"अगं रिया, हे काय लावून धरलंयस तू ? डाएट म्हणजे काय संन्याशासारखं जगणं असतं का ? तू पुण्याहून इतक्या वर्षांनी माझ्याकडे मुंबईला आली आहेस, आणि मी तुला साधं समोसे आणि चीज-बटर उत्तप्पा किंवा साजूक तुपातला शिरा सुद्धा देऊ नको ? हा कसला पाहुणचार ग !."
तन्वीने किचनमधून चमचा हलवत, थोड्या चिडक्या पण प्रेमळ स्वरात विचारलं. तन्वी आणि रिया शालेय जीवनापासूनच्या मैत्रिणी. तन्वी मुंबईत एका कॉर्पोरेट कंपनीत कामाला होती, तर रिया पुण्यात एका नामांकित आयटी फर्ममध्ये होती. रिया आज पाच वर्षांनंतर तन्वीच्या घरी राहायला आली होती.
रिया हॉलमध्ये आपली बॅग उघडत हसून म्हणाली,
" तन्वी, अगं समजून घे ना ! पाहुणचार म्हणजे काय फक्त पोट भरून खाणं असतं का ? तू मला भेटलीस, आपण एकत्र वेळ घालवतोय, हाच माझ्यासाठी सर्वात मोठा पाहुणचार आहे. आणि राहिला प्रश्न त्या शिऱ्याचा, तर माझ्या रक्तातील साखरेचे आकडे सध्या त्या शिऱ्या सारखेच गोड झाले आहेत, जे शरीरासाठी अजिबात चांगले नाहीत."
तन्वी किचनमधून बाहेर आली, हातातील नॅपकीनने हात पुसत तिने रियाकडे रोखून पाहिलं.
" रिया, तू खूपच बारीक झाली आहेस ग ! चेहरेपट्टी सुद्धा बदलली आहे तुझी. मला भीती वाटतेय की या डाएटच्या नादात तू स्वतःचं नुकसान तर करून घेत नाहीयेस ना ? मध्यमवर्गीय घरात डाएट हा शब्द अजूनही उपासमार म्हणूनच ओळखला जातो, हे तुला माहीत आहे ना ? "
रिया सोफ्यावर बसली आणि तिने तन्वीला आपल्या जवळ बोलावलं.
रिया सोफ्यावर बसली आणि तिने तन्वीला आपल्या जवळ बोलावलं.
" तन्वी, हे बघ... तुला वाटतंय तसं काही नाहीये. मी स्वतःला उपाशी ठेवत नाहीये, तर मी स्वतःला योग्य खायला शिकवतेय. गेल्या वर्षी जेव्हा मला प्री-डायबेटिक आणि फॅटी लिव्हरचं निदान झालं, तेव्हा मी हा निर्णय घेतला.
मला माझ्या मुलांसाठी आणि भविष्यासाठी फिट राहायचं आहे. तुझा पाहुणचार मला नकोय असं नाही, पण तो पाहुणचार माझ्या शरीराला झेपेल असा असावा, एवढीच इच्छा आहे."
मला माझ्या मुलांसाठी आणि भविष्यासाठी फिट राहायचं आहे. तुझा पाहुणचार मला नकोय असं नाही, पण तो पाहुणचार माझ्या शरीराला झेपेल असा असावा, एवढीच इच्छा आहे."
तन्वी शांत झाली. तिला रियाचं म्हणणं पटत होतं, पण मनातील जुने संस्कार तिला स्वस्थ बसू देत नव्हते. आपल्याकडे पाहुणा आला की त्याचं तोंड गोड केल्याशिवाय त्याला पाणीही देऊ नये, असं तिला तिच्या आईने शिकवलं होतं.
" बरं बाबा, तुझी इच्छा ! पण मग मी आता नाश्त्याला काय करू ? मी तर सगळं सामान आणून ठेवलं होतं." तन्वीने हताश होऊन विचारलं.
" काही काळजी नको करू. तुझ्याकडे कडधान्यं असतीलच ना ? मग थोडी मटकी किंवा मूग भिजत घाल. आपण त्याचा हेल्दी चाट करूया. आणि चहाऐवजी आपण छान आलं-पुदिना घालून कोमट पाणी पिऊया. " रियाने उत्साहाने पर्याय सुचवला.
तन्वी पुन्हा किचनमध्ये गेली, पण तिचं मन मात्र विचारात पडलं होतं. तिने फ्रिज उघडला, जो पनीर, चीज, बटर आणि मिठाईच्या डब्यांनी भरलेला होता. तिला जाणवलं की आपण किती सहजासहजी आरोग्य सोडून जीभ जपायला शिकलो आहोत. तिने फ्रिजमधील मिठाईचा डबा बाजूला सारला आणि मटकीचं पाकीट बाहेर काढलं.
तितक्यात तन्वीचे मिस्टर, सुमित, बाहेर आले.
" काय ग तन्वी, रियासाठी स्पेशल काय बेत आहे? खीर पुरी की लोण्या सोबत पराठे ? "
तन्वीने रियाकडे बघून डोळा मिचकावला आणि म्हणाली,
" काही नाही हो सुमित, आज आपण रियाच्या डाएट स्टाईलने नाश्ता करणार आहोत. उकडलेली मटकी, त्यावर थोडा कांदा, टोमॅटो, लिंबू आणि कोथिंबीर. काहीतरी वेगळं आणि हलकं ! "
सुमितने कपाळावर आठ्या घातल्या.
सुमितने कपाळावर आठ्या घातल्या.
" काय ? पाहुणीला मटकी खाऊ घालणार ? लोक काय म्हणतील तन्वी ? तन्वीच्या घरी गेलो आणि काही साधं खायला मिळालं नाही, असं नाव होईल तुझं."
क्रमशः
तृप्त मन भाग १
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा