खरी.. मैत्री

True
आज माझ्याकडे एक प्रसंग आहे अगदी काही क्षणांचा पण अगदी स्मरणात राहणारारा...
आज मी पहिल्यांदा त्यांना खूप जवळून पाहिले ...खूप अगदी इतके की जितके कदाचित मला सुद्धा माहीत नव्हते ...
ती काळजी...ती भीती...ती जबाबदारी मी कधी पाहिलीच नव्हती...
असं म्हणता प्रेम जपण अवघड असतं पण मैत्री ...
निःस्वार्थ... पवित्र आणि अतूट मैत्री ...
आयुष्यात ती नेहमी नाही मिळत..आणि प्रत्येकाच्या नशिबी सुद्धा नसते..
तर ही मैत्री होती मी पाहिलेली...अगदी काही तासांची पण त्यांच्या पवित्र मैत्रीचा आरसा दाखवणारी ....एक साक्ष जी मी पाहिली होती ...काही व्यक्तींना मैत्री खूपच चांगली निभावता येते कारण मैत्री निभावणं सुद्धा सोपं नसतं ..." मी तुझा मित्र आहे ...आपली मैत्री आहे रे नेहमी " हे बोलण जेवढं सोप असतं ना त्याहून कित्येक पट ते अवघड असतं...
तर कहाणी तर नाही पण एक प्रसंग आहे ....
त्यांची मैत्री दुरून तर खूप वेळा पहिली होती ...ऐकली होती फक्त पहिली नव्हती.
तर एक मैत्रीण आणि मित्रा सारखेच त्यांचे नाते होते...पण फक्त त्याच्या एका शब्दासाठी तिने कधी नाही केली ...अशी चढाई ती करणार होती ..
हो.. .. चढाई जी सर्वांना नाही आवडत पण फक्त मित्राच्या शब्दाचा मान म्हणुन ती स्वीकारणे सोपे नसते ते पण अशा व्यक्तीला ज्याला चढाई...या शब्दापासून दूरदूर पर्यंत नाते नाही ...
पण ...शब्द तिने जपला आणि निभवला मात्र त्याने ..
आपल्या जबाबदारी वर कोणी येत आहे... आपल्यावर विश्वास ठेऊन कोणी येत आहे ..या गोष्टीची जाणीव पूर्ण वेळ ठेवणे आणि शेवटच्या पावलापर्यंत साथ देणे ...कदाचित खरी मैत्री असते..
तिच्या चढाई मध्ये ..असे खूप क्षण आले जिथे ती हरून गेली..थकून गेली आणि बसून सुद्धा गेली...पण नाही...ती थांबून चालणार नाही ..तिला सोडून देणं सुद्धा चालणार नाही ..ही जाणीव जणू त्याला क्षणाक्षणाला होत होती ...
त्याचे शब्द अजून पण मला आठवत आहे..."अग बसून घे थोडावेळ...अग ते जॅकेट घालून घे...अग थंडी वाजत असेल तर ते जॅकेट घाल...अग बॅग मी घेऊ का? अग तू ऐक चॉकलेट खा... तुला बर वाटेल...अग तू जेवून घे...अग तुला चहा घ्यायचा का? अग हौस झाली का तुझी?? अग चल १० मिनिट बाकी फक्त नंतर आपण निवांत बसून घेऊ...अग चल थोडेच अंतर बाकी आहे...
असे कित्येक वाक्य जे मला आजही आठवत आहे...
त्याला उगवत्या सूर्यासोबत फोन करण्यापासून ते काळजीपूर्वक घरी जा एवढा प्रवास आपल्याला खूप सोपा वाटेल पण तो जितका सोपा वाटतो त्याहून किती तरी तो अवघड होता .... कधीकधी आयुष्यात एक व्यक्तीसोबत घालवलेल्या काही घटका सुद्धा आयुष्यभराची आठवण म्हणून राहू शकते . काही व्यक्ती नशिबात नसतात पण त्या आयुष्याच्या या सुंदर प्रवासात त्यांची काही पाने देऊन जातात जी कदाचित पुस्तकातली फक्त पाने असतात ..पण आपण लिहिलेली असतात... ज्यावर फक्त हक्क असतो.