तु असा जवळी रहा ( भाग ४८ वा)
©® आर्या पाटील
©® आर्या पाटील
दुपारभर आराम केल्यानंतर संध्याकाळी मंदार गार्डन मध्ये येऊन बसला. पाठोपाठ आभाही चहा घेऊन बाहेर आली.आईबाबा आणि श्रेया गेल्यामुळे घर खूपच शांत झालं होतं.
" श्रेयाची आठवण येतेय ना ?" विचारमग्न असलेल्या मंदारच्या बाजूला बसत आभाने विचारले
" हम्म.." आपल्या विचारातून बाहेर येत तो म्हणाला.
" मी म्हणत होते तिला नको पाठवूस पण तु ऐकशील तेव्हा ना.." त्याच्या हातात चहाचा कप देत ती म्हणाली.
" मी म्हणत होते तिला नको पाठवूस पण तु ऐकशील तेव्हा ना.." त्याच्या हातात चहाचा कप देत ती म्हणाली.
" आय ॲम सॉरी आभा." त्याने असे म्हणताच ती मात्र गोंधळली.
" कशासाठी ?" ती विस्मयाने म्हणाली.
" काल रात्री... " तो पुन्हा त्याच विचारांत हरवला.
" मंदार, तु माझ्यासोबत आहेस हा आज महत्त्वाचा. मी कालचं विसरले कधीच आता तु ही विसर आणि मुळात म्हणजे सॉरी म्हणण्यासारखं काही झालच नाही." म्हणत तिने चहाचा कप बाजूला ठेवत त्याचा हात हातात घेतला.
तिच्या स्पर्शाने तो ही शांत झाला. त्याच्या चेहऱ्यावर स्मितहास्याची फुललेली लकेर तिलाही सुखावून गेली.
सहवासाचे ते सोनेरी क्षण त्यांच नातं आणखी उजळवत होते हे मात्र खरं.
त्याच्यासोबत ती रमली. त्याची काळजी घेतांना ती त्याला नव्याने प्रेमात पाडून गेली.तिच्यासोबत जणू हक्काच्या वेळेची लॉटरीच त्याला लागली होती. चार दिवसांत जखम चांगलीच भरून निघाली होती. डॉक्टरांनी पुढच्या दोन दिवसांत स्टिचेस काढायचेही कन्फर्म केले होते.

तिकडे रुपेशच्या मनाला झालेली भूतकाळाची जखम मात्र पुन्हा एकदा दुखरी झाली. आभाकडून गेल्यानंतर मात्र तो पुन्हा त्याच दुःखात हरवला. अगदी अमित गेल्यानंतर तो जसा शांत झाला होता,अचानक त्याच्या वागण्यात तिच शांतता जाणवू लागली होती. त्याच्या आईवडिलांनी त्याच्या मनातलं जाणून घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.
आभाच्या आईबाबांनीही त्याला भेटून समजावले पण त्याची मानसिकता काही बदलली नाही.
डोळ्यांपुढे भूतकाळाचे चित्र जिवंत होऊन उभे राहत होते आणि अश्रू बनून ओघळत होते.
" आई बघ ना. मी इथे आले आणि रुपेश मामा मला भेटायलाही येत नाही. मी त्याच्या घरी गेले तरी भेटला नाही." त्या दिवशी त्याची तक्रार आभाकडे करत छोटी श्रेया रुसली.

" अगं कामात असेल तो. वेळ भेटल्यावर येईल तुला भेटायला." म्हणत तिने श्रेयाची समजूत काढली.
आईबाबांना रुपेशबद्दल विचारल्यावर तिला त्याची परिस्थिती समजली.
त्या दिवशी श्रेयशला पाहिल्यानंतर रुपेशची ही अवस्था झाली याची जाणिव होताच ती गहिवरली.
' खूप प्रयत्नाने रुपेश यातून बाहेर पडला होता. त्याला पुन्हा त्याच दुःखात नाही पाहायचं आहे. मला त्याच्याशी बोलावच लागेल.' स्वगत होत तिने त्याला कॉल करण्याचा निर्धार पक्का केला.
दुपारी मंदार झोपल्यानंतर ती खाली आली. फोन उचलेल की नाही या साशंकेतच तिने त्याला कॉल लावला. अगदी दोन तीन रिंग गेल्या असतील की लागलीच त्याने तो उचलला.
" ताई, मला तुझ्याशी बोलायचं आहे." पलिकडून रडतच तो म्हणाला.

" रुपेश, आधी शांत हो पाहू .काय चाललं आहे तुझं ?तु पुन्हा स्वतःला त्रास देत आहेस. अमितला हे बघून खूप वाईट वाटत असेल बाळा." त्याला समजावतांना ती मात्र हळवी झाली.
अमितचं नाव ऐकताच तो पुन्हा गहिवरला.
" मला खूप आठवण येतेय अमितची." म्हणत तो ओक्साबोक्सी रडू लागला.
" मला खूप आठवण येतेय अमितची." म्हणत तो ओक्साबोक्सी रडू लागला.
" पण असं रडून काय साध्य होणार आहे ? त्याच्या सोबत घालवलेल्या सुंदर आठवणींत तो जिवंत आहे. त्याला अश्रूंच्या प्रवाहात वाहून नको जाऊ देऊस. मला ताई म्हणतोस मग माझं नाही ऐकणार का ? तुला अमितची शपथ..." बोलता बोलता तिचा ऊर दाटून आला.
तिचं बोलणं ऐकून त्याने मात्र मनाला सावरले. अश्रू टिपत दीर्घ श्वास घेतला.
" ताई, मला भेटायचं आहे तुला." तो शांत होत म्हणाला.
" मी येते घरी तुला भेटायला.." डोळे टिपत ती ही म्हणाली.
" नको.भावोजींना बरं नाही. तु तिथे असणे जास्त गरजेचे आहे. मीच येतो घरी तुला भेटायला." तो स्पष्टपणे म्हणाला.

" पण तु ठिक आहेस ना ?" तिने विचारले.
तिच्या या प्रश्नाचे त्याच्याकडे उत्तर नव्हते.
तिच्या या प्रश्नाचे त्याच्याकडे उत्तर नव्हते.
" मी येतो उद्या सकाळी." तो म्हणाला.
" सावकाश ये." म्हणत तिनेही फोन ठेवला.
'रुपेशला का भेटायचं असेल ' या शंकेवर 'त्याचा सामना श्रेयशशी व्हायला नको ' ही काळजी वरचढ ठरत होती.
त्याला फोन केल्यानंतर तिच्या चेहऱ्यावर चढलेली काळजीची लकेर मंदारच्या डोळ्यांतून सुटली नाही. संध्याकाळी नेहमीप्रमाणे चहा घेत बागेत बसलेले असतांना त्याने विषय काढला.
" आभा, काय झालं ? काही प्रॉब्लेम आहे का ?" तिच्या डोक्यावरून हात फिरवीत तो म्हणाला.
त्याच्या स्पर्शाने ती गहिवरली. तशीच त्याच्या खांद्यावर डोकं ठेवत तिने स्वतःला सावरले.
" आभा, काय झालं ? काही प्रॉब्लेम आहे का ?" तिच्या डोक्यावरून हात फिरवीत तो म्हणाला.
त्याच्या स्पर्शाने ती गहिवरली. तशीच त्याच्या खांद्यावर डोकं ठेवत तिने स्वतःला सावरले.
" इकडून गेल्यानंतर रुपेश पुन्हा त्याच डिप्रेशनमध्ये गेला. अमितच्या आठवणींत हरवला." म्हणत तिने त्याला सारं काही सांगितलं.
" असं अचानक काय झालं की तो पुन्हा ?" मंदार काळजीने विचारता झाला.
