तु असा जवळी रहा ( भाग ५२ वा)
©® आर्या पाटील
आभाच्या मांडीवरून डोकं उचलत श्रेयशने डोळ्यांतील पाणी टिपले.हाताच्या ओंजळीत चेहरा झाकून रडणाऱ्या आभाच्या डोक्यावरून हात फिरवत तिला शांत केले. समोर टेबलवर ठेवलेल्या ग्लासात पाणी भरत त्याने तो आभासमोर धरला.
" आभा, पाणी घे." तिने मानेनेच नकार दिला.
" प्लिज." त्याने विनवणी करताच तिने तो ग्लास हातात घेतला.
" त्या दिवशीही मी तुझं ऐकलं असतं तर आजचा हा दिवस असा नसता.." म्हणत तिने ते पाणी प्यायले.
दीर्घ सुस्कारा सोडत तो पुन्हा तिच्या जवळ बसला.
" अमितच्या अपघातानंतर मी पूर्णपणे तुटलो. गाडीतून उतरून जेव्हा मी त्याच्या जवळ गेलो तेव्हा माझ्या पायाखालची जमिनच सरकली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या त्याला मांडीवर घेतांना काळीज गलबलून आलं. क्षणभरासाठी उघडलेले त्याचे डोळे खूप काही सांगत होते. त्याने घट्ट धरून ठेवलेला माझा हात त्याची जगण्याची धडपड स्पष्ट करत होता .त्याला होणारी वेदना काळजाला पोखरत होती. त्याला काहीतरी बोलायचे होते पण शब्दांनी साथ सोडली होती. क्षणाचा अवकाश की त्याने डोळे मिटले ते कायमचे. माझा हात हातात धरत माझ्याच मांडीवर त्याने जीव सोडला. त्या अपघातानंतर असा एकही दिवस गेला नाही की मी आतून मेलो नाही.त्याचा रक्ताळलेला चेहरा मला बैचेन करायचा.त्याचे ते वेदनेने भरलेले डोळे आठवताच मला स्वतःला संपवावे असे वाटायचे. त्याच्या अपघाताला सर्वस्वी आपण कारणीभूत आहोत ही सल मला धड जगूही देत नव्हती आणि मरूही. तुझा आईबाबांचा चेहरा सारखा समोर यायचा.अमितनंतर तुमची काय अवस्था झाली असेल ही कल्पनाही भयावह वाटायची. तुझ्यावर कोसळलेल्या दुःखाच्या डोंगराला मी कारणीभूत आहे ही वास्तवता मला एवढी छळत होती की मी स्वतःला संपवण्याचाही अयशस्वी प्रयत्न केला." भिंतीला डोकं टेकवतं त्याने आपला गतकाळ सांगितला.
भूतकाळाच्या त्या प्रसंगाने अमितचा चेहरा तिच्या डोळ्यांसमोर साकार झाला. श्रेयशने सांगितलेल्या अमितच्या आयुष्यातील शेवटच्या आठवणींत तो तिला पुन्हा भेटला. श्रेयशची झालेली अवस्था ऐकून तिला रडू कोसळले.
" तु आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलास.." ती रडत विचारती झाली.
" माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. अमितच्या अपघाताचं आणि तुला कायमचं गमावल्याचं शल्य जगू देत नव्हतं. मी शून्य होतो तुझ्याशिवाय. माझ्या जगण्याला काहीच तर अर्थ नव्हता." डोळे गच्च मिटत तो म्हणाला.
" असं करतांना तुला मॅडम आणि सरांचा विचार नाही आला." ती जाब विचारत म्हणाली.
" बेशुद्धावस्थेत असतांना त्यांनी मला हॉस्पिटलमध्ये नेले. शुद्धीत आल्यावर माझ्या बाजूला बसलेल्या दोघांना मी कमालीचे हतबल पाहिले. कोणत्याही परिस्थितीला धीराने सामोरे जाणारे ते दोघे त्यावेळेस पूर्णपणे खचले होते. स्वतःला संपवण्यापूर्वी मी त्या दोघांना संपवावे अशी इच्छा सांगून जेव्हा दोघेही रडले तेव्हा मात्र मी आत्महत्येचा मार्ग कायमचा बंद केला. फक्त आणि फक्त त्यांच्यासाठी जगायचे ठरवले. मी उभा राहिलो तो त्यांच्यासाठी. नियतीच्या मनात मात्र काहीतरी वेगळेच होते. माझ्या डिप्रेशनने त्यांचा बळी घेतला. मला सततचं डिप्रेशनमध्ये पाहून आईबाबाही विचारांच्या अधिन असायचे. आपल्या मुलाची अशी अवस्था कोणत्या बापाला पाहवणार होती. त्यादिवशी आईला दवाखान्यात नेत असतांना त्यांच्या गाडीचा अपघात झाला आणि माझ्या जगण्याची शेवटची आशाही संपली. तो नक्की अपघातच होता ना हा प्रश्न आजही मनाला पडला आहे." बोलतांना त्याच्या बंद डोळ्यांतून अश्रू ओघळले.
" किती सहन केलस तू आणि मी मात्र आपल्या प्रेमाच्या चितेवर स्वतःचा संसार उभा केला." ती रडत म्हणाली.
" तू ही स्वतःहून हे नक्कीच केलं नसणार. आपलं प्रेम एवढंही तकलादू नव्हतं की त्याची चिता रचली जाईल आणि..." बोलता बोलता तो शांत झाला.

" नव्हतच किंबहुना नाहीच. मी ही तुटले होते.अपघातामुळे मी अमितला गमावले होते तर तुझ्यावर लादलेल्या अपराधीपणानं तुला. मी फक्त हरले होते. अचानक रंग बदललेल्या माझ्या नशिबासमोर मी हतबल झाले होते. नियतीने मला तरी कुठे जगण्यायोग्य ठेवले होते. रोजच मरत होते अमितच्या आठवणींत आणि तुझ्या अपराधात. तुझा तिरस्कार करत होते पण तरीही प्रेम नव्हतं ना संपलं. जेव्हा आईबाबांनी मला तुला पुन्हा भेटण्याविषयी सांगितले तेव्हा त्यांचा प्रचंड राग आला. तुझ्यासोबत राहूनही मी तुला त्रासच तर देणार होते.माझ्या डोळ्यांत स्वतःला असं अपराधी तू नसता पाहू शकलास. डिप्रेशनचं भूत माझाही पिच्छा पुरवत आलच पण आईबाबांसाठी मला स्वतःला सावरावं लागलं. मरणाची धमकी देत त्यांनी मला मंदार सोबत लग्न करण्यासाठी वचनबद्ध केले. माझा नाइलाज होता. लग्नानंतर....." ती पुढे बोलणार तोच त्याने तिला थांबवले.
" लग्नानंतर मंदारने तुला सावरले. प्रेमाने तुझ्या आयुष्याची ओंजळ भरली. तुला नव्याने जगणे शिकवले. तुझ्यावर भरभरून प्रेम केले किंबहुना करत आहे." आता बोलतांना त्याला मात्र अश्रू अनावर झाले.
त्याला असे तुटतांना पाहून ती पुन्हा गहिवरली पण यावेळेस त्याला आधार देण्याची हिंमत मात्र तिला झाली नाही.
तिने त्याला रडू दिले.
त्याला असे तुटतांना पाहून ती पुन्हा गहिवरली पण यावेळेस त्याला आधार देण्याची हिंमत मात्र तिला झाली नाही.
तिने त्याला रडू दिले.
" तुला तुझी बाजू मांडायची एक संधीही दिली नाही हे शल्य कायमचं बोचत राहिल. मी तुला समजून घेऊ शकले नाही हा माझ्या प्रेमाचा पराभव होता. आज मी रुपेशला जसं माफ केलं तसं त्या दिवशी तुला माफ केलं असतं तर.." बोलता बोलता ती शांत झाली.
" तु त्या दिवशी मला माफ केलं असतं तर आज मंदारच्या जागी मी असतो का ?" त्याने तिचे हात हातात घेत निरागस प्रश्न केला. त्याचे भरून आलेले डोळे तिला मात्र व्याकूळ करून गेले. त्याच्या ओलेत्या नजरेत अजूनही तेच जुनं प्रेम तेवढच ओतप्रोत भरलेलं दिसलं. ती थोडा वेळ शांत झाली.
