हे माझं कर्तव्यच आहे. तिच्या जागी कुणीही असती तर मी तिचीही मदतच करणार असतो. हेच माझं काम आहे...plz तुम्ही हात जोडू नका." म्हणत अर्णव ने त्यांचे हात खाली घेतले आणि त्याने प्रिया कडे पाहिले.
"(अच्छा...म्हणजे तुम्ही तुमचं कर्तव्य केलत तर तुम्ही मला वाचवायला आला नव्हता तर. ठीक आहे इन्स्पेक्टर साहेब...बघून घेईन.)" प्रिया अर्णव कडे बारीक डोळे करून मनात चरफडत बोलली.
अर्णव ला तिच्या मनातील विचार कळले. " अच्छा मी येतो..." म्हणत तो तिथून निघाला. जाताना त्याने प्रियाला पाहिले ती अजुनही त्यालाच पाहत होती. तो तिथून निघाला तोच जित आणि निक च्या रूम मध्ये आला.
जित शांत झोपला होता. निक मात्र जागाच होता. त्याच्या पायाला मार लागला होता. अर्णव त्याच्याकडे आला.
" फार दुखतंय का..."अर्णव
"नाही...अरे याची सवय आहे. सो... डोन्ट वरी. मला वाटतं तुला जास्त त्रास होतं आहे ?"निक त्याच्या पडलेल्या चेहऱ्याला पाहत विचारले."काय झालं...?"
"काही नाही...?" अर्णव
"गधड्या...मी ना तुला तुझ्यापेक्षा जास्त ओळखतो. लेट मी गेस....?...प्रिया " निक
"....."अर्णव
"एक सांगू हाच चान्स आहे. सांगून टाक. तिलाही आणि तिच्या आईबाबांना सुद्धा. पुन्हा ड्युटीवर गेल्यावर तू सहा सात महिने तरी परत येणार नाहीस. तोपर्यंत जर तिचं लग्न..." निक
"नाही...??" अर्णव
सर्वजण घरी जायला निघाले. बस हॉस्पिटलच्या आवारात उभी होती. रवी, मालक, सोना, पल्लवी वहिनी सर्वजण गाडीत जाऊन बसले होते. आता फक्त प्रिया आणि तिचे आईवडील राहिले होते. प्रियाने गाडीत चाढण्यापूर्वी बाहेर पाहिले. ती गाडीत चढली.
"अजुन कसे आले नाहीत आईबाबा. माझ्या मागेच तर होते." आईबाबांनी वाट पाहून प्रिया पुन्हा गाडीतून खाली उतरली.
समोर ती डोळे मोठे करून पाहतच राहिली. अर्णव तिच्या आई बाबांबरोबर बोलत होता. तिच्या काळीज धडधडायला लागलं. जणू थोड्याच वेळात ते तोंडातून बाहेर येऊन पडेल. तिने पाहिलं तिचे आईबाबा फार गंभीर झाले होते. बाबांनी प्रियाला पाहिलं. त्यांच्या डोळ्यात राग दिसत होता. तिने घाबरून आवंढा गिळला. तिला दरदरून घाम फुटला.
"आय ला...एवढी भीती तर त्या मायाची सुध्दा नाही वाटली. हे गुरु माऊली....वाचावं रे बाबा. मी खर खर सांगते. मी कोणालाही त्रास देणार नाही. अगदी अच्छा बच्चा बनेन. "(? झालं हीच सुरू)
प्रिया वर बघून एकटीच हातवारे करत बडबडत होती.
तिने पुन्हा एकदा आईबाबांना पाहिलं. अर्णव त्यांच्याशी बोलून आता तिच्या दिशेने यायला वळला. तीचं हृदय बाहेर यायचं फक्त राहिलं होतं. तो जसजसा जवळ येत होता तसतशी प्रिया भांबावली. त्याने घसा साफ करत तिच्या अगदी जवळ येऊन उभा राहीला. तिने त्याच्या नजरेला नजर न देता विचारले.
"क....काय....काय झालं.."प्रिया
त्याने एक दीर्घ श्वास घेतला " एक विचारायचं होतं."अर्णव गंभीर होत बोलला.
त्याचा सिरीयस चेहरा पाहून प्रियाला काय बोलावं तेच कळेना."काय झालं अर्णव....सगळं ठीक आहे ना....?" प्रिया
"प्रिया.....प्रिया..."अर्णव
"?..... एवढं टेन्शन देऊन जीव घेणार आहेस का...? सांग लवकर....काय झालं ?" प्रिया रडकुंडीला आली होती.
"प्रिया.....
...
....
तू....
तू माझ्याशी लग्न करण्याचं काय घेशील....?"अर्णव
" हा मी ना...काय....??????"?? प्रियाला काय बोलावं तेच कळेना. तिने आईबाबंकडे पाहिले.
"?.......?"आईबाबा
" तुझं हृदय...." प्रिया
अर्णव ने तिला घट्ट मिठी मारली." सोड...मी रागावले तुझ्यावर. " प्रिया त्याच्या पासून दूर होत म्हणाली.
" काही हरकत नाही. आता काय सासू सासरे तयार आहेत म्हटल्यावर बायकोला पटवायला वेळ लागणार नाही....??"अर्णव ने तिचे गाल ओढले.
" तरीही मी रागावले आहे. तू तुझी ड्युटी केली ना. मला वाचवून. त्यासाठी धन्यवाद...??" प्रिया ने तिचे हात त्याच्या समोर जोरदार वाजवत नमस्कार केला. " मंडळ आभारी आहे. पण मला काहीही इंटरेस्ट नाही. तुमच्याशी लग्न करण्यात. " प्रिया गल फुगवून तिच्या आईबाबांच्या बाजूला गेली.
" आई बाबा....बघा तुमची मुलगी लग्नाला तयार नाही म्हणते. काय करावं ?" अर्णव ने आईबाबांना प्रश्न केला.
" काही हरकत नाही. माझ्या भावाची मुलगी आहे. तिच्यासोबत जुळवून देऊ तुझं. " बाबा आपलं हसू दाबत म्हणाले.
" मला चालेल..." अर्णव ने खांदे उडवले.
प्रियाने त्याची कॉलर पकडली. " तुम्हाला चालायला तुमचे पाय जाग्यावर राहिले पाहिजेत ना...?" प्रिया ने त्याला धमकीच दिली. तिच्या डोळ्यातील राग पाहून त्याला भितच वाटली. अर्णव ने तिच्या समोर हात जोडले. काय सांगावं तिच्यातील माया पुन्हा बाहेर यायची.....
समाप्त.
(Hi.... माझ्या सर्व वाचकांचे मी आभार मानते. ही माझी पहिली कथा जी आज पूर्ण झाली. जशी सुचली तशी लिहिली. तरी जर काही चुकल असेल तर plzzz... सांभाळून घ्या हीच विनंती.
मी एक प्रेमकथा लिहायचा विचार करत आहे. पण आधी या कथेला येणारा प्रतिसाद पाहून मगच पोस्ट करेन.
मला वाटतं वाचकांना भयकथा फार आवडतं नाहीत. ही कथा पूर्ण केली. माझ्या डोक्यात अजुन एक कथा सुचली आहे. मी लवकरच ती लिहायला घेईन निदान तुम्हाला ती तरी आवडेल.
असो ...ट्रीप ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगायला विसरू नका. आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया अवश्य कळवा. धन्यवाद . )
ज्योती
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा