तू बाहेर पड आता...भाग 3
दुसऱ्या दिवशी मीनल किचनमध्ये गेलीच नव्हती. तिने स्वयंपाकही बनवला नव्हता. त्यावरून सासू आणि नणंद तिला खूप बोलल्या.
मीनल तिच्या खोलीत बसलेली होती पण त्या दोघींचं बोलणं तिच्या कानावर पडत होतं. तिने त्याकडे दुर्लक्ष केलं.
आता रोज रात्री राकेश आल्यानंतर तिच्यावर ओरडत असे
कारण त्याची आई आधीच त्याचे कान भरायची. मीनल बद्दल काहीतरी वाईट साईट सांगायची. खरं काय खोटं काय याची शहानिशा न करता तो तिच्यावर ओरडायचा.
कारण त्याची आई आधीच त्याचे कान भरायची. मीनल बद्दल काहीतरी वाईट साईट सांगायची. खरं काय खोटं काय याची शहानिशा न करता तो तिच्यावर ओरडायचा.
मीनलला सहा महिने पूर्ण झाले, आता तिचं पोट वाढायला लागलं असल्यामुळे तिला बसायला उठायला त्रास होत होता. मीनलला त्रास व्हावा म्हणून तिची सासू आणि नणंद काहीतरी करामती करत असायच्या. पण हे सगळं राकेशच्या लक्षात येत नव्हतं.
एक दिवस मीनल राकेशला फाडफाड सगळ बोलली.
"राकेश तुला कळत कसं नाहीये, तुझ्या आईची आणि तुझ्या बहिणीची चाल आहे आपल्या दोघांमध्ये भांडण लावायची. आणि आपल्याला वेगळ करायची. मला ओळखतोस ना तू तरी असा का वागतोस? तुला कळत कसं नाही. एक तर तुझ्या आईला आपल्या दोघांबद्दल काहीही लगाव नाहीये, मी प्रेग्नेंट आहे त्यांनी आपल्याला इथे बोलावलं.
त्यांना त्यांचा वारस मिळणार म्हणून त्यांनी आपल्याला इथे बोलावलं त्यांना आपल्याशी काहीही आपुलकी नाहीये. त्यांना फक्त नातवंडाच तोंड बघायचंय.
तुझी आई तुझी बहीण चुकीची आहे असं म्हणत नाहीये मी, तुमच्या आई आणि मुलाच्या नात्यात नाही पडायचंय मला. पण तू मला समजून घ्यावं, माझी ही बाजू ऐकून घ्यावी एवढंच मला वाटतं. प्लिज प्लिज मला समजून घे."
मीनल इतकं बोलूनही राकेशवर काहीच परिणाम झालेला नव्हता.
दिवस सरत होते, बघता बघता नऊ महिने पूर्ण झाले आणि मीनलने एक गोंडस मुलीला जन्म दिला.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा