तू बाहेर पड आता...भाग 2
मीनलने एक तास तोंडात घातला,
"मला तर मी बरोबरच वाटतंय."
"हो का म्हणजे मी खोटं बोलते का?"
"नाही आई मी तसं म्हणत नाही आहे."
"अहो बघताय का सूनबाईचे कारनामे? मला खोटं पाडतेय."
"येऊ दे राकेशला सांगते सगळं. तोंडावर तोंड देतेस ना सांगते त्याला सगळं."
मीनल न जेवताच तिच्या खोलीत गेली. तिला आज खूप भूक लागलेली होती. सकाळपासून फक्त एक कप चहावर होती ती. पण तिला सुखाने दोन घास खायलाही मिळालेले नव्हते.
रात्री राकेश आल्यानंतर तो खोलीत यायच्या आधी आईने त्याचे काम भरले, त्याला काय सांगितलं माहिती नाही पण खोलीत आल्या आल्या तो मीनल वर ओरडायला लागला.
"हे काय मीनल, तुला साधा स्वयंपाकही नीट करता येत नाही. आज भाजीत मीठ घातलेले नाहीस तू, का असं वागतेस? माझ्या आई बाबांना चांगलं बनवून खाऊ घालायचं नाहीये का तुला? नसेल तर तसं सांग."
"राकेश तू चिडू नकोस. आधी माझा ऐकून घे मी काय म्हणते ते. हे बघ मी पण भाजी खाल्लेली होती. भाजीत मीठ बरोबरच होतं. आता आई असं का म्हणतात मला माहीत नाही."
"अच्छा म्हणजे माझी आई खोटं बोलते तर."
"मी असं म्हणत नाहीये राकेश."
"मग तुला तसंच म्हणायचं ना की माझी आई खोटं बोलतीये म्हणजे माझी आई खोटारडी आहे आणि तू सत्यवान आहेस."
"राकेश प्लिज माझ्याशी वाद घालू नकोस. हे बघ आपण वेगळे राहत होतो तेव्हा आपल्यात एकदाही वाद झालेला नव्हता आणि आता आईमुळे वाद होतोय, का?"
"हे बघ तू मला जास्त अक्कल शिकवू नकोस, उद्यापासून चांगला स्वयंपाक करायचा असेल तर कर नाहीतर करायची गरज नाहीये."
"ठीक आहे नाही करणार मग मी." असं म्हणून ती अंथरूणाला पडली.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा