Login

तू बाहेर पड आता...भाग 4 अंतिम

Sangharshatun baher pdata yayla hava
तू बाहेर पड आता...भाग 4 अंतिम


मुलगी झाली म्हणून राकेशच्या आईने त्या दोघांना घरातून हाकलून दिलं.

त्याचा खूप मोठा परिणाम राकेशच्या मनावर झाला. त्याला नको ते व्यसन लागले. तो व्यसनाच्या आहारी गेला.
मीनल त्याला सावरण्याचा खूप प्रयत्न करत होती.
पण त्यालाच स्वतःला सावरायचं नव्हतं.

हळूहळू त्याचा परिणाम दुकानावर व्हायला लागला. तो दुकान खोलून बसतही नसे, थोडा वेळ सुरू ठेवून जो धंदा झाला त्या पैशाने दारू प्यायला जायचा. घरात पैसे देणे बंद केलं होतं. आता मात्र मीनलची काळजी वाढली. घर कसं चालवायच? त्यातला तर मुलीचा खर्च, ती लहान असल्यामुळे तिच्या दवाखान्याचा खर्च वेगळा होताच.

त्याच्या दारूच्या व्यसनामुळे मीनलला खूप त्रास होत होता, तो रात्री रात्री उशिरा येऊन मीनलला मारायचा, तिच्याशी दुर्व्यवहार करायचा. तिला नको नको ते बोलायचा.
अनेक दिवस असं सुरू होतं. आता मात्र तिला हे सगळं असह्य होत होतं.

मीनलने दुकान स्वतःच्या ताब्यात घेण्याचं ठरवलं. तिला कळलं की राकेशने खूप उधारी करून ठेवलेली आहे, काही लोकांकडून व्याजाने पैसे घेतले होते.
सगळ्यांची कर्ज कशी फेडायची? सगळ्यांचा पैसा कसा द्यायचा म्हणून तिने दुकान विकून जी रक्कम आली त्याच्याने सगळ्यांचे कर्ज फेडले. हातात काही शिल्लक रक्कम होती.
पण नवऱ्याची साथ नाही म्हणून ती हरली, तिला एकट वाटू लागलं होतं.

आपलं असं जवळ कुणीही नव्हतं, माहेरची खुप आठवत येत होती पण ती तिथेही जाऊ शकत नव्हती.

अशातच एकदा तिची भेट बालमैत्रिण स्वाती सोबत झाली. एकमेकींना बघून दोघींना खूप आनंद झाला होता.
एकमेकींबद्दल विचारपूस करून दोघीही निघून गेल्या.


आज मीनल स्वातीला भेटायला आलेली होती, मीनलच्या आयुष्याबद्दल स्वातीला पूर्ण कल्पना होती.

"मीनल यातून तू बाहेर पड आता. मी तुझी मदत करेल."


स्वातीने तिला यातून बाहेर पडायला मदत केली.
मीनलला शिवणकामाची आवड होती, तिने शिलाई मशीन घेऊन तिच्या कामाला सुरुवात केली, नवऱ्याला नशामुक्ती केंद्रात दाखल केलं.

काही महिन्याने तो तिथून परतला, त्याला त्याची चूक कळली.

त्याने नव्याने सुरुवात केली आणि दोघांचा संसार फुलायला लागला.


समाप्त:


सगळ्यांच्या आयुष्यात एकदा तरी दुःखाचं सावट येतंच.
मग तो नात्यातला दुरावा असो की आर्थिक परिस्थिती असो. यातून बाहेर पडायला शिकायला हवं.

दुःखाला कुरवाळत बसायचं की त्यातून बाहेर पडायचं हे त्याचं त्याला ठरवता यायला हवं.
0

🎭 Series Post

View all