" जर हाच प्रश्न तू मंदार माझ्या आयुष्यात येण्यापूर्वी विचारला असता तर त्याचे उत्तर हो असते." तिने नजर खाली घेत उत्तर दिले.
आपसुकच त्याच्या हातातून तिचे हात मोकळे झाले. पाठमोरा वळत त्याने स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला. कसल्याश्या जाणीवेने त्याला खंबीर केले. तिच्याकडे वळत त्याने तिच्या डोक्यावरून हात फिरवला.
" तू सुखात आहेस यापेक्षा वेगळं काय हवं मला. मंदार, खूप चांगले आहे. एक चांगला मित्र, तुला समजून घेणारा पती, श्रेयावर जीव ओवाळून टाकणारा बाप आणि आईबाबांची काळजी घेणारा मुलगा." म्हणतांना त्याच्या चेहऱ्यावर समाधान झळकले.
तिला मात्र त्याच्या स्पर्शाने आणि शब्दाने भरून आले. अश्रूंनी पुन्हा तिच्या डोळ्यांचा ताबा घेतला.
तिला मात्र त्याच्या स्पर्शाने आणि शब्दाने भरून आले. अश्रूंनी पुन्हा तिच्या डोळ्यांचा ताबा घेतला.
" पण तू सुखात नाहीस ना. मी हे सगळच तुझ्याकडून.." ती बोलणार तोच त्याने तिला शांत केले.
" माझं सगळच माझ्याकडे आहे. माझे प्रेमही आणि त्या प्रेमाच्या गोड आठवणीही." तो खंबीर होत म्हणाला.
" श्रेयश, मला माफ कर. तुझ्या या परिस्थितीला फक्त आणि फक्त आपलं प्रेम कारणीभूत आहे." ती हात जोडत म्हणाली.
" हो.. अगदी बरोबर. माझ्या जिवंत राहण्याला फक्त आईबाबा कारणीभूत नव्हते तर आपलं प्रेमही तेवढ्याच अंशी कारणीभूत होतं. मी आत्महत्या केली हे तुला कळाल्यावर तुझी काय अवस्था होईल या कल्पनेने मी शहारलो. आईबाबांसाठी आणि तुझ्यासाठीही किंबहुना आपल्या प्रेमासाठी मी जगलो. माझ्या जगण्याला नक्कीच आपलं प्रेम कारणीभूत आहे." तो स्पष्टपणे म्हणाला.
" हा अपराधीपणा नाही सहन होत मला." ती रडू लागली.
" आभा, सावर स्वतःला. तुला असं रडतांना पाहून मात्र मी आतून मरतो." तिचे डोळे पुसत तो म्हणाला.
" का अजूनही तुला मलाच सुखात पाहायचं आहे ?" ती त्याच्या शर्टाला पकडत जाब विचारती झाली.
" कारण आजही माझं तुझ्यावर तेवढच प्रेम आहे किंबहुना आयुष्यभर ते तेवढच राहिल." तिचा चेहरा ओंजळीत धरत तो उत्तरला.
त्याच्या त्या उत्तराने ती मात्र शांत झाली. त्याच्यापासून दूर जात तिने अश्रू टिपले. समोरच्या सोफ्यावर बसत तिने सुस्कारा टाकला.
" मंदारसोबत जेव्हा लग्न ठरलं तेव्हा वाटलं कायमचं निघून जावं तिथून पण आईबाबांच्या वचनात कटिबद्ध होते. आमची पहिली भेट कशी, कधी आणि कुठे झाली काहीच लक्षात नाही आहे. त्यावेळी माझी मानसिकता आपल्या आठवणींभोवती गुरफटली गेली होती. लग्नाआधी त्याच्याशी फोनवर बोलतांना मी फक्त ऐकायचे. जुन्या आठवणींत गुंतलेल्या माझ्या कानावर त्याचं बोलणं पडतच नसायचं. तो बोलत असतांनाच फोन ठेवून तेथून निघून जायचे. लग्नाआधी भेटून त्याने माझ्या मनात दुसरं कोणी आहे का हे जाणून घेण्याचाही प्रयत्न केला पण मी मात्र तेव्हाही शांतच होते. लग्नात आपल्या प्रेमाच्या आठवणींभोवती फेरे घालत मी त्याला सात जन्माच्या सोबतीचं वचन दिलं.आमच्या लग्नाच्या गोड आठवणी नाही बनवू शकले मी कारण त्यावेळी मी तुझ्या आठवणींत हरवले होते." तिचे बोलणे आता त्याला बैचेन करू लागले.तो तिच्याजवळ येऊन बसला.
