Login

तृप्ती कोष्टी : लेखनात अमर्याद तृप्ती मिळणाऱ्या लेखिका

लेखनासारख्या छंदात अमाप तृप्तता मिळते.

भारतिय संस्कृतित गृहीणी हे भूषण मानाचे आहे.घराला शोभिवंत करणारे हे पद तितकेच आपली भूभिका सुंदर पार पाडीत असते.मुळात स्री हा भारतिय संस्कृतीचा गाभा आहे.संस्कृतीला स्रीनेसुद्धा जीवापाड जपले आहे.स्रीचे दैनंदिन कामकाज उल्लेखनीय आहे.पहाटे सडासारवनाने व सुबक रांगोळीने घराचे अंगण सजवले जाते. घरातील स्वच्छता वेळोवेळी केली जाते.सर्वांना नाष्टा, चहापाणी दिले जाते.मुलांना अंघोळ , कपडे , टीफीन व त्यांच्या दफ्तरांची सोय सुद्धा गृहिणींना करावी लागते.नंतर मन लावून केलेला स्वयंपाक व त्यामध्ये विविध पदार्थांची असलेली रेलचेल जेवणाची लज्जत आणखीन वाढविते.प्रत्येकांच्या आवडीनिवडी जपणे आजारपणात सेवा करणे इतक्या सा-या व्यापातून गृहिणी थकून गेलेल्या असतात.क्षणभर विसावासुद्धा त्यांना मिळत नाही.पण या सा-या हालअपेष्टांचा कधीच त्या कांगावा करत नाहीत.सतत हसतमुखाने सर्वांना प्रसन्न ठेवण्याचे कार्य त्या अविरत करत आहेत.अशाच घराला घरपण देणाऱ्या व लेखणीला समृद्धीचा मुलामा देणाऱ्या आदर्श गृहिणी म्हणजे तृप्ती कोष्टी..!!

ईरा व्यासपीठावर लेखिकांंचे विचार फार मौल्यवान वाटतात.यामध्ये अनेक लेखिका गृहिणीची भूभिका चोख बजावत आहेत.आपल्याला मिळालेल्या वेळेचे सोने करुन त्यांनी लेखनक्षेत्रांत आपले विचार प्रकट केले आहेत.आदरणीय लेखिका तृप्ती कोष्टी यांनीही अशाच स्वरुपाचे यश मिळविले आहे .उत्तम गृहिणी म्हणून कुटुंब समृद्ध केले आहे.आपल्या कुटुंबाला संस्काराचे धडे देताना स्वतःला कामात गुंतवले आहे.मुलांना योग्य मार्गदर्शनाबरोबरच त्यांची जडणघडणही उत्तम केली आहे.वेगवेगळ्या रेसीपीत आवड जोपासताना किचमध्ये खुमासदार पदार्थांची गोडी आणली आहे.वेगळे छंद जपताना पाळीव प्राण्यांचा छंद त्यांनी जपला आहे. घरातील मांजराचा त्या आवडीने देखभाल करतात. मानव जातीतील मुले दत्तक घेण्यास माणसे कचरतात पण त्यांनी चक्क दोन मांजरांच्या पिल्लांना दत्तक घेऊन मांजरांच्या प्रती वेगळे प्रेम व्यक्त केले आहे.

सर्वांत महत्वाचे महणजे त्यांनी अनेक जबाबदारीतून जपलेला लिखाणाचा छंद …!! ईरा व्यासपीठ हे त्याचे व्यक्त होण्याचे माध्यम आहे. या व्यासपीठाने महिला भगिंनाना विचारांना मुक्त चालना दिली आहे.अत्यंत आवडीने त्या लिखाण करत आहेत.तृप्तीजींचे लिखाणही या व्यासपीठावर बहरले आहे.अनेक लेखावर लेखन करतांना अत्यंत सुबक लेखन केले आहे.वास्तविक आधारावर असलेले त्यांचे लेखन वाचकांना विशेष आवडते. खोपा, माझं काय चुकलं, व्यक्त व्हायचं राहून गेलं, प्रवास एकटीचा , चांदण्यात फिरताना, फिरुनी नवी जन्मेन मी, तोच चंद्रमा नभात, शतदा प्रेम करावे अशा कथा व कथामालिका यातून त्यांनी वाचकांना समृद्ध केले आहे. सकारात्मक बोलणे आणि वागणे , आनंदी राहणे ,महिलांच्यात संवाद साधणे , मैत्रिणींच्यात रमणे , कुटुंबाला वेळ देणे , मुलांना चांगले घडविणे , लेखनात व्यक्त होणे अशा अनेक गुणांनी परिपुर्ण असणारे तृप्तीजींचे व्यक्तिमत्त एक आदर्श गृहिणी व आदर्श लेखिका म्हणून उदयास येत आहे.त्यांचे हे जीवन असेच बहरत जावावे.त्यांनी कुटुंबामध्ये रमावे,उत्तम आरोग्ग्य व सुख लाभावे , भरपूर लेखन करावे त्यासाठी त्यांना खूप शुभेच्छा …!!

लेखनातून जपली
सामाजिक कृती
आनंदाने मिळते
कुटुंबात तृप्ती

©®नामदेवपाटील