Login

तू बाहेर पड आता...भाग 1

Sangharshatun marg Kadhayla hava
तू बाहेर पड आता...भाग 1

"मीनल अग काय झालं? का अशी रडतेयस?"

"मग काय करू स्वाती? आता सगळं नकोस झालंय. अस आयुष्य नको वाटतं, जगावंसं वाटत नाही ग. रोजचा तोच त्रास, तेच ते सगळं. कंटाळा आलाय मला."

"हे तू बोलतीयेस? तू अशी हरलीस तर तुझ्या मुलीला काय शिकवण मिळणार आहे. हेच की आयुष्याला हरून रडत बसायचं."


मीनल आणि स्वाती बालमैत्रिणी होत्या.

पहिल्या वर्गापासून ते बारावी पर्यंत त्यासोबतच शिकल्या. त्यानंतर कॉलेजही सोबतच केलं आणि लग्नही एकाच वर्षी झालं पण मीनलचं लव्हमॅरेज होत आणि स्वातीचं अरेंजमॅरेज होतं..

दोघीही वेगवेगळ्या शहरात गेल्या, कालावधाने संपर्क तुटला.
दोघीही त्यांच्या त्यांच्या संसारात रममाण झाल्या.


मीनल आणि राकेशने पळून जाऊन लग्न केलेलं होतं, त्यामुळे दोघांच्या घरचे त्यांच्या संपर्कात नव्हते, त्यांनी त्या दोघांपासून संबंध तोडले होते.

मीनलचं माहेर तुटलेलं होतं, पण आपलं प्रेम आपल्याजवळ आहे म्हणून ती आनंदात होती.

लग्नानंतर सुरुवातीचे दिवस छान मजेत आनंदात गेले.
राकेशचं किराण्याचं छोटसं दुकान होतं. दोघांचं भागेल एवढी कमाई करत होता तो. पहिले सहा महिने खूप छान गेले. त्यानंतर मीनलला दिवस गेले.

मीनलला दिवस गेले हे राकेशच्या घरी माहित झालं, आता आपल्या वंशाला दिवा मिळणार म्हणून त्या लोकांनी राकेशला आणि मीनलचा स्वीकार केला.

त्यांना स्वतःच्या घरी राहायला बोलावलं, दोघेही त्यांच्यासोबत त्यांच्या घरी राहायला गेले. घरापासून राकेशचे दुकान खूप लांब होते. राकेश सकाळी डबा घेऊन निघत असे तो रात्रीच घरी परतत होता. दिवसभर घरी मीनल आणि तिचे सासू-सासरे, नणंद घरी असायचे. मीनल घरचे सगळे काम करत होती.

सकाळी उठल्यापासून सगळ्यांच्या हातात सगळं देण्यापासून सगळं करत होती.
आणि वेळ मिळाला तर खोलीत आराम करत होती.

एक दिवस सगळे जेवण करायला बसले, मीनलने सगळ्यांना जेवण वाढलं आणि तीही त्यांच्यासोबत जेवायला बसली.

सगळ्यांनी जेवणाला सुरुवात केली, ती पहिलाच घास तोंडात घालणार तेच सासूबाईंनी ओरडणं सुरू केलं.

"ही काय भाजी बनवली मीनल? भाजीला काही चवच नाहीये. मीठ घातलं की नाही यात. भाजीला मीठ वाटत नाही आहे."


"आई मी मीठ टाकलेलं होतं."

"मग मी खोटं बोलते का? तू खाऊन बघ ना."

क्रमशः
0

🎭 Series Post

View all