प्रेमाचा अर्थ खरा
**************
**************
नको प्रेम अर्थ शून्य
प्रेमात हवा खरा गोडवा
रुसलेल्या प्रियेस हसवणारा
त्याने दिलेला गंधित मारवा
प्रेमात हवा खरा गोडवा
रुसलेल्या प्रियेस हसवणारा
त्याने दिलेला गंधित मारवा
प्रेम आपले
अभिजात असावे
हृदयस्त्य यामिनीस
डोळ्यात दिसावे
अभिजात असावे
हृदयस्त्य यामिनीस
डोळ्यात दिसावे
त्याची नौका
नेहमी तिच्याच बंदरी
हे प्रेमाचे गुढ
मनी जाणूनी हसावी सुंदरी
नेहमी तिच्याच बंदरी
हे प्रेमाचे गुढ
मनी जाणूनी हसावी सुंदरी
पहिल्या भेटीची रंगत
दोघांच्याही स्मरणात अविरत
अशा प्रेमाचा सोनचाफा
युगानुयुगे सुगंधित
दोघांच्याही स्मरणात अविरत
अशा प्रेमाचा सोनचाफा
युगानुयुगे सुगंधित
..............योगिता मिलिंद नाखरे