आभाकडे या प्रश्नाचे उत्तर तर होते;पण ते ती त्याला सांगू शकत नव्हती.
नकारार्थी मान हलवत तिने ते उत्तर लपविण्याचा प्रयत्न केला.
नकारार्थी मान हलवत तिने ते उत्तर लपविण्याचा प्रयत्न केला.
" त्याला तुझ्याशी काय बोलायचं असेल ?" मंदारला पुन्हा प्रश्न पडला.
" अमितविषयी बोलून कदाचित बरं वाटेल." तिने उत्तर दिले.
" बरं केलस तु त्याला इथे भेटायला बोलवलस. त्याची समजूत काढ." तिच्या डोक्यावरून पुन्हा एकदा हात फिरवत त्याने तिला पाठिंबा दिला.
" कधी येणार आहे तो ?" तो म्हणाला.
" उदया सकाळी. अरे, पण सकाळी तर तुझे स्टिचेस काढायला हॉस्पिटलमध्ये जायचे आहे ना ? मी विसरले. त्याला फोन करून संध्याकाळी यायला सांगते." डोळे टिपत तिने सांगितले.
" अगं तो आधीच डिप्रेस आहे त्यात तु आणखी त्याचा अंत नको बघूस. स्टिचेस तर काढायचे आहेत. मी येईन जाऊन." म्हणत त्याने मार्ग काढला.
" अरे पण.." ती पुढचं काही म्हणणार तोच त्याने तिला अडवलं.
" आता पण नाही आणि बिन नाही. भेट त्याला. भूतकाळातून बाहेर पडायला मदत कर. त्याची अवस्था श्रेयशसारखी व्हायला वेळ लागणार नाही. जखमेवर योग्य वेळी योग्य तो उपचार झाला नाही तर ती चिघळते." त्याने तिला समजावले.
श्रेयशचे नाव ऐकताच ती शांत झाली.
श्रेयशचे नाव ऐकताच ती शांत झाली.
' या भूतकाळाने आम्हां सगळ्यांनाच भरून न येणारी जखम दिली आहे. देवा निदान आपल्या माणसांच्या साथीने वेदना सहन करण्याची ताकद दिलीस आम्हांला पण श्रेयशचं काय ?
त्याच्याकडे ते ही नाही.' ती विचारांत हरवली.
त्याच्याकडे ते ही नाही.' ती विचारांत हरवली.
" आभा, काय झालं ?" तिला विचारांत हरवलेली पाहून मंदार म्हणाला.
नकारार्थी मान हलवत तिने स्वतःला सावरले.
" मी समजावते उदया श्रेयशला.."बोलता बोलता ती थांबली.
" मी समजावते उदया श्रेयशला.."बोलता बोलता ती थांबली.
"आय मिन रुपेशला.."पटकन भानावर येत ती म्हणाली.
मंदारकडे पाहत ती रडवेली झाली.
" आय ॲम सॉरी." म्हणत तिने त्याल गच्च मिठी मारली.
" ये वेडाबाई. सॉरी काय त्यात. चुकून नाव आलं श्रेयशचं त्यात एवढं काय झालं . श्रेयशला समजवायला त्याला काय प्रॉब्लेम आहे हे तुला कुठे माहित आहे आणि तसंही तु त्याला काय आणि का समजावशील. सो चिल. एवढं टेन्शन नको घेऊस.." तिच्या भोवतीची मिठी घट्ट करत तो म्हणाला.
ती मात्र त्याच्या मिठीत अश्रूंना वाट मोकळी करत होती.
' मी का समजावेन श्रेयशला, माझं काय नातं आहे त्याच्याशी ?' स्वगत होत तिने मनाला प्रश्न विचारले ज्याचे उत्तर दिला चांगलेच माहित होते.
' मी का समजावेन श्रेयशला, माझं काय नातं आहे त्याच्याशी ?' स्वगत होत तिने मनाला प्रश्न विचारले ज्याचे उत्तर दिला चांगलेच माहित होते.