" लग्नानंतर जेव्हा मी मंदारच्या घरी आले खूप रडले. मला रडतांना पाहून तो ही हळवा झाला. त्या दिवसानंतर ते आजपर्यंत त्याच्यामुळे माझ्या डोळ्यांत पाणी येणार नाही याची मनापासून काळजी घेतली. त्याला न सांगताही जणू माझ्या मनातलं कळलं होतं.मला माझ्या भूतकाळातून बाहेर पडता यावं म्हणून तो वचनबद्ध झाला.जोपर्यंत त्याला मी मनापासून स्विकारले नाही,त्याने मला हातही लावला नाही. मी आनंदी रहावं एवढीच त्याची इच्छा होती. मी शांत असायचे तेव्हा तो बोलका व्हायचा,अमितच्या आठवणीत हळवं झाल्यावर हक्काने समजूत काढायचा. हळूहळू त्याच्यातील चांगला माणूस माझं मन जिंकून गेला आणि मित्र म्हणून मी माझ्या आयुष्यात त्याचं स्वागत केलं. त्यादिवशी खूप आनंदात होता तो. आमच्यातील मैत्री हेच त्याच्या आनंदाचं एकमेव कारण." बोलता बोलता तिच्या चेहऱ्यावर स्मितहास्य झळकले.
" मित्र बनून मंदारने मलाही सावरलं आहे." शून्यात नजर रोखत श्रेयश म्हणाला.
" त्यादिवशी बाबांना छातीत दुखू लागलं. शेजाऱ्यांचा त्यांना दवाखान्यात नेल्याचा कॉल आला आणि मी कोसळले. त्या प्रसंगी मंदार माझी शक्ती झाला. मला सावरत लागलीच त्याने गाडी काढली आणि दवाखान्याकडे वळवली. बाबांना ब्लॉकेज डिटेक्ट झाले.लगेच उपचार सुरू करणे गरजेचे होते. मंदारने मुलाच्या नात्याने बाबांप्रती आपले कर्तव्य बजावले.
रडणाऱ्या आईला मुलगा बनून सावरले.बाबांना असं पाहून हतबल झालेल्या मला त्याने मित्राचा आधार दिला.स्वतः हॉस्पिटलमध्ये थांबून आईला घरी पाठवले. बाबांना घरी सोडल्यावर त्याने त्यांना आमच्या घरी आणले. त्यांची गोळ्या औषधे, योग्य आहार, व्यायाम याची योग्य ती काळजी घेतली. तुझ्यासारखाच भासला रे तो मला त्यावेळेस. माझ्या आईबाबांची आपलं मानून काळजी घेणारा." ती त्याच्या डोळ्यांत पाहत म्हणाली. तो मात्र अजूनही शून्यात नजर रोखून होता.

" त्या वेळेस मी स्वतःला स्वार्थी वाटले. मंदार माझ्याप्रती सगळी कर्तव्य निभावत होता पण मी मात्र त्याच्या हक्काचं काहीच तर त्याला देत नव्हते. ना प्रेम,ना सहवास. स्वतःचा खूप राग आला. त्यारात्री त्याच्याच कुशीत शिरत खूप रडले. मला रडतांना पाहून तो ही हळवा झाला. त्याच हळवेपणाला सांभाळायची जबाबदारी माझी होती. मी त्याला माझ्यावरचा त्याचा हक्क दिला.शरीराने त्याच्याशी एकरूप झाले पण मनाने मात्र..." ती बोलता बोलता थांबली. आता त्याच्याकडे पाहणेही तिला शक्य नव्हते. त्याच्या डोळ्यांतून ओघळणारे अश्रू न पाहताही तिला स्पष्ट दिसत होते.
क्रमश:
©® आर्या पाटील
©® आर्या पाटील