Login

भेटली तू पुन्हा ! भाग - अठरा

भक्ती विश्वराज
भेटली तू पुन्हा !


भाग - 18

लिली आणि अनन्या भक्तीच्या मागे धावत असतांना ती विश्वराजच्या अंगावर पडली.. हे सर्व करणारी लिली होती. अनन्या भक्तीला सावरायला जाणार इतक्यात लिलीने अनन्याला अडवून त्या दोघ नवरा बायको साठी घडवून आणले होते.

“ नवरा बायको.” हे ऐकून तिला आश्चर्यचा धक्का बसला. धक्का इतका जबरदस्त होता की तिने तिचे दोन्ही हात तिच्या दोन्ही गालांवर ठेवले आणि आपोआप डोळ्यांचा आकार मोठा झाला.

“ काय म्हणालीस तू  मिस्टर अभ्यंकर  भक्तीचा ... म्हणजे आदिराजचे डॅड. ” अनन्या पुन्हा खात्री करवून घेत होती.

“ म्हणजे हे सर्व तू या साठी केलं.” अजुनही अनन्याचा विश्वास बसत नव्हता. 

 “हो .”  लिलीने  खाली वर करत मान हलवली. अनन्या तिथेच एका खूर्चीवर बसली.


इकडे हे दोघे ही खाली पडून बोलत होते.
“ चांगलच बघतेच मी त्यांच्याकडे ” ती दात ओठ खात म्हणाली.

“ त्यांच्याकडे नंतर बघ पण पहिलं समोर बघून धावायचं ना. पडली असती आणि काही लगालं असतं म्हणजे.” तो काळजीने दटावत होता.

“ समोर बघूनच धावा होते तुम्ही एकदम माझ्या पुढे आले म्हणून पडले मी ..” 

“अरे जर तू बघून धावत होतीस तर मी कसा काय पडलो?”
खाली पडूनच दोघांची तू तू मै मैं चालू होती.

“ हॅलो, मिस्टर ॲण्ड मिसेस… जोडी तर तुमची एक नंबर दिसतेय पण  रोमान्ससाठी ही जागा योग्य नाहीये. कारण सर्व तुम्हालाच बघत आहे.” मध्यम वयाचा माणूस त्यांच्या जवळ येऊन म्हणाला. त्याच्या असं अचानक मध्ये बोलण्याने दोघांनी त्याच्याकडे पाहिले. आजूबाजूचीही लोकं कुजबूजत हसत होती. 

“ थॅक्य यू सो मच सर.”  त्या इसमाची कॉम्प्लिमेंट विश्वराजला  भारीच आवडली तो गालांच्या कोपऱ्यात हसला ती विचित्र नजरेने त्या माणसांकडे बघत होती..
“याला कमी दिसत आहे किंवा जास्तीचेच दिसत आहे.” ती मनात बडबडत होती..


“आम्ही रोमान्स नाही करत आहोत मी पडले यांच्या अंगावर.” ती चिडून त्या माणसाला सांगू लागली.

 भान येताच ती बावरून उठायला गेली आणि धापकन पुन्हा त्याच्या अंगावर पडली..

 
“सॉरी सॉरी ..” चेहरा पाडतच विश्वराजला बोलली.. सावरत ती उठण्याचा प्रयत्न करीत होती. तितक्यात ती पुन्हा त्याच्याकडे खेचली गेली सोबतच तिंच्या तोंडून ‘आह’ आवाज आला.. 

“ व्हॉट हॅपन्ड ..” 

“माझे केस अडकलेत.” तिचे मोकळे असलेले केस त्याच्या ब्लेझरच्या ब्रुचमध्ये अडकलेले होते तिने ते दाखवले.

“ओके. हळू काढ.” तिने पटकन त्यातले केस बाहेर काढले आणि पटकन बाजूला झाली.. तोही उभा राहिला.

“थॅक्य यू मिस्टर अभ्यंकर ॲण्ड बाय.” तिने त्याचे आभार मानले.. ताडताड पाऊल टाकत ती तिथून निघाली. राज खेळत होता त्याला सांगून ती लिलीला फोन केला.

“ राज खेळत आहे . त्याला घेऊन येशील थोड्यावेळात संध्याकाळ साठी रेडी व्हायचं आहे.”

“ हो.. मी त्याच्याजवळ आहे.” भक्तीने फोन कट केला..

 “अचानक हिला काय झालं ?” तो तिच्या पाठमोरी आकृतीकडे बघत मनात म्हणाला.

“ तुमची बायको रागवली हो.” तो माणूस विश्वराज कडे मिश्किल बघत म्हणाला.. .

“ अं .. हो ना .. ॲकच्युली तिने बेट लावली होती आणि माझ्यामुळे हरली म्हणून रागवली आहे.” विश्वराज सावरण्याचा प्रयत्न करत सुचेल ते बोलत होता.

“बाय द वे आय आम् विश्वराज अभ्यंकर .” विश्वराजने हात पुढे करत ओळख करून दिली.

“ अभ्यंकर ... अं म्हणजे ते अंजली एम्पायर आणि फॅशन इंडस्ट्रीचे नवीन ओनर मिस्टर विश्वराज अंजली अंभ्यकर.” तो माणूस आनंदून गेला. 

 “तुम्ही ओळखता मला.”
 
“तुम्हाला कोण नाही ओळखत मिस्टर अभ्यंकर मॅक्झीनमध्ये तुमची इंटरव्यूह वाचले आहेत..

“आय ॲम् अखिलेश देसाई.. माझी टेक्सटाईल कंपनी आहे.” दोघांनी शेकहॅन्ड केला.. 

“ मिस्टर अभ्यंकर खरचं तुमची जोडी एक नंबर आहे पण बायको रागवलीय तुमच्यावर आधी तिला लवकर मनवा. नाहितर खूप महागत पडतात हो या बायका..” देसाई हसत म्हणाले. 
यावर दोघेही मनापासून हसले..

“ खरचं खूप महागत पडलोय ज्याची किंमत कुणीही चुकवू शकत नाही.” तो मनात बोलला.

“ खूप वर्षांचा अनुभव दिसतोय .” विश्वराज अखिलेशला म्हणाला.

“बावीस वर्षांचा..आत्ताच नेकलेस घेऊन दिला.” अखिलेश त्यांचा अनुभव सांगत होते.. तितक्यात देसाईचा फोन वाजू लागला..       “अगदी शंभर वर्ष जगणार आहेत या.” मिसेस देसाई यांच नाव बघून ते मिश्किलपणे म्हणाले..


“ हो .. आलोच .” देसाई यांनी पुढचं बोलणं आटोक्यात घेतले.

“ चला भेटूया नंतर होम मिनिस्टरचा आदेश आलाय जावं लागेल. नाईस टू मी टू यू मिस्टर देसाई..” दोघांनी पुन्हा हात मिळवले. हात मिळवणी करून देसाई निघून गेले..


“माझी होमनिस्टर कधी अशी ऑर्डर देईल याची वाट बघतोय.” विश्वराज हलका उसासा सोडत पुटपुटला.

भक्ती आत आली आणि तिला तिच्या वागण्याचं आश्चर्य वाटत होतं. 

 ‘ मी असं कसं इतकावेळ त्यांच्या अंगावर पडूनच बोलत बसले होते.. आणि एक मिनट हे इथं कसे आलेत? हे मला फॉलो करत माझ्या मागे आले काय? काय ते बोलायलाच पाहिजे मला.’  ती मनात बडबडत होती.. तिचा संताप होत होता. त्यापेक्षा तर तिला जर विश्वराजला आदिराजचे सत्य समजले तर याची भिती वाटत होती… ती पटकन बाथरूम मध्ये जाऊन शॉवर खाली उभी राहिली.. आवरून बाहेर आली.. लिली आदिराजला घेऊन आली..

“ मम्मा, खूप मज्जा आली माझे नवीन फ्रेंडस पण झाले.”

“ माझं बाळ आहेच खूप गोड.” भक्तीने त्याचं कौतुक केलं.. 

“ चला फ्रेश होऊन आवरून खाली जायचं आहे..” भक्तीने छान आवरून त्याला तयार केलं.. ग्रे आणि व्हाईट कलरच्या लेंहगा त्यावर ज्वेलरी आणि माफक प्रमाणात केलेला मेकअप करून तीही आवरून तयार झाली.

“ मम्मा तू खूप सुंदर दिसतेय.” 

 “ऑ.. पण तुझ्यापेक्षा कमीच .”

“But my son always looks handsome.” या  वाक्यावर आदिराज गोड हसला. तिने त्याच्या डोक्यावरुन हात फिरवून तिच्या कपाळावर कडाकडा मोडली.

“Mamma, what is this?” तिच्या कृतीवर त्याने तिला विचारले.

“माझी आजी कौतुकाने आणि प्रेमाने करायची अशी. ही पण प्रेमाची पद्धत आहे.” राज ने ही अगदी तिच्यावरून तसेच केले. भक्तीने त्याला लगेच कुशीत घेतलं. त्याच्या कपाळावर ओठ ठेवले. डोळ्यातलं काजळ हलकच बोटावर घेऊन त्याच्या कानामागे लावलं..

“ दिदी सोबत खाली जा मी नंतर येते.” भक्ती

“ तू का नाही येतं ?”

“ बच्चा मला एक काम करून यायचं आहे सो तू जा एन्जॉय करं.”

“ मग मी पण नाही जात खाली इथे येऊन पण तू कामच करतेय.” आदिराज  बोलला आणि बाल्कनीत जाऊन बसला..
भक्ती त्याच्या मागे गेली.

 “रागवलास माझ्यावर ?” भक्तीने विचारले. त्याने मान डोलावून नाही म्हटले.

“मग बोलत का नाहीस?” 

“लग्नाला आलोय एन्जॉय करायचं सोडून स्ट्रेस मध्ये दिसतेय. माहिती आहे मला की लहान असल्यामुळे तू सांगत नाही. पण काही समजत नसेल तरीही तुझा टेंशनने भरलेला चेहरा पाहिला की मी अपसेट होतो ना… कसले विचार करत असतेस?” तो तिचा चेहरा त्याच्या चेहऱ्यांच्या ओंजळीत पकडून बोलत होता. त्याचं बोलणं ऐकून ती खरचं भारावून  गेली.. ‘फक्त माझ्या चेहऱ्यावरून याच्या लक्षात यावं की मी स्ट्रेसमध्ये आहे..   आईला आपल्या बाळाचं दुःख समजतं पण इथे तर आईच्या चेहऱ्यावरून त्याची आई स्ट्रेस मध्ये आहे हे जाणवलं. यापेक्षा ते सुख काय असणार बरं?’  डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.. पण आता मला त्याच्यासमोर खूप सर्तक राहावं लागेल. खूपच ऑब्जर्व्ह करतोय  माझ्यामुळे तो अपसेट व्हायला नको.’ ती विचार करत होती.   

 “राज तू जवळ असतांना मी कसलाच विचार करत नाही.” ती त्याला जवळ घेत म्हणाली.. त्याने ही त्याच्या छोट्या हातांचा विळखा तिच्या मानेला घातला..

“मग खाली जाऊया .” त्याने तिच्या हनुवटीला बोटांच्या चिमटीत पकडून विचारले. भक्तीने त्याच्या हातांवर ओठ टेकवत होकार दिला. राजला होकार तर दिला पण खाली विश्वराज आणि आदिराज समोर आले तर ? ही भिती धास्तावत होती. मनात बाप्पाचं नाव घेऊन ती राज आणि लिली सोबत खाली यायला निघाली होती. आधी तर ती अनन्याच्या खोलीत गेली.. अनन्या  तयार होत होती.. तिला बघून मगासचा प्रसंग आठवला. अनन्या आणि लिली तिच्या मागे हळदीचे हात घेऊन धावत असतांनाच ती विश्वराजच्या अंगावर पडली होती. 

“भक्ती आलीस तू..” अनन्या म्हणाली आणि मागे वळली.भक्तीला बघून ती पाहतच राहिली.

 “वॉव कमाल दिसतेस यार .. काश! मी मुलगा असता तर इथेच प्रप्रोज करून लगेच लग्न केलं असतं .” अनन्या हृदयावर हात ठेवत नौटंकी करत म्हणाली तसे लिली आणि आदिराज हसायला लागले. त्यांना पाहून अनन्याने डोळा मारत हसली. 

“असले डॉयलॉग माझ्यासमोर मारू नकोस मी चांगलीच ओळखून आहे तुला पण लक्षात ठेवं गोड बोलून मी फसणार नाहीये.”  तशी अनन्याने जीभ चावली. तिची नौटंकी भक्तीला कळली होती..

“ सॉरी यार थोडी मस्ती केली मी सॉरी ना.” अनन्याने पपी फेस करत म्हटले.. तिचे क्यूट चेहरा बघून भक्तीचा राग दूर पळाला.

“ठीक आहे केलं माफ .” भक्तीने तिचं नाक ओढलं..

“चल आवर लवकर!” भक्तीने तिला आवरायला मदत करू लागली.. लिली आणि आदिराज पुढे निघून गेले.. अनन्याचा फायनल टचअप केला. काळजाचा दिट कानामागे लावला.. अनन्याने एकवेळ समोरच्या आरश्यात स्वतःला निरखून पाहिलं. डार्क पर्पलच्या फ्लोअर गाऊन मध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. अनन्याला घेऊन भक्ती खाली निघाली..