त्याच्या दुःखाचं कारण आणि उपायही तिच तर होती. तिच्या एका माफीने त्याचा भार हलका होणार होता. कसल्याश्या जाणिवेने खंबीरपणाची एक लकेर तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट उमटली.
' मी माफ करेन त्याला. आयुष्यात पुढे जाण्याची गळ घालेन. तो इथून कायमचा निघून जाण्याआधी त्याच्या आयुष्यातील एका चुकीचं ओझं मी रितं करेन. त्याला जगावं लागेल नव्याने.जेवढया मनापासून त्याच्यावर प्रेम केलं तेवढयाच मनापासून किंबहुना अधिकच तिरस्कार केला. त्याची शिक्षा त्याला मिळाली आहे. आता पुरे झालं. त्याला असं जगतांना पाहून काळीज तुटतं. जरी तिरस्काराच्या रुपात असला तरी माझ्या मनात तो कायमच जिवंत होता. त्याला असं मरतांना नाही पाहवत. मी बोलेन त्याच्याशी.' दीर्घ श्वास घेत तिने आपला निर्धार पक्का केला.

" आभा, उदया त्याला भेटून लग्नाविषयीही बोलून घे. हक्काची जोडीदार मिळाली की त्याला या दुःखातून बाहेर पडायला मदत होईल." मधेच मंदार म्हणाला आणि ती भानावर आली.
" हा..?" ती विस्मयाने म्हणाली. श्रेयशच्या विचारांत असल्यामुळे क्षणभर मंदार त्याच्याविषयीच बोलत आहे असे तिला वाटून गेले. ती थोडीशी धास्तावली.
" अगं, उदया रुपेशला भेटणार आहेस ना तेव्हा त्याला लग्न करण्याचा सल्ला दे." मंदार असे म्हणताच ती सावरली.
होकारार्थी मान हलवत तिने प्रतिसाद दिला. अजून किती वेळ भूतकाळाचं हे पान मंदारपासून दुमडून ठेवायचं ही विवंचना तिला चलबिचल करून गेली.दुसऱ्याच क्षणी आपलं प्रेम नाही पण निदान त्यांची मैत्री तरी गोड आठवण बनून स्मरणात रहावी ही जाणिव वरचढ ठरली आणि त्याचसाठी तिने आपला भूतकाळ मंदारपासून कायमचा दूर ठेवण्याचे ठरवले.
इकडे नविन कंपनीच्या रुपात आईचं स्वप्न पूर्ण झाल्याचं समाधान श्रेयशला नविन ऊर्जा देऊन गेलं पण रुपेशला पाहून भूतकाळाचं ओझं पुन्हा डोईजड झालं.आभाच्या आईवडिलांनी दाखवलेली माया त्याला जगण्यासाठी वचनबद्ध करून गेली पण आभाची माफी मात्र त्याच्या जगण्याची प्रेरणा बनणार होती. ऑफिसची घडी बऱ्यापैकी बसली होती. आणखी दोन दिवस की तो तेथून कायमचा निघून जाणार होता.
जाता जाता तिच्याशी बोलण्याची इच्छा होती पण हिंमत मात्र होत नव्हती. रुपेशला भेटल्यानंतर तर त्याने आभाच्या समोर जाणेही टाळले होते. मंदारला भेटायला घरी न जाता फोनवरच त्याच्या तब्येतीची चौकशी करतांना त्याला वाईट वाटत होते पण त्याच्यामते तेच योग्य होते. मनावर पुन्हा एकदा भूतकाळाचे ओझे घेऊन निघून जावे लागणार इतवर त्याने मानसिकता बनवून घेतली होती.ऑफिसमधून आल्यावर अनाहूतपणे नजर त्यांच्या बंगल्यावर जायची पण त्याच क्षणी तो स्वतःला सावरायचा.

क्रमश:
©® आर्या पाटील