जलदलेखन स्पर्धा
तू दुर्गा तू स्वयंसिध्दा - समर्पण - भाग १
"वाह व्वा क्या बात! किती जादू आहे या मुलीच्या स्वरात! इतक्या लहान वयात सूर तालाची एवढी प्रगल्भ जाणीव. आवाजातला गोडवा लाजवाब!" अशा
कौतुकमिश्रित वाक्यांबरोबर टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला आणि शालिनी भानावर आली. आज स्वराला संगीत क्षेत्रातला एक मोठा पुरस्कार मिळणार होता. स्वराची इच्छा होती की तो तिच्या आईच्या हातून म्हणजे शालिनीच्या हातून तिला मिळावा म्हणून स्वराचं गाणं ऐकण्यासाठी शालिनी पहिल्या रांगेतच बसली होती. आज संगीत क्षेत्रात स्वराचं जे काही नाव झालं होतं त्याचं सारं श्रेय ती तिच्या आईला शालिनीला आणि तिच्या कल्पना मावशीला देत होती. शालिनी सभागृहात बसली होती तरीही तिच्या नजरेसमोरून तिचा सारा भूतकाळ तरळून गेला.
शालिनीचे बाबा शरद मोरे मुळचे मुंबईचे. परंतु रेल्वेत नोकरी असल्याकारणाने त्यांची नेहमी बदली होत असे. ज्या ज्या ठिकाणी त्यांची बदली होई तिथे ते सारे कुटुंब स्थलांतरित होत असे. शालिनीच्या कुटुंबात आई शीला, बाबा, ती आणि अजून दोन धाकट्या बहिणी शर्मिला आणि राजश्री होत्या. परिस्थिती तशी बेताचीच होती. एकटे बाबाच कमावणारे होते. शालिनीला अभ्यासात काही गती नव्हती त्यामुळे तिने सातवी नंतर शाळा सोडून दिली. ती आईला घरकामात मदत करायची. शरदरावांच्या एकट्याच्या पगारात कुटुंबाचा सारा खर्च काही भागत नव्हता. म्हणून शीला आजूबाजूच्या चार घरी स्वयंपाकाची कामं करत होती. शालिनी आईला तिच्या कामात हातभार लावायची. शर्मिला आणि राजश्री अभ्यासात हुशार होत्या. त्या नेहमी वर्गात चांगला नंबर काढत होत्या. आपल्या आर्थिक परिस्थितीची जाणीव तिन्ही बहिणींना होती त्यामुळे त्या सगळ्याच खूप समंजसपणे वागायच्या.
शरद आणि शीलाचा संसार उत्तम रीतीने चालला होता याचं कारण म्हणजे शरदराव पण कामसू वृत्तीचे होते. स्वभावाने शांत होते. ते आपल्या पत्नीला नेहमी
घरकामात सुद्धा मदत करायचे. मुलींवर जास्त बंधनं नसली तरी शिस्तीचा धाक होता. रेल्वेत नोकरी असल्याकारणाने त्यांनी बऱ्याच गोष्टींचा अनुभव घेतला होता. वेगवेगळ्या स्वभावाच्या व्यक्ती त्यांच्या सहवासात आल्या होत्या. कडक शिस्त असल्यावर मुली कशा विरुद्ध दिशेने वागतात तेही त्यांनी पाहिलं होतं. सुट्टीच्या दिवशी सगळे मिळून कुठेतरी फिरायला जात असत. त्यांच्यातल्या नात्यांची गुंफण खूपच सुरेख होती. शरदरावांना जसं जमेल तसं मुलींच्या लग्नासाठी थोडे थोडे पैसे ते बाजूला ठेवत असत. हळूहळू मुली मोठ्या होत होत्या. शालिनी वीस वर्षाची झाल्यावर तिने सुद्धा स्वतंत्रपणे स्वयंपाकाची कामं घ्यायला सुरुवात केली आणि ती वडिलांना हातभार लावू लागली. ते मात्र तिला मिळालेले सर्व पैसे बाजूला ठेवत असत. तिघींमध्ये शालिनी खूपच हळवी आणि इतरांना मदत करणारी अशी होती. कुणाचेही दुःख बघून ती स्वतःच दुःखी कष्टी होत असे.

शालिनी जिथे जिथे कामाला जायची तिथे त्या सगळ्या लोकांना तिच्या वागण्यामुळे ती आपलंसं करून घ्यायची. अतिशय प्रामाणिकपणे आणि नम्रपणे ती काम करायची त्यामुळे सर्वजण तिच्यावर नेहमीच खुश होते. असंच एकदा शरद रावांची बदली गुजरात मधील एका शहरात झाली. रेल्वेत असल्याकारणाने त्यांना राहण्याची व्यवस्था करावी लागत नसे. रेल्वेची छान जागा राहायला मिळत असे. गुजरातला बदली झाल्यावर शीला आणि शालिनीने गुजराती पदार्थ शिकून घेतले आणि त्यांनी तिथेही स्वयंपाकाची कामं सुरू केली. दोघींच्याही हाताला छान चव असल्या कारणाने त्यांना नेहमीच उत्तम कामं मिळत गेली.
असंच एकदा शालिनी आणि तिच्या दोन मैत्रिणी फिरायला म्हणून जवळपास गेल्या होत्या. तेव्हा शालिनीला एका तान्ह्या बाळाचा रडण्याचा आवाज ऐकू आला. ती खूपच अस्वस्थ झाली आणि आजूबाजूला शोध घेऊ लागली तेव्हा तिला दिसलं की एका झाडाच्या बुंध्याजवळ एक तान्हं बाळ कपड्यात गुंडाळून ठेवले आहे. ती लगेच तिथे गेली आणि तिने बाळाला छातीशी कवटाळलं. रडूनरडून बाळ लालेलाल झालं होतं. शालिनीने विचार केला, आजूबाजूला पाहिलं, आवाज दिला परंतु आसपास कोणीही नव्हतं म्हणजेच त्या बाळाला कोणीतरी सोडून दिलं होतं. तिने त्या बाळाला आपल्या घरी न्यायचं ठरवलं. तिच्या मैत्रिणींनी तिला समजावलं की तू असं बाळ घेऊन जाऊ नकोस. तुझं अजून लग्न व्हायचंय त्यापेक्षा तू त्याला इथेच ठेव. ती त्यांना म्हणाली,
"इतक्या तान्ह्या बाळाला एकटं सोडून जायचं मला तरी पटत नाही. त्याला असंच इथे सोडून दिलं तर बिचारं मरून जाईल. मी त्याला माझ्या घरी नेणारच." शालिनी त्या बाळाला घरी घेऊन आली. तिने घरातील सर्वांना ते बाळ दाखवलं. ती खूप उत्साहाने सर्वांना म्हणाली,
"आई बाबा आता हे बाळ मी वाढवणार. त्याला खूप मोठं करणार. हे बाळ म्हणजे एक तान्ही मुलगी आहे. बघा ती किती गोंडस आणि निरागस आहे."
क्रमशः
(त्या बाळाला सांभाळण्यासाठी आई-बाबा हो म्हणतील का पाहूया पुढच्या भागात)
©️®️ सीमा गंगाधरे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा